बुद्धीमत्ता ,सर्जनशीलता, latent inhibition आणि मानसिक रोग!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 10 January, 2017 - 08:15

माणसाने केलेली प्रगती ही त्याच्या बुद्धीमत्तेमुळे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पण माणुस ही खुप मोठी टर्म आहे.माणसांचे अनेक प्रकार पडतात,कॉकेशीअन (युरोपियन्स), मंगोलॉईड(पौर्वात्य)ऑस्ट्रेलॉईड्स(भारतीय),निगरॉईड्स(आफ्रिकन) व इतर अनेक.यांच्यात जसे वर्णादी भेद आहेत ,तसेच बुद्धीमत्तेतही भेद आहेत.बुद्धीमत्ता म्हणण्याऐवजी सर्जनशीलतेत(creativity)खूप फरक आहे.जगाच्या बुद्ध्यांकावर जर नजर टाकली तर पौर्वात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आहे व त्यांचा मेंदू सर्वात मोठा आहे.त्या खालोखाल युरोपियनांचा बुद्ध्यांक व मेंदू व बाकीचे नंतर.जर पौर्वात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त असेल तर बहुतांश शोध ,सर्जनशीलता तिथे दिसायला हवी होती.पण आपण इतिहासात डोकावलो तर आपल्या लक्षात येईल की बहुतांश शोध ,सर्जनशिलता ,कला ,काव्य ह्यात आघाडीवर होते व आहेत ते म्हणजे कॉकेशीयन्स( युरोपियन्स).बुद्ध्यांक व मेंदूच्या आकारमानात दुसर्या क्रमांकावर असलेले युरोपियन्स जगाच्या पुढे कसे ?हे कोडे पडल्याशिवाय रहात नाही.आकारमानात मोठा असलेला मेंदू व उच्च बुद्धीमत्ता असुनही पौर्वात्य(Oriental's) कुचकामी का ठरले?
Race_IQ_Sketch_OrderFlipped.png
इथे विचारवंतांनी एक सिद्धांत मांडला आहे.जो मानसशास्त्राला अनेक दशके ज्ञात आहे. हा सिद्धांत आहे latent inhibition चा.

काय आहे latent inhibition(अव्यक्त अवरोध)?
आपल्या मेंदूकडे येणारी माहीती ही कीती उपयुक्त आहे हे मेंदू ठरवत असतो,आपल्यावर सतत होणारा माहीतीचा मारा (constant stream of information) मेंदूला सहन करावा लागतो.यातील कीती व कोणती माहीती आत घ्यायची व कोणती बाहेर ठेवायची हे ठरवण्याची मेंदूची क्षमता म्हणजे latent inhibition.उदा- आपल्या दाराचे हॅन्डल (doorknob) कसे आहे ,कसे दिसते व ते कसे काम करते हे आपल्याला माहीती असते,प्रत्येकवेळी दार उघडताना आपण जर ह्या माहीतीला ' नवीन माहीती' (new stimulus)म्हणून पाहू लागलो तर आपल्या मेंदूवर माहीतीचा अतिरीक्त ताण येईल(sensory overload) ,म्हणून मेंदू ही नेहमीची माहीती ब्लॉक करत असतो,या ओळखीच्या माहीतीसाठी मेंदूचे गेट बंद असते.
सर्जनशीलता (creativity)कशी उगम पावते?
उच्च बुद्धीमत्ता व low latent inhibition असा योग जुळुण आल्यास व्यक्ती सर्जनशील बनते.युरोपियन बुद्धीमत्तेच्या बाबतीत जरी दुसर्या क्रमांकावर असले तरी त्यांच्यात Latent inhibition कमी आहे.low latent inhibition म्हणजेच मेंदूला जास्तीची माहीती ,तिचे अवलोकन करण्याइतपत बुद्धीमत्ता याचे उत्तम योग युरोपियनांमध्ये जुळुण आले आहेत.याचा अर्थ त्यांच्या बुद्धीमत्तेला नेहमी नवीन खाद्य मिळत असते.एखाद्या जटील गोष्टीतून अन्वयार्थ लावण्याची त्यांची क्षमता जास्त आहे कारण त्यांच्यात low latent inhibition हा गुण प्रकर्षाने आलेला आहे.आता हा गुणधर्म त्यांच्यात का आला हा अजुनही अभ्यासाचा विषय आहे.

