ऑपरेशन ब्लाइंड हॉक

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 November, 2016 - 13:21

'स्टोक' अवघ्या काही हजारांची लोकसंख्या असलेले एक छोटेसे गाव. लडाखची राजधानी 'लेह'पासून साधारण वीस - पंचवीस किलोमीटर अंतरावर वसलेलं एक छोटंसं खेडेगाव. तसं पाहायला गेलं तर 'स्टोक' (किंवा काहीजण याचा उच्चार 'स्टाक' असाही करतात) अगदीच काही अज्ञात किंवा दुर्लक्षीत नाहीये. माऊंट एव्हरेस्टवर चढाईसाठी येणारे बहुतांश गिर्यारोहक आधी सरावासाठी म्हणून 'स्टोक कांगडी' या शिखरावर चढाई करतात. हिमालयाच्या रौद्र निसर्गाने भरलेल्या आणि भारलेल्या स्टोक पर्वतराजीमधलं हे एक उत्तुंग शिखर. त्यामुळेच असेल कदाचीत पण ....

स्टोकच्या सौंदर्याला ख्यातीला कारणीभूत अशी अजुन एक गोष्ट म्हणजे लद्दाखच्या गतकालीन राजघराण्याचा वारसा सांगणारा, आता वस्तु संग्रहालयामध्ये रुपांतरीत झालेला त्यांचा वैभवशाली राजवाडा.

हिमालयाच्या पर्वतराजीतलं एक लहानसं, फारसा लोकसंपर्क नसलेलं गाव म्हणजे त्याला दैवी निसर्ग सौंदर्याचं वरदान असणं हे ओघाने आलंच. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली पांढर्‍‍याशूभ्र बर्फाची चादर. चारी बाजूला दिसणारी उत्तुंग पर्वतशिखरे आणि एका बाजुला खोलचखोल स्टोक व्हॅली. अशा या निसर्गरम्य, परंतू अतिशय दुर्गम भौगोलीक परिस्थीत वसलेले स्टोक. गाव तसं छोटंसंच, कधीमधी येणारे पर्यंटक आणि स्टोक कांगडीच्या चढाईसाठी येणारे गिर्यारोहक सोडले तर तसे 'शांत' , थोडेसे आळशी , सुस्त भासणारे गाव आहे स्टोक !

एका बाजूला उंचचउंच अजस्त्र कातळकडा उभा, तर आजुबाजूला स्टोक व्हॅलीची भीषण दरी. त्या कातळकड्यात वसलेली जगप्रसिद्ध स्टोक मॉनेस्ट्री, एक सेकंडरी स्कुलपर्यंत शिकण्याची व्यवस्था असलेलं हायस्कूल, एक-दोन बर्‍यापैकी हॉटेलं आणि स्टोक व्हॅलीतून वाहणार्‍या झन्स्कार नदीच्या दोन्ही तीरावर वसलेली लहान मोठी घरे, काही बंगलीवजा वास्तू, तिथेच एका कोपर्‍यात एका जुनाट बंगलीत थाटलेली पोलीस चौकी आणि स्टोकच्या अगदी एका कोपर्‍यात, लेहच्या विरुद्ध दिशेला जिथे झन्स्कारचा प्रवाह अगदीच लहान होत जातो, तिथे कायम भारतीय सैन्याच्या पहार्‍याखाली असलेली एक छोटीशी हवेली. खरेतर ती बहुदा कुणा भारतीय सेनाधिकार्‍याची खाजगी प्रॉपर्टी होती. पण बाहेर बोर्ड मात्र 'ऑफिसर्स क्लब'चा. कधी अधुन मधुन लडाखला हिमवर्षावामुळे अडकलेले सैन्याधिकारी अधेमध्ये तिथे उतरायचे. नाहीतर हा तथाकथीत आर्मी क्लब तसा ओसाडच होता. पण तरीही तिथे कायम आर्मीचे सैनीक पहारा देत असत. 'आंगचूक मोथूप' ने दोनतीन वेळा त्या प्रॉपर्टीत घुसण्याचा प्रयत्न करून पाहीला होता. पण त्याला सुद्धा बंगलीच्या गेटवरुनच परत पाठवण्यात आले होते. ..., 'आंगचूक मोथूपला' सुद्धा ! गंमत म्हणजे चार-पाच वर्षांपुर्वीपर्यंत अगदी आत पर्यंत जरी नाही तरी त्या बंगलीच्या दिवाणखाण्यापर्यंत प्रवेश होता 'आंगचूकला'. म्हणजे तिथले निवासी असणारे रिटायर्ड कर्नल फुन्सूक थापा यांच्याशी त्याची ओळख होती. त्यावेळी खरे तर सैनिकांचा पहारा पण नसायचा. पण चार एक वर्षापूर्वी अचानक सगळेच दृष्य बदलले. ती वास्तू सिव्हिलियन्ससाठी पुर्णपणे बंद करण्यात आली. बंगलीच्या चारी बाजूल अगदी सख्त पहारा सुरू झाला. एकदोन वेळा आंगचूकने प्रयत्न केला आपल्या उच्चाधिकार्‍यांशी बोलण्याचा, पण अगदी कडक शब्दात समज देवून त्याचे तोंड बंद करण्यात आले.

'आंगचूक मोथूप' , ३५ वर्षाचा उंचापूरा, गव्हाळ वर्ण, पण देखणा चेहरा लाभलेला 'आंगचूक मोथूप'. स्टोकच्या इवल्याश्या वस्तीतल्या इनमीन सात-आठ कर्मचारी असलेल्या पोलीस चौकीचा रुबाबदार, धाडसी एस्. एच. ओ. सतत काहीतरी साहस हवे असलेल्या आंगचूकला गेली चार वर्षे ती वास्तू खटकत होती. तीथे काहीतरी विचित्र, काहीतरी सामान्याच्या पलीकडचे घडतेय ही शंका त्याच्या मनाला शांत बसू देत नव्हती. आपल्या धाडसी स्वभावाला जागून दोन तीन वेळा त्याने गुपचूप त्या वास्तूत शिरण्याचा प्रयत्नही केला. पण तिथे पहार्‍यास असलेल्या सैनिकांनी त्याचा प्रयत्न हाणुन पाडला होता. एकदा तर त्याला तुरुंगवासच घडायचा. तो सापडलाच होता सैनिकांच्या तावडीत. पण त्यावेळी कर्नल थापांनी हस्तक्षेप केल्यामुळे निव्वळ गंभीर चेतावणी देवून त्याला सोडून देण्यात आले होते. त्याच्या वरिष्ठांनी कानपिचक्या दिल्या त्या वेगळ्याच. तिथून बदलीच व्हायची त्याची पण सुदैवानेच तो वाचला होता. तरीही त्या बंगलीबद्दल वाटणारे औत्सुक्य काही कमी होत नव्हते. गेल्या काही दिवसात ते जास्तच वाढले होते.

आठवड्याभरापूर्वी नासीर सांगत आला...

"हुजूर, त्या बंगलीभोवतीची चहल पहल वाढलीये आजकाल."

"चहलपहल ? पण मी तर गेल्या कित्येक दिवसात आर्मीची माणसं नाही पाहिली गावात, मार्केटमध्ये. म्हणजे बघ ना, स्टोकपासून त्या बंगलीपर्यंत जाणारा गावातला एकमेव रस्ता आपल्या चौकीवरुनच जातो. आणि आपली चौकी गावाच्या एका टोकाला आहे. इथून पुढचा रस्ता तसा थेट दरीत उतरणारा असल्याने डेड एन्डच आहे. त्यामुळे इथून पुढे जाणार्‍याला आपली परवानगी घेतल्याशिवाय जाता येत नाही. अगदी आर्मीवाले आले तरी हेडऑफीसहून आपल्या आगावू सुचना मिळालेली असते. तसं काहीही या वेळी झालेलं नाहीये."

आंगचूक आपल्या समोरची गेल्या आठवड्याभराची रजिस्टर्स चाळत म्हणाला.

हा भाग तसा शांतच असल्यामुळे चौकीत असणारे ७-८ पोलीस कर्मचारीसुद्धा तसे बर्‍यापैकी सुस्त आणि निष्क्रिय बनत चाललेले होते. त्यामुळे आंगचूक अजुनच वैतागायचा. त्यातल्या त्यात हवालदार नासीरुद्दीन बनातवाला हे एक अजब कॅरेक्टर त्याच्या दिमतीला होतं. नासीरमिया ऐन पंचविशीत होते. रक्तातली सळसळ, धाडसी स्वभाव आणि त्याबरोबर असलेलं देशावरचं , त्याहीपेक्षा त्याची लाडकी मातृभुमी लद्दाखवरचं प्रेम यामुळे हा पोरगा पोलीसात भरती झाला होता. पण इथे स्टोकमधल्या थंड ( केवळ 'गार' या अर्थाने नव्हे, तर एकुणच थंड ) वातावरणात कंटाळला होता. पण त्याच्या या स्वभावामुळेच त्याचं आंगचूकशी चांगलं जमायचं. त्यामुळे आंगचूकने कायम संशयाच्या घेर्‍यात असलेल्या 'त्या' हवेली कम ऑफिसर्स क्लबवर लांबूनच नजर ठेवायची कामगिरी नासीरवर सोपवली होती.

"दिड महिन्यांपूर्वी मेजर लांबा आणि त्यांच्या फॅमिलीची विश्रांतीसाठी म्हणून झालेली पर्सनल व्हिजीट सोडली तर आर्मीकडून कसलीही नोंद नाहीये आपल्याकडे. त्या व्यतिरीक्त गेल्या महिन्यात स्टोक कांगडीवर चढाई करण्यासाठी आलेली ती कोरीयन गिर्यारोहकांची टीम , तीची एक नोंद आहे. पण ती टीम परत गेल्याची सुद्धा नोंद आहे. त्या दिवशी आपण दोघेच होतो ना मार्केटमध्ये जेव्हा ती टीम परत गेली. त्यांचा तो टीमलीडर वूजीन आणि तो कॅसानोव्हा टाईप होता तो.. काय त्याचं नाव बरं ?

" तो 'मिनजून' हुजूर..."

" करेक्ट मिनजून, काय पण एकेक नावं त्यांची." आंगचूक स्वतःशीच पुटपूटला. पुटपुटताना त्याची नजर नासीरकडे गेली. नासीर त्याच्याकडे बघत मिश्किलपणे हसत होता. त्याच्या हासण्याचे कारण लक्षात आले आणि 'आंगचूक' स्वतःसुद्धा हसायला लागला.

"आमच्याकडे असलीच नावे असतात रे."

"असो, तर मुद्दा हा की हे दोन गृप्स सोडले तर इतर कुठल्याही गृपची नोंद नाहीये यात. "

नासीर थोडा घुटमळला बोलताना....

"सर, मलाही त्यामुळेच आश्चर्य वाटतेय. त्या वूजीनच्या टीममेट्सपैकी दोघे जण त्या हवेलीच्या आसपास घुटमळताना पाहीले आहेत मी. "

"कसं शक्य आहे नासीर, ते तर... , एक मिनीट, आर यू शुअर अबाऊट धिस? "

" तुम्हाला माहितीय हुजूर, मी एकदा पाहिलेला चेहरा परत जन्मात विसरत नाही. खरेतर मी त्यांना हटकायचा विचार केला होता. पण त्यामुळे ते सावध झाले असते. मी दोन कॉन्स्टेबल्स त्यांच्या रादर बंगलीच्या पाळतीवर ठेवले आहेत. सद्ध्यातरी त्यांना फक्त लांबूनच त्या दोघांवर नजर ठेवायला सांगितली आहे. "

आणि आज परत नासीर सांगत आला होता...

" हुजूर... 'रायान' गायब आहे गेले सकाळपासून . त्याला आणि तेन्जीनला मी बंगलीवर नजर ठेवायला सांगितली होती. रायान गायब झालाय आणि...

'आणि ......?'

