देवळांचे अर्थकारण - भावना आणि तर्क

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 10 September, 2016 - 10:20

भावना आणि तर्क हे कधी एकत्र असत नाहीत. किंबहुना ह्या दोन गोष्टी नेहमी एकमेकांपासून लांबच असतात.
मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान आहे आणि त्याच्या मेंदूतला केमिकल लोच्या तर्क हा भावने इतक्या लवकर स्वीकारत नाही.
भावना ह्या सोप्या असतात, मेंदूला सहज ग्राह्य असतात
आणि त्या भावना जर चांगल्या शब्दांत गुडाळलेल्या असतील तर आपण फारसा विचार न करता त्या लगेच घेतो.
*म्हणूनच व्हॉट्सॅपवर व्हायरल झालेले संदेश हे भावनेला हात घालणारे असतात आणि अनेकदा तर्कहीन असतात*.
*हिंदूंचे सण जवळ आले की भावनांनी ओथंबलेले संदेश व्हायरल होतात*.
*होळी, दिवाळी हे कॉमन*.
आता त्या पाठोपाठ *गणपती हा सण भावनेने ओथंबलेल्या संदेशांच्या पंगतीला आला आहे*.
महाराष्ट्रातील *सकल प्रदूषणाचा कर्ता एकटा गणपती बाप्पा आहे*, हे आपण मनावर ठासून घेत आहोतच.
आता त्यापाठोपाठ *एक गाव एक गणपती, गणपतीला फुलं मिठाई नको, लालबागचा राजाच नवसाला पावतो का*?
*खरं तर कोणताच गणपती नवसाला पावत नाही वगैरे वगैरे संदेश यायला लागले आहेत*.
गणपतीच्या अनुषंघाने एका मेसेजमध्ये *भारतातील देवळांच्या आणि देवांच्या कमाईवर सवाल* उठवला आहे.
तर प्रश्न चांगला आहे, लोकशाहीत अश्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळायलाच हवं.
प्रश्नकर्त्यांचा अधिकारच आहे तो. ह्यालाच लागून आलेला उपप्रश्न म्हणजे
*देवळांना पैसे द्यावेच का*?
तो पैसा भारतातील *गोर गरीब जनतेला, अडल्या नडल्यांना* देता येऊ शकत नाही का?
*अनेक संसार त्यात सावरले जाऊ शकतात* वगैरे वगैरे !
उद्देश चांगला आहे, असा आलेला मेसेजही भावनेच्या पाकात घोळवून काढलेला असल्यामुळे आकर्षक आहे.
पण म्हंटलं ना कि भावना आणि लॉजिक्स हि एकमेकांसोबत कधी जात नाहीत. इथेही तेच झालंय.
ज्या चांगल्या भावनेने आपण गणपतीच्या देणगीचा प्रश्न उचललाय त्याच चांगल्या भावनेने
भारतातल्या *आपल्या सर्वांच्या आवडत्या तीन गोष्टींच्या आर्थिक व्यापाकडे बघुयात* !
ह्यातली आपल्या सर्वांची पहिली आवडती गोष्ट म्हणजे ' *चित्रपट* ',
दुसरा नवीन लागलेला छंद म्हणजे ' *आय पी एल* '
आणि तिसरी जिव्हाळ्याची पूर्वापार चालत आलेली गोष्ट म्हणजे
' *मद्य अथवा दारू* '...
फिल्म फ्रॅटर्निटी वगैरे म्हणतात त्या चित्रपट सृष्टीने २०१५ साली १४०० करोडपेक्षा जास्त धंदा केला होता.
ह्यावर्षी सप्टेंबर पर्यंत १४०० करोडच्या आसपास धंदा केला आहे.
एकट्या 'सुलतान' चित्रपटाची कमाई ३५० कोटी रुपये आहे.
ह्या सर्वात साऊथ इंडियाचा एकही पिक्चर नाही,
'कबाली' हा ब्लॉकबस्टर नाही किंवा 'सैराट' सारख्या इतर प्रादेशिक चित्रपटांची गणना नाही.
शिवाय हा अधिकृत हिशोब आहे, अनधिकृत किती असेल त्याची कल्पना नाही.
ह्याआधीच्या वर्षांच्या कमाईचा हिशोब ह्यात नाहिये.
आपला दुसरा आवडता नवीन छंद म्हणजे 'आय पी एल'.
आयपीएलचा ह्यावर्षीचा टर्नओव्हर १२०० कोटी रुपयांच्या आजूबाजूला आहे.
सोनी मॅक्स चॅनलला ह्यावर्षी फक्त जाहिरातींमधून अपेक्षित असलेला रेव्हेन्यू होता १२०० कोटी रुपये.
शिवाय बी सी सी आयने प्रक्षेपणाचा केलेल्या कराराची किंमत आहे ८२०० कोटी रुपये.
ह्याही सर्व अधिकृतरित्या जाहीर झालेल्या फिगर्स, अनधिकृत काही असेल तर त्याची कल्पना नाही.
भारतातील तिसरा आवडता छंद म्हणजे 'दारू'.
