एल आय सी मधून नॉन ग्यारंटेड एडिशनल बोनस

Submitted by आऊ on 6 January, 2017 - 06:53

मायबोलीकर मी तुमच्या साठी नवी आहे पण तुम्ही मला ओळखीचे आहात. कोणाला याविषयी माहिती असेल तर कृपया मदत करा.
२००३ मध्ये बॉस ची एक एल आइ सी पॉलिसी काढली होती. त्याचे हप्ते चार वर्षभरले, नंतर काही भरले नाहीत. एवढ्या वर्षात विसरून सुद्धा गेले. आज सकाळी एल आइ सी मधून फोन आला होता. त्यांनी सांगितलं तुम्हाला एल आई सी कडून नॉन ग्यारंटेड एडिशनल बोनस मिळालाय तो क्लेम करण्यासाठी पोलिसी नं. व जन्म तारीख विचारली व पडताळणी केली. त्यानंतर मला फाईल नं. देऊन तो गुप्ता ठेवा असा सांगितलं. तुम्हाला आमच्या क्लेम डिपार्टमेंट मधून कॉल आला कि तो नं सांगा असं सांगितलं.

दूपारी दुसरा फोन आला. त्यांनी सुद्धा पॉलिसी नं., जन्म तारीख आणि सकाळी सांगितलेला फाईल नं. विचारला. जर बोनस अमाऊंट क्लेम करायची असेल तर दोन पद्धती आहेत. एक एजन्ट कडून आणि दुसरी स्वतः. एजन्ट कडून केली तर त्यांचे कमिशन ६०% + प्रोसेसिंग फी १०% वजा होऊन तुम्हाला ३०% रक्कम मिळेल. स्वतः क्लेम केली तर कुठेही ना जात (१,५४,४१२./-) १००% रक्कम मिळेल. त्यासाठी फक्त लागेल ती डिटेल द्यावी लागेल.
मी स्वतः क्लेम करायची आहे असं सांगितलंतर त्यांनी विचारलं बॉस ची फ़ूचर जनरली किंवा एच डी एफ सी ची पॉलिसी असेल तर त्याची डिटेल द्या. ती कशासाठी हवी तर एल आई सी ने ते पैसे फ़ूचर जनरली किंवा एच डी एफ सी मध्ये गुंतवलेत. त्या कं. ला हि डिटेल द्यावी लागेल. (दोन महिन्यापूर्वीच फ़ूचर जनरली पोलिसी मॅच्युरिटी झाली आणि रक्कम अकाउंट ला जमा झाली ). मी सांगितलं या पैकी कोणत्याहि कं. ची पोलिसी नाही. त्यांनी त्यावर पण उपाय सांगितला. बॉस ची २५-४५ दिवसाची ४०,०००/- ची रेफन्डेबल पोलिसी काढायची व त्यानंतर बोनस ची रक्कम क्लेम करायची, तुम्हाला नव्या पॉलिसी चे १०० वजा होऊन ३९,९००.०० परत मिळतील.

आत्ता नवा प्रश्न उभा राहिला बॉस तर १५ दिवस परदेशी गेलेत तर नवी पोलिसी कशी काढणार?
झालं त्याने त्यावर उपाय सांगितला बॉस च्या पत्नी इथे असतील तर त्या किंवा ब्लड रिलेशन मधील दुसऱ्या कोणाची तरी पॉलिसी Uhoh काढायची. बोनस मिळाला कि रिफंड घायची. हि पॉलिसी सुद्धा तेच कडून देतात. त्यांचा एक माणूस येईल त्याल ४०,००० चा चेक, पॅनकार्ड, आधार कार्ड & कॅन्सल चेक द्यायचा. तो पॉलिसी काढून देईल, बसल्या जागी.

तुम्ही कुठून बोलताय विचारलं तर म्हणाला बरंच नो.११२ दिल्ली से बोल राहा हू| Uhoh
(मला पटकन स्पेसिअल २६ आठवलं). मग म्हटलं एल आई सी वाले असं एवढा खटाटोप करून पैसे का देताहेत तर म्हणे नाही आप का पैसा आप को मिळणं चाहिये इसलिये| आगर आप क्लेम करना चाहती है तो जल्दी बताइये नाही तो पैसे गव्हर्मेंट फंड मी जमा हो जायेगा| त्याला सांगितलं बॉस शी बोलल्या शिवाय मी काही करूशकत नाही. तर त्याने मोबाईल नं. दिला आणि सांगितलं जल्दी रिप्लाय
दिजीए| हो बाबा म्हटलं आणि फोन ठेवला.

तर मला आलेला हा फोन खरा असेल असं मला तरी वाटत नाहीय, कोणाला जर अनुभव असेल तर किंवा माहिती असेल कृपया तर मार्गदर्शन करा.

