स्विमिंग (रिओ ऑलिंपिक्स)

Submitted by Adm on 7 August, 2016 - 16:39

रिओ ऑलिंपिक्समधल्या 'स्विमिंग' बद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.. ... .. ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

४ x १०० फ्रिस्टाईल रिलेमध्ये ऑस्ट्रेलियन बायांनी अमेरिकन बायांना मागे टाकून गोल्ड मेडल मिळवलं. वर्ल्ड रेकॉर्डही मोडलं.
महिलांच्या ४ बाय १०० मेडलेमध्ये हंगेरीयन हॉसझूने वर्ल्ड रेकॉर्ड तब्बल ४ सेकंदांनी मोडला !!
पुरूषांच्या ४ बाय १००मध्ये अमेरिकन चेसने परत ब्रेस्टस्ट्रोक आणि फ्रीस्टाईलमध्ये जोर लावून रौप्य पदक खेचलं. पहिल्या जपान्याला काही मागे टाकता आलं नाही त्याला.

भरत. | 7 August, 2016 - 08:24

बातम्यांत ऐकलं की स्वीमिंगमध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला आणि मोडणारीला त्याचा पत्ताच नव्हता.

जलतरणात चक्क एक नेपाळी खेळाडू आहे आणि ती या ऑलिंपिकमधली सगळ्यात लहान अ‍ॅथलीट आहे.

दिनेश. | 7 August, 2016 - 12:05

स्विमिंगमधे एकाने वेळेच्या आधीच पाण्यात उडी मारली. तो रडत रडत बाहेर आला. ( स्पर्धेतून बाद झाला का तो ? )
मला या यावेळेस सर्वच स्टेडीयम मधे असलेली निळ्या हिरव्या रंगाची सजावट फार आवडली.

उदय८२ | 7 August, 2016 - 12:08

स्विमिंगमधे एकाने वेळेच्या आधीच पाण्यात उडी मारली. तो रडत रडत बाहेर आला>>>>>> हो तो डिस्कॉलिफाईड झालेला संपुर्ण स्पर्धेतून परंतू त्याला पुन्हा संधी देण्यात आली. पण कामगिरी खालवल्याने तो पुढच्या राऊंडला क्लॉलिफाईड झाला नाही

स्विमिंगच्या आजच्या रेसेस लय भारी !!!

अमेरीकेच्या लिडीकी ने ४०० मिटर फ्रीस्टाईलमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड दिवसभरात दोनवेळा मोडलं. सकाळी सेमी फायनलमध्ये एकदा आणि नंतर फायनलमध्ये स्वतःचाच परत एकदा. ती रौप्यपदक विजेत्या ब्रिटीश स्विमरपेक्षा तब्बल ४ सेकंदांनी पुढे होती. शेवटचे पन्नास मिटरतर अफाट जोरात मारले.
ही माझ्या मित्राची लिडीकी बद्दलची फेसबूक पोस्ट.. Happy
Katie Ledecky should give everybody a 7 second start from now on just to make it interesting.
रच्याकने, लिडीकीला मेडल द्यायला नीता अंबानी आली होती.

त्याआधी अमेरिकेच्या डॅना वॉल्मरनेही १०० मिटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये ब्राँझ मेडल मिळवलं. तिला पण लंडन आणि रिओ स्पर्धांदरम्यान मुलगा झाला. ह्या स्पर्धेतली गोल्ड मेडल विनर स्विमिंगमध्ये मिडल मिळवणारी पहिली स्विडीश महिला आहे. ती पण शेवटचे पन्नास मिटर जोरदार पोहोली!

पुरूषांच्या ४ बाय ४०० रिल फायनलमध्ये अमेरिकेने गोल्ड मेडल मिळवलं. पहिल्या १०० मिटर नंतर अमेरिका पहिल्या तिनातही नव्हती. फेल्प्सने त्याच्या पहिल्या पन्नास मिटरमध्येच फ्रांसच्या स्विमरवर बॉडी लेंथचा लिड मिळवला आणि त्याचे १०० मिटर संपताना अमेरिका पहिल्या नंबरवर आली. तिसर्‍याने लिड कायम राखला आणि चौथा अ‍ॅड्रीयन त्याचा लाईफटाईम लॅप पोहोला (म्हणे) आणि कुठलाही कसूर न ठेवता संघाला गोल्ड मेडलपर्यंत पोहोचवलं. ब्राझिलची टीम पहिल्या पन्नास मिटर अखेरीस पहिल्या नंबरवर होती आणि तेव्हा स्टेडीयमवर अभुतपूर्व जल्लोष झाला !! पण अखेरीस ही टीम पाचव्या नंबरवर घसरली. फेल्प्सचं हे १९वं सुवर्णपदक..!!