'द हिंदू' च्या आकड्यानुसार भारतात दर वर्षी २० बिलियन लिटर दारू विकली जाते
आणि फक्त दारूचा वर्षभरातला व्यवहार होतो १ लाख कोटी रुपयांहून अधिक.
*गणपतीचा किंवा देवळांचा आर्थिक व्यवहार कॅम्पेअर करण्यासाठी मी ह्या तीनच गोष्टी वापरल्या आहेत*.
आणि ह्या वापरल्या आहेत कारण देवळातली किंवा गणपतीची देणगी जशी सर्वसामान्यांच्या खिशातून जाते त्याचप्रामाणे
हे सर्व आकडे आपणच आपल्या खिशातून कन्ट्रीब्युत केलेले असतात.
*चित्रपट, आयपीएल आणि दारू ह्यासोबत कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स किंवा मोबाईल्स, फूड चेन्स, सोनं, चांदी ह्या सर्वांची माहिती यात धरली जाऊ शकते*.
पण तेवढं खोलात जायची गरज नाही. कारण तुलनेसाठी ह्या तीनच गोष्टी पुरेश्या आहेत.
त्यातून हा सर्व रॉ डेटा आहे. अजून खोलात शिरलो तर अजूनही बरेच मोठे आकडे हाती येतील.
गंमतीचा भाग असा की ह्या सर्व गोष्टी आपण आता गरज ह्या सदरात टाकल्या आहेत.
पण त्याचवेळी देव हि देखील एक भावनिक गरज आहे हे आपण मान्य करत नाही.
*माझा देव हि माझी एक सपोर्ट सिस्टिम आहे*
आणि *तिचं सगुण स्थान टिकवून ठेवायला मलाच खिशात हात घालावा लागणारे हे आपण मान्य करत नाही*.
लालबागच्या राजाच्या पेटीचा जो काही कोट्यांमध्ये हिशोब आहे तो बाहेर काढायला आपण सरसावतो,
त्या पैशाच्या दानात किती लोकांचं कुटुंब चालू शकतं, किती शेतकरी आपलं घर सावरू शकतात हे हिशोब आपण हिरीरीने करतो.
*पण दारू पिताना एका बीअरच्या पैशात एका कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण सुटू शकेल हा हिशोब कुणी करायला जात नाही*
की *आय पी एलचं तीन चार हजाराचं तिकीट काढताना एखाद्या विद्यार्थ्याचा चार सहा महिन्यांचा अभ्यासाचा खर्च त्यातून भागू शकेल*
हा विचार केला जात नाही.
तीच गोष्ट चित्रपटांची.
१०० कोटीचा धंदा केलेला पिक्चरच्या रेव्हेन्यूमध्ये आपलं सहा सातशे रुपयांचं कन्ट्रीब्युशन असतं
आणि *तेही कुणाला तरी उपयोगी पडू शकेल हे आपल्याला मान्य करायचं नसतं*.
*येऊन जाऊन हिशोब सणांच्या आणि देवांच्या नावाखाली खर्च होणाऱ्या पैशाचा मागितला जातो*.
*लालबाग, सिद्धिविनायक किंवा अजून कोणतीही देवस्थाने ह्यांना मिळणारा पैसा हा सायलेन्सर तुटलेल्या बाईकसारखा आहे*,
*स्पीड २० चाच पण गोंगाट मात्र हा मोठा* !!!
सर्वात महत्वाचं म्हणजे दान धर्म आणि इतर हिशोब ह्यासर्वांवर मेसेजेस आपल्या सणाच्या वेळीच येताना दिसतात.
*एखाद्या खानाचा पिक्चर रिलीज होतोय, तो पाहू नका*,
*ते पैसे एखाद्या संस्थेला द्या*
किंवा *३१ डिसेंबरला दारू पिऊ नका ते पैसे एखाद्या कुटुंबाला द्या असं कधी वाचलंय*?
असं कधीच होणार नाही.
*कारण भावनेत घोळवलेली भाषा वापरून आपले सण त्याने निष्प्रभ होणार नाहीत*.
*ते काम फक्त होळी, गणपती, दिवाळी ह्यातच होऊ शकतं*.
*आपली श्रद्धास्थानं बुडवणं, त्यांच्यापासून आपल्याला लांब नेणं हे एक कारस्थान आहे*.
*लोकांचे आदर्श बुडाले कि देश सहज बुडवता येतो*.
*भावनिक खच्चीकरण अर्थात डिमोरलायझेशनची हि एक पायरी आहे आणि आपण स्वतः हुन त्यावर जाऊन बसतोय*.
त्यामुळे *दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ*.
*आपली बुद्धी गहाण टाकू नका आणि बुद्धिभेद करणाऱ्या एकाही मेसेजला बळी पडू नका*.
ज्याप्रमाणे समाजात तळागाळातल्या लोकांना हात देणं हे आपलं कर्तव्य आहे
त्याच प्रमाणे
*देव, देश आणि धर्म ह्यांना बळ देणं हे आपलं काम आहे आणि ते विसरता कामा नये*.

