भूलोकीचा "कैलाश" - वेरूळ लेणी (औरंगाबाद)

Submitted by जिप्सी on 5 January, 2017 - 11:02

१.५२ दरवाजांचे शहर - "औरंगाबाद"

२.देवगिरी (दौलताबाद) किल्ला — औरंगाबाद
========================================================================
========================================================================

महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगांव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे. वेरूळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात. वेरूळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते. भारतातील महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आले. वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा एका अखंड खडक वापरण्यात आला असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली असणार. ह्या मंदिराच्या निर्मितीमागचे असामान्य शिल्पज्ञान ह्या गोष्टी हजार-दीडहजार वर्षांपूर्वी ज्या माणसांना अवगत होत्या त्यांची नावेही इतिहासात कोणी नोंदवलेली नाहीत.
(साभारः- विकीपिडिया)

प्रचि ०१
 DCIM\100GOPRO\GOPR9371.

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
 DCIM\100GOPRO\GOPR9345.

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
 DCIM\100GOPRO\GOPR9356.

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही रे जबरी फोटोज .
ज्या पद्धतीने पडझड होतेय ते बघता पुढील काही वर्षांत बघायला तरी काही शिल्लक उरेल की नाही शंकाच आहे.

आमच्या शाळेची ट्रिप गेली होती तेव्हा हे सगळं बघितलं होतं. त्या आठवणी जाग्या झाल्या . मस्त आहेत फोटोज.
बाकी तिथे xyz लव्हज abc लिहिलेले साहित्य आहे का कायम अजून ? Sad

चांगले कोन घेतले आहेत. पहिल्या फोटोसाठी वेगळी ट्रिप मारावी लागली असेलच.ते कळसावरचे सिंह (२७,२८) आज दिसले फोटोमुळे. आवडले.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

ज्या पद्धतीने पडझड होतेय ते बघता पुढील काही वर्षांत बघायला तरी काही शिल्लक उरेल की नाही शंकाच आहे.>>>>अगदी अगदी. Sad

बाकी तिथे xyz लव्हज abc लिहिलेले साहित्य आहे का कायम अजून ?>>>>>नाही दिसले. बहुतेक सुरक्षारक्षक असल्याने लिहिण्यास कोणी धजावत नसेल.

पहिल्या फोटोसाठी वेगळी ट्रिप मारावी लागली असेलच.>>>>>नाही एकाच ट्रिपमधले फोटो आहेत. Happy ऑगस्ट महिन्यात गेलेलो. Happy

ग्रेट.......... नतमस्तक अशा कलाकारीपुढे अन त्या असंख्य अज्ञात कलाकारांपुढे...:)

इथे फोटो दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

सु रे ख ! अनेक वर्षात गेले नाही. दौलताबाद म्हैसमाळला जाणं होतं पण इथेही परत एकदा पाहावंस वाटतंय..

सुंदर ! एवढे बारकाईने दर्शन तर आमच्या प्रत्यक्ष भेटीतही झाले नव्हते.>>>>>१११११

सुंदर शिल्पं आणि प्रचि सुद्धा. प्रचि ४ आणि प्रचि १२ मध्ये कोपऱ्यात जे थोडं डिझाईन दिसतंय ते पूर्ण असताना हि शिल्प किती सुरेख दिसत असतील. एवढ्या वर्षानंतर सुद्धा इतकी छान दिसतात, तर त्या काळात काय दिमाख असेल या लेण्यांचा.

मस्त प्रचि.... ही स्थळे कशी बघायला हवीत ह्याची माझ्या सहित अनेक लोकांना कल्पना नसते... 2-3 तासाची धावती भेट देण्याची ही जागा नाही... बरेच पर्यटक उदासीन असतात, त्यामुळे अशा कलाकृति अवशेष रुपात उरतात...
जिप्सी यांनी काढलेले प्रचि नेहमी नविन दृष्टि देतात.

व्वा..

मस्त फोटो... भग्न मूर्ति पाहून खूप वाईट वाटते पण Sad
प्रचि ०४ मध्ये रावणाने शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कैलास डोक्यावर घेतला त्या प्रसंगाचे शिल्प आहे.
गुरुचरित्रात ती कथा येते.