( लिखाणातील चुकांबद्दल क्षमस्व)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आऊ.. हा फोन फसवा होता...
एलआयसी कडुन असे कोणतेही फोन केले जात नाहीत
फक्त चार वर्षे पूर्ण झाली असलेल्या पॉलिसीचे मॅचुरिटीला पैसे मिळु शकतात (प्रत्येक पॉलिसीला वेगळ्या अटी असु शकतात)
हल्ली पैसे खात्यात जमा होतात.
मी एलआयसीत काम करते.

एजंटचे कमिशन प्रिमियम भरतानाच त्याला मिळते

नंतर परतावा मिळताना कोणतेही कमिशन वजा होत नाही.

चार वर्षे प्रिमियम भरला असेल तर सरेंडर किंवा सर्वायवल बेनेफिट क्लेम करा.

सरळ सरळ स्कॅम आहे हा , ४०००० घेतील आणि तिकडेच गायब होतील. पुढच्या वेळेस फोन आला तर पोलिसात कंप्लेंट करीन म्हणुन सांगा.

ती कशासाठी हवी तर एल आई सी ने ते पैसे फ़ूचर जनरली किंवा एच डी एफ सी मध्ये गुंतवलेत. त्या कं. ला हि डिटेल द्यावी लागेल.>>> काय संबंध ?

मला सेम असाच फोन आला होता. मी माझे कुठलेच डिटेल्स त्याला दिले नाहीत. वर त्यालाच प्रश्न विचारल्यावर तो गांगरला... हे प्युअर फ्रॉड आहे.

आऊ, आपल्या पॉलिसीज, अकाऊंट नंबर अशी जनरल माहिती सगळीकडे लिक होत असते, त्यावरून आपला फोन नंबर घेऊन असले फोन करुन माहिती विचारली जाते. तशी माहिती त्यांच्या हाती आली, कि मग पुढचे अनेक उद्योग करायला ते मोकळे असतात कारण आपणच त्यांच्या हाती चावी दिलेली असते.

एल आय सी, बँक वगैरे संस्था कधीही फोनवरुन अशी माहिती विचारत नाही आणि तसे त्यांच्या वेबसाईटवर वगैरे स्पष्ट लिहिलेले असते. खरं तर जी माहिती त्यांच्याच रेकॉर्डवर आहे, ती ते परत फोन वरून का विचारतील ? इअतर कोणाचीही माहिती तूम्हाला का विचारतील ? अश्या वेळी खुप सावधपणा बाळगायला हवा. हिसका . दणका वगैरे द्यायची गरज नाही ( त्यात आपण आणखी माहिती देऊन बसतो ) त्यापेक्षा तो नंबर बॅन करा किंवा सोशल मिडीया वर त्याची माहिती द्या.

इन्शुरन्सवाले प्रिमियम घेताना बोलतात . हम साथ साथ है
क्लेम देताना बोलतात . हम आपके है कौन >>>> अगदी अगदी Lol

हो दिनेशदा, मागे फ़ूचर जनरली मध्ये पोलिसी बंद करण्यासाठी कस्टमर केअर ला फोन लावला तर त्यांनी किती फंड मिळणार हे सुद्धा नाही सांगितलं. ते आम्ही फक्त पॉलिसी होल्डर ला सांगतो म्हणाले. त्यावरूनच मला कांहीतरी गडबड आहे असा वाटलं आणि सावध होऊनच बोलले. धान्यवाद सावध केल्या बद्दल, बोलताना अनवधानाने बोलून जातो आपण नक्की काळजी घेईन या पुढे. Happy

एल आय सी वाले असला कुठलाही प्रकार करत नाहीत. पॉलिसीचे पैसे विनाझीझक मिळतात. एक लेटर पाठवतात किंवा आपल्या रजिस्टर ईमेल वर मेल करतात. त्यात एखादा नंबर दिला असेल तर कॉन्टॅक्ट केल्यावर व्यवस्थित गाईड हि करतात. मला माझे मनीब्याक पॉलिसीचे रिटर्न्स दोनदा विनाझीझक मिळाले. पहिल्यांदा चेकने आणि दुसऱ्यांदा मला मेल आल्यावर, मेल पाठवणाऱ्या मॅडमला प्रत्यक्ष जाऊन भेटले आणि डॉक्युमेंटेशन सबमिट केल्यावर ब्यांकेत आले. LIC चे क्लेम मिळतातच असा माझा अनुभव.

हो स्वधा माझे एल आई सी ची रक्कम सहज अकाउंट ला जमा झाली होती. पण बाकी ओरिएंटल चा कार इन्शुरन्स वाल्यानी क्लेम अमाऊंट द्यायला जवळ-जवळ २ ते अडीच महिने लावले होते. पाठलाग करून काढावे लागले. हाताची पाची बोटं काही सारखी नसतात ना.