antibiotic resistance ,मानवासमोर उभा ठाकलेला सर्वात मोठा धोका.

Submitted by सिंथेटिक जिनियस on 23 November, 2016 - 03:25

ॲन्टीबायोटीक्स अर्थात प्रतिजैविकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला हे अनेकांना ज्ञात असेलच.पेनिसिलीनचा शोध लागल्यानंतर बॅक्टेरीअल इन्फेक्शन ट्रिट करणे सोपे झाले .त्यानंतर अनेक प्रकारची प्रतिजैविके शोधली गेली.यातून बॅक्टेरीयल एन्फेक्शनने होणारे मृत्यु वा इतर कॉम्प्लीकेशन टाळता येऊ लागली.साहजिकच जगाचे आयुर्मान त्यामुळे वाढले.
पण मानवाने लावलेल्या या शोधाला लवकरच ग्रहण लागले ते म्हणजे ॲन्टीबायोटीक रेझिस्टंटचे.एखादे ॲन्टीबायोटीक ठराविक काळ वापरले गेल्यानंतर बॅक्टेरीया त्याच्या विरोधात प्रतिरोध तयार करतात.बॅक्टेरीया स्वतःच्या genetic makeup मधे बदल घडवतात,इतर बॅक्टेरीयाकडून ठराविक जनुकं मिळवून असा रेझिस्टन्स विकसीत होतो.मग असे बॅक्टेरीया त्यावर वापरल्या जाणार्या प्रतिजैविकाला दाद देत नाहीत.

यावर उपाय म्हणून मल्टिड्रग थेरपीचा वापर केला जातो.यात एक ॲन्टीबायोटीक न देता अनेक ॲन्टीबायोटीक्सचा वापर केला जातो.पण अत्यंत लवचिक असलेले हे बॅक्टेरीया यावरही प्रतिरोध विकसीत करत आहेत.leprosyअर्थात कुष्ठरोगावर आधि डॅप्सोन हे ॲन्टीबायोटीक दिले जायचे, पण लवकर लेप्रसीला कारणीभूत ठरणार्या Microbacterium leprea या बॅक्टेरीयाने यावर प्रतिरोध विकसीत केला .WHO ने मग मल्टीड्रग थेरपी रेकमंड केली ,या मल्टीड्र्ग थेरपीला अवरोध करणारे बॅक्टेरीया तयार होऊ लागले आहेत.
टीबी हा घातक रोग आहे ,यावर ॲन्टीबायोटीक देऊन उपचार करता येतात.पण आता मल्टीड्रग रेझिस्टंस टीबी असा नवीन इन्फेक्शनचा शोध लागला आहे ,असा मल्टीड्रग रेझिस्टंट टीबी झाल्यास रुग्णाला प्राण गमवावा लागतो,या मल्टीड्रग टीबीवर सध्याचे कोणतेही ॲन्टीबायोटीक काम करत नाही.

