आयफोन ५ एस - वापरकर्त्यांचे अनुभव

Submitted by जाग्याव पलटी on 20 March, 2016 - 08:23

नमस्कार,

आयफोन ५ एस घ्यायचा विचार मनात पक्का करत आहे पण त्या आधी मायबोलीवर असलेल्या सभासदांपैकी अनेक लोक हा फोन वापरत असतील त्यांच्याकडून ह्या फोनच्या परफॉर्मन्स बद्दल ऐकायला खूप आवडेल आणि त्यायोगे खरेदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करता येईल.

मला खालील बाबींवर विशेष माहिती मिळाल्यास मदत होईल,

१. युजर फ्रेंडलीनेस
२. प्रोसेसर स्पीड
३. फोटो क्वालिटी - सेल्फीसह Happy
४. बॅटरी बॅक अप

आणि

सर्वात महत्वाचे,

भारतातील खरी किंमत - अनेक दुकानात्/नेटवर सांगितलेल्या किंमतींमधे खूपच तफावत आहे असे दिसते.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी गेली दोन वर्षे वापरतो आहे.
पहिल्या तीन मुद्द्यांवर मी पूर्ण संतुष्ट आहे.
कधी हँग होत नाही.
बॅटरी बॅकअप मिडियम आहे असे मी म्हणेन.

माझ्या कडे iphone5 आहे
युझर फ्रेंडली आहे पण आता अन्द्रोइद मध्ये पण युझर फ्रेंडली मोबाईल आले आहेत
मी स्वतः mi चा fan आहे तो घ्या असा suggest करीन
Battery backup १ दिवस पुरतो
Processor बद्धल म्हणाल तर इतर अन्द्रोइद फोन्स पेक्षा कमी शक्तिशाली processor आहे पण स्मूथ operate होतो मधेच कधीतरी अडकतो
Facebook google + instagram आणि इतर social app वापरात असाल तर इंटर्नल मेमोरी लवकर भरते आणि मेमोरी clean करायची असल्यास app delet करावे लागते
गाणी आणि सिनेमा टाकायचे असल्यास itunes वापरावे लागते सिनेमाचे सगळे format support करत नाही
इतर desktop softwares वापरून iphone compatible format मध्ये बदलून sync करावे लागते
Camera quality अन्द्रोइद फोन्स मधेही चांगली झाली आहे
एवढा जुना फोने घेण्य पेक्षा आता नवीन आलेले अन्द्रोइद फोन घ्या

सर्वांचे आभार!

swapk007 - माझ्याकडे ऑलरेडी एक अँड्रॉईड फोन सध्या आहे(सोनी एक्स्पेरीया सी), ज्यात फोटो, सेल्फी ह्या बाबींकरीता मी समाधानी नाही.

शिवाय आयफोनच्या डिझाईनबद्दल मनात एक आकर्षणही आहे असे म्हणू शकता. किंमतीचा विचार करता ६ किंवा ६ एस प्लस घ्यायचे मनात नाही. ५ एस हा जवळजवळ त्याच फिचर करीता स्वस्त पर्याय उपलब्ध आहे असे ऐकले आहे. मोठा स्क्रीन ही हौस नाही.

सोशल मिडीया(व्हाट्सॅप वगळता), विडिओज, गेमिंग, सिनेमे ह्या गोष्टी सहसा वापरत नाही.

अ‍ॅपल उद्या ( युएस टाइम ) त्याचे ५ एस आणि सि चे सुधारित आव्रुत्ति आणतोय , ति बहुधा मिडरेन्ज असतिल.... वेट फॉर इट