low latent inhibition आणि कमी बुद्ध्यांक----
Psychosis ह्या माझ्या मानसिक आजाराचे जेव्हा मी अवलोकन करायला लागलो तेव्हा अनेक उपयुक्त माहीती मला मिळाली.जर बुद्धीमत्ता कमी असेल व latent inhibition ही कमी असेल तर अशा व्यक्तींचा मेंदू सतत माहीतीच्या ओघाखाली असतो,पण कमी बुद्धीमत्तेमुळे माहीती सर्जनशीलतेत रुपांतरीत होत नाही.परिणामतः अशा व्यक्तींना सायकोसीस पासून स्किझोफ्रेनियापर्यंत कोणतेही मानसिक आजार होऊ शकतात.मानसिक आजारांचे प्रमाण युरोपियनांत अधिक असण्याचे देखील हे एक कारण आहे.ह्यावरुन सरळ दोन समीकरणे बनतात.
High intelligence + low latent inhibition= creativity
Low intelligence + low latent inhibition= insanity

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Interesting!
याबद्दल आणखी वाचायला आवडेल.
मी शोधतेच, पण तुमची सोर्स आर्टिकल्सही शेअर करू शकाल का?

भारतीयहि पौर्वात्य (पौरात्य नव्हे) असे मी समजत होतो.
माझ्या मते फार पूर्वी कदाचित असे भेद स्पष्ट असतील, पण हजारो वर्षात संमिश्र संतती जन्माला आल्यावर व इकडे तिकडे पसरल्यावर त्यातून आजच्या समाजाच्या बाबतीत सर्वसाधारण निष्कर्ष काढणे व तो मानणे हे कठीण वाटते.

मी जेंव्हा क्वचित यावर विचार करतो तेंव्हा मला वाटते की हजारो वर्षांपूर्वी भारतीयांनी देखील अ‍ॅस्ट्रॉनॉमी, वैद्यकीय शास्त्रात बरीच प्रगति केली होती, तसेच काव्य शास्त्र संगित नाट्य यातहि बरीच प्रगति केली होती. पण नंतर कदाचित सर्व तत्वज्ञानात भौतिक जगतातील सर्व अशाश्वत, शरीर तर कधीहि नष्ट होऊ शकते, मृत्यूनंतर आत्म्याच्या गती साठी देव वगैरे करा या विचारांचा पगडा जास्त बसला, त्यातून मुसलमानांसारख्या संपूर्णपणे भिन्न संस्कृतीचे वर्चस्व यामुळे अव्यक्त अवरोध वाढला नि बुद्धि जणू कोषात जाऊन बसली. हे भारताबद्दल, तसे सर्व युरोप मधे एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर व इतका प्रदीर्घ काळ तशी परिस्थिती नव्हती.

बुद्धिमत्ता किंवा सर्जनशीलता आणि मानसिक आजार यांचा जवळचा संबंध आहे हे बरेचदा दिसून येतं. पण latent inhibition ही संकल्पना नवीन आहे. वरती लिहिल्याप्रमाणे संदर्भ मिळाले तर फार छान नाही तर मी पण शोधेनच. धन्यवाद!

इंटरेस्टिंग! सोर्स द्या ना! अजून वाचायला आवडेल.
माझा प्रश्न - लो लेटंट इन्हिबिशन ऑटिझम स्पेक्ट्र्म किंवा हायपर अ‍ॅक्टिविटी असे परीणामही घडवत असावी का?

लिंक्स शोधून लेखात ॲड करतो.
हो,low latent inhibition चा ऑटीझमशी व ADHD शी संबंध आहे,मगाशीच एक लेख वरवर बघितला होता यासंबंधी.

