...ए स्ट्रेंजर इन टाउन... ‘फ्रैंक मोर्गन’

Submitted by रवींद्र दत्तात्... on 27 November, 2016 - 23:13

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

सुट्‌या सगळ्यांनाच हव्या, अगदी सुप्रीम कोर्टचा जज देखील याला अपवाद नाही. एक जज सुटीवर जातो, त्या सोबत ज्या घटना घडतात, त्यावर 1943 साली एक चित्रपट आला होता- ‘ए स्ट्रेंजर इन टाउन.’ सत्तर मिनिटे लांबीच्या या चित्रपटाचा दिग्दर्शक होता- राॅय रॉलैंड (Roy Rowland).

चित्रपटाची सुरवात कोर्टरूम मधे नुकत्याच संपलेल्या केस पासून होते. दुसरया दिवसापासून कोर्ट ची सुट्‌टी आहे...सुप्रीम कोर्टचा ऑनरेबल जस्टिस जॉन जोसेफी ग्राँट (फ्रैंक मोर्गन) वरांड्यात येतो तर सोबतीचे जज त्याला हॉलीडे विश करतात. त्यांचा स्वीकार करीत ते आपल्या रुम कडे निघतात. दार उघडणार इतक्यांत मीडियाची माणसं त्यांना अडवतात...

सर जॉन, काही प्रश्नं विचारायची होती...

जज साहेब म्हणतात-तीन मिनिटांपूर्वीच प्रश्न-उत्तरे संपली की...

त्या पैकी एक विचारतो- सर, आपण सुटीवर कधी जाणार...

जज साहेब उत्तरतात...-लगेच...,तुम्ही मला सोडा, हा मी निघालोच...

आणि ते आपल्या रुम मधे शिरतात...मीडियाची मंडळी बाहेर घुटमळत उभी असते, इतक्यांत आतून आवाज येतो- कम इन...मग जज साहेब मीडिया वाल्यांशी थोडंसं खेळी-मेळीच्या वातावरणांत बोलतात, मग मीडिया ची मंडळी निघून जाते.

अातां जज साहेब आपल्या टेबलावरील कागदं बघतांत...शेजारी त्यांची सेक्रेटरी लूसी गिलबर्ट (जीन रॉजर्स) त्यांना पुढच्या केसची माहिती देत असते, तिचं सगळं लक्ष आपल्या बॉस कडे असतं...कागदांच्या मधे सेक्रेटरीच्या नावाचा कागद बघून जज साहेब दचकतात...आणि तिला विचारतात- हे काय...

ती सांगते हे माझं रेजिग्नेशन लैटर आहे...तुम्ही इतकं काम करवून घेता की मला दुसरा काही पर्यायच नाही.

यावर जज साहेब प्रेमळपणे तिला सांगतात- मला माहीत आहे...की मी तुझ्याकडून खूप काम करवून घेतो...पण बेटा (माय चाइल्ड), यात तुझं भलंच होणार आहे...दुसरी कडे जे तू दोन वर्षात शिकशील ते तू इथे वर्षभरात शिकशील. ते काही नाही...मी हा कागद फाडून टाकलाय...आपण सुट्‌टी नंतर भेटू तेव्हां या विषयावर बोलू...काही तोडगा निघेलच की. हे बघ आज पासून मी सुटीवर आहे...माझा पत्ता कोणाला कळता कामा न ये...

आणि जज साहेब निघतात वाशिंगटन जवळच्या क्राउनपोर्ट गावांत शिकार करण्यासाठी. ती देखील बतखांची शिकार (डक हंटिंग)...

पुढच्याच दृश्यात जॉन बंदूकीने नेम धरुन घोडा ओढणार, तेवढ्यात माशी शिंकते अाणि आवाज येतो-

थांबा, तुम्ही इथल्या बतखांची शिकार करु शकत नाही, मी या गावाचा पोलिस आॅफिसर (गेम वार्डन) आहे...तुमचा शिकारीचा परवाना दाखवा...

