Submitted by निशिकांत on 3 February, 2017 - 01:32
वेदनेच्या मैफिलीचा स्वर टिकाऊ होत नाही
जीवनाबाबत कसा हा नियम लागू होत नाही?
पोट भरण्याचीच मोठी मजबुरी, पदभ्रष्ट करते
हौस म्हणुनी कोणतीही स्त्री विकाऊ होत नाही
मानतो मी एकलव्याला स्वयंभू व्यक्तिरेखा
मांडुनी प्रतिमा गुरूची, तो शिकाऊ होत नाही
छेडती रस्त्यात स्त्रीला, गप्प सारे, पण कुणीही
सोडवाया जानकीला, का जटायू होत नाही
खेचण्याचा व्यर्थ केला यत्न पण पळतो पुढे तो
सुरुकुत्यांचे राज्य आले, काळ काबू होत नाही
शौर्यगाथा सांगणे सोडून टीव्ही पाहिल्याने
वाढवायाला शिवाजी, मा जिजाऊ होत नाही
पाळले जाते शुचित्वाला इथे, पण मजबुरीने
कोण संधी लाभता पटकन लुटारू होत नाही
ना चकोराला शशीचा वाटतो हल्ली भरवसा
दूरचा निष्ठूर सखया का दयाळू होत नाही ?
कर जरा "निशिकांत" मैत्री वेदनांच्या वास्तवाशी
मृगजळामागे पळाल्याने सुखायू होत नाही
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती छान लिहिलंय हो सर...
किती छान लिहिलंय हो सर....खूपच सुंदर,अगदी ओळ न ओळ आवडली...
वाव्वा...खूप सुंदर रचना!
वाव्वा...खूप सुंदर रचना!
जवळपास सर्वच शेर अप्रतिम!
मस्त रचना.....आवडली
मस्त रचना.....आवडली
खुप सुंदर रचना
खुप सुंदर रचना
मस्तच गझल. सुरुवातीला काफिया
मस्तच गझल. सुरुवातीला काफिया अवघड वाटला. पण एव्हढे शेर इतक्या सुंदरतेने निभावलेत. सलाम तुम्हाला.
खुप छान !! अतिशय अर्थगर्भ गझल
खुप छान !! अतिशय अर्थगर्भ गझल !!
सुंदर आशय ! आवडली !
खुप सुंदर....
खुप सुंदर....
फार छान!
फार छान!
सुंदर अर्थ,
सुंदर अर्थ,
'' छेडती रस्त्यात ............ जटायू होत नाही ''हे विशेष
वा
वा