' आणि तेन्जीनला अपघात झालाय . बंगलीमागच्या एका खोल कपारीत तेन्जीन बेशुद्धावस्थेत सापडला आर्मीच्या जवांनांना. सद्ध्या तरी तो बेशुद्धावस्थेत आहे. त्यामुळे अपघात आहे की घातपात हे तो शुद्धीवर आल्यावरच कळेल.

" मी तुला म्हणलो नव्हतो नासीर? त्या बंगलीत काहीतरी शिजतय नक्कीच. आधी अचानक सैनिकी पहारे बसवले जातात. आपल्याला सुद्धा प्रवेष निशिद्ध ठरवला जातो आणि आता हे नवीन त्रांगडं. तू एक काम कर, अजुन काही जण बरोबर घेवून 'रायान'चा शोध घ्या. मी दवाखान्यात जावून तेन्जीनची खबर घेतो..."

"आणि नासीर....

दारापर्यंत गेलेला नासीर मागे वळला, " जी हुजूर...!"

"काळजी घ्या. उगीच जास्तीचे धाडस दाखवायला जावू नकोस. मला माझी माणसं गमावणं परवडणारं नाहीये."

"जी हुजूर"

नासीर अजून काही कॉन्स्टेबल्स घेवून रायानच्या शोधात निघाला तर आंगचूक दवाखान्याकडे....

*************************************************************************************************************************************

स्टोकपासून हजारो किमी अंतरावर....

उत्तर कोरीयातील एका छोट्याश्या शहरात...

फोन खणखणला तसा त्याने लॅपटॉपमधली नजर बाहेर काढली. खुर्ची सोडून निवांतपणे सिगारेट शिलगावली आणि मग आपला सेलफोन उचलून कॉल पिकअप केला. बहुदा हा कॉल त्याला अपेक्षीतच असावा आणि आपण उचलल्याशिवाय कट होणार नाही हे सुद्धा त्याला पक्के ठाऊक असावे.

" annyeonghaseyo, mal ( Hello, tell me)

"boseu , jihoo ga jug-eoss" ( Boss, Jihoo is dead)

त्याने एक थंड नि:श्वास सोडला. कपाळावर क्षणभर एक आठी उमटली आणि..

"Choa , naui da-eum myeonglyeong eul gidalineun dasi jeonhwahaji anhseubnida. naega god dangsin-eul hochul ( OK, wait for my next instructions. and don't call me again. I will call you soon.)

त्याने फोन टेबलवर आदळला.

परत तिरीमिरीत त्याने फोन उचलला आणि कुठलातरी नंबर लावला....

थोडा वेळ रिंग गेल्यानंतर पलीकडच्या व्यक्तीने फोन उचलला.

"मेजर शौकत हिअर.... , व्हाय डिड यू कॉल मी? आय हॅड वॉर्न्ड यू नॉट टू कॉल, बेवकुफ?"

"आय हॅव लॉस्ट अ मॅन मेजर. कॉस्ट इनक्रीज्ड नाऊ."

"डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. यू विल गेट व्हॉट एव्हर यू नीड. आय वॉन्ट रिजल्ट्स मिस्टर जोंग यु."

"डोंट वरी, यू विल गेट व्हॉट यु आर पेयींग फॉर."

त्याने फोन ठेवला, ठेवता ठेवता पलिकडच्या मेजरने हिंदीतून हासडलेली शिवी त्याच्या कानावर आली आणि तो हसला. बराच काळ नेपाळच्या भागात काढल्यामुळे त्याला हिंदी तशी नवीन नव्हती. त्यामुळे मेजर शौकतने उच्चारलेला तो शब्द म्हणजे एक अतिशय गलिच्छ शिवी आहे हे त्याच्या बरोबर लक्षात आले. पण जोपर्यंत मेजर त्याला वेळच्या वेळी पैसे देत होता, तोपर्यंत असल्या शिव्यांनी त्याच्या अंगाला भोके पडणार नव्हती.

*******************************************************************************************************************************************

"सर, ते दोघे जण होते. त्यातला एक जण गेल्या महिन्यात आलेल्या त्या कोरीयन गिर्यारोहकांपैकी एक होता."

नुकताच शुद्धीवर आलेला तेन्जीन समोर बसलेल्या आंगचूकला सांगत होता.

"एकच...., ?"

" कदाचित दोघेही असतील. मी मात्र एकालाच ओळखले. हवालदार साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही त्या ऑफिसर्स क्लबवर पाळत ठेवून होतो....

...

....

" रायान, तू उत्तरेकडील बाजूने पहारा ठेव, मी दरीकडची बाजू सांभाळतो. पोलीसात भरती होण्यापूर्वी काही काळ शेर्पागिरी केलेली असल्याने मला त्या दरीची आणि पर्वतरांगाची रेघ न रेघ माहीत आहे. तेव्हा तो भाग मी सांभाळतो. तू हा उत्तरेकडचा गेटच्या बाजुचा भाग सांभाळ" , तेन्जीनने रायानला सुचना दिली आणि तो बंगलीच्या मागच्या बाजूला जाण्यास निघाला.

"तेन्जीन, तुला असे नाही वाटत का की हवालदारसाब उगीचच बाऊ करताहेत. अरे गिर्यारोहक आहेत ती पोरं. कड्याकपारीत गिर्यारोहणाचा सराव नाय करणार तर काय बंगल्यात करणार?" , कायम गस्त, पहारा देणे असल्या कामाचा कंटाळा असलेल्या रायानने वैतागलेल्या आवाजात तेन्जीनला विचारले. " त्यांच्या मागे फिरत बसण्यापेक्षा सरळ दोघांना उचलुयात आणि चौकीत घेवून जावुयात. आपली स्पेशल ट्रीटमेंट दिली की पोपटासारखे बोलायला लागतील दोघेही."

"हे बघ रायान, हवालदारसाबनी सांगितलय की ते दोघेही कोरियन नागरीक आहेत, परवानगी घेवून इथे गिर्यारोहणाच्या सरावासाठी आलेत. त्यांच्यावर थेट हात टाकायला आपल्याकडे काहीही पुरावा नाहीये. अश्याने देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संबंध धोक्यात येवू शकतात. तेव्हा जेवढे साबनी सांगितलेय तेवढे कर. स्वतःचे डोके चालवू नकोस." तेन्जीनने रायानला दटावले आणि तो आपल्या ठरलेल्या दिशेने निघाला.

रायानच्या चेहर्‍यावरून त्याला काही ते पटलेले दिसत नव्हते. आळशी जरी असला तरी रायान भित्रा नव्हता. पण साहेबांचा हुकूम न पाळण्याचे परिणाम नोकरीवर होवू शकतात हे माहीत असल्याने तो गपचूप सांगितलेले काम करत राहीला.

तेन्जिनच्या वॉकीटॉकीने मंद स्वरात बीप-बीप करायला सुरुवात केली...

हॅलो, हॅलो ...

तेन्जिन, रायान बोलतोय. ते दोघे जण बंगल्याच्या उत्तरेला आहेत. त्यांच्यापैकी एक जण आत शिरण्याचा प्रयत्न करतोय. लवकर पोहोच, मी आता थांबू शकत नाही फार काळ.

मी, आलोच रायान. तू घाई करू नकोस. काहीतरी काळेबेरे आहे नक्कीच. त्यांच्याकडे शस्त्रे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी येतोच आहे, तोपर्यंत फक्त नजर ठेव...

..

..

..

..

आणि त्यानंतर मला रायानही दिसला नाही आणि ते दोघे सुद्धा. बंगलाही शांत होता. ते दोघे आत शिरले असते तर कदाचित आतल्या सैनिकांनी काहीतरी विरोध केला असता. काहीतरी गडबड, गोंधळ झाला असता. पण..... ! तरीही मी बंगल्याच्या कंपाऊंडवरून आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. पण नेमके त्याच वेळी माझ्या डोक्यावर मागून काहीतरी प्रचंड आघात झाला आणि माझी शुद्ध हरपली. त्यानंतर शुद्धीवर आलो तेव्हा इथे तुमच्यासमोर होतो. साबजी, रायान...?

तेन्जीन, रायान अजुनही गायब आहे. वी हॅव नो ट्रेस ऑफ हिम येट?..... आंगचुकने एक दीर्घ निश्वास सोडला.

सर, अजुन एक गेल्या काही दिवसात अजून एक माणुस त्या परिसरात वावरताना दिसला होता मला.

कोरियन?

नाही सर, तो कोणीतरी भारतीय होता. मला नक्की नाही सांगता येणार पण त्याचा चेहरा ....?, तो माणूस एकदाच ओझरता दिसला मला. चेहरा नाही आठवत आता, पण त्याचे अतिशय कठोर, पण चकाकणारे डोळे मात्र मी कधीच विसरू शकणार नाही.

तू ठिक आहेस तेन्जीन? बाहेर येवू शकशील?

एकदम फिट साबजी.... तेन्जीन पटकन अटेन्शन मोडमध्ये आला तसा हसत आंगचुक उठला. आता सगळे प्रोटोकॉल्स बाजूला ठेवायची वेळ आली होती. त्याचा एक माणूस गायब होता आणि एक जखमी झाला होता. काहीतरी शिजत होतं नक्कीच.

नासीर , गाडी काढ, आपल्याला हवेलीत जायचय. मी सांगितलेलं काम केलयस ना?

यस्सर !

*************************************************

कर्र्च्चक्क ! पोलीस व्हॅन ऑफिसर्स क्लबच्या दारात थांबली. तसे पहार्‍यावरचे जवान चौकन्ना झाले. पण गाडीतून उतरताना आंगचुकही चमकला. कारण क्लबच्या दारात अजुनही एक लांबलचक गाडी उभी होती..... स्टेशन वॅगनटाइप.

जवानांनी त्याला गेटवरच अडवले. आंगचुकला याची कल्पना होतीच, पण त्यामुळेच त्याने रायानच्या बेपत्ता होण्याची खबर वापरून आधीच हेडक्वार्टरकडून परवानगी मिळाली होती. पण ते वॉरंट वापरण्याची त्यावर वेळच आली नाही. क्लबच्या दारात एक अनोळखी चेहरा डोकावला आणि त्यांने जवानांना काहीतरी खुण केली तशी जवान आपोआप बाजूला झाले.

"वेलकम इन्स्पेक्टर मोथूप ! मायसेल्फ मेजर चैतन्य निंबाळकर. मला माहीत होतं तू येणार ते."

तेन्जीन हळूच आंगचुकच्या कानात कुजबुजला...

"साबजी, हाच तो चकाकणार्‍या डोळ्याचा......"

राईट यु आर, तेन्जीन. तोच मी.

आंगचूक जाम गोंधळात पडला होता.

"आय एम सॉरी सर, पण माझा एक माणूस गायब झालाय या प्रकरणात. हे नक्की काय चाललेय ते मला कळायलाच हवंय..... आंगचुक थोडा रागातच बोलला.

"आय कॅन अंडरस्टँड माय फ्रेंड. आय एम सॉरी, पण तो जिवंत असण्याची शक्यता कमीच आहे. हा तेन्जीनही त्याच्याच वाटेने गेला असता पण ऐन वेळी मी त्याच्या मागे पोचलो आणि त्याच्या डोक्यावर आघात करून त्याला बेशुद्ध केले म्हणून वाचला. मी काहीही हालचाल करायच्या आधीच रायान आत पोचला होता, नेमका तेन्जीनच्या नादात वेळ गेल्याने मला उशीर झाला आणि मी आत उशीरा पोचलो..., तोवर चौघेही गायब झालेले होते."

बोलता बोलता चैतन्यची नजर पहार्‍याच्या जवानांकडे वळली पण पुढच्याच क्षणी त्याच्या लक्षात आले की त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांना तर बिचार्‍यांना आपण कशावर पहारा करतोय ते ही माहीत नव्हते. आणि इथे तर त्याची गाठ जगातल्या एका अतिशय घातकी गुन्हेगारी टोळीशी होती.

"चौघे?"इति आंगचुक

चैतन्यने आर्मीच्या त्या दोन जवानांना बाहेर जाण्याची खुण केली. त्यांच्या बरोबरच त्याने नासीर आणि तेन्जीनकडेही पाहीले तसे ते दोघेही बाहेर पडले.

