ती

Submitted by Chetan02012 on 23 January, 2017 - 11:42

"तिचं लग्न आहे रे पुढच्या आठवड्यात!!!"
"अच्छा, म्हणून JD चा खंबा उघडलास का डायरेक्ट??"
६० च्या पेग मध्ये २-२ ice cubes पडले.
"अरे पण हि ती कोण ???"
"ती कोण??? तुला लाज कशी नाही वाटत रे असं काही अभद्र बोलायला ?? तुझी जीभ कशी धजावली असं काही विचारायला???"
अजून कोल्ड-ड्रिंक पण नव्हत टाकलं ग्लास मध्ये.
(आपणच पडत घेतलेलं बर)"माफ कर मित्रा, पण आज माझ्या स्मृतिपटलावरच्या आठवणी मला भाव देत नाहीयेत , तूच दे जरा."
चषकांवर चषक आदळले आणि मुखाजवळ आले.
" अरे माझी ती रे .. तशी ती प्रत्येकाच्याच आयुष्यात असते. तिच्याशिवाय तुमचं आयुष्य म्हणजे व्हिस्की, सोडा , कोल्ड-ड्रिंक अँड इव्हन चकणा सुध्दा आहे. कमी आहे ती फक्त ice - cubes ची. म्हणजे तुम्ही पिताच हो,पण ice असता तर पेग अजून दनकेदार झाला असता असा निर्वाद मुद्दा चघळतच पिता. खरं पाहिलं तर उदाहरण चुकलं माझं. कारण ice तुम्हाला आज नाहीतर उद्या भेटतोच. पण ती तुम्हाला नाहीच भेटत. आणि अशी हि ती प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ठाण मांडून बसलेली असते."
अजून फक्त एकच घोट.
"दुःख समजतंय मला तुझं."
"तुला खरंच कळतंय.??
हे बघ.. तुमच्या कडे सगळं काही असत.चांगलं शिक्षण झालेलं असत, राहत घर असत, चांगली नोकरी असते आणि जीवाला जीव देणारी छोकरीही असते. आता छोकरी फक्त यमक जुळवण्यापुरतं बर का. तस त्या द्विपाद प्राण्याला बायको असंही संबोधतात. anyways तर जीवाला जीव देणारी छोकरीही असते. आयुष्य सुरळीत चालू असत. तसे प्रॉब्लेम्स असतातच पण ते चार भिंतीत असतात. सगळं काही इतकं सुंदर चालू असत कि जणू काही कोणाची नजरच लागेल.आणि ती नेमकी तुमचीच लागते.कशी?? एखाद्या गहिवरलेल्या , एकांती ,अबोल अश्या अभद्र-असुरी क्षणी तुमचं subconscious mind हळूच एक जुना कडी गंजलेला दरवाजा उघडत आणि तिच्या नावाचा एक किडा तुमच्या डोक्यात सोडून देतो. आणि तो तिथेच वळवळत राहतो.आणि त्या दरवाज्यातून बाहेर आलेल्या स्मुतीरूपी फिती तुमच्या नजरमंडलासमोरून फिरू लागतात.”
दुसरा पेग ओतला गेला..
"तिच्यासाठी तुम्ही खुप काही केलेलं असत. कारण ती पहिलीच असते हो.अशीच कुठेतरी बस स्टॉप वर किंवा शाळेत-कॉलेज मध्ये , may be even in society as well , दिसलेली असते . मग तिला पाहताच तुमच्या मनाला ती भावलेली असते, अंगभर रोमांच उभारून गेलेली असते.पहिल्याच नजरेत तुम्हाला घायाळ करून मनाच्या एका कोनाड्यात घर करून गेलेली असते.जेव्हा प्रेम म्हणजे शब्दाशिवाय एक भावनाही आहे हे तुमच्या खिजगणितही नसत तेव्हा ती प्रेमाची फुंकर घालून गेलेली असते.मग तुम्हाला कळत कि मनाला प्रेम नावाची एक पालवी फुटलेली आहे. त्यावेळी ती आणि तिचं तुमच्या जगात असते. तुम्ही तुमच्या एका वेगळ्या विश्वात बागडत असता. तिच्याशिवाय बाकी सबकुछ झूठ आहे असं वाटू लागलेलं असत.आणि सबसे बढकर म्हणजे तिला ह्या सगळ्याशी काहीच घेणं देणं नसत."
