ह्युमन क्लोनिंग

Submitted by उडन खटोला on 16 September, 2016 - 12:47

(मूळ लेखक झपाटलेला फिलॉसॉफर,यांच्या पूर्वपरवानगीने इथे प्रकाशित )

काही दिवसापूर्वी क्लोजर टू गॉड हा हॉलीवूडपट पाहिला . आणि मनात विचारशॄन्खला सुरू झाली ...
http://www.imdb.com/title/tt3457486/

क्लोनिंग मुळे कॅन्सर / अल्झायमर / एड्स सारख्या असंख्य रोगाना प्रतिबन्ध करता येवू शकेल. अधिक आयक्यू असणारी / सशक्त / रोगप्रतिबन्धक गुणधर्म जन्मजात असलेली बालके जन्मास घालता येवू शकेल . मानवी उत्क्रान्तीचा वेग अनेक पटीनी वाढून मानवी आयुर्मर्यादा देखील वाढवता येइल . असे अनेक क्रान्तिकारी बदल आणि फायदे मानवी जीवनास होतील ....याबाबत डोक्टर मिशियो काकू या अमेरिकन जापनीझ सायन्टिस्ट चे मत अवश्य ऐकण्यासारखे आहे. https://www.youtube.com/watch?v=6GooNhOIMY0 .

परंतु ह्यूमन क्लोनिंग / जीन्स डेव्हलपमेन्ट ट्रायल्स ला गेल्या अनेक वर्षे पाश्चिमात्य देशातून आणि विषेशतः कट्टर ख्रिश्चन आणि इस्लामिक समुदायांकडून प्रचंड विरोध होत आहे . आजतागायत या बिनडोक धर्मवाद्यांच्या दबावाला बळी पडून असो किंवा ह्यूमन क्लोनिंग कितपत नैतिक /अनैतिक आहे असल्या फुटकळ मुद्द्यात अडकून असो, ह्यूमन क्लोनिंगला आजतागायत कायद्याने मान्यता नाही...

कोणत्याही वैज्ञानिक शोधाचे फायदे तोटे असतातच ! पण अ‍ॅबॉर्शन ला सुद्धा आन्धळा विरोध बिनडोक विरोध करणार्या अशा बावळट धर्मसंस्था अन त्यांचे ऐकून कायदे राबवणार्या आयर्लन्ड सारख्या देशात सविता हलपनवार चे काय झाले ? हे सुज्ञ वाचक अजून विसरले नसतील अशी अपेक्षा ! यास्तव अशा बुरसटलेल्या बाण्डगुळाना त्वरित दूर सारून ह्यूमन क्लोनिंग खरोखरीच जर मानवजातीस उपयुक्त असेल तर त्वरित त्यास परवानगी देवून संशोधन खुले करावे , असे मला वाटते !

आपणास काय वाटते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लोनिंग ला बराच विरोध फक्त तुम्ही दिलेल्या कारणांमूळे नसून एकजिनसी समाज बनवण्याच्या धोक्यामूळेही आहे.