"आंगचुक, खरे तर हा पुर्णपणे आर्मीच्या अखत्यारीतला मामला आहे, सो आय एम नॉट अ‍ॅट ऑल अलाऊड टू टेल यू एनीथिंग. पण तू यात एक माणूस गमावलायस. म्हणजे कदाचित तो अजुनही जिवंतही असू शकतो, कदाचित मृतही. पण तुझी पुर्ण माहीती माझ्या रेकॉर्डला आहे. त्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवून ही गोष्ट तुला सांगतोय. आय होप, इट विल रिमेन बिटवीन यू अँड मी. आणि तुला हे सांगतोय, कारण कदाचित आम्हाला तुझी मदत होवू शकेल या केसमध्ये म्हणून. एक लक्षात घे, बाहेर पहारा देणार्‍या त्या जवांनासुद्धा हे माहीत नाहीये की ते इतके दिवस कशासाठी आणि कुणावर पहारा देत होते."

आंगचुकचे खांदे साहसाच्या कल्पनेने उत्तेजीत झाले.

"यु प्लीज रेस्ट अ‍ॅश्युअर्ड सर. माझ्या या कानाने ऐकलेली गोष्ट त्या कानापर्यंत सुद्धा पोचणार नाही."

"थँक्स आंगचुक, मग ऐक... गेली तीन वर्षे इथे एक भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा कैदी अतिशय गुप्तपणे कैदेत ठेवलेला होता. त्याच्या इथे असण्याबद्दल खुप कमी जणांना माहिती होती. तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, चार वर्षापुर्वी जेव्हा पहिल्यांदा तुला इथे यायाला बंदी करण्यात आली, तेव्हा या बंगलीचे एका तुरुंगात रुपांतर करणे चालु होते. त्यांनंतर त्याला इथे हलवण्यात आले. गेली तीन वर्षे तो इथेच होता आमच्या संरक्षणात, कैदेत. पण समहाऊ....

समहाऊ, इंडीयन आर्मी हॅड फेलड धिस टाईम. एका अतिशय कुख्यात अश्या कोरीयन मर्सिनरीजच्या गँगने त्याला सोडवून नेण्याची सुपारी घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. गेल्या काही दिवसात त्यांच्या गुप्त हालचाली वाढल्याचे आमच्या लक्षातही आले होते. पण ते लोक आपल्यापेक्षा खुपच फास्ट ठरले. कधी नव्हे ते मी फसलो आणि त्या लोकांनी माझ्यावर मात केली. दोन दिवसांपूर्वी, ज्या दिवशी रायान आणि तेन्जीन इथे आले होते, त्याच दिवशी त्या टोळीने त्याची सुटका केलीय. कशी? ते अजुनही कळालेले नाहीये. पण मी लवकरच शोधून काढेन. त्या कामात कदाचित मला तुझी मदत लागेल." चैतन्यने आपले बोलणे संपवले तसा आंगचुकने पुढचा प्रश्न विचारला.

"पण मग इतक्या खतरनाक कैद्याला, केवळ बाहेरच्या काही पहारेकर्‍यांच्या भरवशावर कसे ठेवले होते?"

"नाही आंगचुक, बाहेरचा चार जवानांचा पहारा हा केवळ दिशाभूल करण्यासाठी होता. आत, प्रत्य़क्ष सेलवर बारा अतिशय घातकी अशा कमांडोजचा पहारा होता, ज्याबद्दल बाहेरच्या जवांनानाही माहिती नव्हते. आणि तुला तर माहीतीच आहे, आर्मीत प्रश्न विचारले जात नाहीत, फक्त आज्ञा पाळल्या जातात. पण इथे शत्रू आपल्यापेक्षाही घातकी आणि हुशार ठरलाय."

"म्हणजे?"

"आत माझ्या बारा कमांडोजची प्रेतं पडली आहेत आंगचुक. तू एक माणुस गमावलाहेस, मी बारा बहाद्दर गमावून बसलोय. सामना अतिशय भयंकर आणि घातकी लोकांशी आहे."

"इफ यु डोंट माइंड......

"मला माहिती आहे तू काय विचारणार ते. खरे तर मी तुला काही सांगायला नकोय. पण मी दुर्दैवाने तितका कट्टर आर्मीमॅन नाहीये, त्यामुळे काही निवडक अपवादांच्या बाबतीत मी प्रोटोकॉल मोडतो बिंधास्त. सुदैवाने या आधीच्या दोन्ही वेळी माझे निर्णय योग्य ठरलेत आणि का कोण जाणे मला तुझ्याबद्दल तितकीच खात्री वाटतेय जितकी शिर्‍याबद्दल वाटली होती."

"शिर्‍या...?"

"कळेल लवकरच. हा जो कैदी आपल्या कैदेतून पळालाय ना, त्याला पकडून देण्यात शिर्‍याचा सिंहाचा वाटा होता, त्यामुळे आता तो पळालाय म्हटल्यावर मी कितीही नाही म्हटले तरी शिर्‍या या प्रकरणात उतरणार आणि मग त्याची, तुझी भेट होइलच. इफ यु आर इंटरेस्टेड, आय वुड आस्क माय सुपिरीयर्स टू इन्वोल्व्ह यू इन धिस केस?"

"ऑफकोर्स सर, आय वुड लव्ह टू. पण सर, तुम्ही अजुनही.......

"हिज नेम इज 'पख्तुनी, पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा, जगातील अतिशय घातकी हेरांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा मेजर दिलबागखान पख्तुनी !"

*********************************************************************************

नजर जाईल तिथवर पांढरा आणि काही प्रमाणात हिरवा रंग पसरलेली ती सुविख्यात, निसर्गरम्य स्टोक , खरेतर हिमालयाचा परिसर. स्टोक तसं आता बरेच मागे पडलेले होते. सगळीकडे अभेद्य पर्वतशिखरे आणि दर्‍या. पण त्याचं हे प्रेमात पाडणारं सौंदर्यही तितकंच दुर्गम होतं. एका बाजुला उंचच उंच कडा आणि दुसरीकडे दरी. एखादे पाऊल चुकून इकडे तिकडे पडले की लगेच खाली पडायच्या ऐवजी थेट वर जाण्याची शक्यताच जास्त. आणि अश्यात जर तुमच्या पाठलागावर भारतीय सैन्याचे एखादे पथक असेल तर विचारुच नका....

ते दोघेजण होते. दोघेही साधारण सहा-साडे सहा फुटी, धिप्पाड शरीरे. दोघेही कसलेले वाटत होते. सराइतासारखे न चुकता त्या भीषण दरीतुन मार्गक्रमण करत होते.

"व्हाट्स युवर नेम, बडी?" पख्तुनीने गेल्या दिड दिवसात तिसर्‍यांदा हा प्र्श्न विचारला होता. पण त्याचा जोडीदार एखाद्या मुक्या माणसाप्रमाणे शांत होता. तो पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पख्तुनीकडे बघून हलकेच हसला आणि...

"इज दॅट रिअली इम्पॉर्टन्ट मिस्टर पख्तुनी?"

आवाजात एक प्रकारचा कठोर, खरखरीतपणा होता. पण असहकार नक्कीच नव्हता. त्याला आपले डिटेल्स शेअर करायचे नाहीयेत हे एव्हाना पख्तुनीच्या लक्षात आलेले होते. पण त्याला जास्तीत जास्त बोलते करुन पख्तुनी त्याचा बेस जाणुन घेण्याचा प्रयत्न करत होता. कारण या माणसाचा चेहरा थोडासा नॉर्थ इस्ट एशियन वाटत होता, पण त्याची साडे सहा फुटापेक्षा जास्त असलेली धिप्पाड देहयष्टी त्याच्या चेहर्‍याशी मेळ खात नव्हती. पण भाषेचा एक्सेण्ट मात्र किंचित कोरीयन वाटत होता. या माणसाने आपल्या सुटकेसाठी भारतीय कमांडोजची एक पुर्ण टीम उध्वस्त केलेली पख्तुनीने पाहिली होती. त्याच्या पराक्रमाबद्दल एक अनामिक आदर निर्माण झालेला असला तरी मनात कुठेतरी शंकेचे पिल्लुही वळवळायला लागलेले होते.

(इथुन पुढे वाचकांच्या (आणि माझ्याही) सोयीसाठी आपण सरसकट मराठी भाषा वापरणार आहोत, सर्व संभाषणांसाठी)

"मला माहीती आहे पख्तुनी, तुझ्या मनात सद्ध्या अनेक प्रश्न आहेत. का? कशासाठी? कोण? कुणासाठी? पण लेट मी टेल यु, मला काहीही बोलायची परवानगी नाहीये. सद्ध्या इतकेच सांगू शकेन की मला , एका प्रोफेशनल संघटनेकडून तुला सोडवण्याची सुपारी मिळालेली आहे. त्यासाठी एक अवाढव्य रक्कम माझ्या अकाऊंटला जमा झालेली आहे. आणि अर्थातच जोपर्यंत माझ्या अकाउंटला नंबर्स दिसताहेत तोपर्यंत बाकीचे प्रश्न विचारायची किंवा त्यांची उत्तरे शोधायची मला गरज भासत नाहीये."

"पण ज्या लोकांना तू संपवलेस , ते कोण होते माहीत आहे का? "

"भारतीय सैन्यदलाचे किंवा कदाचीत रॉ, एम आय चे कमांडोज असावेत. इट डझन्ट मेक एनी डिफरन्स टू मी. आय एम अ प्रोफेशनल असासीन. मला पैश्याशी मतलब आहे. तुला सोडवून आणण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते. ते मी केले. एकदा तुला 'त्या' लोकांच्या ताब्यात दिले की माझे काम संपले. त्यानंतर जर दुसर्‍या कोणी मला तुला मारायची सुपारी दिली, किंवा परत त्या संघटनेच्या तावडीतून सोडवून भारतीय सैन्याच्या ताब्यात देण्याची सुपारी दिली तर मी ते ही काम तेवढ्याच आनंदाने करेन."

"गुड, मग जर मीच आत्ता तुला एक आगाऊ सुपारी दिली तर स्वीकारशील?" पख्तुनीने जाळे टाकायला सुरूवात केली तसा तो धुर्तपणे हसला.

"मिस्टर पख्तुनी, तुझ्याबद्दल माझ्याकडे असलेली माहिती अगदीच चुकीची नाहीये तर. मी तुला त्या संघटनेच्या ताब्यात देण्यापूर्वी माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुला मिळतील. त्यानंतर जर तूला शक्य झालेच, आणि तू माझी किंमत देवू शकलास तर ..... आय विल बी एट युवर सर्व्हीस."

इतक्यात त्याचा सॅटेलाइट फोनने बिप द्यायला सुरुवात केली आणि त्याने कॉल पिकप केला. आपल्या भाषेत फोनवर काहीतरी बोलून झाल्यावर पख्तुनीकडे वळून एक स्माइल केले.

"गेट रेडी मिस्टर पख्तुनी, तुझी माणसं तुझी वाट पाहताहेत , तासाभरात मी तुझी डिलीव्हरी पुर्ण करेन. अर्थात ती तुझी माणसं आहेत का शत्रु आहेत हे मला माहीत नाही. पण त्यांना तू हव आहेस हे नक्की. माझी गरज पडलीच तर नोमपेन्ह मध्ये प्याँगयाँग रेस्ट्रॉच्या मागे एक कोरीयन नाइट कॅफे आहे, 'किम्स डेन' या नावाचा. तिथल्या काऊंटरला एक मेसेज ठेव लिओपॉर्डसाठी , तुझे कॉन्टॅक्ट डिटेल्स देवून ठेव. मी कॉन्टॅक्ट करेन. विश यु अ नाइस फ्री लाइफ माय फ्रेंड. "

पख्तुनी नावाचं वादळ मुक्त झालं होतं. मेजर चैतन्य आणि ब्रिगेडीयर चक्रवर्ती यांच्यासाठी हि बातमी अतिशय चिंताजनक होती.

