गझलीयत गझलीयत गझलीयत

Submitted by बेफ़िकीर on 13 October, 2015 - 15:20

गझलीयत गझलीयत गझलीयत
====================

शेवटी एकदा ह्या शब्दाचा अर्थ शब्दांत मांडण्याची क्षमता अंगी आली.

किंबहुना, एखादी तीव्र दु:खद परिस्थिती अनुभवल्यावरच ह्या शब्दाचा अर्थ समजू शकतो हे समजले.

'एखादी तीव्र दु:खद भावना समर्थपणे शब्दांत मांडण्याची क्षमता अंगी असतानाही त्या तीव्र दु:खामुळे ती भावना मांडण्यास आपण असमर्थच ठरावे अशी इच्छा होणे, अशी परिस्थिती निर्माण होणे, म्हणजे गझलीयत'

आयुष्यात मिळालेल्या दोन जिवश्चकंठश्च मित्रांपैकी एक मरणाच्या उंबरठ्यावर उभा असल्यामुळे हे कळावे एवढीच माझी औकात!

"आलोच रे, तू हो पुढे"

-'भूषण'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मशान असावे दोन हाकांवर मनाच्याही,
पावलांना सराव असावा त्याच्या सांगाताचा
विशेषत: सायंकाळी
वाचून घ्यावे दरवाज्याच्या कमानीवरचे
मृताच्या मिटल्या ओठांतले अमर सुभाषित
आज माका फाल्या तुका
चेतून पहाव्या गेलेल्या जीवलगांच्या
जिवंत झालेल्या जागल्या चिता
आणि स्वत:चीही
– बा. भ. बोरकर

दक्षिणा,

तुम्ही प्रतिसादांमार्फत दिलेल्या आधाराचा मी ऋणी आहे. दिलखुलास व्यक्तिमत्वांची वानवा निर्माण होण्याच्या काळात तुमचे प्रतिसाद (केवळ मला आवडतात, म्हणूनच नव्हे तर तसेही) मन मोकळे करायला प्रवृत्त करतात. मायबोलीला तुमच्यासारखे अधिकाधिक सदस्य मिळोत.