मायबोली मास्टरशेफ - बदाम - मॅकाडेमिया ब्रेड अर्थात LCHF ब्रेड - नलिनी

Submitted by नलिनी on 13 September, 2016 - 09:52

ह्या उपक्रमाची घोषणा झाली तेव्हाच ठरविले की ह्यावेळी नक्की सहभागी व्हायचे. म, ब, य, ल ह्या घटकांमुळे पर्याय तसे कमीच उपलब्ध होते.

मी सध्या LCHF डाएट करत असल्याने मलाही चाखता येईल असा पदार्थ हवा होता. मैद्याला पर्याय म्हणून बदाम पावडर वापरून बरेच पदार्थ करता येतात पण त्यात अंडी मुख्य घटकांमध्ये येतं. इथे ते वापरता येणार नसल्याने स्वत: प्रयोग करून पाहायचे ठरविले.

साहित्यः

बदाम पावडर : २०० ग्रॅम

मॅकाडेमिया पावडर : १०० ग्रॅम

लोणी : ५० ग्रॅम

यिस्ट : १/२ टिस्पून

बेकिंग पावडर : १/४ टिस्पून

लिंबाची साल : एका लिंबाची

योगर्ट (दही) : १ टेबलस्पून

मिल्क (दुध) : अर्धा मेजरींग कप

मगज : सजावटीसाठी

मिठ : चवीनुसार

ingredients

कृती :

एका खोलगट भांड्यात बदाम पावडर, मॅकाडेमिया पावडर, यिस्ट , बेकींग पावडर घेऊन एकत्र करावे. ह्या मिश्रणात लोणी, लिंबाची साल व मिठ घालून परत एकदा व्यवस्थीत एकत्र करावे. ( हे मिश्रण हातात घेऊन गोळा केला साधारण लाडून वळता येतो असे होते)

मिश्रणात दही घालून एकसारखे एकत्र करावे व त्यात एक एक चमचा करत सगळे दुध घालावे. जरासे सरबरीत असे हे मिश्रण तयार होते.

हवे असल्यास जरासा मगज मिश्रणात पण टाकावा.

साधारण एक तास हे मिश्रण फुगण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवावे.

एका ब्रेडच्या भांड्याला लोण्याचा हात फिरवून घेऊन त्यात हे मिश्रण घालावे.

परत एकदा हे भांडे तासभरासाठी उबदार ठिकाणी ठेवावे. एवढ्या वेळात मिश्रण छान फुगून येते.

१८० डिग्री से. तापमानाला १५ - २० मिनिट ब्रेड भाजावा.

Eggless Almond Bread

अधिक महिती :

मी सॉल्टेड बटर घेतल्याने तसेच मॅकाडेमिया खारे असल्याने मी मिठ वापरले नाही.

भाजायला ठेवल्यानंतर पाचव्या मिनिटापासूनच घरात एक मस्त सुगंध दरवळायला सुरवात झाली होती.

मिठाऐवजी साखर वापरणार असलात तर सोबत चॉकलेट चिप्स वारून केक किंवा कुकीज करता येतील.

अंडे वापरले तर यिस्ट वापरायची गरज नसल्याने मिश्रण फुगवण्याचा वेळ वाचवता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान.....

<<<<<अन्ड्याला पर्याय म्हणून, अळशीची पूड पाण्यात मिसळून वापरता येते.>>>>

दिनेशदा....आम्हांला कित्ती माहिती मिळ्ते तुमच्यामुळे...!

खूपच मस्त.
मायबोली मास्टरशेफ वरच्या अटी पाळून पण इतके पदार्थ बनतात हे मला आता सर्व चांगल्या चांगल्या एंट्र्या वाचल्यावरच कळतं आहे.

सर्वांचे मनापासून आभार!
दिनेशदादा, अळशी होती माझ्याकडे. पुढच्या वेळी वापरते.

LCHF म्हणजे काय>> Low Carb High Fat

मॅकाडेमियाला पर्याय काय आहे?>> पेकान नट्स, हेजल नट्स, अक्रोड, ब्राझिल नट्स, पिस्ता किंवा काजू

Pages