Submitted by बाळ पाटील on 11 January, 2017 - 05:31
तुझी भाग्यरेखा तिथे भंगली
तुझी नीतिमत्ताा जिथे खंगली
बलात्कार झाला पुन्हा एकदा
तशी एक चर्चा पुन्हा रंगली
जिथे राहती या जगी कबुतरे
तिथे जाहल्या नेमक्या दंगली
जरी रूप घडले तिचे साजरे
शिला एक भोळी तिथे भंगली
स्मशानी जरी शांतता हे खरे
कुणी बांधली का तिथे बंगली
असा रे कसा तू इथे पोसला
विना शेपटीचा तरी जंगली
_बाळ पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरी रूप घडले तिचे साजरे शिला
जरी रूप घडले तिचे साजरे
शिला एक भोळी तिथे भंगली
स्मशानी जरी शांतता हे खरे
कुणी बांधली का तिथे बंगली
असा रे कसा तू इथे पोसला
विना शेपटीचा तरी जंगली>>>>>अप्रतिम !!!
सुरेख!
सुरेख!
बलात्कार आणी जंगली आवडले.
बलात्कार आणी जंगली आवडले.
बलात्कार आणी जंगली आवडले.
बलात्कार आणी जंगली आवडले.
बंगली हा शब्द पहिल्यांदाच
बंगली हा शब्द पहिल्यांदाच वाचनात आला. बंगली म्हणजे काय? छोटा बंगला का? खयाल मस्त आहे
अतिशय छान लिहिले आहे.
अतिशय छान लिहिले आहे. अर्थपूर्ण.
खूपच छान !!!!!!!!!!!!!
खूपच छान !!!!!!!!!!!!!
वाह् व्वा,क्या बात है!
वाह् व्वा,क्या बात है! प्रत्येक शेर खास!
"बंगली हा शब्द...." हो
"बंगली हा शब्द...." हो जयदीपजी.....छोटेखानी बंगला.धन्यवाद !
रमेशजी,सत्यजीतजी,शार्दुलजी,लल
रमेशजी,सत्यजीतजी,शार्दुलजी,ललिताजी....धन्यवाद!
कावेरीजी धन्यवाद!
कावेरीजी धन्यवाद!