एक मोठ्ठा घोट.
"मान्य आहे कि तुम्ही हे सगळं परत अनुभवतात. तेवढंच किंवा त्याहूनही तीव्र. पण ती तीच राहते. नवीन भेटलेली तिच्यापेक्षा चांगली असेल , खूपच चांगली असेल. पण तिच्याशी तुलना करन तुम्हाला जड जात. कारणं तिच्याशी कोणाचीच तुलना नाही होऊ शकत. जस तुम्ही श्रीराम लागू यांच नटसम्राट नाटक आणि नाना पाटेकर यांचा नटसम्राट सिनेमा या दोन कलाकृती आणि कलाश्रेष्टींची तुलना नाही करू शकत तसंच. कारण दोन्हीही व्यक्ती आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत."
पुढचा पेग आणि जोडीला धूर सुध्दा .
"मग तुम्हाला वाटून जात की ती जर आयुष्यामध्ये असती तर आयुष्याची रंगत अजून वाढली असती.संपूर्ण जग जिंकल्याचा आभास आला असता. पण पुढच्याच क्षणी तुम्हाला वाटत की नाही आपण जो विचार करतोय तो चुकीचा नाही. कारण त्यावेळी तुमच्या conscious mind ने तुमचा ताबा घेतलेला असतो.आणि subconscious mind ने सोडलेला किडा तिच्यासकट तुमचं conscious mind त्या दरवाज्यापाठी कुलूपबंद करून अखंड अश्या पसरलेल्या त्या मेंदूच्या गोतावळ्यामधे भिरकावून देतो परत कधीही न सापडण्यासाठी. न सापडण्यासाठी हि कृती किंवा क्रियापद फक्त conscious mind च्या समाधानासाठी आहे हे माहीत असूनही वेड पांघरून subconscious mind conscious mind कडे पहात गालातल्या गालात हसत असत, पुढच्या क्षणाची वाट पहात."
आता मोजणं सोडूनच दिल .
"बर ते सोड. तुझी ती, तुझी crush होती की gf ??"
"कसा रे तू असा..बर तू विचारतो म्हणून सांगतो. ती माझी crush होती.."
"अच्छा...."
"फक्त थोडी हिम्मत केली म्हणून तिचं प्रमोशन झालं gf म्हणून"
"हाहाहा...(एवढंच) बर मग तुझं break up कस झालं?"
"माझा break up ... म्हणजे आम्ही एकमेकांपासून कसे दुरावलो.??..किंवा तिच्या हृदयमंदिरामधली माझी प्रतिमा तिने का फोडली??.... ... का त्या विधात्याला आमच्या दोघांमधली सलगी पहावली नाही आणि त्याने या संपूर्ण भूतलावरच्या त्याच्या अवाक्यातल्या शक्तींना का आव्हान केलं आमच्या मध्ये तफावत पाडण्यासाठी.???"
"अरे हो हो हो ... ब्रेक मार.."
"शेवटच बर होत ना रे??.... पण माझ्या मित्रा ते मी तुला नाही सांगणार .. नंतर कधीतरी सांगेन"
"अरे मग हा एवढा आटापिटा कश्यासाठी ???"
"हा सगळा?? तिच्याचसाठी रे .. पण तिच्या साठी म्हणजे त्या व्यक्तीसाठी नाही रे .. त्या भावनेसाठी... खरं सांगू मला तिचा चेहरा सुध्दा आठवत नाहीये. कोणालाच नाही आठवत रे . कारण ती केव्हाच निघून गेलीये रे.. आता फक्त एक भावना उरलीये ... फक्त एक भावना"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावनांनी भरलेलं एखाद पत्र...जे कधी तिला देऊन सुध्द्दा भावनाहिन राहिलं...असच काही झालाय ह्यात.... कोण कोणाला काय बोलतोय हे जर स्पष्ट पणे लिहले असतं तर अजुन छान झालं असत...

असो... बेस्ट ओफ लक पुढील लिखाणास..