तडका १००० - विशाल मस्के यांचे अभिनंदन !!

Submitted by जीएस on 12 December, 2016 - 04:44

मायबोलीवर येऊन तीन वर्षे होण्यापूर्वीच श्री. विशाल मस्के यांनी आपली एक हजारावी तडका कविता आज सादर केली आहे. http://www.maayboli.com/node/61085

लेखनाचा दर्जा हा नेहेमीच सापेक्ष असतो, त्याबद्दल मतभिन्नता असू शकते पण ताज्या घडामोडींवर दररोज कविता लिहित रहाण्याचे त्यांचे सातत्य निर्विवाद आहे.

यापूर्वी एक हजार कवितांचा टप्पा इथे कोणी गाठल्याचे मला आठवत नाही.

विशाल मस्के यांचे अभिनंदन !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाण तिच्या मारी ,अजुन काही दिवसांनी मायबोलीवरचे अर्धे साहीत्य म्हणजे फक्त तडके असतील.

देवपुरकर यांना काहींनी त्रास दिला गेला नसता तर त्यांनी सुध्दा १००० चा टप्पा नक्कीच पार केला असता.
मस्के यांना देखील त्रास दिला हिणवले गेले परंतू त्यांच्या माघार घेतली नाही.

मस्के यांच्या चिकाटीला सुध्दा सलाम

विशाल मस्के यांचे अभिनंदन!!!

एका बाबतीत पूर्ण केलेल्या शंभरीच्या स्वानुभवावरून मला जाणीव आहे कि आपण एक अत्यंत कठीण गोष्ट साध्य केलीय. खरंच! आपले कौतुक आहे.

क्षमस्व

परंतू आताच केलेल्या तपासणीनुसार मस्के यांनी १००० तडके लिहिले नाही हे खेदपुर्वक नमुद करत आहे.

२० * ५० या हिशोबानी जीएस यांनी १००० हा आकडा गृहित धरून धागा काढला. पण...

मस्के यांनी तब्बल ३३ कविता स्वतंत्ररित्या लिहिलेल्या आहे. जे "तडका" या सदराखाली येत नाही.
तसेच १४ वेळा त्यांनी दोनदा तडका कविता पोस्ट केली आहे.

अशा रितीने १००० - ३३ (कविता) - ७ (डबल पोस्ट तडका) = ९६० तडके झाले आहे असे जाहीर करतो.

या वर्षाचे २० दिवस बाकी आहे. त्यात ४० तडका झाल्या तर १००० होउ शकतील.

Happy

त्यांनी एक धागा काढून 'मी तडके लिहू का नको?' असे विचारलेही होते ना? ते पण असेल ना ह्या ९६०मध्ये, प्रसादक? इन एनी केस, एवढ्या कविता केल्या ही कौतुकाचीच गोष्ट आहे.

जेव्हा जेव्हा तडका पहिल्या पानावर असतो तेव्हा मी आवर्जून वाचतो. मस्के यांच्या चिकाटीबद्दल त्यांचे अभिनंदन

त्यांनी एक धागा काढून 'मी तडके लिहू का नको?' असे विचारलेही होते ना?
>>>>>
या धाग्यावर बहुधा मी त्यांना मायबोली माझ्या सासरेबुवांची असल्याच्या थाटात बिनधास्त लिहीण्याचाच सल्ला दिला होता.
जर त्यामुळे त्यांना जरा जरी बळ आले असेल तर या विक्रमात माझाही मुंगीचा वाटा आहे.

मी पर्सनली त्यांचे सात आठ तडके आजवर वाचले असतील आणि तीनचार वर प्रतिसाद दिला असेन. पण मुळातच मला कवितेची नसलेली आवड (आणि जाण) पाहता हा आकडाही कमी नाही ..

किंबहुना, मला हॉटेलमध्ये दाल तडका ऑर्डर करतानाही हा तडका आठवतो यातच या तडक्यांचे यश Happy

अभिनंदन आणि शुभेच्छा !
चिकाटीलाही मनापासून सलाम !

आपल्या सर्वांचा आभारी आहे,

आपण दिलेल्या शुभेच्छा आणि केलेलं अभिनंदन मनाला भावले,त्याबद्दल सर्वांचे आभार

माझे सर्वच तडके मायबोलीवर नाहित,तसं पाहता आजचा तडका हा १७६४ क्रमांकाचा आहे,सर्व तडके पाहण्यासाठी तुम्ही माझ्या फेसबुक ऊंटवर भेट देऊ शकता,

आपणा सर्वांचे पुनश्च आभार

धन्यवाद,...!

@ विशाल मस्के, १७६४!!! अबब!!! बाबो!!!!
कालपासून तुमची ह्या धाग्यावर येण्याची वाट पहात होतो! आमच्याकडून आपल्या अभिनंदनाचा स्वीकार व्हावा!!!