आयफोन ५ एस - वापरकर्त्यांचे अनुभव

Submitted by जाग्याव पलटी on 20 March, 2016 - 08:23

नमस्कार,

आयफोन ५ एस घ्यायचा विचार मनात पक्का करत आहे पण त्या आधी मायबोलीवर असलेल्या सभासदांपैकी अनेक लोक हा फोन वापरत असतील त्यांच्याकडून ह्या फोनच्या परफॉर्मन्स बद्दल ऐकायला खूप आवडेल आणि त्यायोगे खरेदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करता येईल.

मला खालील बाबींवर विशेष माहिती मिळाल्यास मदत होईल,

१. युजर फ्रेंडलीनेस
२. प्रोसेसर स्पीड
३. फोटो क्वालिटी - सेल्फीसह Happy
४. बॅटरी बॅक अप

आणि

सर्वात महत्वाचे,

भारतातील खरी किंमत - अनेक दुकानात्/नेटवर सांगितलेल्या किंमतींमधे खूपच तफावत आहे असे दिसते.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आयफोन ५s वर सफारी ब्राउजर मध्ये मायबोली मध्ये लॉगिन करता येत नाहीये...
क्रोम मध्ये हा प्रॉब्लेम येत नाहीये...
आणखी कुणाला हा प्रॉब्लेम आला आहे का ??

मी पण लॉग इन करु शकतो.
आयफोनवर मराठी किबोर्ड सिलेक्ट असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो लॉग-इन ला, पण तो फक्त सफारी नव्हे तर क्रोमला पण यायला हवा.

मागच्या आठवड्यात iPhone 6 s Plus 64 GB घेतला..>>>> सेम पिंच
आता नवर्‍याने डोके उठव्लेय केवढा मोठाय हा फोन हातात पण मावत नाही. कारच्या कोणत्या कप मधे फीट होत नाही. Proud

मी सफारीमधे व्यवस्थित मायबोली सर्फ करू शकत आहे. कुठलाही की बोर्ड सिलेक्ट असला तरी काहीही प्रॉब्लेम आला नाही एकदाही.

मला अजूनही हा प्रॉब्लेम येत आहे...
"मिसळ-पाव" ह्या संकेतस्थळावर सुद्धा तसाच प्रॉब्लेम येतोय....

पण क्रोम वर मात्र लॉग-इन होतेय...
मी स्विफ्टकी / ios कीबोर्ड वापरतो... त्यावर प्रॉब्लेम येतोय...
युजर-नेम टाईप करू शकत नाहीये... आणि एखाद्यावेळी टाईप करू शकलो तर काहीच मेसेज येत नाही पण लॉग-इन सुद्धा होत नाही.

मी सफारीमधे व्यवस्थित मायबोली सर्फ करू शकत आहे. कुठलाही की बोर्ड सिलेक्ट असला तरी काहीही प्रॉब्लेम आला नाही एकदाही.>>>>>>>>> मी सुद्धा सर्फिंग करू शकतोय ...पण सभासद म्हणून नाही...

ज्यांना हे इश्यूज आहेत त्यांच्याकरता - क्रोम अ‍ॅप डिलीट करून पाहा आणि एक्स्लूजिवली सफारीवर ट्राय मारा.
मला मागे असा अनुभव होता की आयओएस वर क्रोम असेल तर सफारीचा रिस्पॉन्स स्लो असायचा.

[तुमचा क्रोम चा डेटा (बुकमार्कस वगैरे) सिंक केलेला असेल तर अ‍ॅप रि-इन्स्टाल केल्यावर रिस्टोर होतो.]

सफारी मध्ये प्रॉब्लेम येत होता म्हणून मी क्रोम इन्स्टॉल केलय...
सफारी वर रिडींग मोडची खूप सवय झालीये...
त्यामुळे क्रोम वरून लिंक कॉपिय करून सफारी मध्ये उघडून पाहावी लागते....

माझे प्र्शन खुपच बाळबोध आहे कदाचित
माज्या आय फोन वर व्हॉट्स अप वर आलेली गाणी मी स्व्तःलाच ईमेल करुन मग डाऊनलोड करुन घेते.ह्या द्राविडी प्राणायमला काही पर्याय आहे का ????

माज्या आय फोन वर व्हॉट्स अप वर आलेली गाणी मी स्व्तःलाच ईमेल करुन मग डाऊनलोड करुन घेते.ह्या द्राविडी प्राणायमला काही पर्याय आहे का ? >> नाही. हा सोपा पर्याय आहे.