***************************************************************

" चैतन्य, पाहायला गेलं तर बातमी तशी निरुपद्रवी आहे आणि म्हणायला गेलं तर चिंताजनकही आहे. "

" मी समजलो नाही कर्नल ????"

"चैतन्य, आतापर्यंतच्या , विशेषतः मागच्या केसमधील एकंदरीत वर्तन लक्षात घेता शिर्‍यावर नजर ठेवायची तुझी मागणी चक्रवर्तींनी मान्य केली होती."

"यस्स सर, पैश्यांच्या बाबतीत शिर्‍या थोडा ढिलाच आहे, म्हणून अगदी जवळचा मित्र असुनही मी त्याच्यावर लक्ष ठेवण्याची मागणी केली होती."

"आय माइट बी राँग माय सन, पण या कर्नल देशमुखाचा अनुभव धोका देत नसेल तर काहीतरी गडबड नक्की आहे चैतन्य. कारण गेले आठवडाभर शिर्‍या गायब आहे. त्याच्या पाळतीवर असलेल्या आपल्या एजंटला अगदी सहज गुंगारा दिलाय शिर्‍याने. काल पर्यंत आपल्या एजंटकडून व्यवस्थीत अहवाल येत होता शिर्‍याच्या हालचालींचा. पण काल एक शॉकिंग बातमी कळाली. शिर्‍याच्या पाठलागावर असलेला आपला एजंट एलिफंटा केव्ह्जच्या जंगलात हात, पाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्यामते गेले चार-पाच दिवस तो कुणाच्या तरी कैदेत होता. "

"मग...., म्हणजे असे असेल तर?"

"यु आर राईट मेजर, असे असेल तर शिर्‍याबद्दलची प्रत्येक बातमी, माहिती आपल्याकडे कशी काय पोहोचत होती?"

"कर्नल, डु यू मीन टू से, शिर्‍या....?"

"आय डोंट वान्ट टू से एनीथिंग मेजर, पण काहीतरी गोंधळ आहे. रॉच्या माहितीनुसार शिर्‍याच्या हाताचे ठसे नोमपेन्हमधल्या एका नाइट कॅफे मध्ये सापडलेत. तिथे गँबलींग टेबलवर झालेल्या हाणामारीत एका अज्ञात माणसाचा मृत्यु झालाय. तेव्हा स्थानिक पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना घेतलेल्या माहितीत जे ठसे सापडलेत त्यात शिर्‍याचे ठसे आहेत असे रॉ खात्रीशीररित्या सांगतेय. "

"पण सर, नोमपेन्हसारख्या एका शांत शहरात घडलेल्या एका क्षुल्लक मारामारीत रॉ ला स्वारस्य असण्याचं कारण काय?"

" 'किम्स डेन' या नावावरून काही लिंक लागतेय चैतन्य?"

" किम्स डेन..... ! म्हणजे.... एथिकल ड्रॅगन्स?"

"येस्स चैतन्य. एथिकल ड्रॅगन्स या कुप्रसिद्ध भाडोत्री मर्सीनरीज पुरवणार्‍या संघटनेचं संपर्क केंद्र असणार्‍या या नाइट कॅफेमध्ये झालेल्या या हाणामारीत जे काही फिंगरप्रिंट्स सापडलेत त्यातले काही शिर्‍याच्या फिंगरप्रिंट्सबरोबर मॅच होताहेत. जे आपल्यासाठी खुप शॉकींग आहे. कारण पख्तुनीला आपल्या तावडीतून सोडवून नेणारा सुद्धा एक एकांडा शिलेदारच होता."

शिर्‍या... शिर्‍या... नक्की काय करतोयस तू? तू जर शत्रुपक्षात असशील तर माझ्यासाठी हे प्रकरण शारीरीक, बौद्धीक आणि मानसिक अशा तिन्ही पातळ्यांवर फार कठीण जाणार आहे.....

मेजर चैतन्य, आयुष्यात प्रथमच एका विलक्षण प्रसंगात अडकला होता. अर्थात कुठल्याही परिस्थितीत पहिले प्राधान्य कायम देशालाच असणार होते.

*************************************************************************

मलेशियामधल्या एका पंचतारांकीत हॉटेलच्या एका राजेशाही सुइटमध्ये ती भेट झाली....

"शौकतमिया आप? मुझे तो लगा था की .....

"आपकी आर्मीसे ज्यादा हमे आपकी जरुरत है, मेजरसाहब. और सच मानीये तो फिक्र भी !"शौकत हुसैन मिर्झा, आय.एस. आय्.चा एक अतिशय वरच्या स्थानावरचा असा अधिकारी. असे मानले जात असे की तो थेट आणि फक्त चीफलाच आन्सरेबल आहे. एवढ्या वरच्या स्थानावरचा माणुस इन्व्होल्व्ह असलेला पाहून पख्तुनी आपोआपच गंभीर झाला.

"तो ये देढ-दो सालका इंतजार क्युं किया आपने?"

"आप तो खफा हो गये मेजरसाब, खैर छोडीये , कमींग टू द पॉइंट. एक बहोतही अहम काम के लिए आपकी जरुरत है ! और मुझे, सॉरी... हमे यकीन है के ये काम सिर्फ आपही कर सकते है! "

"ऐसा क्युं?"

"क्युंकी इस बार हमे दुश्मन के साथ साथ अपनेही लोगोंसे लडना है?"

"मै.....

"समझाता हूं, वक्त बहोत कम है और काम बहोत ज्यादा. लेकीन एक बात जान लिजीये, इस कामके लिए आपको इसलिये चुना गया है क्योन्की ये काम आपको अकेलेही करना है ! इव्हन हम भी इसमें कही नही आयेंगे, ना आपकी कोई मदत कर पायेंगे. कल को आप अगर पकडे जाते है तो ना तो पाकिस्तान ना ही आय. एस. आय. आपकी कोइ जिम्मेदारी लेगा ! "

"इसमे नई बात क्या है, सरहदपे लडे मेरे नब्बे हजार भाइयोकी जिम्मेदारी भी कहा ली थी सरकारने?" पख्तुनीचा स्वर कडवट झाला होता.

"कुछ चिजे ना चाहते हुये भी करनी पडती है मेजरसाहब. खैर ये फाइल संभालीये, इसमें सारी डिटेल्स है, बस इतना बता देता हूं की दो साल पहले एक सिक्रेट लॅबोरेटरी खोली गयी थी, जहांपर किसी बहोतही खतरनाक बायोलॉजिकल वेपनपर काम चल रहा है! आपको उस लॅब को तहसनहस करना है ! अगर उस वेपनका फॉर्म्युला मिल जाता है तो सुभानअल्लाह, वर्ना उनके हाथ भी कुछ नही लगना चाहीये!"

"इस छोटेसे कामके लिए इतना खर्चा करके, एक मर्सीनरी अपॉइंट करके मुझे छुडवाने की जरुरत क्या थी शौकतसाब ! ये काम तो आपके अपने लोगभी आसानी से कर सकते थे"

"नही कर सकते, क्योंकी इस लॅब के बाहर पाकिस्तानी फौज का सख्त पहरा है ! एक पूरी रेजिमेंट तैनात है वहापर !"

"इसका मतलब आप इतनी हद तक उतर आए? आपने ये सोच भी कैसे लिया की पख्तुनी अपने ही मुल्क के खिलाफ लडनेमें आपकी मदत करेगा?" पख्तुनी भडकला होता.

"कुल डाऊन , मेजरसाहब. हमने अभी पुरी बात नही बतायी है आपको. आपने मिया झुल्फिकार हसन जहांगीर'के बारे मे तो सुना होगा?"

"उस कमजर्फ को कौन नही जानता शौकतमिया? सदर-ए- रियासतका साला है इसिलिये आजतक बचा हुआ है, वर्ना कबका मै ही मार चुका होता उसे !"

"आपके पास जो फाइल है, उसमें कुछ सबूत ऐसे है जो ये साबीत करते है की अब आप अपनी मन्शा कभी पूरी नही कर पायेंगे, क्योंकी झुल्फिकार देढ साल पहले कराचीके एक हॉटेलमे मारा जा चुका है , सारे सबुत उस फाइल में मौजूद है !"

"तो फीर आप उससे इतना डर क्युं रहे है, अब तो रास्ता बिल्कुल साफ है! "

"नही मेजरसाब, ये मामला इतना साफ नही है, आपकी जानकारी के लिए बता दूं झुल्फिकारमिया कल शाम लाहोरमे हुयी एक रॅलीमे मौजूद थे ! रादर पिछले देढ सालसे वो बिल्कुल सक्रीय है यहां की पॉलिटिक्स में, और अब उनका रुतबा और भी बडा हो गया है !"

"मै कुछ समझ नही पा रहा हूं जनाब... आप अभी कुछ कहते है, अभी कुछ...."पख्तुनी गोंधळला

"ये कोइ और है मेजरसाब, जो पिछले कही महिनोसे झुल्फिकार बने छाया हुआ है, बदकिस्मती से जो सबुत उस फाइलमे है उन्हे आप तो समझ सकते है लेकीन सदर को समझाया नही जा सकता ! अहम मुद्दा ये है की जिस सिक्रेट लॅब की बात हम कर रहे है, वो इन्ही झुल्फिकारमियां की अगवानीमें चल रहा है ! और हमे पक्का यकीन है लॅबमे जो कुछ भी पक रहा है उसके पिछे हिंदुस्थान का हाथ है ! ये बंदा कोइ हिंदोस्थानी जासूस है जो इतने अंदरतक घुसा हुवा है, हमारीही फौज की निगरानी में हमारेही मुल्क के खिलाफ एक जहरीला हथियार तैयार करवा रहा है और चुंके वो सदर का साला है हम उसपर हाथ नही डाल सकते ! उसे टॉपमोस्ट सिक्युरिटी हासील है, कमसे कम सौ कमांडोजसे घिरा रहता है हमेशा ! ऐसेमें अगर कोइ हमारे मुल्क की मदत कर सकता है तो वो नाम है मेजर दिलबागखान पख्तुनी.... "

" मै अपने सोर्सेस से पता लगाऊंगा शौकतमियां. ऐसा नहीं है की आपपे यकीन नही है, लेकीन.. आप समझ सकते है, पख्तुनी के काम करने का यही तरीका है !"

"बिल्कुल मेजरसाहब, आप अपने सारे सोर्सेस युज कर सकते है, इन्शाल्लाह हमे यकीन है की आप कामयाब होकर ही लौंटेंगे!"

...

..

फाईल आणि आपल्या वैयक्तीक सोर्सेसकडून खात्री करून घेतल्यावर पख्तुनीच्या डोक्यात आलेला पहिला विचार होता, तो म्हणजे या वेळी लढा आपल्याच, म्हणजे त्याने स्वतःच ट्रेन केलेल्या कडव्या कमांडोजशी असणार आहे. कारण अशा कामासाठी पाकिस्तानी आर्मी इतर कुठल्याही रेजिमेंटचा विचार करणार नाही हे त्याला पक्के माहीत होते. एक एक माणुस त्याने स्वतः पारखून घेतलेला होता, एकेक जवान म्हणजे साक्षात सैतान होता. अशा जवळ जवळ तीनशे जणांच्या पहार्‍यातून त्याला त्या लॅबमध्ये घुसायचे होते. हे करताना आपल्याच माणसांची कमीत कमी हानी होइल याचीही काळजी घ्यायची होती कारण ती माणसे तशी निर्दोषच होती, आपण कुणाचे काम करतोय हेच मुळी त्यांना माहीत नव्हते. त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या पाक वतनसाठीच लढत होते. त्याच क्षणी पख्तुनीने मनातल्या मनात दोन निर्णय घेवून टाकले...

पहिला ... लॅब उध्वस्त झाली की पहीले काम म्हणजे झुल्फिकारला उडवायचे, त्या आधी त्याच्याकडून सगळे डिटेल्स काढून घ्यायचे. खरेतर आत्ताच त्याच्यावर हात टाकायचा मोह होत होता, पण अशाने दुश्मन होशियार झाला असता.