*सम्पादित

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वामीजी, लेख व्हाट्स अँप साठी लिहिला होता का?
महत्वाचे शब्द बोल्ड करण्या साठी वापरलेला *---* सिंटेक्सट तसाच राहून गेलाय.

आपली श्रद्धास्थानं बुडवणं, त्यांच्यापासून आपल्याला लांब नेणं हे एक कारस्थान आहे*.
*लोकांचे आदर्श बुडाले कि देश सहज बुडवता येतो*

आत्ता माझ्या घरासमोरुन जी "नायक नही खलनायक हूँ मैं" असा डॉल्बी स्पीकर्स मधून ललकारा करीत "गणपतीची" विसर्जन मिरवणूक जाते आहे आणि त्यात सहभागी लोक जसे नाचत आहेत ते पाहता असली श्रद्धास्थानं असली श्रद्धास्थानं बुडवली तरच देश तरेल! हे असले आदर्श बुडालेलेच बरे.
तुम्हाला माहिती आहे का हे कारस्थान कोण रचतंय? I want to join them asap!

Ji +1 Happy
Hynche adarsh jar dolby soundsystems war, raste block karun, daru peeun dhingane ghalne ase ch astil tar apan kon tyana adavnare? Ghala dhingane.

गणेशोत्सव ही आय पी एल, हिंदी चित्रपट इत्यादींसारखीच एक कमर्शियल अ‍ॅक्टिव्हिटी (गल्लाभरू हा शब्द चालेल का?) आहे हे स्पष्टपणे सांगितल्याबद्दल अभिनंदन!

लेखात नक्की बुद्धीला किंवा तर्कालाच आवाहन केलंय ना? की भावनेला? त्याही सहज दुखावूबन घ्यायला, भडकवून घ्यायला तयार असलेल्या!

>>>भावना आणि तर्क हे कधी एकत्र असत नाहीत. किंबहुना ह्या दोन गोष्टी नेहमी एकमेकांपासून लांबच असतात.
मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान आहे आणि त्याच्या मेंदूतला केमिकल लोच्या तर्क हा भावने इतक्या लवकर स्वीकारत नाही.भावना ह्या सोप्या असतात, मेंदूला सहज ग्राह्य असतात<<<
अगदी पटले. अंधश्रद्धा टिकून राहण्याचे हे एक कारण आहेच

भारतातील देवळांच्या आणि देवांच्या कमाईवर सवाल उठवला आहे.>>>देवळांना पैसे द्यावेच का?>>> स्वामीजी आपणांकडून देवळांचे उत्पन्न, खर्च तसेच त्यांची आर्थिक कर्तव्ये व अधिकार ह्यासम्बन्धातील आकडेवारीसहित केलेले विश्लेषण वाचायला आवडेल.

स्वामीजी,
लेख व्हाट्स अँप वर फिरतो आहे असे समजले, तो लिहिताना सुद्धा मुद्दाम व्हाट्स अँप साठी लिहिला आहे हे पण स्पष्ट आहे, लेखाच्या शेवटी तुम्ही संपादित लिहिलं आहे, याचा अर्थ स्पष्ट कराल का?

तुम्हीच लिहिलेला लेख, संपादित करून इकडे टाकला आहात? ( म्हणजे लेखातील सर्व मते तुमची आहेत) कि व्हाट्स अँप वर फिरणारा लेख, तुम्हाला अपील झाला म्हणून काही उल्लेख गाळून इकडे प्रकाशित केला आहात (सोयीस्कर पणे काही मतांची जबाबदारी तुम्ही टळणार?)

स्वामीजी,
लेख व्हाट्स अँप वर फिरतो आहे असे समजले, तो लिहिताना सुद्धा मुद्दाम व्हाट्स अँप साठी लिहिला आहे हे पण स्पष्ट आहे, लेखाच्या शेवटी तुम्ही संपादित लिहिलं आहे, याचा अर्थ स्पष्ट कराल का?

