विडंबन - मी हजार चितांनी

Submitted by धनुर्धर on 13 September, 2016 - 13:07

(कवी संदीप खरे यांची माफी मागून )

मी हजार चिंतानी डोके सडवतो
तो खुर्चीवर बसतो, हसतो, निवडणुक लढवतो

मी जुनाट एस टीमधे किरकिरा बंदी
तो फियाटगाडीमधे रस्त्यावरी स्वछंदी
मी बेकारीशी जीव गंजवीत बसतो
तो लंगून संसद फ्रॉड कराया बघतो

डोक्यात माझीया प्रचाराचा ताप
दिसतात बोटावर मत दिल्याचे छाप
तो त्याच मतांचे गठ्ठे गोळा करून
जिंकून निवडणुक खुर्चीवरती झुलतो

मी कार्यालयी घातल्या हेलपाट्यांवरती चिडतो
तो त्याच ठिकाणी खुर्ची मांडून बसतो
मी दात काडीने कोरत बसतो अंती
तो मुक्त मोकळ्या कुरणामध्ये चरतो

मी शिल्लक मोजत खिशामध्ये राहिलेली
कामासाठी देतो लाच टेबलाच्या खाली
तो घोटाळयात घेतो पैसा खाऊन सारा
तरी धन्यवाद जनतेचे घेऊन जातो

मज संसाराचा रोज पडे हा भार
वाचतो पेपर आणि पडतो गपगार
तो फक्त काढतो माल कोटींचा तरीही
त्या बगळ्याच्या शुभ्र पिसांपरी दिसतो

. . . धर्नुधर . . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users