मदुराई, रामेश्वर ट्रीपबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by मी_आर्या on 27 December, 2016 - 06:18

नमस्कार,

फेब्रुवारीमधे कन्याकुमारी येथे जाणार आहोत. तर सोबत मदुराई, रामेश्वरम ही करावे असा मानस आहे.
बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. लेडीज फक्त. तीर्थाटनाचाच उद्देश आहे. ट्रेन व बसनेच प्रवास करणार आहोत. शक्य झाले तर एका बाजुने विमानप्रवास होउ शकतो.
कुणाला या स्थळांचा म्हणजे मदुराई, रामेश्वरचा काही अनुभव, तसेच राहण्या/खाण्यापिण्याची व्यवस्था, जवळपासची मन्दिरे, कुठ्ला रुट सोपा पडेल इ माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Tamilnadu tourism चे हॉटेल तामिळनाडू असतात, हि सगळी हॉटेल्स एकदम मोक्याच्या ठिकाणी असतात. Online booking करता येते. यांचे जेवणखाण पण छान असते. आम्ही नेहमी ह्याच हॉटेलात राहतो. BTW, कर्नाटक tourism ची हॉटेल मयुरा पण खूप छान आहेत आणि मोक्याच्या ठिकाणी असतात.

http://www.tamilnadutourism.org/tour-operator/tour-packages.html

ह्या लिंक वर planned tours आहेत. मुंबई ते चेन्नई ट्रेन ने यायचे. पुढे हि टूर घ्यायची.

मी नुक्तताच दक्षिणेत बाईक राईड करुन आलो. गोवा पासून पश्चिम किनार्यानी कन्याकुमारी पर्यंत. तिथून रामेश्वरम , मदुराई , मुन्नार करून परत.
कन्याकुमारी ला Hotel Sun Park चांगले हॉटेल आहे . MakeMyTrip वरून बुकिंग केल्यास १०००/- डिस्काउंट पण मिळतो . आम्हाला २ बेड वाल्या रूम्स ८००/- प्रति दिवस या दराने मिळाल्या. Hotel Sun Park ला लिफ्ट आहे. कन्याकुमारी मध्ये भगवती अम्मन मंदिराजवळ हॉटेल Saravana आहे. उत्तम दाक्षिणात्य पदार्थ मिळतात.

कन्याकुमारी जवळ १३ कि.मी. वर सुचिंद्रम ला सुंदर मंदिर आहे. तिथल्या मंडपाच्या ४ खांबांमधून स्वर ऐकू येतात. थोडा पुढे पद्मनाभ पुरम राजवाडा पण आहे (२६ कि.मी.) Route - https://goo.gl/maps/RPyRW9jANx22

कन्याकुमारी वरून रामेश्वरम ला जाताना Thiruppullani ला पण एक मंदिर आहे. वेळ असल्यास नक्की बघा. (https://goo.gl/maps/wbScjJGpph72)

रामेश्वरम चे हॉटेल (Temple Tower) जरा महाग वाटले . तामिळनाडू tourism चे हॉटेल मिळत असेल तर नक्की प्रयत्न करा. अन्यथा Hotel Temple Tower आणि Hotel Setu आहे . जेष्ठ नागरिक आहेत तेव्हा लिफ्ट असलेले हॉटेल बघा. हॉटेल टेम्पल टॉवर ला लिफ्ट नाहीये . रामेश्वरमच मंदिर खूप सुंदर आहे . आम्ही संध्याकाळी ५.३० - ६.३० च्या सुमारास गेलो तेव्हा गर्दी नव्हती. ५ मिनिटात दर्शन झाले आणि मग शांतपणे मंदिर बघितले. ६०० फूट लांब कॉरिडॉर नक्की बघा. रामेश्वरम मध्ये हॉटेल गणेश आणि Saravana भवन चांगले आहे. दोन्ही हॉटेल्स मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच उजव्या बाजूला आहेत.

मदुराई ला आम्ही थांबलो नव्हतो, त्यामुळे हॉटेल बद्दल काही माहिती नाही देऊ शकत. मीनाक्षी मंदिर नक्की बघा.