तुम्हीच लिहिलेला लेख, संपादित करून इकडे टाकला आहात? ( म्हणजे लेखातील सर्व मते तुमची आहेत) कि व्हाट्स अँप वर फिरणारा लेख, तुम्हाला अपील झाला म्हणून काही उल्लेख गाळून इकडे प्रकाशित केला आहात (सोयीस्कर पणे काही मतांची जबाबदारी तुम्ही टळणार?)

स्वामीजी,

लेख चांगला आहे.

पण आपण एकच बाजू मांडली आहे. दुसरी बाजू मांडलीच नाही.

मंदिरांची संपत्ती किती आणि त्या संपत्तीचा करा विनियोग होतो हे मांडणे आवश्यक आहे. उदा. जर मंदिराचे उत्पन्न आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर उर्वरित उत्पन्न समाजासाठी वापरणे जास्त चांगले, असे मला वाटते. स्वच्छता, अन्नकोष, पाणपोया, रस्ते, धर्मशाळा, वृक्षारोपण, रुग्णालये अशा गोष्टी सहज करता येतील. लोकांचा देवावरील विश्वास सुद्धा वाढेल, मंदिरांचे उत्पन्नसुद्धा वाढेल आणि मंदिर परिसरात सर्वत्र समाधान नांदेल.

अनेक मुद्यांवर प्रतिवाद करता येऊ शकतो.
1. मी जेव्हा पैसे खर्च करून सिनेमा बघायला, आयपीएल ची match बघायला किंवा अगदी दारू प्यायला हॉटेलात गेलो की मला तिथे त्या अनुषंगाने येणाऱ्या सुविधा मिळतात. स्वछता, चांगली प्रसाधनगृहे, दर्जेदार खाद्य पदार्थ, आणि त्याची किंमत मी मोजतो. हाच न्याय देवळांना लावायचा झाला तर किती टक्के देवस्थाने या कसोटीला उतरतात?
2. जास्त पैसे फेकले कि मला कुठल्याही सिनेमाला लवकर आत सोडत नाहीत. दारू पिणाऱ्याला लवकर सर्व्हिस मिळत असेल पण स्पेशल दर्शन वाले आत आणि बाकी सगळे तासंतास रांगेत उभे असा तरी प्रकार कुठे होत नाही.
यावर काय म्हणणे आहे?
3. मी सिनेमाला गेलो की मला पुण्य लाभेल आणि नाही गेलो तर पापाचा धनी असे सामाजिक पिअर प्रेशर कुणी माझ्यावर टाकत नाहीत.
4. सिनेमा चालक, दारूविक्रेते आणि आयपीएल वाले याना करमणूक टॅक्स भरणे बंधनकारक आहे. त्यात आता करचुकवेगिरी चालते ते सोडा पण उद्या सगळ्या देवस्थानांना हिशेब सक्तीचे केले आणि त्यावर टॅक्स लावायचा प्रस्ताव आणला तर किती धुरळा उडेल.
5. सिनेमे, आयपीएल आणि दारू विक्रेते माझ्या घराशेजारी, दारात, रस्त्यावर मांडव टाकून कान बधिर करणारे लाऊड स्पीकर लावत नाहीत, रस्ते जॅम करून अक्खे शहर वेठीला धरत नाहीत, विषारी धुराचा अतिरेक करत नाहीत, खरेतर ह्या सागल्याबद्दल मी त्यांची सुविधा न घेताही पैसे द्यायला तयार होईन.

सध्या तरी इतकेच, यावर लेखक मजकूर काय बोलतात त्यावर पुढे बोलीन

आशुचँप - अगदी खरे. विशेषतः जास्त पैसे फेकले कि मला......................... असा तरी प्रकार कुठे होत नाही.

आता गरीबांना मदत हा मुद्दा. असे गरीब माहित पाहिजेत की जे स्वाभिमान सोडून अशी मदत स्वीकारतील. किंवा जे खरोखर दिलेल्या पैशाचा उपयोग गरजेसाठीच करतील. किंवा देणारेहि कुठलीहि अपेक्षा न ठेवता देतील.
अमेरिकेत तरी चॅरिटी च्या नावाखाली पैसे गोळा करून त्याचा भरपूर दुरुपयोग करण्याची उदाहरणे अनेक.
असे काही फार थोडे लोक आहेत जे यातून मार्ग काढून मदत करतात.

सनातनी धार्मिक भावना किंवा विधींशी तडजोड नाही .......गोष्ट संपली!

ज्यांना हिन्दू सणाची एलर्जी आहे ..... खुशाल सोडावा.

मन्दिरांच्या कमाईचा एक मोठा भाग सरकारी तिजोरीत ही जातो....हे ध्यानात घ्यावे.
चर्च किंवा मशिदींची कमाई कुणी विचारात ही नाही ...कुठे जाते.