दुसरा निर्णय त्याने घेतला, तो म्हणजे "किम्स डेन "वर मेसेज सोडायचा...

***********************************************************

"आंगचुक, तुझ्यावर एक अतिशय महत्त्वाची कामगिरी सोपवणार आहे मी. पण त्या आधी मला तुझ्याकडून पुर्ण माहिती हवीये त्या कोरियन गिर्यारोहकांच्या टीमबद्दल. ते लोक कधी आले? कधी परत गेले? त्यांच्यातला कोणी मागे राहिला होता का?"

"पण सर तुम्हाला त्या लोकांबद्दल...., श्या मी पण काय मुर्ख माणुस आहे. कुणाला काय विचारतोय. सर ते लोक एकुण १८ जण होते....

आणि आंगचुक बोलायला लागला, ते शेवटी तेन्जीनकडून मिळालेली ताजी माहिती सांगुनच थांबला.

"म्हणजे दोघे जण कोणीतरी मागे राहीले होते. म्हणजे ज्या कुनी पख्तुनीची सुटका केली तो एकटा नव्हता. त्याच्याबरोबर मदत होती.. कदाचित बाहेरुन असेल पण होती. मुळ मुद्दा, असा आहे की ते जे कोणी होते ते तुझ्या माहितीनुसार कोरियन्स होते, पाकिस्तानी नव्हे. मग त्यांनी पख्तुनीची सुटका का करावी? आणि त्यांना पख्तुनीचा ठावठिकाणा कसा काय लागला? पॉसिबिलिटी ऑफ इनफिल्ट्रेशन ! ह्म्म्म....."

"आंगचूक तुला आता महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे शक्य ते सोर्सेस वापरून त्या टीमची माहिती काढायची. आलेल्यां-गेलेल्या प्रत्येक व्यक्तिचे डिटेल्स आउट पोस्टवर मिळतील. आणि या बंगलीवर नजर ठेवायची. इथे कोण येते, कोण जाते. आजपर्यंत रेग्युलर येणार्‍यांपैकी मग त्यात हरकामे नोकरसुद्धा येतात कोण कोण यायचे बंद झालेय. ही सर्व माहिती काढायची."

"श्या... मला वाटलं सर, तुम्ही मला या केसमध्ये बरोबर घ्याल."आंगचुकने नाराजी व्यक्त केली.

"तू आमच्या बरोबरच आहेस आंगचूक. हे ही काम तितकेच महत्त्वाचे आहे. आणि लवकरच मी तुला बोलवून घेइन. तुला इन्वोल्व्ह करुन घ्यायचे म्हणजे काही सरकारी सोपस्कार पुर्ण करुन घ्यावे लागतील, त्यात काही दिवस जातील. तोपर्यंत तू हे काम कर. मग मी तूला बोलावून घेतोच. "

************************************************

नोमपेन्हच्या प्योंगयोंग रेस्टोरंटच्या त्या लॉबीत तो म्हातारा बराच वेळ कुणाची तरी वाट पाहात बसला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो तिथेच , त्याच हॉटेलात मुक्काम करून होता. कुठल्यातरी आफ्रिकन देशातून आलेला टुरीस्ट म्हातारा, त्याच्याबरोबर त्याची साधारण त्याच्याच वयाची बायको. दोघांचाही वर्ण त्यांच्या नागरिकत्वाची ग्वाही देत होता. वय झालेले असले तरी म्हातारा अंगकाठीने धिप्पाड होता. वेटरला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की आल्यापासून म्ह्मातार्‍याने एकदाही बीअर किंवा कुठल्याही मद्याला हात लावलेला नव्हता. निव्वळ कॉफी , कॉफी..... आजही त्याचे चार वेळा कॉफी मागवून झालेले होते. वेटरने विचारले सुद्धा त्याला की सर तुम्हाला गाइड वगैरे हवा आहे का? , कुणाची वाट पाहताय? हवे असेल तर हॉतेलतर्फे सोय करून देवु का?"पण यावर म्हातारा नुसताच हसून गप्प राहिला होता.

एवढ्यात एक तरुण त्याच्यासमोर येवून उभा राहीला. कुठल्यातरी भडक अत्तराचा उग्र वास भक्क करुन नाकावर आला तसे म्हातार्‍याने वर पाहीले, आपले पिवळेजर्द दात दाखवत तो तसाच समोर उभा राहीला होता.

"सर, त्या वेटरने सांगितले की तुम्हाला गाइड हवा आहे म्हणून..."

म्हातारा भडकला.,"मी त्याला आधीच नकार दिलाय. नाऊ यु प्लीज टेक युवर फिल्दी माऊथ अँड डिसअ‍ॅपीयर, अदरवाईज आय विल हॅव टू कॉल हॉटेल गार्ड्स टू थ्रो यु आउट."

चिडून म्हातार्‍याने हातातल्या मॅगझिनमध्ये डोके खुपसले...

"अ‍ॅक्टींग अच्छी कर लेते हो मेजरसाहब, भेस भी अच्छा बदला है ! कोइ भी पहचान नही पायेगा आपको. लेकीन लिओ की नजरोंको धोका नही दे सकते."

म्हातार्‍याने चमकून वर पाहीले. समोर तोच गाईड दात दाखवत हासत होता.

"लिओ....? तुम....?"

"तुम्हाला काय वाटलं , चेहरा फक्त तुम्हालाच बदलता येतो. दॅट्स द मेन वेपन ऑफ माय बिझनेस सर."

तेवढ्यात वेटर जवळ येताना दिसला आणि तो परत भुमिकेत शिरला..."

चेहर्‍यावर शक्य तेवढी लाचारी आणत म्हणाला...

"साबजी मै हैदर, थॉमससाबने भेजा है, आपका गाइड हूं मै."

वेटरचे समाधान झाले पण आपले कमिशन हुकल्यामुळे तो वैतागला सुद्धा.

चले साबजी ?

हैदरने पुढे झुकून आदराने विचारले तसे पख्तुनी उठला. त्याच्या चेहर्‍यावर समाधान होते. त्याची निवड सार्थ ठरली होती. आता फक्त त्या भाडोत्री अभिनेत्रीचे पेमेंट करून तिला रफादफा करणे बाकी होते.

*****************************************************

" हॅलो डेडशॉट, एव्हरीथिंग इज ओके?"

"आतापर्यंत तरी सगळं प्लानींगप्रमाणेच होतय सर. झुल्फिकारने काही घोळ घालू नए म्हणजे मिळवली."

"पाखरू उडालय, आतापर्यंत शिकारी त्याच्या मागे लागले असतील."

"डोंट वरी सर, पकहरू लवकरच आपल्या ताब्यात येइल. आपले शिकारी सराईत आहेत."

"काही गोंधळ होता कामा नये, एक लक्षात घे इथे जर काही झालं तर आपलं सरकारदेखील आपल्याला वार्‍यावर सोडेल. वी ऑल मे लुज अवर क्रेडीबिलिटी."

"तसे होणार नाही सर. मी त्याला लवकरच परत आणेन. काहीही झाले तरी आपल्या प्रोजेक्टला धक्का लागू देणार नाही मी. इट्स अ वर्ड !"

"वेलडन चॅप अँड ऑल दी बेस्ट."

"थँक्स चीफ, नाऊ वी विल मीट टू सेलिब्रेट द सक्सेस ऑफ "ऑपरेशन ब्लाइंड हॉक".

***************************************************************************

"सो, आता तरी तू तुझ्या मुळ रुपात येणार आहेस का लिओ? बादवे लिओ हे तरी तुझं खरं नाव आहे की...."

आपला उद्देश्य स्पष्ट केल्यावर पख्तुनीने हैदरला म्हणजे लिओला विचारले. अर्थात लिओला त्याने पुर्ण माहिती दिलेली नव्हतीच. लिओला फक्त एवढेच सांगण्यात आले होते की एका पाकिस्तानी सैनिकांच्या पहार्‍यात बंदीस्त ठिकाणी एका माणसाला कैद करून ठेवले आहे. तिथुन त्याला उचलायचेय. आणि त्यासाठी लिओने पख्तुनीला त्या अभेद्य गढीत प्रवेश मिळवून द्यायचा होता. लिओच्या माहितीप्रमाणे ते सर्व पाकिस्तानी गणवेशातले भारतीय जवान होते.

"माझा अकाऊंट नंबर तुझ्याकडे आहे मेजर. माझी फी जमा झाली की मी तुझ्याबरोबर आहे. "

"संध्याकाळपर्यंत होवून जाईल ते काम. पण एक लक्षात ठेव, तिथे स्टोकमध्ये तू बारा कमांडोज कापले होतेस. इथे मला फार रक्तपात नकोय. कमीतकमी जिवीतहानी व्हायला हवी. "

"ओके डुड, माझी फी जमा झाली की मी कामाला लागतो. एका आठवड्याने इथेच भेटुयात. तुझ्या फाइलमधला तो नकाशा तेवढा मला देवून ठेव. आय नीड टु फाइंड आउट अ‍ॅटलीस्ट टू-थ्री पॉसीबल वे आउट्स ! अँड येस वी मे नीड सम अ‍ॅमो."

"त्याची व्यवस्था मी करेन. आठवड्याभराने तू भेटशील तेव्हा मी तयार असेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव लिओ. मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय कारण आजपर्यंत मी कधीही तुझे नाव ऐकलेले नव्हते. पण गेल्या काही दिवसात मी बरीच माहिती मिळवलीय. अगदी 'झाई झँग'पासून ते जोंग यू पर्यंत. तेव्हा माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न करशील तर यापुढे लिओ हे नाव कधीच, कुणालाच ऐकू येणार नाही याची काळजी हा मेजर दिलबागखान पख्तुनी जातीने घेइल."

लिओच्या चेहर्‍यावर आधी आश्चर्य आणि मग कौतुकाचे भाव उमटले.

"इट्स रिअली प्लेझर टू वर्क विथ अ डिझर्व्हींग सोल्जर , मेजर. तू थेट जोंगपर्यंत पोचलास म्हणजे यु आर समथींग. उगाच नाही आय. एस. आय. ने तुझ्यावर विश्वास टाकून तुला सोडवण्यासाठी एवढा खर्च केला."

"आय. एस. आय."?

"कमॉन मेजर, मी पण कोणी बच्चा नाहीये. गेली कित्येक वर्षे या खेळात टिकून आहे ते याच मुळे. आय हॅव माय ओन सोर्सेस माय डिअर. एकच सांगतो, मला फक्त आणि फक्त पैश्याशी मतलब आहे. जोपर्यंत तू आर्थिक बाबतीत माझ्याशी दगाबाजी करत नाहीस तोपर्यंत आय एम विथ यू. अदरवाइज, लिओच्या असंख्य शत्रुंमध्ये अजुन एकाची वाढ होइल."

"जाण्यापूर्वी एकच प्रश्न लिओ ........'

"माहितीये, पण त्याला माझे आजही तेच उत्तर आहे. नावात काय आहे? चल, तरीही तू मला आवडलास. लिओच्या मुळापर्यंत पोचणारा तू पहिलाच माणुस आहेस, त्यामुळे धोकादायक असलास तरी मला आवडलास. ज्या कामासाठी तू मला हायर केले आहेस, ते सक्सेसफुली पुर्ण झाले की मी तुला माझे खरे नाव नक्की सांगेन. दॅट्स अ जंट्लमॅन्स वर्ड."

***********************************************************************

"हॅलो डेडशॉट धिस एन्ड..."

"डेडशॉट, पाखरु लोकेट झालय. ते कंबोडियामध्ये आहेत. प्योंगयाँग हॉटेल, नोमपेन्ह सिटी. गेल्या दोन दिवसात तो एका हैदर नावाच्या मुसलमान गाईडबरोबर पाहिला गेलाय.""

"गुड, लक्ष ठेव. तो नजरेच्या टप्प्याबाहेर जाता कामा नये.

"योग्य वेळ आली की त्याला उचलूच आपण."

