कॅनडा ट्रिप

Submitted by प्राजक्ता on 3 July, 2016 - 08:58

या समर मधे कॅनडा ट्रिप करायचा विचार आहे ३ दिवस २ रात्री साठी, मुल ५-१२ वयाची जास्तित जास्त एन्जॉय करु शकतिल असा प्लॅन करायचा आहे तस मायबोलिकर अमितने काही माहिती दिली होती.पण , तरि अमेरिकेतुन ट्रिप प्लॅन केलेल्याचे अनुभव,टिप्स आल्यास फायदा होइल.
३ दिवसात बायोडोम, झु,नायगरा फॉल्स (हे झाल तर ठिक याला फार प्रिफरन्स नाही दरवेळिस पॅरेन्ट्स आल्यावर अस मिळुन ३ वेळा तरी बघितलाय) आणि काय काय शक्य आहे, शक्यतो वॉटर पार्क ,अम्युझमेन्ट पार्कस नाही करणार कारण ते इकडे चिक्कार वेळा होतातच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही माहिती मलाही हवी आहे. ही माहिती टोरंटो, मॉण्ट्रियाल जवळच्या भागाची असावी असे दिसते. मलाही तेथीलच हवी आहे.

प्राजक्ता, ड्राईव्ह करणार आहात ना?
पहाटे निघून बोस्टन मॉरेयल पाच एक तासाचा ड्राईव्ह असेल, सो दुपारच्या जेवणापर्यंत पोहोचाल. त्या दिवशी बायोडोम (३ तास पुरे) आणि संध्याकाळी botanical garden. रात्री डाऊन टाऊन चक्कर इ.
दुसऱ्या दिवशी बेसिलिका आणि डाऊन टाऊन टाईमपास करून जेवण उरकून ओमेगा पार्क.(१.५ तास) ओमेगा पार्क सफारी सारखं आहे, तिकडे प्राण्याना गाजरं खायला घालून भरपूर फोटो काढून रात्री झोपायला आटोवा (१ तास). हे थोडं स्ट्रेच करून ५ तास ड्राईव्ह शक्य असेल तर सरळ टोरोंटो गाठा झोपायला.
टोरोंटो ला आलात तर सकाळी झु. जेवण करून नाएग्रा. (हे थोडं भोज्य्ज्याला हात लावल्यासारख होतंय) आणि एक रात्र वाढवलीत तर नाएग्राला फॉल फेसिंग रूम घेऊन काढा. वर्थ इट.

थोडी धावपळ होईल ३ दिवस २ रात्री पण शक्य आहे.

प्राजक्ता Quebec City नाही करणार का? सुरेख आहे.

तसही तुम्ही नायगारा आधी पाहिला आहेच.

टोरोंटो मध्ये Centre Island Ferry घ्या. Skyline छान दिसते. CN Tower, Ripley's Aquarium पण छान आहे.

>> तिकडे प्राण्याना गाजरं खायला घालून भरपूर फोटो काढून रात्री झोपायला आटोवा (१ तास)

हे वाचायला खूपच मजा आली Lol

Lol दाखवायला नाही. खायला घालायला सांगितलंय. Proud
जोक्स अपार्ट, गाडी शेजारी प्राणी येऊन त्यांना खायला घालणे भारी वाटतं. बारके प्राणी तर पुढचे दोन पाय रेअर व्हू मिरर वर टाकतात. उंच प्राणी मून रुफातून मान आत टाकतात. लाजरे दूर फेकलं तर खातात. चालू गाडीतून मुन्रुफातून आपण (म्हणजे शेजारच्याने) मान बाहेर काढून बघायला पण मजा येते. तिकडे एका ट्रेलवर त्यांची बारकी गाडी रेंट करून जाता येतं. वेळ असेल तर जंगल एक्स्प्लोर करायला पण आवडेल.

खंदकाच्या पल्याड पांढरे लांडगे (आर्क्टिक वुल्फ) होते. मी त्यांना गाजर फेकलं, त्याने रागाने अशी उडी मारली की प्रतिक्षिप्त क्रियेने माझं डोसकं आपटलं. डोळ्यात कसली जरब असते त्यांच्या. घाबरून गाडी पळवली तिकडून. Lol

काही ठिकाणी प्राण्याना पेट करायला मिळतं. शहरी माणसाला आणि बर्यापैकी प्राणी हेटरला (as पेट्स) मस्त संधी आहे जवळून तरीही लांबून मज्जा करायची. बाकी बर्ड शो इ. नेहेमीची आकर्षणे आहेतच.

