आबा अन केदार

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

आबा आणि केदार एक नाट्यमय प्रवास

आबा लहान पणा पासून खुप हुशार पण भयंकर मनस्वी आपल्याला हव तेच करणारा आबाला नाटक सिनेमाच भारी वेड इतक की नट सम्राट नाटक त्याने सातही नटसम्राटाच्या संचात पाहीलेल पहाटे पाच वाजता उठून तो नाटकाच्या तिकेटाच्या रांगेत उभे रहायला जायचा पुढच्या खुर्च्या मिळाव्यात म्हणून पहिल्यांदा नाटक स्वता पहायचा स्वताला आवडल तर मग आईला बहीणी ला बायकोला मित्राना नातेवाईका ना दाखवायचा बरोबर स्वता असायचाच ( त्याना नाटक कळल नाही तर काय घ्या ब्वा) नाटक बघताना बरोबराच्याला समजेल न समजेल म्हणून नाटक चालू असताना त्याला एखादा प्रसंग समजेल न समजेल म्हणून समजावून सांगायचा आणि इतर प्रेक्षकांची दटावणीही खायचा एकदा म्हणे मी एक वर्षाचा असताना तो मला आणि आईला घेउन विद्याधर गोखल्यांचे " जय जय गौरी शंकर" नाटक पहायला घेऊन गेला त्याने ते आधी अनेकदा पाहील होत आई प्रथमच पहात होती अर्थात मीही प्रथमच पहात होतो.मध्येच मला काय झाल कळल नाही पण मी मोठमोठ्याने रडायला लागलो तो काही केल्या शांत होत नव्हतो प्रेक्षक आरडा ओरडा करायला लागले मग आबाने एक खरा नाट्यप्रेमीॆ जे करेल तेच केल. सरळ मला आणि आईला बाहेर पाठवल नंतर आईचा राग शांत होण्या साठी आईला परत ते नाटक दाखवल हा भाग अलाहीदा

स्वताचे हे नाट्यप्रेम चित्रपट प्रेम माझ्यात उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न आबाने केला। तो काही अंशी सफलही झाला.त्यासाठी त्याने दक्षीण मुन्बईत बरेचसे जून चित्रपट त्याने मला दाखवले बरोबर प्रबोधानही करायचाच

आबाला कधी कधी माझी परिक्षा घ्यायची लहर यायची कुठलेही गाणे चालू असताना तो मला त्या गाण्यातली नट नटी गायक गायीका ओळखायला सांगायचा ओळखल तर शाबशकी द्यायचा एकदा गम्मत झाली कुठेले तरी गाणे चालू असताना त्याने मला नाटक ओळखायला सांगीतली मी म्हणालो ही तर नटी साधना तर आबा म्हणाला कस काय बरोबर ओळखलस तर मी म्हणालो केसांचा साधना कट म्हणून साधना हे ऐकून आबा स्तब्ध झाला आणि हा मुलगा आपल नाव मोठ करणार म्हणून त्याची खात्री पटली
ते नाव मोठ करण्याच मी खुप म्हणजे खुपच मनावर घेतल ईतक मी स्वताचे नाव मोठ्या अक्षरात लिहू लागलो इतकच नव्हे तर संगणकावर लिहिताना माझ्या नावाच्या अक्षरांचा फोन्ट मी ११ वरून १६ वर आणला

केदार साखरदांडे
दिनांक ०८/०१/२०१७

विषय: 
प्रकार: 

ते नाव मोठ करण्याच मी खुप म्हणजे खुपच मनावर घेतल ईतक मी स्वताचे नाव मोठ्या अक्षरात लिहू लागलो इतकच नव्हे तर संगणकावर लिहिताना माझ्या नावाच्या अक्षरांचा फोन्ट मी ११ वरून १६ वर आणला
याबद्दल तुमचे नाव खरेच मोठे व्हायला पाहिजे - इतकी हुषारी!