आज भारताचे २ स्विमर्स प्राथमिक फेरीत उतरणार आहेत. एक पुरूष, एक महिला. (नावंच आठवेनात) पुरूष स्विमर बहुतेक फेल्प्सच्याच हीटमधे असेल. त्यानेच तो खूष होता. मुलाखतकाराला म्हणत होता शर्यत झाली की फेल्प्सशी जाऊन बोलणार आहे.

पहिल्या स्प्रिंट मधे वर्ल्ड रेकॉर्ड करणारा शर्यत संपेपर्यंत ३ र्‍या चौथ्या स्थानावर सुध्दा येऊ शकतो हे कालच्या काही स्विमिंग स्पर्धेत अनुभवले

कालच्या स्विमिंग फायनल्सपण मस्त झाल्या!
पुरूषांच्या २०० मिटर फ्रीस्टाईलमध्ये अखेरच्या टप्प्यात सुन यांगने साऊथ आफ्रिकेच्या ले क्लोसला मागे टाकत सुवर्ण पदक जिंकलं. ले क्लोस सेमी फायनलमध्येही अगदी अश्याच पद्धतीने शेवटच्या टप्प्यात मागे पडला होता. कदाचित आधी वेग घेतल्याने दमत असावा. ह्या स्पर्धेचा मेडल सेरेमनी झाल्यावर १० मिनीटांत तो २०० मिटरच्या ब्रेस्टस्ट्रोकसाठी टँकवर दाखल झाला !! आणि फायनलला पोहोचला पण. आज पुन्हा त्याला पदकाची आशा आहे.

पुरूषांच्या १०० मिटर बॅकस्ट्रोकमध्ये अमेरीकन डेव्हिड प्लमरने वयाच्या तिसाव्या वर्षी पहिलं मेडल मिळवलं!

महिलांच्या १०० मिटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये अमेरिकेच्या लिलि किंगने रशियाच्या एफिमोवाला काही मायक्रो सेकंदांनी मागे टाकत सुवर्ण पदक जिंकलं. ह्या दोघीमध्ये सुरुवातीच्या फेर्‍यापासून खुन्नस सुरू होती. आज वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये ह्या 'कोल्ड वॉर' बद्दल लेख पण आला आहे.

पुरूषांच्या २०० मिटर बटरफ्लाय सेमी फायनलमध्ये हंगेरीच्या केंडेरेसीने मायकेल फेल्प्सला शेवटच्या ५० मिटरमध्ये मागे टाकत पहिला नंबर मिळवला. २०० मिटर बटरफ्लाय ही फेल्प्सची सिग्नेचर रेस मानली जाते! रेसनंतर फेल्प्सही जरा चक्रावलेला दिसला. आज फायनलला मजा येणार!!!

त्यानेच तो खूष होता >>>> सहाजिक आहे. १९ गोल्ड मेडल मिळवलेला माणूस आपल्याबरोबर स्पर्धेत आहे ह्याचच अप्रुप वाटत असेल. Happy

आज ३ गोल्ड अमेरिकेला!व्हॉट अ नाइट !! फेल्प्स, लिडिकी आणि पुन्हा रीलेची टीम (यात फेल्प्स आणि लॉक्टी हे स्टार्स!) मस्त मजा आली बघायला!

स्विमिंगमधल्या टीम-रेसेस माझ्या सर्वात आवडत्या आहेत. एक स्विमर आपलं अंतर पार करून भिंतीला हात लावतो, पुढचा तोवर एकदम तयारीत उभा असलेला त्या क्षणी पाण्यात उडी मारतो, पहिला जरा दम खाईपर्यंत दुसर्‍याचे ५० मीटर पोहून झालेलेही असतात, ३रा आणि ४था एकाग्रचित्त करण्याचा प्रयत्नात असतात, पहिला पाण्यातून बाहेर येऊन चिअर करायला लागतो... ४ बाय १०० ला तर फारच लगबग उडते. ती लगबग बघायलाच मला जास्त आवडतं. Proud

२००मि. बटरफ्लायच्या अंतिम सामन्यात पहिल्या ५०मिटर मधे Hungaryचा Cseh लिड वर होता.. पुढल्या १०० मिटर मधे Phelpsने लीड घेतला.. मात्र शेवटच्या ५० मिटर मधे Phelpsला जपानच्या Sakaiने जबरी फाईट दिली.. केवळ ०.०४ सेकंदाने तो दुसरा आला.

4x200 freestyle relayमधे मायकलच्याच टिमने पहिल्या पासून लीड घेतला होता.

