सल्ला हवा आहे

Submitted by आईची_लेक on 5 September, 2016 - 05:00

ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने BSC नंतर MCM केलयं. सध्या एका BPO कंपनीत customer care service मधे Senior Associate म्हणून जॉब करतोय , पण इथे पगार फार कमी मिळतोय त्याला , तर IT क्षेत्रात त्याला काही चांगल्या संधी मिळू शकतील का ? MCM वाल्यांना IT मधे काय संधी आहेत ? माझा IT क्षेत्राशी दुरान्वये ही संबंध नाही त्यामुळे इथे विचारतेय .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
(MCM होऊन साधारण ८-९ वर्ष झालीत.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे.. ८-९ म्हण्जे बरीच वर्ष झालीत तशी..

सीड इन्फोटेक मधे बरेच डिप्लोमा कोर्सेस आहेत.. तिकडे प्लेस्मेंट्स होतात..
एखादा डिप्लोमा करुन बघता येइल..

सध्या काही कारणास्तव त्याला अधिक उत्पन्नाची आवश्यकता आहे,सध्या फक्त २० हजार पगार आहे त्याला , त्याने आता जर IT मधे प्रयत्न केले तर सध्या काय संधी मिळतील आणि आहे तीच नोकरी कंटिन्यू ठेवली तर पुढे फ्युचर मध्ये काही चांगल्या संधी मिळतील का ?
सॉरी मी फार प्रश्न विचारतेय पण मी आर्टस् ची असल्यामुळे मला IT क्षेत्रातली अक्षरशः शून्य माहिती आहे .....