गंभीर प्रकार असा आहे की साध्या एन्फेक्शनला कारणीभूत होणारे बॅक्टेरीयासुद्धा आता प्रतिरोध (resistance) विकसीत करत आहेत.यावर कडी म्हणून की काय ,१९८५ पासून एकाही नव्या ॲन्टीबायोटीकचा शोध लागला नाही आहे.जागतिक आरोग्य संघटनेने या antibiotic resistance ला एकविसाव्या शतकातला सर्वात मोठा धोका असे म्हणट्ले आहे.असे बॅक्टेरीया ज्यांना ' सुपरबग ' असे म्हण्टले जाते त्यांचे प्रमाण वाढत आहे.यावर उपाय म्हणून अमेरीकेत ओबामा प्रशासनाने national action plan for combating antibiotic resistant bacteria असा अनेक कलमी प्लान २०१४ जाहीर केला.
हे सुपरबग तयार होण्याची प्रक्रीया वेग घेत आहे व नवीन प्रतिजैविकांचा शोध लागत नसल्याने फार मोठा धोका मानवासमोर उभा ठाकला आहे.जर नवीन प्रतिजैविके शोधली गेली नाहीत तर साधं इन्फेक्शनही प्राणघातक ठरणार आहे.शस्त्रक्रीयेनंतर इन्फेक्शन होऊ नये म्हणून ॲन्टीबायोटीक्स दिले जातात ,सुपरबगमुळे अश्या शस्त्रक्रीया करणेही प्राणघातक ठरु शकते.व अगदी नजिकच्या भविष्यात साध्या शस्त्रक्रीयाही प्राणघातक ठरु लागल्याने अनेकांना प्राण गमवावे लागू शकतात.हा फार मोठा धोका असून सुद्धा याकडे डोळेझाक केली जात आहे .नवीन प्रतिजैविके शोधण्यात बराच पैस खर्च होत असल्याने फार्मा कंपण्या यात दिरंगाई करत आहेत.
आपण काय करु शकतो
१. सर्व प्रथम ॲन्टीबायोटीक्सचा होणारा सर्रास वापर टाळावा.
२.अनेक डॉक्टर्स साध्या व्हायरल इन्फेक्शनलाही ॲन्टीबायोटीक्स देतात ,हे थांबले पाहीजेत.
३. ओव्हर द काउंटर ॲन्टीबायोटीक्सवर बंदी आणायला हवी.
३. जगभरातल्या पुढारलेल्या देशांनी फार्मा कंपण्यांना ,इतर संशोधन संस्थांना इन्सेंटीव्ह देऊन नवीन प्रतिजैविकांच्या शोधासाठी मदत केली पाहीजे,तसा दबाव सामान्यांनी आपआपल्या सरकारांवर टाकायला हवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण काय करु शकतो
१. सर्व प्रथम ॲन्टीबायोटीक्सचा होणारा सर्रास वापर टाळावा.
२.अनेक डॉक्टर्स साध्या व्हायरल इन्फेक्शनलाही ॲन्टीबायोटीक्स देतात ,हे थांबले पाहीजेत.
३. ओव्हर द काउंटर ॲन्टीबायोटीक्सवर बंदी आणायला हवी.
३. जगभरातल्या पुढारलेल्या देशांनी फार्मा कंपण्यांना ,इतर संशोधन संस्थांना इन्सेंटीव्ह देऊन नवीन प्रतिजैविकांच्या शोधासाठी मदत केली पाहीजे,तसा दबाव सामान्यांनी आपआपल्या सरकारांवर टाकायला हवा.>>>>>>+++++++++1000
Total agree with all the above points..

या विषयावर डॉ उज्ज्वला रेगे यांचा सविस्तर लेख वाचला होता. आपली प्रतिकारशक्ती वाढवणे हाच एक उपाय आहे.

आयुर्वेद, सध्या नुकतीच अमेरिकेने "निरुपयोगी" असे लेबल लावायला कंपल्शन केलेली होमिओपदी, इ. चा वापर करावा.
अ‍ॅलोपथीच्या वाटेस जाऊ नये.

छान माहिती.

बाकी << ३. ओव्हर द काउंटर ॲन्टीबायोटीक्सवर बंदी आणायला हवी. >> हे महाराष्ट्रात झालं आहे आणि मुंबईत तरी बऱ्यापैकी पाळलं जातंय.

अजून एक म्हणजे ॲन्टीबायोटीक्सचं प्रिस्क्रिप्शन किमान MBBS डॉक्टरने द्यायला हवे असा पण नियम आहे.

ॲन्टीबायोटीक्स रेझीस्टंस ह्याचा पुरेपुर अनुभव मला नुकताच आलाय. मला ई-कोलाय रेझीस्टंस सुपरबग चे इंफेक्शन झाले होते. जीवघातक विषाणू. खुप पॉवर चे वेगवेगळे ॲन्टीबायोटीक्स दिल्यावरच आटोक्यात आला.

ई-कोलाय रेझीस्टंस सुपरबग अत्यंत घातक आहे, एक एक करून सर्व अवयव निकामी करतो.

हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.

१. सर्व प्रथम ॲन्टीबायोटीक्सचा होणारा सर्रास वापर टाळावा <<< यामुळे कसा फायदा होईल? हल्ला करणारा शत्रू आपल्यावर होणारे प्रतिहल्ले (ॲंबायोटीक्सचे) परतवून लावण्याच्या तयारीनिशी सज्ज असेल तर शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारालाही सहज गुंडाळू शकेल ना?

थोडस बरं वाटेनासं झाल की गोळ्या घेणे बंद करावे। शरीरातल्या white cells लढ़ायचे काम करतच असतात घरगुती उपायानी बरे वाटते का पहावे।। btw लेख छान आहे sy ge।। पण तुमच्या नंतरच्या लेखाशी सुसंगत वाटला नाही खरे की खोटे लिहिलेय तुम्ही जाणे।