किस्सा स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी चा

Submitted by Sanjeev.B on 30 May, 2016 - 08:02

तसं बघायला जाणार तर स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी वर मी काही लिहेन असं कधी मला वाटलं नव्हतं, पण आलिया भोगासी असावे सादर या म्हणी ला स्मरुन वाचकांच्या भोगां ना स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी वर हा लेखन प्रपंच सादर करत आहे.

किस्सा आहे मी ८वीत असताना चा. फिझीक्स चा तास होता, फिझीक्स च्या बाई आम्हा सर्व विद्यार्थ्यांना स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी वर चा धडा शिकवित होत्या, त्या आम्हाला प्रयोग करुन दाखवत होत्या. फुटपट्टी ला हातांनी घासुन, मग ते फुटपट्टी कागदांच्या छोट्या छोट्या चिटोर्‍या जवळ घेऊन गेले तर कागदाचे चिटोरे फुटपट्टी जवळ खेचले जात होते. तर, बाई ने समजाऊन सांगितले कि घर्षण केल्याने फुटपट्टी जवळ एक विद्युतीय जाळे (electric field) निर्माण झाले होते व त्यामुळे ते कागदाचे चिटोरे फुटपट्टी जवळ खेचले जात होते. सर्वांनी आप आपल्या कंपास पेटीतुन फुटरुलर काढुन हा प्रयोग करुन पाहिला, तेव्हढ्यात तास संपल्याची बेल झाली, शेवट चा तास असल्या कारणाने शाळा ही सुटली.

आमची चौकडी वर्गातुन बाहेर पडली. मी, गुरन्या (गुरनाम), सुंड (सुंदरम) आणि मुडद्या (मृदुल) असं आमचा स्केटिंग चा गृप होता. मुडद्या आमच्या वर्गा चा मॉनिटर होता. चालता चालता मी बोललो, काल छायागीत मध्ये आ गले लग जा मधलं गाणं पाहिलं का, शशी ने काय जबरी स्केट्स चालवलि आहे त्यात, कॅसेट आणु आणि शिकु ४-५ स्टेप्स आपण. सगळ्यांनी होकार दिले, २-२ रुपये काढुन कॅसेट आणले, मुडद्या च्या घरी आम्ही जमलो, सिनेमा सुरु झालं, शशी कपुर, शर्मिला टागोर वर लाईन मारतो व पटवतो, व रस्त्या वर स्केटस चालवता चालवता, शर्मिला चा तोल जाऊन ती एका बर्फाळलेल्या खोर्‍यात जाऊन पडते, आता तिला होश मध्ये आण्ण्यासाठी शशी कपुर तिला जिस्म की गर्मी देतो. हे जिस्म की गर्मी चं प्रकरण गुरन्या ला कळत नव्हतं, तो मध्येच बोलला, "अबे ये क्या कर रहे है", तेव्हा मी त्याला समजावलं, अरे उसको सर्दी हो गया है यार, शशी कपुर उसको स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी शॉक देकर ठिक कर रहा है आणि डोळे मिचकावलो, गुरन्या साधा होतो, त्याला खरंच वाटलं, तो बोलला क्या पकाऊ पिच्चर है यार, चल fast forward मार और स्केट्स का शॉट लगा, मग fast forward मारुन तो सिनेमा आम्ही संपवलं

दुसर्‍या दिवशी शाळेत परत फिझीक्स च्या तासाला बाई ने स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी चा धडा सुरु केला आणि सर्वांना
प्रश्न विचारलं कि स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी चं आणखी एक उदाहरण द्या, तर गुरन्या ने हाथ वर केलं, बाई ने त्याला उभं राहुन उदाहरण द्यायला सांगितले तर आम्हा तिघांना धडकीच भरलं, ह्या पठ्ठयांनी सरळ सांगितले, When 2 human bodies are rubbed against each other, the heat generated due to the friction of bodies generates an electrical field, this is an example of static electricity.

बस्स बाई ने पुढे काहीच विचारले नाहे, सरळ येऊन गुरन्या च्या कानशिलात एक आवाज काढली आणि म्हटले this is also an example of static electricity आणि नंतर त्यांस विचारले कि तुला हे कोणि शिकविले, तर ह्यांनी आम्हा तिघांकडे बोट केले, बाई आम्हा चौघांना घेऊन, प्रिंसीपल कडे गेल्या आणि सर्व हकिगत सांगितले, प्रिंसीपल ने सांगितले bring your parents tomorrow.

घरी हे सांगितल्यावर आम्हा सर्वांच्या कानशिला खाली स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी चे जाळे generate केले गेले हे सुज्ञास सांगणे न लगे.

थोर शास्त्रज्ञ Thales of Miletus ज्यांनी स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी चा शोध लावला त्यांना ही कधी असे वाटले नसणार कि भविष्यात त्यांची ही शोध पुढची पिढी एक नविन दृष्टीकोणातुन पाहणार.

धन्स

संजीव (३००५२०१६)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे भायनक किस्सा.
त्या आ गले लग जा आणि अजून एक अक्षय कुमार चित्रपट आहे त्यात गारठलेल्या शरिराला ऊब म्हणून हिच संकल्पना आहे.(साधी सुधी शेकोटी वर पाय शेकणे, तोंडात ब्रँडी वगैरे उपाय नसतील ना तेव्हा.... Happy )

Rofl
आमच्या मेसमधे फायबरच्या खुर्च्यांवर बसल्यामुळे मला बऱ्याचदा बेसीनच्या लोखंडी नळाला हात लावला की शॉक बसायचा! ही पण स्टॅटिक इलेक्ट्रिसीटीच असावी काय?

बापरे Lol गुरन्या बिचारा.
ऑफिसात एसी सहन होत नाही म्ह्जणुन मी शाल पांघरुन बसते. खुप वेळ अंगावर असलेली शाल काढुन चेअर्वर ठेवली आणि तिला हात लागला की चर्र व्हायचं. स्टॅटिक इलेक्ट्रिसीटीच असावी काय? Happy

आ गले लग जा मधली गारठलेल्या शरिराला ऊब देण्याची संकल्पना बर्‍याच चित्रपटात आहे.

सर्वांचे आभार.

शेकोटी <<< आराधना शिन्मात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर ने शेकोटी पेटविल्याचे स्मरते, पण काही उपयोग झालं नाही, घोळ केलंच दोघांनी.

जबरी Lol

आ गले लग जा मधली गारठलेल्या शरिराला ऊब देण्याची संकल्पना बर्‍याच चित्रपटात आहे.
>>>>
हो,
आणि कडाक्याच्या थंडीवर हा एकच उपाय असतो असे वाटण्याच्या वयात यावर आजवर किती जणांनी स्वप्नरंजने केली असावीत यावर वेगळा लेख बनेल Wink

Proud

" आ गले लग जा " मधली गारठलेल्या शरिराला ऊब देण्याची संकल्पना बर्‍याच चित्रपटात आहे.

जर शेकोटीच दाखवायची असती तर सिनेमाच नाव आग पे लग जा अस नसत केल ?

शेवटी घोळ करायचा होता म्ह़णुन " आ गले लग जा "

Wink

कडाक्याच्या थंडीवर हा एकच उपाय असतो असे वाटण्याच्या वयात यावर आजवर किती जणांनी स्वप्नरंजने केली असावीत यावर वेगळा लेख बनेल>>>> आपल्या कल्पनेला सलाम
Biggrin