धन्यवाद अमित! प्लॅन पर्फेक्ट वाटतोय आता काम करते यावर , आता बहुधा ऑगस्टमधेच होइल जाण अस दिसतय, (इतुकासा समर काय काय करायच अस होवुन जात)
झेलम ! क्युबेक पण आहेच अजेन्डावर पण एवढ सगळ एक्दम होणार नाही , त्यामुळे तो पुढच्या वेळेस.
प्राण्याना गाजर खाउ घालणे बहुधा सगळ्यात आव्डत असेल अस दिसतय.

अमेरिकन - मंट्रियाल किंवा मांट्रियाल; फ्रेंच - मंरिैयाल

कनेडियन सिटीत विशेष फरक जाणवणार नाहि, अमेरिकेत राहणारे असाल तर. आटोवा थोडं वेगळं आहे, कलोनियल कॅरेक्टर. ब्रिटिश कालिन (आर्किटेक्चर) इमारती आहेत, मुंबईतल्या फोर्ट भागातल्या सारख्या. आटोवा रिवरला जोडणार्या रिडो कनॅल वरचे लाॅक्स आवर्जुन पहाण्यासारखे आहेत...

आउटडोअर्सची आवड असेल तर अल्बर्टा इज दि बेस्ट...

आउटडोअर्सची आवड असेल तर अल्बर्टा इज दि बेस्ट...>> अरे वा ! अजुन भागाची माहिती येवु द्या, अजुन खाण्यापिण्याची ठिकाण , काय अव्हॉइड काय मस्ट डु वैगरे टिप्स चाल्तिल

मॉरेयाल ==मॉण्ट्रियाल. येस. पहिल्यांदा गेलो तेव्हा कुठे चाललोय ते शुद्ध देशी भाषेत सांगितलं तर समोरच्याला कळेपर्यंत नाकीनौ आले.

कनेडियन सिटीत विशेष फरक जाणवणार नाहि, >> राज, टोरोंटो बाबत टोटली अग्री. रादर टोरोंटो बाहेरचे लोक टोरोंटोला घाऊक हेट करताना त्यांना कॅनेडियनही समाजत नाहीत. हे तर अमेरिकनच... चुकून इकडे आलेले.
मॉरेयाल, क्युबेक सिटी मध्ये मात्र डाऊनटाऊन युरपियन/ फ्रेंच शैलीत बांधलेल्या इमारती खूपच सुंदर दिसतात. आटोवा पार्लमेंट पाहिलं की सी एस टी स्टेशन/ महानगर पालिकेची इमारत आठवते. पण राज आटोवात बाकी डाऊन टाऊन बऱ्यापैकी हाय राईजेस ठोकळेच आहेत.

पहिल्यांदा पार्लमेंट बघितलं तर चक्रावूनच गेलेलो. सिक्युरिटी म्हणून कुठे नाही!!! कधीही कुणीही या. मेटल डिटेक्टर ही नाही (हल्ली लावलाय मला वाटतं). लॉनवर खेळा, मागे पुढे चक्कर मारा. कुठेतरी कोपऱ्यात पुलिसची गाडी दिसलेली. सिक्युरिटी असेलच पण दर्शनी कुठे मागमूस दिसत न्हवता.
पार्लमेंटच्या मागच्याच रस्त्यावर अमेरिकन एम्बसी आहे. तिकडे मात्र पर्मनंट बॅरिकेडस -अर्धा रस्ता अडवून वन वे केलेला- उंच तारांचं कुंपण. गम्मत वाटलेली. Happy

Hi,
I live in Calgary. Been to Jasper and banff national park many times. Please Vipu Kara.
Thanks

फोटो पाहिले. अत्यंत सुंदर आहेत. पार्कातच रहायला छान बेड अँड ब्रेकफास्ट आहे का तिथे? अर्थात लगेच जाणे होणारच नाहिये तरी विषय निघालाय म्हणुन म्हटले विचारावे.

