बिनभांड्यांचा स्वयंपाक

Submitted by नानाकळा on 22 December, 2016 - 01:36

मी शाळेत असताना स्काउट कॅम्प असायचा, त्यात बिनभांड्यांचा स्वयंपाक अशी स्पर्धा असायची.

कदाचित मोदींच्या शाळेतही होत असेल. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी "बिननोटांची, बिनएटीएमची, बिनबँकांची, बिननेटवर्कची, बीनडोक इकोनॉमी" अशी काही कल्पना लढवली असल्याची दाट शक्यता आहे. किंवा आमच्या शाळेतला कोणी परांजपे मोदींना भेटला असल्याचीही शक्यता आहेच. स्काउट म्हणजे एकप्रकारचे सोल्जरच. आता सुरुवातीलाच "सोल्जर बोल दिया, अर्गुमेंट खतम".

बिनभांड्याच्या स्वयंपाक स्पर्धेत वाटेल त्या वाटेल तशा पाककृती करायची परवानगी तरी होती. अन्यथा स्पर्धा सुरु झाल्यावर अचानक आता फक्त डोसे करा, नाही मसाले भात करा, ते राहू दे आम्लेट भुर्जी करा, शीख कबाब, मुगलाई मटन करा, असे वक्तावक्ताला बदलणारे नियम नव्हते. मोदीबाबा सारखे परीक्षक असते तर "तुम्हाला तर आम्ही स्वयंपाक सांगितला होता, तर मग अन्न का शिजवले?" असेही विचारले असते.

स्वयंपाक किमान दोन जणांना पोटभर पुरेल इतका असावा असाही नियम होता. मोदीनी दोन टक्के चोरांना पोटभर पुरतील इतक्याच नोटा छापल्या असाव्या. बाकीच्यांनी स्वतःची सोय स्वतः लावावी (म्हणजे स्वतःच्या नोटा छापाव्यात) असा 'प्रचंड गुप्तता' असलेला सुप्त हेतू असू शकतो, लैनीत सडणाऱ्या ९८ टक्क्यांना नै कळत त्यात सतत mypapastrongest कोकलणाऱ्या नायडूच्या देवाचा, आपल्या लाडक्या पंतप्रधानांचा, महाप्रमाणिक, अतिव बुद्धिमान मोदींचा काय दोष?

मात्र गुप्तता फार नसायची आमच्या स्पर्धेत. आम्ही एकमेकांना स्पर्धक असून मदत करायचो, चोर चोर मौसेरे भाई असतात तसे. बँकवाले आणि काही प्रचंड गरजू यांनी एकमेकांना अशीच मदत केली म्हणे.

आमचे काही स्पर्धक मात्र बिलंदर हां. कुठेतरी जुगाड करून कांदा भजी, पोळ्या, भरली वांगी, जीरारैस असा खुमासदार ऐवज बिनदिक्कत पैदा करायचे, परीक्षक त्यांना सामील असल्याने निकाल त्यांच्या बाजूनेच लागायचा. बिचार्‍या परि़क्षकांना तेवढंच काय ते चमचमीत खायला मिळायचं.

आम्ही आपले अर्धवट भाजलेला एखादा रोडगा, कोशिंबिरी, हाताने तोडलेल्या कांदा-मिरच्यांच्या चटणीत अर्धकच्च्या भाजलेल्या वांग्याचं भरीत कालवत असू. निदान पोटाला खायला मिळेल अशी तयारी तरी असायची. एवढे उपद्व्याप करूनही उपाशीच मारेल अशी विचारपूर्वक ठरवलेली मास्टरस्ट्रोक योजना नव्हती ती.

खरंच, स्काउटवाले परांजपे मोदीला भेटले असतील काय?

बिनभांड्यांच्या स्वयंपाकात चहा बनवत नव्हते. कारण चहाने पोट भरत नाही, लंब्याचौड्या गप्पा मारायला सोबतीला चहा बरा असतो म्हणतात. गगनभेदी गप्पांनीही पोट भरत नाही.

भूक मारायला चहा आणि वेळ मारून न्यायला गप्पा ह्याशिवाय जास्त काही माहित नसावे परांजप्यांना... दुसऱ्यांचे पैसे बदलायला माणसे परत येऊ नये म्हणून बोटावर शाई लावण्याची कल्पना परांजप्यांचीच असावी. उगाच का अख्खा टाटाचा कारखाना बोटावर उचलून बंगालातून द्वारकेत आणला त्यांनी...

आय रियली मिस यु परांजपे. जिथे कुठे असाल तिथून लवकर परत या. घरी कोणी रागावणार नाही. तिथे बसून रोज नव्या आयड्या देण्यापेक्षा घरी आलात तर जास्त आनंद होईल. बिनभांड्यांचा स्वयंपाक करूया, बिनपिठाचा, बिनतेलाचा, बिनभाजीचा, बिनपैशाचा कसा करायचा तेवढे मोदींकडून शिकून या येताना.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानां(च्या जिवाला लागलेल्या) कळा कळाल्या,
पण इथे उपरोध, तळतळाट, सत्यकथन इ. ला काहीच किम्मत नाही हे नानांना कधी कळणार?

स्काऊट मध्ये बिनभांड्याच्या स्वयंपाक.. एव्हढे नावीन्य सोडले तर अत्यंत घिसापीटा लेख ...
बाकी लेखकाची तळतळ, मळमळ , खळखळ इत्यादी इत्यादी बाहेर पडले आहे