ईंटरेस्टींग आहे.
जगातले सारे रंग माझ्या सेवेस हजर आहेत, पण मला चित्रकलाच येत नाही. काय करू काय करू.. हे प्रेशर माझा जीव घेणार आता..

पण या उलटही होऊ शकते ना
छानसे चित्र रंगवायचे आहे, ती माझी कुवतही आहे. पण रंग नेमके दोनतीनच आहेत माझ्याकडे. कसे करू कसे करू.. हे फ्रस्ट्रेशन जीव घेणार आता माझा

कॉकेशिअन्स जगाच्या पुढे सदासर्वदा आहेत हेच पटत नाही.
हे लोक जेव्हा रानटी अवस्थेत होते तेव्हा आपण कला विज्ञान आणि अध्यात्म या सगळ्याच बाबतीत त्यांच्या अनेक योजने पुढे होतो.
(नंद्यांचे म्हणणे पटतेय.)

अगदी मुस्लिम आक्रमणे झाली तरिही सुरूवातीच्या मुस्लिम आज्रमकांना इथल्या संपत्तीबरोबरच इथले ज्ञानही घ्यायचे होते.
बहुतेक गणित्/खगोलशास्त्र यांविएह्हयीचे सुरूवातीचे ज्ञान व्हाया अरब युरोपियनांना गेलेय.

याचा अर्थ पूर्वी आपला बुद्ध्यांक युरोपियनांपेक्षा खूप जास्त होता आणि मग अत्यंत कमी झाला असा आहे का?

सगळ्याच गोष्टी जेनेटिक्सच्या दृष्टीकोनातून आणि १+१=२ अश्यानाही पाहता येणार.
एक समाज म्हणून आपण मागे का पडत गेलो हे जेनेटिक्सप्रमाणेच इतिहास आणि इतर समाजशास्त्रे यांच्या आधारानेही पहावे लागेल.

मात्र एक समाज म्हणून युरोपितन लोक सध्या जास्त ओपन माईंडेड किंवा तुमच्या लेखाच्या भाषेत कमी लॅटेंट इन्हिबिशन असणारे आहेत.
पण त्याचे कारणही जेनेटिक्सपेक्षा सामाजिक असावे असे वाटते.
मागची कित्येक शतके आपल्या समाजाला सरधोपट किंवा इनसाईड द बॉक्स विचार करण्याचे शिकवण्यात आले आहे.
तर युरोपियनांना एक्स्प्लोरेशन करण्यास तिथल्या समाजाने प्रोत्साहन दिले आहे.

मात्र त्याअगोदर भारतातही वेगवेगळे विचार करण्यास /वेगवेगळ्या प्रकारे डोके चालविण्यास प्रोत्साहन मिळत होते असे दिसते.
अन्यथा इतके धर्म्/इतकी दर्शने/इतके खगोलशास्त्र इथे डेवलप झाले नसते.

सिंजी , मला तरी लेखातला मूळ मुद्दा म्हणजे बुद्दिमत्ता जास्त आणि लॅटेंट इन्हिबिशन कमी असल्यास क्रिएटिविटी वाढते हे पटत असले तरी कॉकेशियनांपुढे पौर्वात्य हे केवळ जेनेटिक रिझन्समुळे मागे आहेत हे पटत नाही.

साती,
रेस आणि आय. क्यू. च्या मुद्द्यावर इथे बरेचदा प्रबंध येत असतात. मलाही ती थेअरी पटत नाही. कारण नुसता डेटा असला तरी त्यामागे प्रीनेटल केअर, आर्थिक-सामाजिक परीस्थिती, भोवतालचे वातावरण, संस्कृती मधील फरक आणि त्यानुसार बुद्धी म्हणून कशा प्रकारच्या नैपुण्याला महत्व दिले जाते ते वगैरे अनेक गोष्टी येतील.

