"गरूडाचे घरटे" अर्थात किल्ले तोरणा

Submitted by जिप्सी on 18 February, 2017 - 20:29

___/\___शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा___/\___


राजगडाला जशी संजीवनी, सुवेळा, पद्मावती तशीच तोरण्याला झुंजार आणि बुधला माची. यातील झुंजार विस्ताराने छोटी, पण आक्रमक! राजगडाच्या दिशेने निघालेल्या एका बलदंड सोंडेवरील हे नागमोडी बांधकाम म्हणजे एखादी सळसळणारी नागीणच! सळसळत जात जिने एकदम आपला फणा वर उचलावा अशी! या माचीच्या दोन्ही बाजूला खोल कडे आणि डोंगराच्या या धारेवरच दोन टप्प्यांमधील माचीचे बांधकाम. ज्याला चिलखती बुरुजांनी आणखी भक्कम केले आहे. तिचे वरून दिसणारे दर्शन जितके पोटात धडकी भरवणारे तितकेच तिच्या अंगाखांद्यावरून फिरताना दरारा वाढवणारे. शिवरायांच्या दुर्गाचे हे असले चंडिकेचे रूप पाहिले, की उत्तरेकडील किल्ल्यांचे अस्मानी सौंदर्य त्यापुढे फिके वाटू लागते.

(अभिजीत बेल्हेकर, लोकसत्ता)

 "If Sinhagad fort is Lions Den, then Torna is Eagles Nest"
"सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरण्यास गरुडाचे घरटेच म्हणावे लागेल"
- जेम्स डग्लस

तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.

तोरणा किल्ला घेऊन महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठांचा एकमेव किल्ला होय.

बालशिवाच्या पाहुनि अवघ्या थोर बाललीला
भविष्य जाणुनि हर्ष जाहला जिजाऊमातेला
गड जिंकले, राज्य निर्मिले, आता दैन्य जावे
सिंधू नदी दर्याला मिळते, तिथवर स्वराज्य व्हावे

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४
 गुंजवणे धरण
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
 मेंगाई देवी मंदिर
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
बुधला माची

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
झुंजार माची

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२
 सूर्यास्त आणि राजगड
प्रचि ३३

Group content visibility: 
Use group defaults

क्या बात है! सुपर्ब! शिव जयंती निमीत्त खरोखर महाराजांना त्रिवार मुजरा! काही फोटो अंगावर आलेत.

सुंदर फोटो, अगदी प्रत्यक्ष तिथे असल्यासारखे वाटतेय ! आणि आता बर्‍यापैकी स्वच्छता दिसते आहे या ठिकाणी. अर्थात याचे श्रेय धडपड्या युवकांना आहे !

अतिशय सुंदर फोटोग्राफ.

तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर.
<<
पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर मला वाटते किल्ले पुरंदर आहे, किल्ले तोरणा दुसर्‍या क्रमांकावर आहे.

वाह अप्रतिम फोटोग्राफी.. किल्ला ,वाटा यांचे सुंदर दर्शन घडवलंस जिप्सी.. धन्यवाद
अभिजीत बेल्हेकर यांनी केलेले वर्णन अगदी अ‍ॅप्ट आहे.. सुंदर भाषाप्रयोग!!

सुपर्ब फोटो सारे जिप...
दिदा म्हणते तशी खरच स्वच्छता दिसतेय..आय होप गड खरच असा हमेशा स्वच्छ राहिलं..
धरणातल्या पाण्याची निळाई मस्त वाटतेय.. आणि हो तू लिहिलेली माहितीही छानच..

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!!!

पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर मला वाटते किल्ले पुरंदर आहे, किल्ले तोरणा दुसर्‍या क्रमांकावर आहे.>>>>प्रसाद. माझ्या मते पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला तोरणा आहे. अर्थात जाणकार सांगतीलच. Happy

समयोचित आणि रोचक माहिती लिहीली आहेस. फोटो आवडले. पावसाळ्यानंतर हा परिसर अजून छान दिसत असेल.