आय ओ एस १० मध्ये आतापर्यंत मला आलेल्या अडचणी -

१. आयमॅप्/पॉप अकाउंटवरून मेल सेण्ड होत नाही, सर्वच अ‍ॅड्रेस रीजेक्टेड बाय सर्वर असा मेसेज येत आहे. जीमेल साठी हा इश्यू नाही.
२. मॅपमध्ये "डायरेक्शन्स" बघण्याची सोय नाही - हा इश्यू मी अ‍ॅपल सपोर्टला रीपोर्ट केला आहे.

अजून कुणाला काही दिसलेय का?

जर थर्ड पार्टीे मेल सर्व्हर्स असतील आणि SSL वापरत असेल तर SMTP
पोर्ट 465 हे मॅन्युअली परत सेट करा. iOS 10 अपडेट केलेयावर ते डिफॉल्ट 25 ला रिसेट झालेले मला आढळले.

जाप, मला कुठलाही इश्यू नाहीये आयओएस १० ला अपग्रेड झाल्यानंतर.
मी कुठलीही मेजर अपडेट आल्यावर फोन अपग्रेड करतो आणि मग संपूर्ण फॉरमॅट करून नवीन आयफोन म्हणून सेटअप करतो. शक्यतो काहीही निगल्स येत नाहीत.

राहाता राहिला डेटा, कॉन्टॅक्ट्स चा प्रश्न, तर ते आधी आयक्लाऊड ला सिंक केलेले असतातच.

मल्टिपल मेल अकाऊंट्स सेट करतांना फक्त मेल सिंक करायच्या आणि बाकी सगळे पर्याय (कॅलेंडर, नोट्स, कॉन्टॅक्ट्स इ.) बंद करायच्या.

या सगळ्या गोष्टी मी आयक्लाऊड अकाउंट वरून केलेल्या आहेत.

"iPhone 5s should support VoLTE because the chip set used by the company is developed for LTE. Apple uses Qualcomm MDM9615M LTE Modem. Apple has not enabled the same. I assume they want to sell the latest iPhone and cash in on the JIO demand."

नेट वर वरिल माहिती मिळते आहे. आयफोन 5S, VoLTE support करत असूनही अ‍ॅपल enable करणार नाही किंवा Jio4GVoice App, 5s साठी देणार नाही.

कुणाला याबद्दल अधिक / वेगळी माहिती आहे का?

माझा आय फोन का गंडलाय ???? Sad
मला व्हॉटस अप वर आलेली गाणी डाऊन्लोड च होत नाही.
आयओएस अपडेट करायला वाय फाय च लागेन का ????

फक्त गाणीच लिहिलंय म्हणुनः ऑडिओ फाइल्स का? ऐकताच येत नाही की सेव्ह करता येत नाही?
ऑडिओ फाईल्स आयफोनवर सरळ सेव्ह करता येत नाही. त्या आपल्यालाच इमेलने फॉर्वर्ड करुन, इमेल अटॅचमेंट सेव्ह करता येते.पण त्यात डाटा वापरल्या जातो. त्या ऐवजी File Manager हे App डाउनलोड केले तर फॉर्वर्ड करताना, जसा इमेल ऑप्शन येतो, तसा Save to File Manager ऑप्शन येतो, त्यातून लगेच सेव्ह करता येते.

आयओएस अपडेट करायला वायफाय पाहिजे. किंवा कॉम्प्युटर वर iTunes मधून करता येईल. आयफोनच्याच personal hotspot ने कॉम्प्युटरला नेट कनेक्शन देता येईल. पण डाटा खूप जातो, जर मी चुकत नसेन तर iOS 10 अपडेट 1.8 जीबीच्या आसपास होते. तेव्हा, फोनचाच डाटा वापरुन डाउनलोड करण्यापूर्वी विचार करा.

ऑडिओ फाइल्स का? ऐकताच येत नाही की सेव्ह करता येत नाही?>>>>>> मुळात व्हॉटस अप वर आलेल्या डाऊन लोड च होत नाही.आतापर्यंत एकच झाली जी एकता येते.पण मी स्वतः ला ईमेल केली,जी होत नाहीये. बाकीच्या ऑडीयो फाईल्स ही डाऊनलोड होत नाही.फोटो आनि व्हिडीओज होतात लगेच.

त्या आपल्यालाच इमेलने फॉर्वर्ड करुन, इमेल अटॅचमेंट सेव्ह करता येते.>>>हे प्रकरन झेपल मला.फाईल मॅनेजर पन पाहते आता.

फोनचाच डाटा वापरुन डाउनलोड करण्यापूर्वी विचार करा.>>> खाली वाक्य स्पष्ट लिहले आहे की वाय फाय च लागेन.असो.पाहते.