नोव्हेंबर १५ पासून 5S (३२ जीबी) वापरतोय. त्याआधी अँड्रॉइड (LG-L90-D410-dual sim) वापरत होतो.
माझा वैयक्तिक अनुभवः-
१. अँड्रॉइड वि. आयओएस : कदाचित जास्त काळ वापरल्यामुळे असेल, पण अँड्रॉइड (किटकॅट) जास्त आवडले. जास्त युसर फ्रेंडली वाटले.
२. मेमरी: LG-L90 जवळ्पास २ वर्ष वापरला. त्यात इंटरनल मेमरी ८ जीबी होती, आणि १६ जीबी चं कार्ड वापरत होतो, त्यामुळे मेमरी भरुन जाण्याचा प्रॉब्लेम आला नाही. इनबिल्ट अ‍ॅप्स बरोबर दोन्ही फोन मधे व्हॉट्स अप, फेसबुक, यूट्यूब, फेसबुक मेसेंजर, हँग आउट, कॅमस्कॅनर, xe.com एवढीच ज्यादाची अ‍ॅप्स वापरतो. (मेमरी युसेज समजण्यासाठी मुद्दाम अ‍ॅप्सची नावं लिहिली आहेत). गेम्स शून्य, फोनमधे गाणी/व्हिडिओ पण जे व्हॉट्स अप मधून येतात तेवढेच. ते ही अधून मधून क्लिअर करत राहतो.
३. कॉल क्लॅरिटी: 5S ची कॉल क्वालिटी अत्युच्च आहे. एकदम सुस्पष्ट आवाज येतो.
४. कॅमेरा: दोन्ही फोन्सचा मुख्य कॅमेरा ८ एमपी असला, तरी 5S चा कॅमेरा जास्त चांगला वाटला. मस्त फोटो येतात. इनडोअर, आउटडोअर, कमी / अधिक प्रकाश काहीही असलं तरी फोटो सहीच येतात. घरात मुलं असतील तर किंवा एरवीही स्लो मो मधे व्हिडिओ शूट करुन पहायला मजा येते. 5S चा फ्रंट कॅम पण चांगला आहे.
५. बॅटरी: मला दोन्ही फोन ४८ तास एका चार्ज मधे चालवता आले (अजिबात अतिशयोक्ती नाही). LG-L90 ची बॅटरी 2540 mAh होती, 5S ची कमी असली तरी लो पावर मोड मधे अजून तरी साधारण ४८ तास चालते. अर्थात जास्त वापर झाला तर २४ तासातही संपते, जे जस्टीफाइड पण आहे.
६. लूक्सः स्लीम, ट्रीम 5S नक्कीच LG-L90 पेक्षा देखणा आहे. ४" असला तरी खूप छोटा वाटत नाही. LG-L90 ४.७" होता, त्यामुळे सुरुवातीला 5S एकदम छोटा वाटला. पण ४" ही फोनची एकदम आयडियल साईज वाटायला लागली आहे. 5S मधे फिंगर स्कॅन असल्याने चटकन फोन अनलॉक करुन वापरता येतो, तेच LG-L90 मधे double tap to unlock feature होतं. त्यामुळे तोही अनलॉक करायला वेळ लागायचा नाही.

मी LG-L90 या स्पेसिफिक मॉडेल सोबत तुलना केली असली तरी, आजकालचे सगळेच अँड्रॉइड फोन्स या सगळ्या फिचर्स सकट किंवा त्याहून जास्त फिचर्स बरोबर येतात. किंमती आयफोनच्या तुलनेत खूपच कमी. तरीही 5S च घ्यायचा असेल ( आकर्षंण म्हणुन) तर अजून थोडे दिवस थांबा, 5SE launch होतोय या महिन्यात. त्या नंतर 5S च्या किमती ५०% ने कमी होतील असं सगळीकडे वाचायला मिळतंय.

५ एस ई बद्द्ल माहित नव्हते, सर्वांचे त्याबद्दल खूप आभार!