अक्का,सरधोपट युरोपियन्स सुपिरीयर आहेत असा दावा नाही.पण इन जनरल म्हणायचे होते. भारतातही आर्य आल्यानंतर प्रगत समाजव्यवस्था अस्तित्वात आली.आर्य हे युरोपियन्स नसले तरी कॉकेशीयन वंशाचे आहेत.आता सरमिसळितून कीति शुद्ध आर्य शिल्लक आहेत याबद्दल शंकाच आहे.
मला एवढेच म्हणायचे होते की high intelligence + low latent inhibition हे कॉम्बिनेशन युरोपियन्समधे जास्त आढळते.

इंटरेस्टिंग लेख.
सातीचं शेवटचं वाक्य पटतंय.
>> मला तरी लेखातला मूळ मुद्दा म्हणजे बुद्दिमत्ता जास्त आणि लॅटेंट इन्हिबिशन कमी असल्यास क्रिएटिविटी वाढते हे पटत असले तरी कॉकेशियनांपुढे पौर्वात्य हे केवळ जेनेटिक रिझन्समुळे मागे आहेत हे पटत नाही.
>> +१

सरसकटीकरणाबद्दलचा मुद्दा मान्यच आहे.

साती (किंवा कोणीही अन्य तज्ज्ञ), जेनेटिक्सवर इतर फॅक्टर्सचा उदा. भौगोलिक किंवा सामाजिक परिस्थिती (अर्थातच काळाच्या फार मोठ्या स्केलवर) परिणाम होतो का?

जेनेटिक फॅक्टर मॉडिफाय व्हायला (ते ही फेवरिबली मॉडिफाय व्हायला ) खूप काळ म्हणण्यापेक्षा खूप पिढ्या जाव्या लागतात.
व्हायरसमध्ये ही क्रिया १-२ महिन्यांत होईल, बॅक्टेरियांत एक दोन यरसमध्ये, तर सस्तन प्राण्यांत शेकडो पिढ्याही जाव्या लागतील.
मात्र लांबी/उंची/रंग यासारखी बुद्धिमत्ता ही काही एखाद दुसरा जीन किंवा चार पाच जीन्सचा समूह यावर अवलंबून नाही.
(तसं तर वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे काळानुरुप बुद्धिमत्ता म्हणजे काय हे बदलतं)

त्यामुळे सर्वायवलसाठी झालेलं एखादं मॉर्फॉलॉजिकल (बाह्यरूपातलं किंवा भौतिक) असं मॉडिफिकेशन एखाद्या जीनवर /जीन्सच्या समूहावर पिन्पॉईंट करता येईल तसं बुद्धिमत्तेसाठी करता आलं नसावं.

हो, over the generations असंच विचारायचं होतं. म्हणजे वर्षानुवर्षं गतानुगतिक विचारसरणी अवलंबली आणि नवीन पिढ्यांवर लादली जात असेल तर नंतरच्या पिढ्यांत ती आपसुखच अडॉप्ट केली गेली असं होण्याची शक्यता आहे का? रेसचा मुद्दा त्या अनुषंगाने रेलेव्हन्ट असू शकतो का?
अर्थात यात कारण कोणतं आणि परिणाम कोणता हे ठरवणंही अवघड असेल, पण मुळात संबंध असू शकेल का असा विचार मनात आला.
धन्यवाद.

लेख आवडला. लॅटन्ट इन्हिबिशन हा वाक्प्रयोग माहित नव्हता. मी सरसकट त्याला सेन्सरी ओव्हरलोड संबोधते. आपले सेन्सेस ही जी एक्स्ट्रा माहिती सतत मेंदूकडे पाठवत असतात ती फिल्टर करणे, तिची योग्य ती विल्हेवाट लावणे हे काम काहींच्या मेंदूला जमत नाही आणि मग सेन्सरी ओव्हरलोड होतो. सेन्सरी ओहरलोड झाल्यास कमी कॉन्सन्ट्रेशन,फोकस नसणे, लो अटेन्शन स्पॅन असे प्र्प्ब्लेम्स येतात. हे सर्व नक्कीच ऑटीझम वगैरे डिसॉर्डरशी संबंधित आहे.
खूप आवडला लेख मला. अजून माहिती तसेच सोर्सेस द्या. थँक्स सो मच!

