जिम्नॅस्टिक (रिओ ऑलिंपिक्स)

Submitted by Filmy on 8 August, 2016 - 05:36

रिओ ऑलिंपिक्समधल्या जिम्नॅस्टिक बद्दल चर्चा करण्यासाठी..

मंजूडी | 25 April, 2016 - 12:32
येस!
दीपामुळे भारतीय जिम्नॅस्टीक्स जगतात एकदम भारी वातावरण आहे.

उदय८२ | 7 August, 2016 - 11:06
एका जिम्नॅस्टचा लँड करताना पायच मोडला.::अरेरे: भयानक रित्या तुटला आहे.

जाई. | 7 August, 2016 - 11:14
बापरे Sad

जाई. | 7 August, 2016 - 11:32
दीपा कर्माकरने जिम्नॅटिक्स मध्ये सुवर्णपदक जिंकलं हे खरं आहे का ? फेसबुकवर एकाने शेअर केलीये बातमी . पण बाकी कुठेच दिसली नाहीये Uhoh आता काय करायचं

उदय८२ | 7 August, 2016 - 11:41
नाही. बातमी खोटी आहे
अन्यथा ऑलंपिकच्या ऑफिशल पेज वर डिक्लेअर झाले असते

जाई. | 7 August, 2016 - 11:45
हो ना. मी पाहिलं तिथे . असा काहीच उल्लेख नाही

हिम्सकूल | 7 August, 2016 - 12:41
लेडिज जिमनॅस्टीक्स अजुन सुरुच झाले नाहीये तर दिपा कर्माकरला गोल्ड कसे मिळेल.. बातमी बघून निदान ऑलिपिकची साईट तरी चेक करावी की..

भाऊ नमसकर | 7 August, 2016 - 21:10
भारताच्या महिला हॉकी संघाने जापानला छान लढत दिली; दोन गोल्सने पिछाडीवर असूनही २-२ असा सामना अनिर्णित ठेवून एक पॉइंट मिळवला. जपान व विशेषतः भारताची गोलकीपर [सविता] या दोघानीही गोलकिपींगचं उत्तम प्रदर्शन घडवलं. महिला संघाला पुढच्या कठीण सामन्यांसाठी शुभेच्छा.
दिपा कर्माकार आज रात्री १०.५५ वाजतां आपली कमाल दाखवेल, असं आत्ता हॉकी समालोचकाने सांगितलं. पहाणं आलंच !

पराग | 7 August, 2016 - 23:29
Deepa karmakar ne changla score kelay..
15 mins madhe women archery chi quarter final ahe. Russia cha viruddha. Keeping fingers crossed!!

भरत. | 7 August, 2016 - 23:48
http://m.sportskeeda.com/live/rio-2016-womens-artistic-gymnastics-qualif...
दीपानी व्हॉल्ट्समधये सहावा रँक मिळवून फायनलसाठी क्वालिफाय केलंय म्हणे. पण सगळ्या जिम्नास्ट्सची ही फेरी पूर्ण झाली का? रँक फायनल का? अन इव्हन बार्स सध्या ३८ वी.

रिओची वेबसाइट भारीये.

Rio 2016 : जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय महिला
http://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/rio-2016-olympics-dipa-k...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपा सध्या ऑलराऊंडच्या अंतिम फेरीत क्वालीफाय झाली नाही - https://smsprio2016-a.akamaihd.net/_odf-documents/G/A/GAW024900_Results_...
(मी नताशा - अपडेटसाठी थँक्स! माझ्याकडे काल रात्रीचे अपडेट्स होते.)

ऑलराऊंड म्हणजे वॉल्ट, बॅलन्सिंग बीम, अनइव्हन बार आणि फ्लोअर एक्सरसामिळ्या चारही प्रकारांत आपलं नैपुण्य सादर करायचं. तिचा रँक ५१ वा आहे.
पण या संधीचा उपयोग तिला इंडिविज्युअल अ‍ॅपरेटससाठी होईल. पोडियम, अ‍ॅपरेटसचा तिला चांगला सराव होईल.

वॉल्टमध्ये पदक जिंकण्याच्या आशा आहेत - https://smsprio2016-a.akamaihd.net/_odf-documents/G/A/GAW002900_Results_...
कारण ती जी वॉल्ट सादर करते आहे त्याची डिफिकल्टी ८.००० आहे. एक्झिक्युशनमध्ये तिने ७.००० किंवा त्यापेक्षा अधिक गूण मिळवले तर ती नक्केच पदक जिंकू शकेल.