मे पर्यंत थांबायला काहीच हरकत नाही जर किंमत तीच किंवा थोडीफार(दीड दोन हजार) जास्त असेल तर!

swapk007 - धन्यवाद, आपला कॉस्ट इफेक्टीव्हनेसचा मुद्दा तंतोतंत बरोबर आहे तरी, "प्राईड ऑफ ओनरशिप ऑफ अ ब्रँड" असाही एक अँगल आहे अ‍ॅपल घेण्यामधे! आधी म्हटल्याप्रमाणे एक अँड्रॉईड फोन सध्या आहे तोही बाळगावा लागणार आहेच! (दोन नंबर असल्याकारणाने)

मी आत्ताच नवा आय फोन फाईव्ह एस घेतला. असं वाटतं की थोडं थांबायला हवं होतं. ५ एस ई घेतला असता. ह्या फोनचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे छोटी साईझ.

एस ई ची भारतातील किंमत ३९०००/-($586) असेल अशी बातमी असल्यामुळे ५ एस खरेदी केला आहे.

वापरत आहे, हळू हळू युज टू होत आहे. फोटो आणि सेल्फीची प्रात्यक्षिके घेतली, समाधानी आहे. बाकीच्या गोष्टी आजमावत आहे.

सर्व मार्गदर्शकांचे आभार.

ios 9.3 आलंय. अपडेट केला फोन. ह्यात display मधे night shift नावाचा पर्याय नवीन आलाय. आपण ठरवू त्या वेळेत फोनला कावीळ होते. म्हणजे स्क्रीन यल्लोइश होते. कमी प्रकाशात / रात्रीच्या वेळी डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून हे फीचर या अपडेट मधे अ‍ॅड केलंय. मस्त आहे हे फीचर.

नाह, कनेक्ट आयफोन टू आयट्यून्स. तिथे आयफोनच्या होमपेजवर चेक फॉर अपडेट्स असं बटण आहे. तिथून चेक करा...

मला Settings>>General>>Software Update मधे मिळालं. 5S वरच मिळालं, वायफाय वरुन केलं अपडेट. २२९ एमबी आहे साधारण.

फोनवर नाहीच मिळालं तर आयट्यूनस मधून करा. फोनवर अपडेट २२०-२५० एमबीची आहे. पण व्हाया आयट्यून्स ७००-८०० एमबी असेल.

भारतातून ios 9.3 अपडेट केलंय का कोणी.
बर्‍याच वेळा रिजन वाईज अपडेट्स लॉन्च करतात, कुठे लौकर कुठे नंतर.

हो, मी भारतातूनच केलंय. ज्या दिवशी यूएसमध्ये लॉन्च झालं त्याच दिवशी इथे (रात्री/पहाटे ०१०० भारतीय वेळेला) अपडेट मिळाली होती.

हम, मला पण फोन वरुन आणि आयट्युन्स दोन्ही वरुन ९.२.१ इज अपटुडेट. असा मेसेज येतोय.
नंतर बघावे लागेल.

मानव पृथ्वीकर, सेम पिंच हिअर.

फोन २५ मार्च लाच घेतला आहे हे काही कारण नसावे अशी अपेक्षा.

आताच अ‍ॅपल सपोर्ट्शी बोललो.

काही बग्ज असल्यामुळे ५ एस आणि आधीच्या मॉडेल्ससाठीचे अपडेट तात्पुरते पुल बॅक करण्यात आलेले असून साधारण आठवड्याभरात बग्ज फिक्स करून पुनःश्च iOS 9.3 रीलीज करणार आहेत अशी महत्वाची माहिती मिळाली.

मी भारताबाहेर हा अपडेट घेतला. पण शक्य असल्यास हा अपडेट घेण्यात घाई केली नाही तर बरंच आहे असं दिसतंय खालच्या लिंकनुसारः-

http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/This-iOS-9-3-bug-can-c...

iOS 9.3 re- release झालेली दिसत आहे आज, अपडेट करून घ्या.