जॉन बंदूक मागे घेत खिशातून शिकारीचा परवाना दाखवतो...तो बघून परत देतांना पाेलिस आॅफिसर म्हणताे-हे कामाचं नाही...यावर लोकल बाॅडीचा शिक्का नाही...तुम्हाला पाच डाॅलर दंड भरावा लागेल...

जॉन मुकाट्यानं पर्समधून पैसे काढून देतो...तर पोलिस आॅफिसर सूट वाढवून देण्यासाठी आणखीन पैसे मागतो...

आता याची सटकते...तो दिलेले पैसे परत घेऊन पर्स खिशांत टाकतो आणि पोलिस आॅफिसरला म्हणतो-चल, कुठे नेशील मला...

कोर्टमधे जॉन सांगतो की माझ्या जवळ हंटिंग करण्यासाठी स्टेट चा परवाना आहे...

पण जज (ऑस्टिन हार्कले) त्याचं काहीच ऐकून घेत नाही आिण शंभर डालर्सचा दंड ठोठावतो...जॉन मुकाट्याने रक्कम भरतो...म्हणजे बतखांची शिकार तर दूर, फक्त बंदूकीने नेम धरण्याचा दंड शंभर डॉलर्स...!

त्याच वेळेस कोर्टात दुसरी केस आली आहे...ती केस नायक लढवीत असतो, पण जज त्याचं काहीच एेकून न घेता एकपक्षी निर्णय देतो...

हे बघतांना जॉन ला जाणवतं की या क्राउनपोर्ट शहरांत काही तरी गडबड आहे...इथल्या मेयरनी कायदा-कानून आपल्या मुठीत ठेवून भ्रष्टाचार माजवला आहे...सगळीकडे त्याचीच माणसे दिसताहेत...

कोर्टच्या बाहेर पार्लरमधे (सेलून) त्याची भेट नायक बिल एडम्स (रिचर्ड कार्लसन) शी होते...पार्लर मधे बिलचा क्लाइंट टॉम कूनी येतो...तो बिल जवळ आपल्या केस बद्दल बोलतो...त्याची चूक इतकीच असते की त्याने लोन वर घेतलेल्या ट्रैक्टर ची एक किश्त डीलर जवळ जमा केलेली नाही...यावर जज ने ते ट्रैक्टर डीलर ला परत द्यायला सांगितलंय...त्याच दुकानात मेयर ची माणसं असतात. ती बिल ला डिवचतात. तर बिल आणि त्या लोकांमधे मारामारी होते...या घटनेमुळे मेयर आिण होटल मालक बिल ला धडा शिकवण्या ची शक्कल लढवतात...

पार्लर शेजारीच बिलचं आॅफिस आहे, तिथे जॉन बिलची प्रशंसा करतांनाच त्याच्या दुर्गुणांवर देखील बोट ठेवतो...तो सांगतो की मी देखील रिटायर्ड वकील आहे...आणि तू टाॅमच्या केस ची चिंता नको करु. तिथे जॉन त्याला सांगतो तुझ्या मागच्या कपाटातील कायद्याच्या पुस्तकांकडे जरा लक्ष दे, तुला तुझ्या सगळया प्रश्नांची उत्तरे या पुस्तकांमधे सापडतील...बिल पुस्तक उघडून बघतो आणि चकित होतो...त्या पुस्तका प्रमाणे तो डीलरला ट्रैक्टर चे सुटे भाग बारा महीने ठेवणं जरूरी असतं...आिण त्याच्या जवळ सुटे भाग नसतात...या मुद्यावर बिलचा क्लाइंट निर्दोष सुटतो...या घटने मुळे बिल चा जॉन वर विश्वास बसतो...

जॉन ज्या हॉटेलात थांबलाय, तिथून दिसणारया होर्डिंग वर मेयर चा मोठ्ठा फोटो...खाली जाहिरात असते की येणारया निवडणुकीत मलाच मत द्या....तो आेळखतो इथे लवकरच निवडणूक होणार आहे...आता जाॅन ठरवतो की आपली ओळख न दाखवता बिलची मदत करायची...ताे टेलीग्राम करुन आपल्या सेक्रेटरी लूसी ला बोलावून घेतो...त्यांत तिला बजावतो देखील की मी इथे डक हंटिंग साठी आलोय...इतकंच सांगायचं की पूर्वी मी वकील होतो...