ऑलिंपिकमध्ये ती एवढे इव्हेंट खेळणार आहे - https://www.rio2016.com/en/athlete/dipa-karmakar

उदय८२ | 7 August, 2016 - 11:06
एका जिन्मॅस्टीक चा लँड करताना पायच मोडला. अरेरे भयानक रित्या तुटला आहे>> जिम्नॅस्टीक्स हा खेळ आहे, आणि हा खेळ सादर करणार्‍याला किंवा करणारीला 'जिम्नॅस्ट' म्हणतात.

दीपा सध्या ऑलराऊंडच्या अंतिम फेरीत पोचली आहे.>>> नाही दीपा कर्माकर व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत

इ-सकाळ बातमी -

भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने ऐतिहासिक कामगिरी करत व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. पात्रता फेरीत ती आठव्या स्थानी राहिली.

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली भारताची पहिली जिम्नॅस्ट असा लौकिक मिळवलेल्या दीपा कर्माकरने अंतिम फेरीत स्थान मिळविल्याने भारताला पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. रिओ ऑलिंपिकमध्ये दीपा कर्माकर व्हॉल्ट प्रकारात 14.850 गुण मिळविले. पात्रता फेरीत ती आठव्या स्थानावर राहिल्याने अंतिम फेरीसाठी ती पात्र ठरली आहे. दीपा ही त्रिपुराची रहिवाशी आहे.

दीपाने व्हॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नातच 15.100 गुणांची कमाई केली. तर दुसऱ्या प्रयत्नात दीपाने 14.600 गुण मिळविले. तिने आपल्या खेळाडू सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. कॅनडाची जिम्नॅस्ट शॅलोन ओल्सेन हिच्याकडून तिला कडवी लढत मिळाली. पण, ती अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरली.

महिलांच्या व्हॉल्ट प्रकाराची अंतिम फेरी 14 ऑगस्टला रात्री 11.15 वाजता खेळविली जाईल. दीपाच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. दीपाचे अनइव्हन बार, बॅलन्सिंग बिम आणि फ्लोअर एक्सरसाईजमधील आव्हान संपुष्टात आले. दीपाने अनइव्हन बारमध्ये 11.666, बॅलन्सिंग बिममध्ये 12.866 आणि फ्लोअर एक्सरसाईजमध्ये 12.033 गुण मिळविले.

माझ्या समजुतीप्रमाणे दीपा फक्त व्हॉल्टच्या फायनलला पोचलीय . आठवा रँक.

ओव्हरऑल चँपियनशिपसाठी नाही.

तिचे स्कोर्स आणि रँक्स
ओव्हरऑल ५१.६६५ (५१) ५७.२६५
अन इव्हन बार्स ११.६६६ (७७)
फ्लोर एक्स. १२.०३३ (७५)
बीम १२.८६६ (६५)
व्हॉल्ट १४.८५० (८)

कोणत्याही देशाचे फक्त दोन जिम्नास्ट्स फायनलमध्ये घेतले जातात. मुलींच्या ओव्हरॉलमध्ये पहिल्या तिघी अमेरिकेच्या असल्या तरी तिसरी फायनलमध्ये खेळणार नाही.

एकदम बरोबर भरत..

दिपा कर्माकरला व्हॉल्टमधे थोडे जास्त मार्क्स पाहिजेत.. म्हणजे ९ तरी मिळायला पाहिजेत.. तेव्हढे मिळाले तर तिला गोल्डच मिळेल.. कारण बाकी सगळ्यांपेक्षा तिच्या उडीची डिफिकल्टी सगळ्यात जास्त म्हणजे ८ आहे..

दीपाची आतापर्यन्तची वाटचाल भन्नाटच आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये भारतीय दिसणे हेच मुळात अप्रूप. तिच्यामुळे पी टी उषासारखे इतराना इन्स्पिरेशन मिळेल . नाहीतर ये अपने बसकी बात नही असे समजून त्या वाटेला कोणी जातच नाही. दीपाची शरीरयष्टी आंतरराष्त्रीय जिम्नॅस्ट्सच्या मानाने जरा स्थूल वाटते त्यामुळे तिच्या परफॉर्मन्सवर थोडा तरी परिणाम होत असावा...