मी बॅम्फ-जॅस्परला, टोरोण्टो-ऑटवा-क्युबे़कला, व्हँकुवर-व्हिक्टोरिया-पॅसिफिक रिम नॅशनल पार्क इथे जाऊन आलो आहे. माझ्या मते ३ दिवस २ रात्री हा फारच कमी वेळ आहे, फारतर टोरोण्टो-नायगरा नीट बघता येईल नाहीतर खूप घाईघाई होईल, असे वाटते. ४-५ दिवस असतील तर बॅम्फ-जॅस्पर किंवा ऑटवा-क्युबे़क-माँट्रिअल करा, ७-८ दिवस असतील तर व्हँकुवर-व्हिक्टोरिया-पॅसिफिक रिम नॅशनल पार्क करा असे सुचवीन. ऑटवाला मे महिन्यात ट्युलिप फेस्टीवल असतो, तेव्हा जाणे बरे पडेल असे सुचवीन. मी मुद्दाम ट्युलिप फेस्टीवलसाठी गेलो होतो. पण माझा फर्स्ट प्रेफरन्स असेल व्हिक्टोरिया-व्हँकुवर, मग बॅम्फ-जॅस्पर, मग क्युबे़कला. ट्रीप्सचे डिटेल्स हवे असतील, तर देतो
माझे कॅनडा ट्रीपचे फोटो इथे आहेत.

अरे वा! मस्त माहिती जमा होतेय, आदिश्री हरकत नसेल तर इथेच लिहा, कुणालाही उपयोग होवु शकतो. भोज्याचे स्पॉट सोडुन क्युबेक बघण्याचा आग्रह अजुन एका मैत्रीणिने पण केलाय.
पैचान कौन तुम्हीही लिहा की, मला पण वाटतय कमी होतिल ३-२ , बघुयात.तुम्ही सुचवलेले पर्याय छान आहेत पण आम्हाला मुलाना सेन्ट्रिक ट्रिप करायचीय, ऑक्टोबर मधे शाळा चालु असणार त्यामुळे त्यावेळेस शक्य नाही,

Hi all,
Somebody did email to me but when I replied I got failure delivery response. I live in Calgary . It is 2 hours to Banff and almost 6 hours drive to Jasper. It has numerous locations to visit. It is heaven . There is Colombia ice field which is nice . My son enjoyed since they take you on a bus ride which has really big tyres. They take you to the slowly melting glacier/ ice field which is hundreds of feet thick. There is Takaka falls , very beautiful and Peyto lake which was in song Koi Mil Gaya. Someone also asked me for Glaciar national park. I only been once to waterton lake which resides in Glaciar national park. Half of it is in USA, Montana. So but it is in different direction. So not sure if 5 days are enough. Jasper is breathtaking but try to book hotels or lodge in advance .it is expensive very popular in July and August. Otherwise you would have to stay in Hinton which is 60 km and an hour drive from all the points. There skywalk before, you can see the valleys from glass bridge. I am afraid of heights so I was nervous but fun for kids. You would have to buy tickets just enter the national park which 20 dollars a day or 135 dollars season pass. I am ready to lend mine.
Have a great trip.
Thanks

आदिश्री, पार्कच्या आतमधे आहेत का हॉटेल्स? नेटवर नीट दिसत नाहिये. छान माहिती. प्राजक्ता, तुम्ही गेलात तिथे गेलात तर नक्की लिही.

आदिश्री मस्त माहिती, सुनीधी गेलो तर नक्की, कॅनडा ट्रिपच नकटिच्या लग्नाला... टाइप झालय सध्या. काहि बाही निघतच राह्तय.

Banff and Jasper national park is connected to each other. Consider it as a really long forest. Hotel are inside and outside but jasper town and banff town are really small so more like a village but Banff town is very charming. And since it is a national park gas stations and rest areas are really not frequent so better to take some snack. And full tank. Banff town has some museums , bow river and elbow falls. Museum is a native indian heritage. But we avoid all indoor attractions since it is a paradise in summer.
Thanks

सॉरी, उत्तर द्यायला थोडा उशीर झाला आणि मग धागा शोधायल वेळ लागला. Happy
मीपुढीएल प्रमाणे प्रोग्राम केला होता.

