यंदा १८ बाय २० ची दहीहंडी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 August, 2016 - 22:55

न्यायालयाच्या निकालानुसार यंदाच्या दहीहंडीमध्ये 18 वर्षाखालील बालगोपाळ सहभागी होऊ शकणार नाहीत.
तसेच हंडीची उंची 20 फूटांपेक्षा उंच असता कामा नये.
(नशीब समुद्रसपाटीपासून वीस फूट नाही म्हणाले)

अत्यंत अयोग्य आणि लोकांच्या उत्साहावर विरजन घालणारा निर्णय.

मी काही प्रखर हिंदुत्ववादी नाही जे हिंदूंच्याच सणांना का लक्ष केले जाते म्हणत ओरडा करत फिरतो.
तसेच मी उत्सवप्रिय माणूस असलो तरी दुष्काळात रंगपंचमीला केलेली पाण्याची नाशाडी तसेच गणपती नवरात्रीला उशीरापर्यंत चालणारे स्पीकर यांना विरोधच करतो.
पण या निर्बंधांना मात्र अर्थ नाही.

जर तुम्ही हंडीला खेळ म्हणून पाहिले तर त्याला कुठल्या आधारावर वीस फूटांची मर्यादा घालत आहात. कुठल्याही साहसी खेळाला असे काही निर्बंध आहेत का? फार तर तुम्ही सुरक्षिततेचे नियम कठोर करा आणि ते पाळायची सक्ती करा. ते योग्य राहील. याऊपरही ज्याला त्याला आपल्या जीवाची काळजी असतेच. कोणी मरायला म्हणून हंडी खेळत नाही. यापेक्षा जास्त धोका तर खचाखच गर्दीने भरलेल्या ट्रेनला लटकून प्रवास करण्यात असतो. आणि तसे रोज हजारो लोकं नाईलाजाने करतातही. कित्येक पडून मरतातही. तरी तिथे मात्र सरकार कोणताही कायदा करण्यास असमर्थ ठरतेय.

राहिला प्रश्न 18 वर्षाखालील हंडीचा. तर मी माझ्या आयुष्यात जी काही थोडीबहुत दहीहंडी खेळलोय ती अठरा वर्षांच्या आधीच खेळलोय. अरे लहान मुलांचाच तर हा खेळ आहे. कश्याला तो खराब करत आहात. आधी 20 फूटांची मर्यादा देत त्याला 18 वर्षांखालील मुलांचाच खेळ बनवून ठेवायचे. आणि मग त्यांनाच परवानगी नाकारायची. हास्यास्पद आहे हे.

ज्याने कोणी याचिका दाखल केली. ज्याने कोणी हा निकाल दिला. जो कोणी दहीहंडीच्या विरोधात उभा राहिला. त्या सर्वांचा निषेध!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पीआयएल करायला हिंमत लागते पात्रता नाही . ४ थी पास सुध्दा पीआयएल दाखल करू शकतो. Wink
फक्त सगळे पुरावे वगैरे गोळा करायला हिंमत लागते
आता जसा तु मुद्दा हिंमत करून उचलला ना तसा तो मुद्दा कोर्टात हिंमत करून न्यायधिशांसमोर मांड. यात पात्रता हा शब्दच बसत नाही Wink

उदय, हिंमतीची अंगात कमी नाही. शाळाकॉलेजपासून जेव्हा बंडखोरी करायची वेळ यायची तेव्हा मी सर्वात पुढे असायचो.
पण कोर्टात काही दाखल करायचे तर त्याचा अभ्यास, शोधाशोध, माहिती गोळा करणे, ती साफसूफ करत कोर्टात पेश करणे ईत्यादी कसे जमते ते बघतो. दुर्दैवाने मेजॉरटी मित्र मद्याच्या आहारी गेले असल्याने, ज्यात ओळखीचे वकीलही आलेच, त्यामुळे मदत करायची पात्रता आहे पण करणार नाहीत असे बरेच आहेत.

बाहुबली धन्यवाद,
ऋ बाळ म्हणून संबोधल्या जाणार्‍याला तुम्ही ऋ दादा बोलत हिंमत वाढवलीत बघा Happy

ज्यांचे पूर्वज गलोल घेऊन डायनासोर मारत फिरायचे तयांना बाहुबलीसुद्धा दादाच म्हणेन।।।

आजच्या ताज्या घडामोडी

राज ठाकरे यांनी डबलगेम केला. बंदीला झुगारून मनसेची ४० फूटांची हंडी बांधली.

वर्ल्ड फेमस जय जवान पथकाने बुधवारी सायंकाळीच नऊ थरांची सलामी दिली.

जय हनुमान मंडळाने त्यावर कडी करत रस्त्यावर झोपून नऊ थर लावले.

निषेधाचे काळे झेंडे फडकले. काही पथके मुद्दाम शिड्या घेऊन फिरले.

महिलांनी देखील या वीस फूट कमालमर्यादेची टिंगल उडवत गोरेगावात पाच थर लावले.

स्वतिक महिला पथकाने देखील सहा थर लावणार च असे म्हटलेले. नक्की लावले की नाही कल्पना नाही.

१८ वर्षांखालच्या मुलांना सहभागी न करण्याचा न्यायालयाचा नियम मात्र सर्वच मंडळांनी मान्य करत समंजसपणाचे उदाहरण दिले Happy

परीपक्व चिमटा ! व्हॉट्स्पवरून...

पुढील वर्षीचा संवाद कदाचित!

मुलगा :- बाबा, मी रात्री उशिरा येईन। वाट बघू नका।

वडील :- अरे आज दहिहंडी आहे कुठे चाललाय सणाचा?

मुलगा :- मी कायद्याने चालणारा जबाबदार नागरिक आहे। मी डांसबार मध्ये जातोय ते कायदेशीर आहे।
दहिहंडी खेळून काय जेलमध्ये जाऊ???

Happy

दहीहंडीच्या वरच्या थरावरून अपघाताने गोविंदा पडतात व जखमी होतात. त्यामुळे न्यायालयाने दहीहंडीला २० फुटांची मर्यादा घातली आहे.

सध्या सर्वत्र गगनचुंबी इमारती आहेत. अशा इमारतींच्या मजल्यांवरून किंवा गच्चीवरून लोक अपघाताने पडू शकतात व जखमी होऊ शकतात. अशी उदाहरणे आहेत.

त्यामुळे न्यायालयाने इमारतींनाही २० फुटांची मर्यादा घालण्यासंबंधी आदेश काढावा. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या व बांधल्या जात असलेल्या इमारती २० फुटांच्या मर्यादेपर्यंत छोट्या करण्यासंबंधीही आदेश काढावा.

त्यामुळे न्यायालयाने इमारतींनाही २० फुटांची मर्यादा घालण्यासंबंधी आदेश काढावा. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या व बांधल्या जात असलेल्या इमारती २० फुटांच्या मर्यादेपर्यंत छोट्या करण्यासंबंधीही आदेश काढावा

>> व्वा! काय उपाय आहे. २० फूट उंच झाडावरून पण लोक पडतात, तेव्हा सरकारने सर्व २० फुटांवरील झाडे छाटावीत.

उंचावरून उडणारी विमाने कोसळून लोक मरतात, तेव्हा विमाने देखील २० फूटांवरुन जास्त उंचीवरुन उडवू नयेत

Pages