"यस बॉस्स"

**********************************************************************

"चीफ, पाखरू टप्प्यात आहे. शिकारी नजर ठेवून आहेत. त्याच्या हालचालीची खबर आपल्यापर्यंत पोचत राहील."

"गुड, तो जास्त काळ तिथे नाही थांबणार. लवकरच गंतव्याकडे निघेल. किप अ‍ॅन आय. मला कसलाही गोंधळ नकोय या केसमध्ये."

"डोंट वरी चीफ, एव्हरी थिंग इज अंडर कंट्रोल."

"ते दुसरं कबूतर, त्याचं काय?"

"ते स्वतःला गरुड समजतय चीफ, पण डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ हिम."

****************************************************************

एक आठवड्यानंतर...

"मेजर, पैसे मिळाले. फक्त एकच चेंज आहे प्रोग्राममध्ये. तो म्हणजे आपण आठवड्याने भेटणार होतो, त्याला आता पंधरा दिवस लागतील."

"लिओ, मला गंडवायचा..."

"विचारही नाहीये माझा. बट यु वाण्ट मी टु एंटर अक्साई चीन. "

"नॉट जस्ट यु लिओ, वुई , वुई आर गोइंग देअर... "

"यस्स, पण त्याच तयारीसाठी हा वेळ लागणार आहे. बऱ्याच अरेंजमेंट्स कराव्या लागतील. बनावट कागदपत्रे तयार करावी लागतील. अम्युनेशन आपल्याला तिथेच ताब्यात मिळायला हवंय."

"अर्थात, नाहीतरी मी ते इथून वागवत नेणार नाहीच आहे."

"आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, मला माझी फी वाढवून हवी आहे."

"लिओ, तू शब्द फिरवतोयस... "

"तू मला फिरवतोयस मेजर, तू खोटं बोललाहेस माझ्याशी. तिथे तुला नक्की काय काम आहे याच्याशी मला देणं घेणं नाही. पण दे आर नॉट इंडियन सोल्जर इन पाकिस्तानी डिसगाईस. दे आर पाकिस्तानी सोल्जर्स ! आपल्याच देशाच्या कुठल्यातरी प्रोजेक्टशी तुझं काय वैर आहे मला माहित नाही. पण तू खोटं बोललास. मी अजूनही काम करायला तयार आहे पण अर्थात माझी किंमत वाढलीये."

"ओके, लिओ. आय अपोलोजाईज. तुझे पैसे तुला संध्याकाळपर्यंत मिळतील."

"गुड बॉय अँड बाय..."

तिकडून फोन ठेवला गेला, त्याच क्षणी पख्तुनीने निर्णय घेतला , मिशन संपलं कि लिओसुद्धा संपायला हवा.

***********************************

" अहा, आता कसं मस्त वाटतंय सर. गेली चार पाच वर्षे तिथे सडत होतो लिटरली." आंगचुक नुसता सळसळत होता उत्साहाने. चैतन्यने त्याला श्रीनगरला बोलावून घेतले होते. वरून सगळ्या परवानग्या वगैरे त्यानेच काढल्या होत्या. आता आंगचुक आपल्या पहिल्यावहिल्या साहसाला सिद्ध झाला होता.

"हा नकाशा बघ आंगचुक. काही लिंक लागतेय का?"

आंगचुक नकाशा पाहू लागला , थोड्याच वेळात त्याचा चेहरा गंभीर झाला पण डोळे एका वेगळ्याच उत्साहाने तेजाळले होते.

"आपण अक्साई चीन मध्ये घुसणार आहोत सर?

चैतन्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

"येस आंगचुक. तुला त्या भागाची माहिती आहे?"

"लेह, लद्दाखच्या परिसरात मोठा झालोय सर. आमच्या भागात दर दहामध्ये दोघांना तरी या भागाची इत्तंभूत माहिती असतेच आणि मी त्या दर दोघापैकी एक आहे सुदैवाने. माझं मूळ गाव त्या बॉर्डरवरच आहे. तिथेच लहानाचा मोठा....

आंगचुकने एकदम मान वर करून चैतन्य कडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आनंदमिश्रीत कुतूहल होते...

"शीट, हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. हे सगळं प्री प्लान्ड आहे ना? म्हणजे माझ्यावर तुमची नजर आधीपासून होती तर."

चैतन्य फक्त हसला, काही गोष्टी गुप्तच राहिलेल्या बऱ्या असतात.

"अगदीच प्री प्लान्ड नाही म्हणता येणार, पण पख्तुनी गायब झाल्यावर त्याला कशासाठी सोडवण्यात आले असावे याचे काही अंदाज आम्ही बांधले होते. आता हे स्पष्ट झालय की वुई वेअर राईट. अशा वेळी तुझ्या सारखा लोकल आणि या भारत देशावर जीवापाड प्रेम करणारा माणूस बरोबर असणे जास्त फायदेशीर ना?"

"डोन्ट वरी सर, इट्स माय मिशन नाऊ. घरभी मेरा है, आंगन भी मेरा, अब आयेंगा मजा ! करायचंय काय तेवढं सांगा. एखादी चिनी चौकी उध्वस्त करायचीय?"

"चिनी चौकी नाही आंगचुक , एक भारतीय लॅबोरेटरी उध्वस्त होणार आहे. पण ते काम दुसरेच कुणी करणार आहेत. आपल्याला फक्त त्यांचे काम झाले की त्यांना उचलायचे आहे."

सर, आपलीच लॅब...

फक्त विश्वास ठेव आंगचुक, माझेही माझ्या भारतावर तुझ्याइतकेच प्रेम, श्रद्धा आहे."

"आय ट्रस्ट यु सर. आय एम इन ! त्या भागात चालू शकतील अशा वाहनांची व्यवस्था करावी लागेल. कारण तिथे चॉपर्स नेणे धोकादायक आहे. यु लिव्ह इट टू मी !"

**********†***********************

लिओ आणि पख्तुनीची नोमपेन्हमध्ये भेट झाली त्यानंतर बावीसावा दिवस.

दोघेही आठवढ्यापुर्वीच अकसाई भागात दाखल झाले होते. एका छोट्या खेड्यातील सराईत उतरले होते. इथून गंतव्य स्थान अवघ्या साठ किमी अंतरावर होते. गेल्या काही दिवसात दोन वेळा दोघांनीं त्या भागाची रेकी केली होती. आत उद्या अम्युनेशन हातात आले की प्रत्यक्ष ऑपरेशन...

लिओने एका स्थानिक राहिवाश्याला पटवून एक पिकअप ट्रेक आणि दोन खेचरे मिळवली होती. शेवटच्या सहा सात किमीच्या टप्प्यात ती खेचरेच उपयोगी पडणार होती.

दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी खेचरांसह पिकअपने सराई सोडली आणि कूच केले...

गावाबाहेर पडताना ऐन रस्त्यावर बंद पडलेला एका बर्फ़ाळ प्रदेशातील सामानाची ने आण करणारा ट्रक सोडला तर बाकी काहीच अडचण आली नव्हती.

ऑपरेशन ब्लाइंड हॉक वाज इन लास्ट स्टेज...

************************************

बर्फ, खुरटी झाडं, अधून मधुन दिसणार्‍या बोडक्या, बसक्या टेकड्या आणि दुरवर निर्मनुष्य पसरलेला ओसाड प्रदेश. आणि अशा या दुर्गम भागात ऐन चीनी सैनिकाच्या नजरेच्या टप्प्याखाली असलेली ती तथाकथीत सिक्रेट लॅब. खरेतर लॅब म्हणावे असे बाहेरून काहीच वाटत नव्हते. एक जुनाट पण भक्कम गढीवजा बंगला. खरेतर ती एक प्रायव्हेट इस्टेटच होती. दिड ते दोन किमीच्या परिसरात पसरलेली कुणा अज्ञात व्यक्तीची ती इस्टेट. बाहेरून ओसाड वाटणारी ती हवेली तीनेक वर्षांपुर्वी अचानक गजबजून गेली. एका आठवड्याच्या अंतरात साधारण दिडशे ते अडीचशे सैनिकांचा पहारा बसला. कसले कसले बॉक्सेस हवेलीत येवून दाखल झाले आणि हवेली गजबजून गेली....

तसेही आधीच वैराण असलेल्या त्या भागात त्यानंतर हळुहळु आसपासच्या दहा किलोमीटरच्या परिसरात पुर्ण सन्नाटा निर्माण झालेला होता. पाकिस्तानी सैनिकांचा पहारा आणि का कोण जाणे पण चीनी सैनिकांनी केलेले दुर्लक्ष यामुळे ती हवेली आणि त्यातले लोक बिनधास्तपणे कसलाही अडथळा न येता आपले काम करत होते. झुल्फिकारची मध्यस्थी आणि पाकिस्तानी सैनिकांच्या उपस्थितीमुळे बहुदा चीननेही याकडे दुर्लक्ष केले असावे. पण एकंदरीत काय तर लॅबचे काम अगदी बिनबोभाट चालू होते.

आणि आज पख्तुनी लिओला घेवून... सॉरी लिओ, पख्तुनीला घेवून तिथे हजर झाला होता. नखशिखांत काळ्या कपड्यातले ते दोघे रात्रीच्या अंधारात बेमालुमपणे मिसळून गेलेले होते. लिओच्या डोक्यात नक्की काय शिजत होते हे कळायला मार्ग नव्हता पण त्याने काहीतरी प्लानींग नक्की केले होते.

हवेलीच्या दक्षीणेकडील बाजुला पहारा जरा कमजोर आहे हे लिओने शोधून काढलेले होते त्यामुळे तेथुनच आत शिरायचा त्या दोघांचा इरादा होता. भिंत ओलांडून दोघे आत शिरले. दक्षीण बाजुला कपाउंड वॉलपासून आतली हवेली साधारण अर्ध्या किलोमीटर अंतरावर होती. पण हा टप्पा ठिकठिकाणी उभ्या असलेल्या सैनिकी चौक्या, पहारे हे सगळे ओलांडून त्यांना आत लॅबपर्यंत पोचायचे होते. पण आतली एकंदरीत परिस्थिती पाहिली तर ते एकंदरीत कठीणच वाटत होतं. पख्तुनीला अजुनही लक्षात येत नव्हतं की लिओचा प्लान काय आहे? कारण लिओने त्याला प्रॉमीस केलं होतं की जिवितहानी न होता तो त्याला आत, लॅबमध्ये घेवून जाईल. पण नक्की कसे?

अरे हा गेला कुठे? लिओ परत गायब झाला होता....

*********************************************************************

"सर, ते दोघे दक्षीणेकडच्या बाजूने आत शिरलेत. भिंतीवर चढण्यासाठी बांधलेला दोर तसाच सोडलाय त्यांनी. इतके सराईत लोक, अशी मुर्ख चुक कशी काय करताहेत? दोर कुणाच्या नजरेला पडला तर...? "

"नाही आंगचुक, हवेलीच्या बाहेरच्या बाजुला, त्या बाजुला कुणीही येणार नाही याची खात्री करुनच ते आत शिरलेले असणार. पण मला एक कळत नाही, आतला एवढा खतरनाक पहारा कसा काय पार करणार आहेत ते?"

"स्टोकच्या हवेलीतही घुसलाच होता की तो..."

"आंगचुक, तिथे बाहेर फक्त चार लोक होते आणि आत बारा.... , इथे शेकडो कमांडोज आहेत."

"वाट पाहण्या पलिकडे आपल्या हातात काहीही नाही."

**********************************************************************

पख्तुनीने थोडा वेळ वाट पाहून शेवटी एकटेच पुढे सरकायचा निर्णय घेतला. तो हवेलीच्या दिशेने पुढे सरकला तसे डाव्या बाजुच्या झाडीत कसलीतरी हालचाल झाली आणि क्षणार्धात त्याच्यावर अनेक फ्लॅशलाइट्स पडले. एका क्षणात त्याच्याभोवती सैनिकांचा वेढा पडला. पुर्ण काळ्या कपड्यात असलेला, बुर्ख्यातला पख्तुनी एका क्षणात जेरबंद झाला. काय झाले हे कळायच्या आत सगळा प्लान उधळला गेला होता.