<< दीपाची शरीरयष्टी आंतरराष्त्रीय जिम्नॅस्ट्सच्या मानाने जरा स्थूल वाटते त्यामुळे तिच्या परफॉर्मन्सवर थोडा तरी परिणाम होत असावा...>> मला नेमकं हेंच जाणवलं. पण एवढ्या प्रचंड देशात अजिबात न रुजलेल्या, न रुळलेल्या दुर्मिळ अशा खेळात कडव्या जागतिक स्पर्धेत उतरण्याचं स्वप्न पहाणं व जिद्दीने, तपश्चर्यापूर्वक तें पूर्ण करणं, ह्याचंच आत्यंतिक कौतुक आहे. जिंको, न जिंको, पण तिला मनापासून सलाम व शुभेच्छा. !!

महान पुरोगामी व सेक्युलर शोभा डे यांचे रिओ ऑलिंपिक्स मध्ये गेलेल्या खेळांडू बाबत महान मत.

<< शोभा डे यांचे रिओ ऑलिंपिक्स मध्ये गेलेल्या खेळांडू बाबत महान मत. >> ऑलिंपिकला गेलेल्या भारतीय संघातील खेळाडूंबद्दल असं त्या बोलत असतील, तर त्यांच्या अज्ञानाची कींव करावीशी वाटते. आणि त्याच बरोबर, चार वर्षं अखंड मेहनत घेवून कडव्या जागतिक स्पर्धेला पात्र होणार्‍या प्रतिभावान खेळाडूंचा असा अपमानास्पद उल्लेख करण्याच्या मनोवृत्तीची घृणाही वाटते. Sad

भाऊ+१.

परवा असेच पुजारा बाबतही टिवटिव चाललेली पाहून खंत वाटली.

ह्या 'वाचाळ' बाई मात्र फार भंपक बोलुन गेल्यात. Angry

दीपा ची स्टाईल जी आहे त्या स्टाईलची ती आणि इराणी या दोनच सध्या जगात आहेत. असे काल एनडीटीव्ही वरच्या एका कार्यक्रमात दिपाचा मित्र ज्याने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवले होते. त्याने सांगितले.
बहुदा तिच्या शरीरयष्टीनुसार तिने ती स्टाईल आत्मसात केली आहे.

भाऊ +१
शोभा डे कॉलेज च्या दिवसात स्वतः सुद्धा (मॉड्लिंग च्या आधी) खेळाडू होती ना? तरीही अशी प्रतिक्रिया देतेय!

काही व्यक्ती प्रसिद्धीच्या नशेच्या गोळीच्या शिकार झालेल्या असतात. दोन दिवस प्रसिद्धी हुंगली नाही की त्यांना 'टरकी ' येते. ( विथड्रॉल सिम्प्टम्प्स) . त्यातल्या ह्या बाई. काटजू, दिग्विजय, कमालखान ,बेदी, पवार, राउत्,खेर हे ह्याचे पेशंट्स. आपण मेलेलो नसून जिवंत आहोत हे लोकांना कळण्यासाठी असे करावे लागते. प्रसिद्धीचा गांजाचा एक दम लावला की काही दिवस यांचे बरे जातात.

येस, मलाही तेच वाटतेय. 8 व्या स्थानावरून फायनलमध्ये थेट 4त्या स्थानावर, तेही पदार्पणात. या 4त्या स्थानाचा उपयोग तिला भरपूर फंडिंग मिळण्यासाठी निश्चितच होईल.

Amazing performance by Dipa. तिचे मनापासून अभिनंदन>>> +१.

शेवटचे २ खेळाडू (जे जगातले सर्वोत्तम आहेत) बाकी असताना दिपा दुसर्‍या स्थानावर होती. पहिले ३ आणि दिपा यांनाच १५ पेक्षा जास्त गुण मिळालेत. दिपाचे खरंच कौतुक आहे.

दिपाचा पर्फॉर्मन्स एकदम मस्त.
काही क्षण वाटलं होतं की हीला ब्राँझ मेडल नक्की. १५ ऑगस्टच्या मुहुर्तावर रिओमधे तिरंगा दिसेलच.

सिल्वरमेडल वाल्या मारिया पासेकाचे फॉल्ट्स जास्त होते असं मलातरी वाटलं त्यामानाने तीला एक्झिक्युशनचे मार्क जास्त मिळाले.

.

Pages