२१वे सुवर्ण... HO.gif

अरे, त्या लॉक्टेच्या केसांचं असं काय झालय? परवा मी ओळखलच नाही त्याला.. Uhoh
मुद्दाम रंगवलेत केस की अकाली पांढरे झाले एकदम ???

ब्लीच केले म्हणे.

आणि रिओ च्या सुरस कथांमध्ये पूल मधल्या अल्जीयुक्त पाण्याने त्याच्या ब्लीच्ड केसांचा रंगही बदलला म्हणे.

Singapore cha Joseph Schooling 100 mtr butterfly madhye final la aalaay.
Udya tyachya childhood hero Phelps la haravanaar bahudha.

prelims and semi madhye doghe ekach hit madhye hote, donhi wela schooling first aalaay.

Mostly Singapore che first medal udya sakali milel.

अरे, त्या लॉक्टेच्या केसांचं असं काय झालय? परवा मी ओळखलच नाही त्याला.. >>> हो ना... मी पण.

आधीचे काळे केसच छान दिसत होते त्याला :डोळ्यांत बदाम:

फॉर अ चेंज, उद्याच्या १०० मी. बटरफ्लाय फायनलला फेल्प्स २र्‍या लेनमधे असेल!!
४थ्या-५व्या लेन्समधे स्कूलिंग आणि चॅड-ल-क्लोस

काल जरा फेल्प्स स्लो होता तरी मला वाटत नाही की फायनलला फार त्रास होईल. काल IM नंतर केवळ ३५ मिनिटांत त्याची सेमी होती आणि मध्ये मेडल सेरेमनी. ह्या सगळ्यात जोरदार इमोशनल रोलरकोस्टर होत असणार नाकी. परवा चॅडचं पण तेच झालं होतं.

रच्याकने, कालचा सेमीला पहिल्या ५० मिनिटांनंतर फेल्प्स आठवा होता !!! आणि १०० मिटरनंतर २ रा. काय ताकद आहे का खेळ!

पण चॅड, स्कूलिंग आणि फेल्प्स अशी फायनल मस्त होईल.

ओ माय गॉड, काय झालीय फायनल! स्कूलिंग ला गोल्ड आणि फेल्प्स, चॅड आणि तो हंगेरीचा कोण तो हे तिघे एकाच वेळी दुसरे!!
८०० मी मधे लेडेकी ला गोल्ड!! अमेझिंग स्टॅमिना. वर्ल्ड रेकॉर्ड कसलं आरामात मोडले तिने!!

कालच्या स्विमिंग फायनल्स निव्वळ म हा न !!!!
एकसे एक रेसेस होत्या.
महिलांची २०० मिटर बॅकस्ट्रोक.. ह्यात अमेरीकेची माया डिरॅडो आणि हंगेरीची अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत हंगेरीची हॉस्झू एकदम नेक टू नेक होत्या. हॉस्झू अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत थोडीशी पुढे होती. पण अगदी शेवटी डिरॅडोने स्वतःला अक्षरशः खेचत पहिला नंबर मिळवला. दोघिंमधल्या वेळेतला फरत ०.०५ सेकंद इतका कमी होता. रिप्लेमध्ये दाखवत होते त्यात असं दिसलं की डिरॅडोने शेवटचा हात न मारत स्वतःला खेचत भिंतीला हात लावला तर हॉस्झूने शेवटचा हात मारला ज्यात तिचा जास्त वेळ गेला.
२००८ साली बिजिंग ऑलिंपिकमध्ये १०० मिटर बटरफ्लायची रेस फेल्प्सची अश्याच पद्धतीने जिंकला होता.
माया डिरॅडोचं हे शेवटचं ऑलिंपिक होतं आणि त्यातली ही शेवटची रेस (कारण कळलं नाही). त्यामुळे तिने शेवट गोड केला!

पुरूषांच्या १०० मिटर बटरफ्लायमध्ये फेल्प्स ८ स्पर्धकांपैकी ७ वा होता. त्यामुळे त्याला लेन २ मिळाली होती. पहिल्या पन्नास मिटरमध्ये फेल्प्स पहिल्या तिनात नव्हता त्यानेही स्वत:ला खेचत दुसर्‍या क्रमांकापर्यंत ढकललं. सिंगापुरचा जोसेफ स्कूलिंग निव्वळ अफाट पोहोला आणि गोल्ड मिळवलं. त्याच्या आणि फेल्प्सचा २००८ मधला एक फोटो दाखवला. त्यात स्कूलिंग एकदम लहान शाळेतला मुलगा होता. तो फेल्प्सला आदर्श मानायचा आणि आज त्याने फेल्प्सला हरवून गोल्ड मेडल मिळवलं. ह्या रेसमध्ये फेल्प्स, ले क्लोस आणि शे अस्या तिघांना मिळून सिल्वर मेडल मिळालं.

