मायबोलीचे नवीन सर्वर वर स्थलांतर

Submitted by webmaster on 8 February, 2009 - 11:28

मायबोलीचे नवीन सर्वर वर स्थलांतर पूर्ण झाले आहे. कार्यपद्धतीत नवीन काही बदल नाहीत. पण काही गोष्टी काम करत नसतील तर कृपया इथे लक्षात आणून द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Admin/मदत समिती, गेले काही दिवस मला कोणत्याही बाफ वर गेल्यानंतर खालील प्रकारे पान दिसत आहे..

mb_error.gif

हा नक्की कसला प्रॉब्लेम आहे ते कळत नाही आहे.. खालच्या बाजूला येणार्‍या जाहिराती मुळे हा प्रॉब्लेम येतो आहे का ते कळत नाही आहे.. पण ह्या प्रॉब्लेममुळे कधीही दुसर्‍या कुठल्याही लिंक वर जायचे असेल तर पूर्ण पान स्क्रोल करून खालपर्यंत यावे लागते आहे.. Log out करताना सुद्धा पार खाल पर्यंत स्क्रोल करावे लागते आहे..

हा प्रॉब्लेम जुन्या सर्व्हरवर येत होता आणि नविन सर्व्हरवर पण येतो आहे..

==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

मला पण असेच दिसते.. आजच लक्षात आले..

Admin
Mala category uncategorized asa message
येतो. Tyamule websense re filtered karate.
Junya server var asa hot navhat. Hya babatit
Kahi karata yeil ka.

- अनिलभाई
It's always fun when you connect.

भाईंच्या आवाजात हे कोण बोलतंय? :p

अरे आय ट्च वरुन लिहाय्चे म्हणजे अस होणारच.
- अनिलभाई
It's always fun when you connect.

ऍडमीनराव लवकरच मायबोली मोबिल करुन द्या. मोबिल युजर बेस वाढतोय. Happy

भाई, कधीतरी मला एकदा आय फोनावरुन मराठीत दोन चार अक्षरे लिहीता आली होती. मराठी कसे उमटले ते नंतर अनेक ट्राय मारुन जमले नाही. पण बहुतेक त्यात मी तो वरचा ऍरो (शिफ्ट) पण दाबले होते. ट्राय करुन बघा.

मी एकदा एखादा बीबी वाचून गेलो की त्या नंतर येणारे संदेश च फक्त नवीन म्हणून दिसायचे, पण आता एका विशिष्ठ वेळेपासून चे सगळे संदेश नवीन म्हणून दिसताहेत, उदाहरणादाखल ए.वे.ए.ठी. चा बीबी, आताच मला ३३ नवीन संदेश दिसले, ज्यातले २६ कालच वाचून झाले होते.
हे नवीन सर्व्हर मुळे होत असावे का?

मला पण सेम प्रोब्लेम ..
-----------------------------------------
सह्हीच !

त्यानंतरचे एक आख्खे पान वाचायचे राहिले का? Happy

ऍडमिन, माझा संदेश दुर्लक्षित करा. मला आता सगळे नीट दिसते आहे.
browser refresh केल्यावर हे दुरुस्त झाले असावे.

himscool, tanyabedekar
तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे. गेले काही दिवस आणि सध्या फक्त स्थलांतराशी निगडित अडचणी सोडवायच्या प्रयत्नात आहे. त्या सोडवल्या की हि अडचण पाहतो.

anilbhai
तुमची अडचण समजली नाही. तुम्हाला कुठे Category Uncatgorized" दिसते आहे?
Websense हे काय आहे (Filtering software ?) तसे असेल तर त्यावर आपला काहीच control नाही.

kedarjoshi
Iphone Browser वर देवनागरीसाठी योग्य ते software अजून नाही (र्‍हस्व-दीर्घ्-जोडाक्षरे यांची बोंब आहे)

हो ते Filtering software आहे. जुन्या सर्वरवर हा प्रोब्लेम येत नव्हता. मायबोलिला क्लिक केल की लगेच हा मेसेज येतो. तुम्ही ही साईट एन्टरटेन्ड्मेन्ट साईट म्हणुन डीफाईन केली असेल तर ती बघता येत नाही. ती जर बिजीनेस साईट असेल तर कदाचीत बघता येईल.
- अनिलभाई
It's always fun when you connect.