"चुपचाप हमारे साथ कॅप्टनसाबके पास चलो, तुम्हाला फैसला अब वोही करेंगे."

आयुष्यात प्रथमच पख्तुनीचा प्लान फसला होता. स्वतःच्या सामर्थ्यापेक्षा परक्या लिओवर भरवसा ठेवल्याचा पश्चाताप त्याला आता होत होता.

सैनिक त्याला घेवून आपल्या चीफ ऑफिसरकडे पोचले तेव्हा पख्तुनीच्या डोक्यात एकच विचार सुरु होता. आता नक्की काय आणि कसा स्तॅंड घ्यायचा. मुळात तशी संधी तरी मिळेल का? कारण त्यानेच तयार केलेले कमांडोज होते ते. कर्तव्याच्या पुढे इतर कसलेही आणि कुठलीही नाती, संबंध पाहायचे नाहीत हेच ठसवले होते त्याने त्यांच्यावर.

त्याच्या चेहर्‍यावरचा कपड्याचा बुरखा हटवण्यात आला आणि कॅप्टन बक्ष ताडदिशी उभा राहिला. सवयीने त्याने आपल्या मेजरला एक कडक सॅल्युट ठोकला.

"मेजरसाहब आप, यहां कैसे? इसका मतलब वो लडका सच बोल रहा था?"

"कौन लडका ?"

"जवान, उसे सामने ले आओ."

चार सैनिकांच्या गराड्यात , गनपॉइंटवर असलेला लिओ पुढे आला. गंमत म्हणजे त्याच्या चेहर्‍यावर अजिबात भीती नव्हती, तो निर्धास्त होता.

"कॅप्टनसाहेब, मुझे यहां गनपॉइंटपे लिया गया है और मेजरसाबको ऐसे ट्रीट किया जा रहा है जैसे वो आपके दोस्त हो?" लिओने प्रश्न केला.

"मेजरसाहब, हुजूर आप इस लडके को जानते है? ये आपके साथ है? लेकीन आप तो हिंदुस्थानीयोंकी कैद में थे, फिर...."

"मै बताता हूं कॅप्टन साहब. आप मेरा जर्कीनके पिछले जेबमे चेक किजीये, एक कागज मिलेगा आपको. उसपे कोइ मोहर नही है, लेकीन एक ऐसा निशान है जो सिर्फ एक पाकिस्तानी आर्मी का अफसरही पहचान सकता है ! ये कागज मेरा लाइफ सेवींग कार्ड बनने जा रहा है अब."

त्याच्या खिश्यातून तो तथाकथीत कागद शोधून काढण्यात आला. कॅप्टन बक्षने त्या कागदावर असलेला एका कोपर्‍यातला चांदतारा बरोबर ओळखला. ती त्या कागदाची वैधता स्पष्ट करणारी खुण होती. आणि त्या कागदाप्रमाणे त्या व्यक्तीवर म्हणजे लिओवर पख्तुनीला भारताच्या कैदेतून सोडवून आणण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती. त्यासाठी ऑफर करण्यात आलेली रक्कम बघून कॅप्टनचे डोळेच फिरले.

"येस कॅप्टन, तो माझ्या बरोबरच आहे. रादर मी त्याच्या बरोबर आहे. त्याने माझी त्या कैदेतून सुटका केली आणि आम्ही भारतीय सैन्याला शंका येवू नये म्हणून या उलट्या दिशेने प्रवास सुरू केला. इथुन असेच पुढे जावून एल ओ सी क्रॉस करायची आणि पाकिस्तानात प्रवेश करायचा असा आमचा विचार होता. मध्येच ही हवेली दिसली म्हणून रात्रीच्या निवासासाठी आत शिरलो. तर इथे भलतेच नाटक सुरु दिसतेय. आणि बक्ष, तूझी तुकडी इथे काय करतेय?

आपण काय बोलतोय ते पख्तुनीला कळत नव्हते, पण परिस्थिती परत आपल्या ताब्यात घेण्याचा मार्ग त्याला सापडला होता.

"दॅट्स अ लाँग स्टोरी मेजरसाहब. लेकीन आप थके हुए हो. तुम्ही आपलेच आहात. आणि हा माणुस आपल्याला सोडवू घेवून आलाय म्हणजे तो तर आमच्यासाठी अल्लाह का फरिश्ताच आहे. आप दोनो आज की रात आराम कर लो. आपण उद्या सकाळी बोलुयात. जवान, मेजरसाबको और इनके दोस्तको, हवेलीके अंदर ले जाओ. बाकी बाते कल सोचेंगे."

पख्तुनी लिओकडे पाहातच राहीला. त्याच्या चेहर्‍यावरचे मिस्किल हास्य पाहताच पख्तुनीच्या डोक्यात प्रकाश पडायला सुरूवात झाली होती. लिओची योजना हीच होती तर....

कसलाही रक्तपात न घडवता लिओ त्याला घेवून हवेलीत अगदी बिनबोभाट शिरला होता.

************************************************************************

एकच समस्या होती , ती म्हणजे त्यांच्याकडचे सगळे अ‍ॅम्युनेशन मागे, जिथे त्याला पकडण्यात आले तिथेच राहून गेले होते. आता लॅब उध्वस्त करायची म्हणजे....

"धिस इज फॉर यू मेजर...!"

लिओने त्याच्यापुढे कागदाचा एक तुकडा टाकला होता. पख्तुनीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले.

"या हवेलीतल्या अ‍ॅम्युनेशनच्या स्टोअरचा मॅप. आय एम सॉरी मेजर, पण तुमचे पाकिस्तानी लोक पैश्याच्या बाबतीत फार हपापलेले असतात. मी त्यांच्याकडून हवेलीचा अंतर्गत नकाशा मिळवला काही हजार डॉलर्सच्या बदल्यात. एकंदरीत नकाशावरुन आणि हवेलीच्या अंतर्गत रचनेवरुन मी तीन जागा अशा ठरवल्या होत्या की जिथे हत्यारे किंवा दारुगोळ्याचे कोठार असु शकेल. आत शिरल्यावर मघाशी अजून काही डॉलर्सच्या बदल्यात एक्झॅक्ट लोकेशनही कळाले. मेजर तुला आत आणुन सोडायचे काम मी केलेय. आता येथुन पुढे काय करायचे ते तु ठरावायचे आहेस. मी आता इथून बाहेर पडणार आहे. माझं काम झालय. इथे कोणीही महत्त्वाचा माणुस कैद नाहीये हे नक्की. आय डोंट नो तुझा इथे येण्याचा हेतु काय आहे ते. पण ज्यासाठी तू मला हायर केलं होतंस ते काम मी पुर्ण केलय. पुढचं तुझं तुला ठरवायचय. माझ्यातर्फे तुला ही शेवटची भेट..."

लिओने एक गोष्ट पुढे केली, ती बघून पख्तुनी हरखलाच.

सायलेन्सर बसवलेलं एक ऑटोमॅटीक पिस्टल होतं ते.

"... आणि ही एक्स्ट्राची दोन मॅगझीन्स. हवेलीच्या मागच्या बाजूला एक आउट हाऊस आहे. त्याच्या मागे ड्रेनेजची एक लाइन आहे. ती थेट हवेलीच्या बाहेर निघते. ऑल दी बेस्ट मेजरसाहेब. जरूरत पडे तो बंदे को फिर याद जरुर किजीयेगा. "

"थँक्स लिओ अँड सॉरी बडी, पण मी ही रिस्क नाही घेवू शकत.."

लिओच्या चेहर्‍यावरचे आश्चर्य त्याच्याच वेदनेत जिरले होते. पख्तुनीच्या , त्यानेच दिलेल्या पिस्टलमधून सुटलेली गोळी त्याच्याच छातीचा वेध घेवून गेली होती. पुढच्याच क्षणी लिओ, कसातरी धडपडत त्या रुमच्या बाहेर पडला आणि अंधारात शिरला...

पख्तुनीने त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. कारण गोळी बरोबर हॄदयच्या जागी बसलेली होती. लिओ फार दूर जावू शकणार नाही याची खात्री होती त्याला. त्याला लवकरात लवकर महत्त्वाचे काम उरकायचे होते. स्टोअर हुडकून बॉम्ब्स शोधायचे होते, ते योग्य जागी फिट करायचे होते. त्या तथाकथीत फॉर्म्युल्यात त्याला रस नव्हता आणि तो घातक फॉर्म्युला आय एस आय च्या हातात पडावा असे त्याला चुकूनही वाटत नव्हते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती हवेली उडवून लावण्यापुर्वी आतल्या शक्य तितक्या सैनिकांना हवेलीच्या बाहेर काढायचे होते. तसेही आत फार फार पन्नासच्या घरात जवान होते पहार्‍यावर. त्यातले काहीतरी नक्कीच वाचवता आले असते.

बाहेरच्या अंधाराकडे पाहात त्याने एक सुस्कारा सोडला. लिओला मारायची खरेतर त्याची इच्छा नव्हती, पण त्याला पर्याय नव्हता. हा पोरगा फारच डेंजरस होता. पण लिओ जखमी अवस्थेत बाहेर पडण्यापूर्वी पख्तुनीला काहीतरी खटकलं होतं. नक्की काय ते त्यालाही सांगता आलं नसतं....

पख्तुनीने आपली गन सावरली आणि तो अ‍ॅमो शोधायला निघाला...

*************************************************************************

"गेट रेडी, आंगचूक. कुठल्याही क्षणी आपल्याला निघावं लागेल. त्या समोरच्या नाल्याकडे लक्ष असू दे."

आंगचूक आणि चैतन्य , त्या हवेलीच्या मागच्या बाजुच्या जंगलात एका गर्द ठिकाणी लपून बसले होते. काही वेळाने हवेलीच्या उत्तर दिशेला एक बारिकसा स्फोट झाला. आणि अचानक गोंधळ उडाला. सैनिकांच्या तुकड्या बहुतेक स्फोटाच्या दिशेने जात होत्या.

आणि त्यानंतर काही मिनीटातच हवेलीत एक मोठा स्फोट झाला आणि मग अचानक एका मागोमाग एक स्फोटांची मालिका सुरुच झाली.

"आंगचूक, रेडी....., सावज येइलच आपलं इतक्यात..."

काही मिनीटातच समोरच्या त्या नाल्यातून कोणीतरी गडबडीत बाहेर पडलं. आजुबाजुचा अंदाज घेत त्याने एका दिशेने पळायला सुरूवात केली. पण काहीही कळायच्या आता त्याला परत सैनिकांचा गराडा पडला.

"बेवकुफो, ये मै हूं, मेजर दिलबागखान पख्तुनी. दुश्मन उस तर्फ भाग गया है, मै उसीका पिछा कर रहा हूं...."पख्तुनीने शेवटची चाल खेळली पण आता उशीर झाला होता.

"हा मेजर, मै जानता हूं तुम पख्तुनी हो, तभी तो तुम्हारे इंतजारमे यहा खडा हूं कबसे, तुम्हारे लिये सवारी लेके."

"डेडशॉट तुम, यहां?"

एका क्षणात पख्तुनीच्या मस्तकात तारे चमकले. कारण त्याच्या लक्षात आले होते. मघाशी लिओ जखमी अवस्थेत बाहेर पडताना त्याला काय खटकले होते ते.

"लिओने छातीतून उसळणारा रक्ताचा ओघळ थांबवण्यापुर्वी अतिशय वेदनायुक्त , आश्चर्यचकीत मुद्रेने केलेली ती शेवटची खुण... आपल्या उजव्या हाताची दोन बोटे लिओने आपल्या कपाळावर एका बाजूला अलगद टेकवत पख्तुनीला सॅल्युट मारला होता... पख्तुनीच्या डोळ्यासमोर तो दिड दोन वर्षांपूर्वी भेटलेला देखणा, जिगरबाज पोरगा उभा राहिला होता...

पख्तुनी हातातले पिस्टल खाली टाकून मटकन जमीनीवर गुडघ्यावर बसला...

"या अल्लाह, ये क्या कर दिया मैने?"

