फुंतरू/खंडू/छोटू

Submitted by kalyanib on 13 January, 2017 - 02:53

फुंतरू/खंडू/छोटू

आमच्या फुंतरूचा पहिला वाढदिवस काही दिवसां पूर्वी झाला. माबो वर हरिणी, वान्या वाचण्यात आले आणि फुंतरू बद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली. तर आमचा फुंतरू म्हणजे अतिशय उत्साही. २४ तास तो खेळू शकतो. मला कुत्र्याची फार आवड म्हणून बाबांनी परमिशन दिली. पण त्याच सगळं तुलाच करावे लागेल या बोली वर.. मग मी पण कुत्रा घ्यायच्या तयारीला लागले आणि खूप विचार केल्यावर ठरविले कि कुत्रा विकत न घेता adopt करायचा. रस्त्यावरील कुत्र्यांचे हाल बघवत न्हवते मग आपण असाच एक कुत्रा पाळायचा म्हणून शोधाशोध केली आणि एका मैत्रिणी कडून माहिती मिळाली कि तिच्या building मध्ये एका कुत्रींला पिल्लं झालेत.. ३ पिल्लं झालेली होती. मी भेटायला जायचा दिवस पक्का केला पण घरून नकार आला कि रस्त्या वरच पिल्लू नको. मग त्यांना समजावण्यात १ आठवडा गेला आणि त्या मैत्रिणीचा कॉल आला कि सगळे पिल्लू adopt झाले आणि त्यांच्या आईला NMC वाल्यांनी रस्त्यावरची म्हणून उचलून नेली. खूप राग आला, आणि तुम्हाला खर वाटणार नाही पण मी देवाला विनवणी केली, ''बाबा रे अडथळे दूर कर'' आणि माझं त्यांनी ऐकलं, त्या मैत्रिणीचा कॉल आला कि एका पिल्लाला तिनी परत आणलाय कारण त्याला ज्या लोकांनी नेलं होतं ते त्याला सतत माडीवर बांधून ठेवत उन्हात..मग काय लगेचच त्याला आजच संध्याकाळी न्यायला येते कोणाला देऊ नको बोलले आणि खुशीनी उड्या मारल्या. संध्याकाळ कधी होते याची वाट पाहत होती आणि त्या दिवशी ऑफिस मध्ये असंख्य चुका केल्या. शेवटी तो क्षण आलाच आणि फुंतरच आगमन झालं.
तर असा माझा फुंतरू, अतिशय चिडका, उत्साही आणि माझा जीव कि प्राण.. तो आल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला Dr. कडे नेलं आणि सगळे सोपस्कार पार पाडले. Dr. नि सांगितल्या प्रमाणे त्याला सगळं दिलं. पण त्याला आधीचे owner बांधून ठेवत म्हणून तो चिडका आणि भित्रा झाला. जरा आवाज आला कि घाबरायचा आता थोडा कमी आहे. त्याला दूध पोळी मधील फक्त पोळी आवडते मग दुधाचं बाउल घेऊन घर भर त्याच्या मागे पाळावा लागतं आणि गनिमी कावा करून त्याला दूध द्यावा लागत मग तो सुद्धा गनिमी कावा करून मला नाचवतो. त्याला फिरायला नेण्याचा एक प्रोग्राम असतो आपण तयार झालो कि त्याची लगबग बघण्या सारखी असते. घरभर पळापळी करतो, बेड वर चालून उड्या मारतो आणि मग मला खूप कष्टाने वाघाला पिंजऱ्यात बंद करतो तसे त्याला बेल्ट बांधावा लागतो. तरीही त्याच्या उड्या कमी झालेल्या नसतात. अशा तर्हेने तो आणि मी घर बाहेर पडतो आणि फुंतरू येणाऱ्या प्रत्येक गाडीवर त्याच्या २ पायांवर उभा राहून भुंकतो. येणारा प्रत्येक जण मग खूप विचित्र नजरेने मला बघत चालला जातो. पण हा पठ्या काही सुधरत नाही. अशा तर्हेने फुंतरू मला फिरवून आणतो रोज..
त्याला इंजेकशन घ्यायला आवडतं Dr सुद्धा बघत बसतात काय कुत्रा आहे. आणि मी शक्य तितका दुर्लक्ष करते आणि हा त्या Dr चे हाथ चाटून स्वच्छ करून देतो. त्याला Dr च्या क्लिनिक बाहेर शु शु करायला फार आवडतं. अश्या आमच्या फुंतरूचा पहिला वाढदिवस आम्ही खूप उत्साहात साजरा केला आणि त्याला गिफ्ट म्हणून रेबीज चे इंजेकशन पण दिले. त्याला बाबांच्या पाय जवळ झोपायला फार आवडतं तसेच आमच्या पैकी कोणीही घरी आले कि तो त्याच्या भाषेत बोलतो ते ऐकण्या सारखे असते. त्याला लहान मुले, सिलेंडर वाला,भांडेवाल्या बाई , पेपर , आणि आंघोळ मुळीच आवडत नाही.
असा आमचा फुंतरू ज्याचे त्याच्या पेक्षाही जास्त आमच्या वर प्रेम आहे.