मी iphone-५s ९ मार्च ला घेतला flipkart वरून … (१८७५०/-)
हा माझा पहिला iphone आहे. ह्याआधी मी android फोन वापरात होतो. ios अतिशय सॉलिड os वाटतेय.
बेस्ट बिल्ड क्वालिटी . batary performance उत्तम. camera सर्वोत्तम. Music quality उत्तम …
मी २२ मार्च लाच iOS 9.3 अपडेट केलि. अतिशय छान चाललाय फ़ोन …

मला आज पुन्हा तीच अपडेट मिळाली. आयओएस ९.३. मे बी रीडालो झालीय. पण साईज खूप आहे आयफोनवर १.४जिबी आणि आयपॅड्वर १.६जिबी.

योकु, मला तर २९२ एम बी ची मिळालीय,नवीन फिचर्स आहेत. अर्ध्या तासात झाली अपडेट!

आपण म्हणता ते कुठले व्हर्जन आहे?

जाप, मला सगळ्यात आधी जी मिळाली ती २९२ एम्बी ची होती. परवा ला जी री-पुश झाली ती मात्र १.४ जिबीची होती

माझा सध्या आयफोन ६प्लस आहे. त्याआधी ५एस होता. त्याआधी ४. टीमोबाईलच्या जम्प प्लॅनमुळे वेगळे डिव्हाईसेस वापरता येतात.
एनीवे, सगळे मनापासून आवडले! Happy कोणतेही अ‍ॅपल डिव्हाईस वापरायच्या आधी अँड्रॉईड एचटीसी, सॅमसंग गॅलेक्सी वगैरे फोन होते. पण मी आयओएसच्या प्रेमात आहे. आता फोन बदलायला कारण ठेवले नाहीये. ६प्लस घेताना बर्‍याचश्या गरजा पूर्ण केल्या, मोठी स्क्रीन, ६४जीबी जागा. त्यामुळे आता बदलणार नाहीये फोन.
फक्त आयफोन ६ प्लसला ओआयएसचा प्रॉब्लेम आहे. कॅमेरा खराब होतो. फोकस अजिबात होत नाही. अ‍ॅपलने ठराविक डेटमध्ये घेतलेल्या फोन्सना हा प्रॉब्लेम आहे हे कबूल केले आहे.

योकु,

आपण म्हणता ती iOS 9.3.1 असावी.

आजच मी फोन वरून अपडेट केली. आयट्युन्सवर तिची साईज १.८५ जीबी दिसत आहे. सफारी मधल्या लिंक्सवर क्लीक केल्यानंतर अ‍ॅप्स मिसबिहेव करायचे त्यावरचे फिक्सेस आहेत असे वर्णन लिहिलेले आहे.

अबोल,

जेन्युईन पार्ट्स साठीच प्रयत्न करावात असे सुचवतो. वॉरंटीत नसेल तरीही ऑथोराईज्ड सर्विस सेंटरकडूनच बदलून घ्या.

अबोल, माझ्या आयफोनचा स्क्रिन दोन वर्षापूर्वी तुटला फोन साईटवर वरुन पडल्याने. सर्व्हिससेंटरने सांगितले स्क्रिन बदलून मिळणार नाही, फोन एक्स्चेन्ज करुन मिळेल १८ हजार रुपयात. मग मी एका नावाजलेल्या मोबाईल रिपेअरवाल्या कडे गेलो. त्याने साडेपाच हजारात बदलून दिला. अजून व्यवस्थित चालतोय.

तुम्ही नावाजलेल्या मोबाईल रिपेअरवाल्या कडे जाऊन चौकशी करा. तो कमी किमतीत बदलून देत असल्यास माहिती विचारा, कुठली बॅटरी तो वापरणार, त्याचे रेटींग काय, किती दिवस चालेल वगैरे, ती बॅटरी दाखवायला सांगा आणि तो काय सांगतो या वरुन निर्णय घ्या.

iOS 9.3.3 आलेली आहे, अपडेट करून घ्या.

बग फिक्सेस आणि सिक्योरीटी इम्प्रुवमेन्ट्स आहेत असे दिसतेय.

मला त्यातील 4K Video Recording च ऑपशन खुपच आवडल..
कसली मस्त Video क्वालीटी आहे त्याची....

Pages