बॅम्फ-जॅस्पर:
Take non-stop flight to Calgary.
Rent a car and proceed to Banff.
Stay at Douglas Fir hotel @Banff for 1 night.त्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूलमध्ये वॉटर स्लाइड आहे, म्हणून तिथे राहिलो होतो.)
Then proceed to Jasper using Route 1A. (1A हा आतला रस्ता आहे आणि 1 ला पॅरलल आहे, पण तिथे जास्त वाईल्ड लाइफ दिसते).
On the way, visit Lake Louise, Maligne Lake, Johnson Canyon Reserve, Athabasca Waterfall. Stayed 2 nights at Patricia Lakes Bungalow. Try cable car, Tram (gondola) at Jasper. Pyramid and Patricia Lakes @Jasper
On the way from Jasper to Banff, visit Columbia Ice field.
Then came to Banff and stayed 2 nights.
Fly back home from Calgary.

===================================================

Ottawa
------
1. Royal Canadian Mint
2. National Gallery of Canada
3. Notre Dame Cathedral Basilica, National War Memorial (Part of walking tour)
4. Peacekeeping Monument & Peace Tower.
5. Rideau Canal: Ottawa Locks
6. Parliament Hill and Buildings, Famous Five Monument
7. Confederation Square near Parliament Hill
8. ByTown Museum - small museum near Parliament Hill

Quebec City
-----------
1. Old Quebec City - Free (2-3 hours)
2. Montmorency Falls Park - Free (2-3 hours)
3. Basilique Cathedrale - Notre-Dame-de-Quebec - Free
4. Plains of Abraham near Downtown - Free (More than 3 hours), Joan of Arc statue
5. Musee de la Civilisation - Free (2-3 hours)

===================================================
Day 1
Reach in Seattle at 8:45pm.
Take taxi from airport to hotel

Day 2
Sightseeing in Seattle, No car
Fireworks at night @Gas Works Park
Seattle Space Needle - $11, Package price with Glass garden $21
Chihuly Garden and Glass - Adult(13-64) $19, Child $12
Lunch at Pike Place Market, Pike Place Starbucks
Seattle Waterfront - Free
Olympic Sculpture Park
Waterfront Park
Washington State Ferries Terminal
Take bus #99 to Chinatown

Day 3
Sightseeing in Seattle, No car
Walking trip in Pioneer Square
Seattle Aquarium or Ferry trip to Island

Day 4
Early Morning cascade Amtrak train Seattle King Street Stn to Vancouver
Train #510 7:40 AM - 11:40 AM
Pick up rental car
Afternoon Seawall, Stanley Park (Free) 2-3 hours, Totem Pole & Klahowya village in Stanley Park

Day 5
Drive 5.5-6 hours to Ucluelet
From Horseshoe Bay, just north of Vancouver, BC Ferries takes you to Departure Bay in Nanaimo.

Day 6
Day spent at Tofino & Ucluelet
Pacific Rim national park (Rainforest Trail A and B)
Hiking in Wild Pacific Trail, Ucluelet Aquarium, Tofino Botanical Gardens, Eagle Aerie Gallery
Stay at Ucluelet or Tofino

Day 7
Drive 4 hours to Victoria
Royal BC museum (Open 10am – 5pm Daily, $70 for family)
Inner harbor, Miniature World (if time permits)
Stay in Victoria.

Day 8
Sightseeing in Victoria.
Butchart garden in the morning. entire day.
Stay in Victoria.

Day 9
Visit North Vancouver. Trekking/Hiking. Lynn Canyon Park, Hike to Grouse Mountain

Day 10
Return flight leaves at 6 am.

अनेक वर्षानी पुन्हा एकदा Banff, Lake Louise, Columbia Icefield, Jasper इत्यादी ठिकाणी जाऊन आलो. अत्यंत सुMदर. गर्दी मात्र खूप वाढल्याचे जाणवले. नशिबाने आम्हाला सगळीकदे वेदर चाMगले मिळाले नाहीतर यावर्षी खूप पाऊस पडतोय. प्राणीदर्शन (Mountain goats, bears, raindeer, elks) झाले. अनेक ट्रेल्सवर चाललो.

़Jasper मध्ये रहायला जागा नसल्यास Hintonहा पर्याय आहेच पण अजुन एक पर्याय म्हणजे Valemount (British Columbia)मध्ये राहू शकता. छोटेसेच गाव आहे अगदी. तिथून जवळच Mount Robson (highest peak in Canadian Rockies) आहे