लूसी येते... तिला रिसीव करायला बिल जातो...तो तिला हॉटेलात नेतो. पण तिच्या सोबत बिल ला बघून हॉटल मैनेजर तिला खोली द्यायला तयार होत नाही...कारण काय तर लूसी सोबत काहीच सामान नाहीये...तिथे झालेल्या घटनांमुळे बिल आणि लूसी दोघांना कोठडीत डांबून ठेवतात. जॉन शिकार करायला गेलाय...तो परत येताे तेव्हां सगळा घोटाळा कळतो...तो दोघांना सोडवताे...सगळे जॉनच्या हॉटेलवर येतात...लूसीला खोली मिळते...आता हॉटेल मालक त्यांच्या वर आपल्या माणसांकरवी नजर ठेवतो...

हॉटेल मधील जॉनच्या खोलीत रात्री परिचारिका त्यांचं अंथरुण नीट करीत असते...चादर थोडी लहान असल्या मुळे ती पलंगावर नीट अंथरता येत नाही...जॉन विचारताे चादर लहान आहे कां...तर ती सांगते दोन वर्ष झालीत मैनेजर ला सांगतेय की या चादरी लहान आहेत मोठया चादरी आण, तो लक्षच देत नाहीये...

ती गेल्यावर काही विचार करुन जॉन लूसी (ती दुसरया खोलीत आहे) ला सांगतो की हॉटेलच्या चादरी ची लांबी सांग...मग बिल ला म्हणतो की कायद्या प्रमाणे हॉटेल मधील चादरी ची लांबी किती हवी, हे कायद्याचं पुस्तक बघून सांग...

दुसरया दिवशी न्यायालयांत बिल आणि लूसी वर लावलेले आरोप हॉटेल मालक परत घेतो...आणि समेट करण्याचा प्रस्ताव ठेवतो...बिल तयार होतो...नंतर पद्धतशीर पणे बिल हॉटेल मालका वर केस करताे की यांच्या हॉटेलमधील चादरी लहान आहेत आणि कायद्याशी सुसंगत नाहीयेत...हॉटल मालकाला भुर्दंड भरावा लागतो...

आतां जॉन बिलला टिप्स देतो. तो बिल ला सांगतो-सगळया गोष्टी कायद्याच्या पुस्तकांमधे लिहिलेल्या आहेत...फक्त आलमारी मधील पुस्तकं काढ आणि वाचून तर बघां एकदां...

आणि बिल कोर्टात केस जिंकत जातो...

शेवटचा कोर्ट सीन...

आपल्या चुकांमुळे मेयर कार्लिसन ला आरोपी ठरवतात. तेव्हां तो रागावून विचारतो की मला आरोपी ठरवणारा हा कोण म्हातारा, आपल्या शहरात राहणारा ही नाही...कुठल्या अिधकारांनं मला जाब विचारतोस...

तेव्हां जज जाॅन आपली ओळख देतो...

तो म्हणतो...तुम्ही विचारताय की मी कुठल्या अधिकारांनं तुम्हाला जाब विचारतोय...मी जज आहे म्हणून नव्हे तर मी या देशाचा एक नागरिक आहे... त्या नात्यानं मी तुम्हाला जाब विचारतोय...

या इतक्या मोठ्या देशाचा नागरिक होणं काही क्षुल्लक गोष्ट नव्हे...हा माझा सम्मान आहे की मी या देशाचा नागरिक आहे...या नात्याने माझी, आम्हां सर्व नागरिकांची जवाबदारी मोट्ठी आहे...शासन चालवण्यासाठी आपण कुणाला तरी निवडून देतो...निवड केली म्हणून आपली जवाबदारी संपत नाही...निवडलेला माणूस गडबड करत असेल तर त्याचे कान धरणं आपलं कर्तव्य आहे...तो गडबड करतोय म्हणून आपण गप्प बसावं...हे चूक आहे...त्याला वठणीवर आणण्याची जवाबदारी आपली आहे...डोळे बंद करुन जगणं सोडा...
(आजच्या परिस्थितीत देखील लागू होतात हे शब्द...)