मी आज दोनेक तासांपूर्वी एक कथा प्रकाशित केली (आधी नुस्तीच लिहिलीहोती आणि अप्रकाशित अवस्थेत होती). गेल्या दोन तासात ती कथा विभागात दिसत नाहीये.
माझ्या पाऊलखुणांमधे ती "प्रकाशित" अवस्थेत दिसतेय पण गुलमोहरात नाही.
मी आत्ताच तिचं नाव बदललं - धुरा! तरीही दिसत नाहीये.
कौतुकलाही त्याच्या कथेच्या बाबतीत असलाच काहीतरी प्रॉब्लेम आलेला दिसतोय.

झाली झाली... कथा प्रकाशित झाली. धन्स!

daad, kautukshirodkar नक्कीच काही तरी अडचण आहे शोध सुरु आहे. कथा प्रकाशित केल्या केल्या लगेच दिसायला हवी. आणि कौतुक यांची कथा ही दिसत नाहिये. पाहतोय काय होतंय ते.

कवितांऐवजी चुकून कथा ब्लॉक झाल्या वाटतं.... Wink Light 1

admin,

माझा पूर्वी प्रकाशित केलेला एक लेख गायब झाला आहे.

हेमलकसा
http://www.maayboli.com/node/2411

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

कथा पुन्हा व्यवस्थित दिसायला लागल्या आहेत. चीनूक्स यांचा लेखही दिसतो आहे. ज्या ज्या लेखनामधे एकाच पानावर एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त मजकूर होता ती पाने दिसत नव्हती. आता ती मर्यादा वाढवून दिली आहे. सध्या मर्यादा बरीच आहे (उदा कौतुक शिरोडकर यांची कथा) पण त्या ही पेक्षा जास्त एका पानावर लिहिता येणार नाही. तसे झाले तर कृपया लेखन एकापेक्षा जास्त पानात विभागून टाकावे.

मदत_समीती,

मला माझा profile photo बदलायचा आहे....पण जरी मी जुना फोटो delete करुन वेगळा टाकला तरी पण आधिचाच फोटो दिसत आहे...काही problem आहे का?

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

सेम प्रोब्लेम मला ही आहे Sad
-----------------------------------------
सह्हीच !

केदार, दीपुर्झा
नवीन फोटो लावल्यावर एकदा ब्राउझर रीफ्रेश करुन बघा.

मायबोलीकरांची सुची कुठल्या दुव्यावर उपलब्ध आहे?

मदतपुस्तिका अशी टॅब आहे ना वर त्यावर टीचकी मारल्यावर तुला हव्या असलेल्या सुचीचा दुवा मिळेल.

बर, सापडला... धन्यवाद Happy

मला कालपासून browser मधला back arrow वापरल्यावर काहीतरी वेगळीच लिपी दिसते आहे. इतर दुवे नीट चालताहेत. ही अडचण कुठे विचारावी ते कळलं नाही म्हणून इथे लिहिलं. या प्रश्नाचं उत्तर इतरत्र कुठे आहे का?

रूनी, आभार. एकदा स्पेस बटन वापरून वाचता आलं पण आता forward arrow ला आणि refresh केल्यावरही हीच अडचण येतेय. आणि परत स्पेस बटन वापरलं तर काही उपयोग झाला नाही. काही browser setting बदलावं लागेल का?

नवीन मायबोलीची सुरुवात याच धाग्यापासून झाली का?

नंतर काही नवीन अपडेट? सोयीसुविधा?

काही सुविधा वगळल्याही असतील, त्याबद्दलही जाणून घेण्यास ऊत्सुक!