खरे तर ख्रिश्चन व मुस्लिम धर्म उदयाला आल्यावर जिझस व अल्ला यांच्या खेरीज इतर कुणालाहि मानणे हे हेरेसी, धर्मद्रोह मानले जात असे. त्या मानाने हिंदू संस्कृतीत असे कुठेच नव्हते, म्हणूनच नाना पंथ उदयास आले. तेंव्हा उलट latent inhibition हा प्रकार युरोप व मध्यपूर्वेत अधिक होता असे म्हणावे लागेल.

त्याच काळात भारतात मात्र latent inhibition फार कमी असावे, म्हणूनच शास्त्र, कला, साहित्य इ. क्षेत्रात, अगदी कामशास्त्रात देखील भारतीय आघाडीवर होते.
मला वाटते पुढे मुसलमान आल्यावर कला शास्त्र विज्ञान यांना प्रोत्साहन देणारे राजे नाहीसे झाले, मुसलमानांचे क्रूर अत्याचार, जे जे हिंदू असेल त्या सर्वांचा नायनाट करणे या मुळे शेवटी देव, देव, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, इंद्रियसुखे वाईट असले काहीतरी मुसलमानांपेक्षा जास्त कडवेपणाने भारतातल्या हिंदू लोकांत पसरवले गेले. ज्या वेळी यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते तत्र देवता हे लोक विसरले नि अर्धा समाज अनेक वर्षे अंधःकारात लोटला.
वाईट, वाईट काळ तो.

>>>> चांगला लेख / ललित लिहिलाय सिंजी , मग अधुन मधुन असं बावचळल्यासारखं का करता ? <<<<
मी पण अगदी हेच लिहायला आलो होतो.
चांगला विषय. वाचतोय. समजुन घेतोय.
यातिल कित्येक टर्म्स आधीच ज्ञात आहेत्/होत्या (पण माझ्या शब्दात - नॉट इन अ "साईन्टीफिक लॅग्वेज") Proud
सो अजुन माहित करुन घेतोय.

>>>> ईंटरेस्टींग आहे.
जगातले सारे रंग माझ्या सेवेस हजर आहेत, पण मला चित्रकलाच येत नाही. काय करू काय करू.. हे प्रेशर माझा जीव घेणार आता..
पण या उलटही होऊ शकते ना
छानसे चित्र रंगवायचे आहे, ती माझी कुवतही आहे. पण रंग नेमके दोनतीनच आहेत माझ्याकडे. कसे करू कसे करू.. हे फ्रस्ट्रेशन जीव घेणार आता माझा >>>> Lol

माझे याचेहून तिसरेच असते, म्हणजे असे की लहानपणि रंग उपलब्ध नसायचे, रंगांची कागदाची टंचाई, म्हणुन मग रंग हातचे राखून चित्र काढू पाहिल्याने ते गचाळ व्हायचे.
आता भरपूर रंग साहित्य उपलब्ध आहे, पण पूर्वीची ती रंगांच्या "काटकसरीची सवय" काहि केल्या जात नाही.... अगदी भिंतीला डिस्टेंपर लावायचा तरी ठिपकाही वाया जाऊ न देण्याची कसरत केली जाते.
आता ही वैचारिकतेत भिनलेली कोकी काटकसर कृतित उतरते, तिच्यावर काय उपाय? कोणत्या मानसिक द्वंद्वाचे हे लक्षण?
असो.

दोन शंका : स्वतः वाचन करेनच, पण इथे चर्चा झाल्यास आवडेल Happy

लॅटेंट इन्हिबिशन वयोपरत्वे बदलत जाते का? लहान मुलांमध्ये ते कमी, आणि मोठ्या माणसांमध्ये जास्त असे असते का?

बुद्धीमत्ता ही रेसमध्ये कशी मोजली जाते? इंडीविज्युअल ट्रेट असायला हवा असं मला वाटतं...