महिलांच्या ८०० मिटर फ्रिस्टाईल फायनलामध्ये दुसरं आणि तिसरं कोण येणार हेच काय ते बघायचं होतं कारण लिडीकाला गोल्ड मिळणार हे नक्कीच होत. अपेक्षेप्रमाणे तिने जवळ जवळ अर्धा टँक पुढे राहून गोल्ड मिळवलं आणि तिचा स्वतःचा ह्याच ऑलिंपिकमधला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!

शेवटी पुरूषांच्या पन्नास मिटर फ्री स्टाईलमध्ये अमेरिकेच्या अर्विनने वयाच्या ३५ व्या वर्षी गोल्ड मिळवलं! ह्या माणसाने तब्बल सोळा वर्षांनी ह्याच प्रकारातलं गोल्ड मिळवलं. मागे २००० सालच्या सिडनी ऑलिंपिकमध्ये त्याने ५० मिटर फ्री स्टाईलमध्ये गोल्ड मिळवलं होतं !

फक्त फेल्प्स, लिडीकीच नाही तर ले क्लोस, स्कूलिंग, अर्विन, डिरॅडो, हॉस्झू सगळेच केवळ महान आहेत !!

मायकल फेल्प्स चा समारोप सुवर्णपदक जिंकून झाला. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना कारकिर्दीचा समारोप करणे भल्या भल्यांना शक्य नसते.
तब्बल २८ पदके त्यात २३ सुवर्णपदके जिंकून मायकल ने सुवर्ण इतिहास लिहिला आहे. आता पुढच्या ऑलंपिक पासून कोण त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आहे ते बघू

स्विमिंगच्या अखेरच्या दिवशीच्या फायनल्स पण मस्त! अपेक्षेप्रमाणे ४ X १०० मेडले मध्ये अमेरिकने महिला आणि पुरूषांना गोल्ड मेडल मिळालं. महिलांमध्ये बॅकस्ट्रोक लॅप बेकर चांगली पोहोली पण तिला पहिला नंबर मिळवता आला नाही. लिलि किंगने सुरूवात जोरदार केली पण शेवटच्या क्षणी डॅनिश बाईने तिला मागे टाकून पहिला नंबर मिळवला. डॅना वॉल्मरने बटरफ्लाय "फ्लाय" केलं आणि शेवटच्या टप्प्यासाठी आवश्यक लिड मिळवून दिला, नंतर सिमोनने आपलं काम चोख बजावत फ्रीस्टाईल तोडून गोल्ड मेडल निश्चित केलं!

पुरूषांमध्ये मात्र कोडी मिलरचा ब्रेस्टस्ट्रोकचा लॅप वगळता अमेरिकेने निर्विवाद वर्चस्व राखलं. कोडी मिलरच्या बरोबर ब्रिटनचा अ‍ॅडम पेटी होता. तो ह्या प्रकारातला सर्वोत्तम समजला जातो. मिलरने नंतर इंअरव्ह्यू मध्ये सांगितलं की त्याचं लक्ष फक्त अ‍ॅडमला खूप लिड घेऊ द्यायचा नाही एव्हडच होतं, जे त्याने व्यवस्थित साध्य केलं. (मिलरच्या आधी रायन मर्फीने वर्ल्ड रेकॉर्ड टाईमने बॅक स्ट्रोक पोहून ग्राऊंड वर्क नीट करून ठेवलं होतं!.. ट्रूली अ टीम गेम!) पुढे फेल्प्स आणि अ‍ॅड्रीयनने आपापले लॅप चोख पोहून गोल्ड मेडल पटकावलं. फेल्प्सने ह्या गोल्ड मेडलसह निवृत्ती घेतली. फेल्प्स खरच ऑल टाईम ग्रेट अ‍ॅथलिट आहे!! त्याने आपल्या पुस्तकाची सुधारीत आवृत्ती काढली पाहिजे आता.. Happy

आता पुढच्या ऑलंपिक पासून कोण त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आहे ते बघू >>>>> भविष्यकाळ उज्ज्वल आहे असं म्हणायला हवं. ह्या स्पर्धेत फेल्प्स आणि लेडीकी सोडून बाकीही बर्‍याच जणांनी उत्तर कामगिरी केली. त्यामुळे पुढच्या चॅम्पियन लवकरच येणार ह्यात शंका नाही. Happy

सिंगापुरचा तो स्कुलिग यायला हवा..

भारता तर्फे तरी तुर्तास राम भरोसे त्यामुळे पुढच्या ऑलंपिकला क्वालिफाईन कोण होईल यातच धन्यता मानू