चिव चिव चिमणी - तुमचा अभिषेक - परी नाईक - वय २ वर्षे ४ महिने

Submitted by संयोजक on 7 March, 2017 - 12:58

मायबोली आयडी - तुमचा अभिषेक
पाल्याचे नाव - परी नाईक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुप्पर गोड आहे परी. मस्त हावभाव आणि आवाजाच्या चढाउतारसकट गोष्ट सांगितलीये कि. तिनेच लिहिलेली दिसतेय.
आणि झोपायच्या आधी ब्रश हे डोक्यात फिट्ट बसलेलं दिसतंय. Lol

नावाप्रमाणे परी आहे पिल्लू. परीकथा वाचून तिला पाहायची फार इच्छा होती. हे कार्टून दिसतंय तरी कसं म्हणून.. Happy
फार गोड आहे परी. झोपायच्या आधी ब्रश अगदी ठसवलेलं दिसतंय मनावर. Happy

भारी आहे.
एकदम गोडगोड आहे हां परीराणी.
आणि काय पण खा, खारूताई/ उंदीर नाहीतर मटssssण!
ब्रश करायचं आणि मगच झोपायचं!
Wink

अरे वा, आले हे Happy
धन्यवाद संयोजक

खरे तर हा विडिओ जुना आहे. वय २ वर्षे ४ महिने, आणि आता या महिन्यात ती ३ वर्षांची होईल. याचे कारण आधी नुकतेच बोलायला शिकलेली तेव्हा मराठी कविता बघणे व्हायच्या तेव्हा तोडक्यामोडक्या पाठ होत्या. पण प्लेग्रूपला गेल्यानंतर ईंग्लिशचा टक्का वाढला. या ऊपक्रमाच्या निमित्ताने खरे तर हे जाणवले. आता घाईत मुद्दाम तिच्याकडून मराठी कविता पाठ करून घ्यावी असे वाटले नाही. अन्यथा ते कठीण गेले नसते, कारण मागे पंधरा ऑगस्टला दोनचार दिवसांतच जनगणमन बोलायला शिकली होती. असो, पण इथून पुढे मराठी बालसाहित्यापासून फार दूर राहणार नाही हे बघायला हवे. हा विडिओ या उपक्रमात घेतल्याबद्दल आणि या उपक्रमाबद्दल संयोजकांचे आभार !

मानवमामा, आमच्या घरातले निम्मे बोलणे तर तिचा जो लेटेस्ट टोन आणि डायलॉग असतात त्यातच होत असते Happy

अल्पना, हो. कथा तिचीच होती. प्रताधिकाराचा प्रश्नच ठेवत नाही आम्ही Happy
एक मोठ्ठे जंगल नाही तर गार्डनने कथा सुरू व्हायची आणि त्यात एकेक प्राणी यायचे. ताज्या घडामोडीनुसार त्यात शब्दांचे फेरफार व्हायचे. त्या दिवशीचा वार रविवार असल्याने लेटेस्ट शब्द मटण होता Happy

सस्मित, हो. स्टोर्‍या बनवणे, प्रत्येक प्रश्नाचे उलट उत्तर देणे आणि लॉजिकल इन्लॉजिकल वाद घालणे, पण आपला शब्द पडू न देणे ईत्यादी गुण दुर्गुण तिने माझ्याकडूनच उचलले आहेत असे म्हणू शकतो, पण हे फार पुढचं वर्जन आहे Happy

स्टोर्‍या बनवणे, प्रत्येक प्रश्नाचे उलट उत्तर देणे आणि लॉजिकल इन्लॉजिकल वाद घालणे, पण आपला शब्द पडू न देणे ईत्यादी गुण दुर्गुण तिने माझ्याकडूनच उचलले आहेत असे म्हणू शकतो>>>>>>>>> हे इथे सगळ्यांना माहितीये. Wink
पण हे फार पुढचं वर्जन आहे>>>>>>>>>> ह्याला +१००००

जशी इमॅजिन केली होती >>> फोटोंमध्ये तर पाहिले होतेस ना..

बाकी प्रतिसादांचे धन्यवाद Happy

फोटोंमध्ये तर पाहिले होतेस ना..--- हो, फोटो पाहिले होते, पण त्यात आवाज, झरझर बदलणारे हावभाव, टुनटुन उड्या.. हे सगळं नाही ना दिसत.. इथे बघुन मज़्ज़ा वाटली.

हो ते ही खरंय. आणि मी कितीही फेसबूक पोस्ट लिहिल्या तरी काही गोष्टी शब्दांतही उतरवू शकत नाही. म्हणून तिचे रांगण्यापासून चालणे बोलणे चढणे लटकणे आणि ईतर सारे प्रताप विडिओ रेकॉर्ड करून ठेवलेत. हा टेक्नॉलॉजीचा नक्कीच खूप चांगला फायदा आहे Happy

Pages