सिंजी तुम्ही हा धागा काढला..ह्याच फारस आश्चर्य नाही वाटल मला.अजुन असे काहीतरी व्हॅल्युएबेल धागे काढा ज्याने आमच्या माहितीत भर पडेल.अजुन ह्यावर वाचायला आवडेल. Happy
सगळे प्रतिसाद आवडले.

मला वाटते पुढे मुसलमान आल्यावर कला शास्त्र विज्ञान यांना प्रोत्साहन देणारे राजे नाहीसे झाले, मुसलमानांचे क्रूर अत्याचार, जे जे हिंदू असेल त्या सर्वांचा नायनाट करणे या मुळे शेवटी देव, देव, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, इंद्रियसुखे वाईट असले काहीतरी मुसलमानांपेक्षा जास्त कडवेपणाने भारतातल्या हिंदू लोकांत पसरवले गेले. ज्या वेळी यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते तत्र देवता हे लोक विसरले नि अर्धा समाज अनेक वर्षे अंधःकारात लोटला.
वाईट, वाईट काळ तो.

ऊठसूठ मुसलमान दोषी !!!

मुसलमानांचे राज्य उणेपुरे तीन चारशे वर्षे , तेही सर्व भारतात कधीच नव्हते... महाराष्ट्रात तर साक्षात मराठेच सत्तेत होते... त्यानंतर मुसलमान नामधारीच होते व तख्त राखायला पेशवेच जायचे म्हणे !! तरीही लॅटेंट इन्हिबिशनला मुसलमानच कसे जबाबदार हा गूढ प्रश्न कुणी सोडवेल का ?

बरं , भारतात ८०% जनता तेंव्हाही हिंदुच होती, आजही आहे.. आता तर ती बाबरी मशीद पाडूनही बरीच वर्षे झालीत .. मग अजुनही सर्व गोष्टीना मुसलमान जबाबदार कसे म्हणे ?

शिवाय वरचा तो ग्राफ , हिंदु मुसल्मान ख्रिस्चन असा नसून एशियन, युरोपियन , आफ्रिकन असा आहे... भारतातले सगळे हिंदु मुसलमान एशियन या एकाच गटात येणार ना? Proud

चांगला लेख. विषय खूप छान आहे. रेफरंसेस दिलेत तर अधिक वाचन करत येइल. तुमच्या लेखतील बेल कर्व्ह तुम्ही कोठून मिळविलीत?

बहुतांश शोध ,सर्जनशीलता तिथे दिसायला हवी होती.पण आपण इतिहासात डोकावलो तर आपल्या लक्षात येईल की बहुतांश शोध ,सर्जनशिलता ,कला ,काव्य ह्यात आघाडीवर होते व आहेत ते म्हणजे कॉकेशीयन्स( युरोपियन्स) >>>> ह्यासाठी कारणीभूत त्या काळातील सामाजिक आणि राजकिय परिस्थितीची आहे. मुळात शोध ,सर्जनशिलता ,कला ,काव्य ह्या सर्व गोष्टीसाठी सामाजिक आणि राजकिय स्थैर्य आवश्यक असते. जे युरोपात बर्‍याच अंशी होते. भारतापुरते बोलायचे झाले तर आपले सर्व ज्ञान आपण जातीयवाद आणि परकीय आक्रमणे ह्यात घालविले आहे. कित्येक शतके राजकिय स्थैर्य नसल्याने आपण केवळ लढाया करत राहिलो. सर्व ज्ञान एक विशिष्ठ वर्गासाठी राखून ठेवल्यामुळे संकुचित करून ठेवले. संपूर्ण भारत जर एकछत्री अंमलाखाली सुरक्षित आणि राजकीय दृष्ट्या स्थिर राहिला असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती.

इतर पौवार्त्य देशांचा इतिहास तपशीलासकट विशेष माहित नाही त्यामुळे तेथे अशी प्रगती का झाली नाही ह्या प्रश्नाला माझा पास.

Pages