चित्रकलेच्या साहित्याविषयी माहिती हवी आहे

Submitted by तनिष्का on 1 February, 2017 - 02:07

मला चित्र काढण्यासाठीच्या canvas विषयी माहिती हवी आहे; मी आतापर्यंत card sheet paper वर चित्रे काढली आहेत पण आता मला एक मोठे चित्र काढायचे आहे . पण मला canvas कसा असतो ; किती आकारांत उपलब्ध असतो; त्याच्या कीमती काय असतात.....तसेच त्यासाठीचे रंग वेगळे असतात का ? हे काहिच माहित नाही.....ज्यांना याविषयी काहि माहीती असेल त्यांनी कृपया मार्गदर्शन करा.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तनिष्का, canvas हे कापसापासून बनवलेले जाड कापड असते, ते ताणून लाकडी फ्रेमवर ठोकून बसवतात. त्यामुळे तुम्हाला ज्या आकाराचे पेंटिंग हवे त्या आकारात कॅन्वास फ्रेम बनवून घेऊ शकता. (चित्रकलेच्या साहित्याच्या दुकानात बनवून मिळेल).
canvas वर अ‍ॅक्रिलिक किंवा ऑइल पेंट्स वापरता येतात. रंगवायला सुरुवात करण्याआधी canvas वर जेसो (gesso) चा थर देउन canvas तयार (priming) करावा लागतो. (जेसोला स्वस्त पर्याय म्हणून काही लोक फेविकॉल वापरतात ) तो थर वाळला कि पेंटिंग सुरू करता येईल.
priming ची स्टेप बाय स्टेप माहिती इथे पहा.

तुम्हाला हव्या त्या साइजचा रेडिमेड कॅन्वास मिळत असेल तर दुकानदाराला जेसो ची गरज आहे का हे विचारून घ्या, रेडिमेड कॅन्वास बहुतेक वेळा प्राईम करून विक्रीला ठेवलेले असतात. किंमत कॅन्वासची साईज आणि वापरलेल्या मटेरिअल नुसार बदलते. साधारण किमती अ‍ॅमेझॉनवर चेक करा आणि विकत दुकानातून घ्या Wink