**************************************************************************************

"सगळं काही प्लान्ड होतं पख्तुनी. तुझी सुटका, बारा भारतीय जवानांना मारुन तुझी सुटका करणारा लिओ... सगळे आमचेच होते रे."

"लेकीन मेजर शौकत हुसेन?"

"अरे तू शिर्‍याला ओळखु शकला नाहीस, इतका काळ तुझ्या सोबत असून. शौकतला कसा काय ओळखणार होतास ? कर्नल देशमुखांसारखा मुरलेला माणुस इतक्या सहजासहजी तुला ओळखता येणे शक्य तरी होते का? बाय द वे पख्तुनी, झुल्फिकार बनावट नव्हता, नाही. तो मेलेलाही नाही. जिवंतच आहे. पण शौकत मात्र बनावट होता. कर्नल देशमुखांनी उभा केला होता. गेल्या दोन वर्षातल्या तुझ्या अनुपस्थितीत घडलेल्या गोष्टी तुला माहीत असणे शक्यच नव्हते, रादर आम्ही ती संधीच दिली नाही तुला. तु पहिल्यापासून शेवटपर्यंत आमच्या माणसांच्या गराड्यातच होतास. तुझ्या सोर्सेसकडून ज्या बातम्या, माहिती तुला मिळावी अशी आमची इच्छा होती ती आम्हीच तिथपर्यंत पोचवली होती."

"अँड व्हाट अबाऊट जोंग यु?"

" या केसमध्ये पख्तुनी सारखा अतिशय बुद्धीमान आणि कावेबाज माणुस वापरायचा होता आम्हाला. तुझ्यावर शंभर टक्के नजर ठेवणे निव्वळ अशक्य आहे हे मी पक्का ओळखून आहे. तू आपले सोर्सेस वापरणार ये माहीत होते, खरेतर ते तू वापरणार याची खात्री होती. किम्स डेनचा उल्लेख केला की तू जोंग यू पर्यंत पोचणार हे ही पक्के होते. त्यामुळे आम्ही, म्हणजे मेजर शौकतने जोंग यू ला खरोखरच एक केस सोपवली होती. तू फारच डीपमध्ये गेला असतास तर त्यासाठी सुद्धा आमचा प्लान बी तयार होता. पण सुदैवाने तू तिथपर्यंत पोचलाच नाहीस. फक्त जोंग यू चे नाव जाणुन घेवून , एथिकल ड्रॅगन्सचा यात सहभाग आहे हे जाणून घेण्यावरच तू सामाधान मानलेस. त्यामुळे आम्ही तिथेही सेफ राहीलो. "

"पण हे सगळे कशासाठी?"

"कशासाठी? पख्तुनी, ती लॅब... ते संशोधन भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे होते. आणि पाकिस्तानचे होते म्हणूनच अक्साईच्या चीनच्या भागात असुनही चिनी सैन्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. रादर त्याला संरक्षण दिले होते. म्हणूनच जेव्हा ही लॅब उध्वस्त करायचे ठरवले तेव्हा आमच्यापुढे एकच विश्वासाचे नाव आले, ते म्हणजे मेजर दिलबागखान पख्तुनी."

"आता जेव्हा या घातपाताचा पाकिस्तानमध्ये तपास केला जाइल तेव्हा कॅप्टन बक्ष आणि त्याचे जवान एकच नाव घेतील आणि ते असेल मेजर दिलबागखान पख्तुनी. यापुढे पख्तुनी हे नाव पाकिस्तानसाठी त्यांच्या बहाद्दुर शिपायाचे नाही तर एक गद्दार म्हणून घेतले जाइल. यु आर फिनिश्ड पख्तुनी. धिस वॉ़ज माय लास्ट गेम विथ यु अँड मी जिंकलोय....

पख्तुनीच्या चेहर्‍यावर संताप आणि वेदना दोन्हीचे मिश्रण होते. श्रीनगरमधल्या भारतीय सैन्याच्या मुख्य छावणीत ते होते.

"ओके डेडशॉट, या वेळी तू जिंकलास. एक पाकिस्तानी एजंट म्हणून कदाचित पख्तुनी संपेल यापुढे. पण आपली दुश्मनी संपणार नाहीये. आजपर्यंत फक्त राजकीय शत्रु होतो आपण. यापुढे आपण वैयक्तीक शत्रु आहोत एकमेकांचे आणि मी लवकरच गायब होइन पुन्हा मेजर. वेट फॉर दॅट डे... फक्त एकाच गोष्टीचे वाइट वाटते की तो छोकरा माझ्या हातुन मारला जायला नको होता."

तसा चैतन्य हसायला लागला.....

"पख्तुनी, तुला ती गन लिओनेच दिली होती ना रे ? आणि लिओवर किती गोळ्या झाडल्यास तू?"

"दोन गोळ्या झाडल्या मी त्याच्यावर. त्यानंतर पिस्टलमधल्या गोळ्या संपल्या म्हणून मी दुसरे मॅगझीन लोड केले तोपर्यंत तो लिओ अंधारात गायब झाला होता. ...

गायब झाला होता? यस , यस तो गायब झाला अंधारात. म्हणजे त्या गनमधल्या त्या शेवटच्या दोन गोळ्या त्याने स्वतःसाठीच राखून ठेवल्या होत्या तर. माय गुडनेस. डेडशॉट, इतना बडा प्लानींग. वो छोकरा वही था ना... शिरीष.. शिरीष भोसले?"

"करेक्ट पख्तुनी, तो शिर्‍याच होता. प्रचंड मेहनत घेतली होती त्याने. कोरियन बनणे, त्यांची भाषा, त्यांचा अ‍ॅक्सेंट, त्यांचे वागणे, चालणे-फिरणे. त्यानंतर एथिकल ड्रॅगन्ससारख्या घातकी संघटनेमध्ये प्रवेश मिळवणे. अर्थात हा प्रवेश त्याने फक्त 'किम्स डेन'चा वापर करण्यापुरताच केला होता. तुझा निरोप तू ज्या व्यक्तीकडे सोडलास ती व्यक्ती त्याच दिवशी आकाशातल्या बापाला भेटायला गेली. आणि लिओ बनून शिर्‍या तुझ्याबरोबर चिकटला....."

"पख्तुनी, शेवटी एकच प्रश्न विचारायचाय मला? तू लिओला किती पैसे दिले होतेस हे काम करण्यासाठी?"

"छोडो ना कॅप्टन, मुझे खुशी इस बातकी है, के बंदा अभीभी जिंदा है, मुलाकात जरुर होगी. तब अपना सारा पैसा वसुल करुंगा उससे."

कॅप्टन चैतन्य निंबाळकरने शेवटचा फोन केला चीफला..

"चीफ , पाखरु परत आलं. ऑपरेशन 'ब्लाइंड'हॉ़क इज सक्सेसफुल ."

ब्लाइंड 'हॉक'? पख्तुनीची ट्युब पेटली. त्याच्या विश्वात तो 'किलर हॉ़क'म्हणून ओळखला जात होता आजपर्यंत. पण आज चैतन्य आणि शिर्‍याने त्याची गणना "ब्लाइंड'' हॉकमध्ये करुन टाकली होती.

आणि त्यावेळी शिर्‍या मात्र डॉलर्स ते रुपये या कन्व्हर्जनच्या घोळात अडकून पडला होता.

समाप्त.

विशाल कुलकर्णी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर..
खूप वर्षांनी तुमची कथा वाचायला मिळाली.
मायबोली वरचे जुने दिवस आठवले जेव्हा मी फक्त अश्या आनंद देणाऱ्या कथा वाचायला यायचे इथे..
तुम्ही, कौतुक शिरोडकर, कवठीचाफा यांच्या रहस्यकथा वाचून एक वेगळाच आनंद मिळायचा.

खूपच खिळवून ठेवणाऱ्या कथा असतात तुमच्या. ह्या कथेतही तुमच्या जुन्या कथांचा संदर्भ दिसतोय म्हणून जरा जास्त मनाला भिडली.
थँक्यू सो मच फॉर दिस ट्रीट.

तुमची कथा दिसल्या दिसल्या हावरट सारखी वाचली आणि माझा मायबोली वरचा पहिला वहिला प्रतिसाद लिहला, तो जवळ जवळ आठ वर्ष इथे रोमात राहून.

एक नंबर..
खूप वर्षांनी तुमची कथा वाचायला मिळाली.
मायबोली वरचे जुने दिवस आठवले जेव्हा मी फक्त अश्या आनंद देणाऱ्या कथा वाचायला यायचे इथे..
तुम्ही, कौतुक शिरोडकर, कवठीचाफा यांच्या रहस्यकथा वाचून एक वेगळाच आनंद मिळायचा.

खूपच खिळवून ठेवणाऱ्या कथा असतात तुमच्या. ह्या कथेतही तुमच्या जुन्या कथांचा संदर्भ दिसतोय म्हणून जरा जास्त मनाला भिडली.
थँक्यू सो मच फॉर दिस ट्रीट.

तुमची कथा दिसल्या दिसल्या हावरट सारखी वाचली >>>>>>>+++++++१११११११

saglyanach blind kele tumi.... shevatla samjle nkki operation konache hote....

एक पटले नाही, या सगळ्या प्लॅन मध्ये 12 खतरनाक कमांडो मारले गेले आपल्याच लोकांकडून? जरी देशासाठी शहीद झाले म्हणले तरी नाही पटत. दुसऱ्या महायुद्धात पोलंड वर स्वारी करताना जर्मनीने स्वतःवरच खोटा हल्ला केला आणि माणसे मारली पण ती देखील मृत्युदंड मिळालेले जर्मन कैदी होते, खरे जवान नाहीत.

या सगळ्या प्लॅन मध्ये 12 खतरनाक कमांडो मारले गेले आपल्याच लोकांकडून? जरी देशासाठी शहीद झाले म्हणले तरी नाही पटत. >> +१
कथा आवडली.

एक पटले नाही, या सगळ्या प्लॅन मध्ये 12 खतरनाक कमांडो मारले गेले आपल्याच लोकांकडून? जरी देशासाठी शहीद झाले म्हणले तरी नाही पटत. >> हे जवान मेलेले नसावेत.. जसा शिर्‍या स्वतः मेला नाही... तसेच. फॉल्स अ‍ॅम्युनेशन वापरुन..

बरोबर हिम्स ! आशु, अरे सगळ्याच गोष्टी सांगितल्या जात नाहीत ना? Wink
काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात.
<<< "सगळं काही प्लान्ड होतं पख्तुनी. तुझी सुटका, बारा भारतीय जवानांना मारुन तुझी सुटका करणारा लिओ... सगळे आमचेच होते रे.">>>>

प्लान्ड होतं असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा कमांडोंचे तथाकथीत मृत्यु आणि अगदी आंगचुकच्या त्या कॉन्स्टेबलचं रायानचं गायब होणं सुद्धा त्यात आलंच की? फक्त रायानचे गायब होणे ही नंतर जोडली गेलेली अ‍ॅडजस्टमेंट आहे, कारण त्याची अपेक्षा आधीच्या प्लानमध्ये केली गेलेली नसणार.

मे बी मी हे ही शेवटी मेन्शन करायला हवं होतं, पण मला वाटलं की ते समजून घेणं सोपं आहे.

असो, मनःपूर्वक धन्यवाद मंडळी Happy

मे बी मी हे ही शेवटी मेन्शन करायला हवं होतं, पण मला वाटलं की ते समजून घेणं सोपं आहे.

नाय रे आम्ही डेली सोप बघतो, काजळ घातलेली, कराकरा दात खाणारी, आणि खुनशी हसू असलेली बाई दाखवल्याशिवाय व्हिलन कोण आहे ते आम्हाला मुळीच कळत नाही. :प

मस्त विशालदा, मजा आली वाचायला.

चैतन्य आणि शिर्‍या रॉक्स..

आता जरा वर्तुळ पुर्ण करा...

vishalbhau blind hock mst julun aaley.... aata vartul kde jra lksh dya na rao.... khup jne waiting mdhye aahet nxt partsathi....

छान

Pages