मला उगीच अस वाटतय की मला खराब पीस लागलाय Sad :जाम वैताग:

परत एक समस्या..
मी स्वतःला व्ह्योट्सअप वर आलेली गाणी फॉरवर्ड अ‍ॅज अ इमेल करते तेव्हा तो ईमेल सेंड च होत नाहीये.नॉर्मल टेक्स्ट सेंड होते.गाण्याची अ‍ॅटॅचमेंट जात नाही.बराच वेळ प्रयत्न करुन झाला Sad कनेक्शन टु ऑऊट्गोईंग सर्व्हर फेल असा एरर मेसेज येतोय.आनि ईमेल.कॉन्टअ‍ॅक्ट्,आनि कॅलेंडर मधे सेंटीग्ज करा ,अ‍ॅडीशन सर्व्हर अ‍ॅड करा असा मेसेज.
क्या चुक रहा है ????

लाभ घेण्याचे करावे>> लाभ घेतला Wink
गुगल करुन अपडेटस मुळे काय काय वेगळं होणार आहे, ते आधीच पाहून घेतलं होतं. त्याप्रमाणे कॉल लॉग, की पॅड, समस, इमेल, फोटो वगैरे गोष्टी वेगळ्या दिसतायत.
काल संध्याकाळी अपडेट केल्याने... टू इर्ली टू कमेंट, पण माझ्या करता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अपडेट करण्यापूर्वी फोन मधे फ्री स्पेस ६ जीबी होती, ती अपडेट नंतर १० जीबी झाली. म्हणजे तब्बल ४ जीबी मेमरी फ्री झाली !! याचं प्रमुख कारण कदाचित बेटर फोटो अल्बम मॅनेजमेंट असावं..
नवीन लूक आवडतोय. प्रत्येक आयओएस अपडेटचं मला आवडणारं वैशिष्ठ्य म्हणजे, अपडेट नंतर आपला तोच जुना फोन नवीन झाल्यासारखा वाटू लागतो Happy

दिवसभर आयओएस ११ वापरल्यानंतर आढळलेले दोन प्रॉब्लेम्स :-
१. कंट्रोल सेंटर मधे आता अँन्ड्रॉईड प्रमाणेच डेटा आणि वाय फाय सुरु-बंद करण्याचा पर्याय आहे. इकडून वाय-फाय बंद केले, तरी ते बंदच होत नाही! परत सेटिंग मधे जाऊन ते बंद करावे लागते. थोडक्यात ह्या शॉर्टकटचा पर्याय वाय फाय ऑन-ऑफ करता तरी नीट चालला नाही.
२. नोट्स मधे जाऊन pdf file (camscanner app प्रमाणेच) तयार करायचा पर्याय आहे. नोट्स मधे जाऊन + चिन्हावर क्लिक केल्यास कॅमेरा उघडतो आणि पेपर स्कॅन करता येतो असं गुगलल्यावर समजलं. हे + चिन्हंच दिसत नाहीये ५एस वर. कदाचित हे फक्त ६ आणि पुढच्या मॉडेल्स साठीच आहे का !! कॅम स्कॅनर अ‍ॅप डिलीट करुन अजून थोडी मेमेरी मोकळी करायचा विचार त्यामुळे सध्या बारगळलाय.

मित, फोन हार्ड रिसेट करून पाहा. पॉवर + होम प्रेसहोल्ड करा अ‍ॅपल लोगो दिसेपर्यंत. यामुळे सॉल्व व्हायला हवं.
support.apple.com वर नोट्स चं फिचर चेक करा आयफोन ५एस ला अव्हेलेबल आहे का तर.

हार्ड रिसेट करुन पाहिला , काही फरक पडला नाही. हरकत नाही ...थोडे दिवस , वेट ॲन्ड वाॅच मोड.
इकडे तक्रार म्हणून नाही तर फक्त एक स्वानुभव म्हणून नोंद करुन ठेवली Happy

२. नोट्स मधे जाऊन pdf file (camscanner app प्रमाणेच) तयार करायचा पर्याय आहे. नोट्स मधे जाऊन + चिन्हावर क्लिक केल्यास कॅमेरा उघडतो आणि पेपर स्कॅन करता येतो असं गुगलल्यावर समजलं. हे + चिन्हंच दिसत नाहीये ५एस वर. >>>>

माझा पण 5S आहे. मला + चिन्ह दिसतेय आणि डॉकुमेन्ट स्कॅन पण करता येत आहेत.

मानव Sad
माझ्या फोन मधे असं दिसतंय
F3EB7482-1C9D-4F30-BDDA-3CBD04B7DE1C.png

मित म्हणताहेत तो इश्यू ब्लू टूथ साठी आहे. ब्लू टूथ ऑनच राहते, जर सेटींग मधून बंद नाही केले तर.