मेयर आपल्या चुकांची कबूली देतो. त्याला आणि त्याच्या माणसांना कोठडीत पाठवतात...

या चित्रपटाबद्दल अशी टीप होती-

This is another film about the rights of men, and how they should hold government responsible in the name of justice. But if one watches carefully, the film demonstrates the unfortunate truth that the law is not about justice. Real knowledge of law is only available to attorneys. The common man must avail himself of their services, knowing that laws are created by (mostly lawyer) politicians. We all know how highly politicians are held in the public’s esteem.

----------------

असा होता फ्रैंक मोर्गन

हॉलीवुड चा अमेरिकन चरित्र नायक फ्रैंक माेर्गन च नाव फ्रांसिस फिलिप वुपरमॅन होतं. 1 जून 1890 साली न्यूयार्क सिटी येथे जन्मलेल्या फ्रैंक चा मृत्यु 18 सप्टेंबर 1949 साली ब्रेवरली हिल्स कैलिफोर्निया मधे झाला. अकरा भाऊ-बहिणीं (सहा मुलं-पाच मुली) मधला एक फ्रैंक मोठ्या भावामुळे ब्राडवे कडे वळला. त्याने ब्राडवे वरील नाटकां मधे काम केलं. 1916 सालचा ‘दि गर्ल फिलीप्पा’ (The Girl Philippa) हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्याला प्रामुख्यानं मेट्रो गोल्डविन मेयर चा कान्ट्रेक्ट प्लेअर आणि दि विजार्ड आॅफ ओज मधील त्याच्या भूमिके साठी ओळखलं जातं...या शिवाय 1943 सालच्या ‘दि ह्यूमन कामेडी’ मधील टेलीग्राफ आॅपरेटर, 1940 सालच्या ‘दि शॉप एराउंड द कार्नर’ मधील दुकानमालका ची भूमिका प्रमुख आहेत. 1934 सालच्या ‘दि अफेयर ऑफ सिलेनी मधील भू्मिके साठी फ्रैंकला बेस्ट एक्टरचं नामिनेशन मिळालं होतं.

असा पदरी पडला ‘दि विजार्ड ऑफ ओज’

फ्रैंकची खरी ओळख पटते ती 1939 सालच्या ‘दि विजार्ड ऑफ ओज’ मधील प्रोफेसर मार्वल/ दि विजार्ड मुळे. त्याची ही भूमिका गाजली. (या चित्रपटाची नायिका होती जूडी गारलेंड). आधी या भूमिकेसाठी डब्ल्यू.सी. फील्डस चं नाव ठरलं होतं. पण वेतनच्या मुद्यावर गाडी कुठे तरी अडली आणि ती भूमिका फ्रैंकला मिळाली. याच चित्रपटांत चेटकिणीची भूमिका मारग्रेट हेमिल्टन या नटी ने केली होती. तिने फ्रैंक ची आठवण सांगताना म्हटलं होतं-चित्रपटातील एक दृश्यात प्रो मारवेल (फ्रैंक मोर्गन) अापल्या काळया बैग मधून काढून डोरोथी आणि तिच्या मित्रांना बक्षिसं देतो...हे दृश्य बघतांना माझे डोळे पाणावतात. कारण सांगताना ती म्हणाली-

‘Frank Morgan was just like that in real life-very generous.’

लेंब्स क्लब चा आजन्म सदस्य
फ्रैंक मोर्गन लेंब्स क्लबचा (Lambs Club) लाइफटाइम मेंबर होता. हा क्लब थिएटर च्या क्षेत्रातील सर्वात जुना क्लब होता.
---------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त परिचय Happy

..हे चूक आहे...त्याला वठणीवर आणण्याची जवाबदारी आपली आहे...डोळे बंद करुन जगणं सोडा...
(आजच्या परिस्थितीत देखील लागू होतात हे शब्द...)>>> +१