Submitted by बाळ पाटील on 29 September, 2016 - 03:33
सुकतील ही फुलेही तोड आता
मानून घे मनाला गोड आता
जी अक्षरे मुळातंच गोंदलेली
तेथे कठीण खाडाखोड आता
नाही तुला उन्हाने सोडलेले
तू नाद चांदण्याचा सोड आता
फुटणे स्वभाव आहे दर्पणाचा
आयुष्य तू नव्याने जोड आता
आहे दहयादुधाची मौज येथे
डोईवरील मटके फोड आता
_ बाळ पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही तुला उन्हाने सोडलेलेतू
नाही तुला उन्हाने सोडलेलेतू नाद चांदण्याचा सोड आता ।।। वा क्या बात आहे बाळासाहेब ! एक लय असते गझलेत तुमच्या ' कुठेच् ओड़ताण दिसत नाही खूप छान .
गजाननजी धन्यवाद !आपला एकमेव
गजाननजी धन्यवाद !आपला एकमेव प्रतिसाद पण रसिकतेने ओतप्रोत भरलेला !चीज झाले असेवाटले.
बाळासाहेब खरोखरच लेखनीत जादू
बाळासाहेब खरोखरच लेखनीत जादू आहे तुमच्या ।।। मला तुमची गझल खूप आवडते ।।।
खुप सुंदर !
खुप सुंदर !
छान
छान
सुंदर गजल आहे.
सुंदर गजल आहे.
सुंदर गजल आहे.
सुंदर गजल आहे.
जी अक्षरे मुळातंच
जी अक्षरे मुळातंच गोंदलेली
तेथे कठीण खाडाखोड आता>>
हे दीपिकासाठी लिहिले आहे असे वाटले.
आवडली कविता. गद्य नाही पाहून तर फारच.
गजाननजी,श्री जी, शरदजी,अनिलजी
गजाननजी,श्री जी, शरदजी,अनिलजी धन्यवाद !!
Filmy जी आपले नेमके म्हणने
Filmy जी आपले नेमके म्हणने कळले नाही!!