नोट्स मधे स्कॅन ५ एस मधे यशस्वीरीत्या केले आहे काल, त्यामूळे दुसरा काही इश्यू असेल.

एवरनोट स्कॅनर आणि क्यु आर कोड स्कॅनर ही अ‍ॅप त्वरीत डीलीट करून जागा वाचविण्यात आली Lol

काल ११.०.१ चा अपडेट दिसला, बग फिक्सिंग हा उद्देश दिसल्याने लगेच फोन अपडेट केला. पण तरीही माझे वरचे दोन्ही प्रॉब्लेम्स तसेच Sad
कंट्रोल सेंटर चा वाय फाय / ब्लू टूथ चा इश्यू बर्‍याच ठिकाणी लोकांनी रिपोर्ट केलेला दिसला (इथे वर पण काही जणांनी लिहिलंय). नोट मधला स्कॅनरचा इश्यू मात्र कुठेच दिसला नाही. कदाचित मी अपडेट घेताना एक दोन वेळा कनेक्टिव्हीटी गेली होती वायफाय ची.. तसेच अर्ध्यातच चार्जिंग बंद करुन काही कामानिमित्त बाहेर जाऊन यावं लागलं आणि आल्यावर परत चार्जिंग आणि अपडेट सुरु केले. या सगळ्या वेळात काहीतरी गडबड झाली असेल की काय अशी शंका येत आहे ! तसं झालं असलं तरी ११.०.१ घेतल्यावर तरी बरोबर होईल असं वाटलं होतं.. आता परत थोडे दिवस धीर धरी !

कंट्रोल सेंटर चा वाय फाय / ब्लू टूथ चा इश्यू बर्‍याच ठिकाणी लोकांनी रिपोर्ट केलेला दिसला >>> इथे कदाचित दोन मुद्दे आहेत असे दिसते.

१. कंट्रोल सेंटर मधून वाय फाय डिसेबल केले की तुम्ही असलेल्या वाय फाय कनेक्शनवरून डिसकनेक्ट होता.
२. त्या व्यतिरीक्त सिस्टम नेटवर्क्स शोधत राहते, पण वाय फाय नेटवर्क शोधायचेच नसतील तर सेटींगमधून ऑफ सेलेक्ट करावे लागते.

ब्लू टूथ चेही असेच असावे.

मी मागेही एकदा लिहिलं होतं. कुठलीही मेजर अपडेट झाली करून की फोन पूर्ण फॉरमॅट करून 'सेट अ‍ॅज न्यू आयफोन' म्हणून सेटअप करायचा. काहीही निगल्स नाही येत.
राहाता राहिला कॉन्टॅक्ट्स आणि बाकी डेटा चा प्रश्न - हे सगळं क्लाऊड ला बॅक्ट अप असतंच. सगळे पासवर्ड्स फक्त लक्षात हवेत.

>>फोन पूर्ण फॉरमॅट करून 'सेट अ‍ॅज न्यू आयफोन' म्हणून सेटअप करायचा. काहीही निगल्स नाही येत.<<

आय्फोनचा वापर फक्त फोनसाठीच करणार्‍यांसाठी हा अ‍ॅप्रोच एकवेळ ठिक आहे पण आय्फोनची बहुतांश फिचर्स वापरणार्‍यांसाठी नाहि. कारण फोन फॉर्मॅट करुन नविन सेटप करणे म्हणजे सगळी अ‍ॅप्स डाउन्लोड करणे (त्यांचा इंडिविज्युअल डेटा लॉस हि गोष्ट वेगळी), म्युझिक, फोटो, सिक्युरिटी प्रेफरंस, युसेज प्रेफरंस, हेल्थ डेटा इ. अगणित बाबी आहेत ज्या आय्क्लाउड मध्ये मावणार नाहित म्हणुन एकामागुन एक मॅन्युअली सेटप/बिल्डप कराव्या लागतील, विच इज पेन इन अ बट...

एक प्रिकॉशन म्हणुन मेजर अप्ग्रेडच्या आधी फोनचा फुल बॅकप घेउन ठेवावा (बॅकप एन्क्रिप्ट केलात तर वाय-फाय पासवर्डस, हेल्थ्/पर्सनल डेटा हि बॅक्डप होतो); जस्ट इन केस रोल्बॅक करावं लागलं तर; बाकि काहि करायची गरज नाहि. गेल्या १० वर्षांत माझ्याबाबतीत तरी ती परिस्थिती उद्भवलेली नाहि... Happy

Pages