रिओ पॅरालिम्पिकमधे भारताला ४ पदकं......अभिनंदन

Submitted by आईची_लेक on 10 September, 2016 - 12:46

रिओ पॅरालिम्पिक मधे उंच उडीमध्ये १.८९ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकणाऱ्या मरियप्पन थांगावेलू आणि याच प्रकारात 1.86 मीटर उडी मारून ब्राँझ पदक मिळवणारा वरुण भाटी या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन ......
रिओ पॅरालिंपिकमध्ये या दोघांनी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे........

1भारताच्या दीपा मलिक हिने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत सोमवारी गोळाफेकीच्या एफ 53 प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना रौप्यपदकाची कमाई केली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली
3रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला. पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
यापूर्वी त्याने 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत 62.15 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते.

4रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला आत्तापर्यंत ४ पदक मिळाली , पदकांची संख्या आणखी वाढावी हीच इच्छा या सगळ्या खेळाडूंच्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त उडी मारली त्याने.

सगळ्यांचे अभिनंदन.

दीपा आणि मलिक !!! मस्त कॉंबो आहे नावाचं.>>> बातमी वाचुन मलाही अगदी असच वाटल Happy

विश्वविक्रमासह देवेंद्रने पटकाविले दुसऱ्यांदा सुवर्ण

रिओ दि जानिरो - रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला. देवेंद्रच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.

ऑलिंपिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळविण्यात अपयशी ठरलेल्या भारताला पॅरालिंपिकमध्ये मात्र दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे. रिओ पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंत भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळाले आहे. डाव्या हाताने अपंग असलेल्या 36 वर्षीय देवेंद्रला केंद्र सरकारकडून 2004 मध्ये अर्जुन आणि 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे पुरस्कार मिळविणारा हा पहिला पॅरालिंपियन खेळाडू आहे.

रिओ पॅरालिंपिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक एफ46 प्रकारात देवेंद्रने विश्वविक्रम नोंदविला. यापूर्वी त्याने 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत 62.15 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते. त्याने आता 2016 मध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. जागतिक क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे. देवेंद्र राजस्थानच्या चुरु गावचा रहिवासी आहे.

सर्व खेळाडूंचे आणि पदक विजेत्यांचे विशेष अभिनंदन.

या सर्वांच्या जिद्दीला सलाम!