नोट- मराठी कच्चे असल्यामुळे काही चुका झाल्यास क्षमा असावी.

pahila wadhadivas.jpgpahila wadhadivas_0.jpg10403680_248990742116489_4111697492379880893_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाव ! ! !मस्तच दिसतोय फुंतरू...
माझ्याही काही आठवणी आहेत,पिल्लुची,टॉमीची आठवण करून दिलीत...
छान वाटला लेख आणि फुंतरू वरील प्रेम...

मराठी लिहिण्यासाठी एक सांगू कां??
तुम्ही जेथे प्रतिसाद देता तिथे ब्लु कलर मध्ये apple (सफरचंद)आहे त्यावर क्लीक करा आणि दिलेल्या स्टेप follow करा...
सुरुवातीला हे असच होत नंतर सवय होईल हळूहळू ....
पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! ! !

विनिता.झक्कास, केदार धन्यवाद... फुंतरू मझ्यावर गेलाय

कावेरि नक्कि करते तसे. सान्गितले ते बरे केलेस ग...

फुंतरु नाव मस्त आहे, दुनियादारी चित्रपट आठवला.
अगदी लहान बाळासारखेच आहे कुत्र्याच्या पिलाचे सुख अनुभवणे. फक्त आम्हालाच तो पाळायला आवडत नाही Happy

कावेरि फुंतरू ला सांभाळणे म्हणजे अग्निदिव्य ग बाई... जावे माझ्या जन्मा तेंव्हा कळे>>>>हो ताई,लहान बाळासारखेच यांचे चोचले असतात,नाकी नऊ करून सोडतात.आमच्याकडे पण २वर्षापूर्वी दादांनी एक छोटस गोंडस पिल्लू आणलं होत,मी त्याला पिल्लूच म्हणायची,त्याच्याआधीही भरपूर येऊन गेली पण हा खूपच लहान होता(८-१० दिवसांचा असेल आणला तेव्हा),मी अगदी त्याला हाताने खाऊ घालायची,त्याच तोंड पुसायची,अंघोळीच्या वेळेस तर पळूनच जायचा.मी जाईल तिथे माझ्या मागेमागे असायचा....सगळे त्याला माझा बॉडीगार्ड बोलायचे.आमच्याकडे आज पर्यंत जी जी कुत्री आली त्या सर्वांना माझाच लळा होता.तो गेला तेव्हा खूप रडलो आम्ही Sad Sad ....
खूप इच्छा आहे माझी कि असच एखाद गोंडस पिल्लू परत आणायची ....बघू कधी पूर्ण होते ते...

अर्चना सरकार धमाल ??? सीमेवर तैनात असल्या सारखे सतत सतर्क राहावे लागते. पण मज्जा फार येते. घरी गेल्या बरोबर त्याला होणार आनंद शब्दात सांगू शकत नाही Sad Sad Sad

माझ्या कोलेजच्या दिवसात आम्ही पाळलेले दोन श्वान आठवले.
बोझो आणि राॅनी....
माझ्या दुर्दैवाने ते जास्त दिवस आमच्या सोबत राहु शकले नाहीत. आमच्या सोसाईटीने आक्षेप घेतला नाहितर आजवर ते सोबत असते.
खुपच छान आहे फुंतरु. जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्द्ल धन्यवाद.

Pages