स्नाईपर रिलोडेड २

Submitted by Abhishek Sawant on 21 July, 2016 - 23:03

स्नाईपर रिलोडेड – २

या सगळ्या अग्निपरीक्षा पास झाल्यानंतर चालू होते ती स्नाईपरची ट्रेनिंग......

स्नाईपर ट्रेनिंगच्या सुरूवातीला तुम्हाला फक्त एक वॉलंटीअर म्हणून स्नाईपर ट्रेनिंग स्कूल मध्ये काम करावे लागते. तुम्ही कितीही रॅंकने किंवा कितीही मार्क्सने स्नाईपरच्या सगळ्या पात्रता परीक्षांमध्ये ऊत्तीर्ण झाला असला तरीही तुमच्या एका चूकीसाठी तुम्हाला स्नाईपर ट्रेनिंग स्कूल मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. सर्वीलंस कॅमेरा तुमच्या प्रत्येक हालचाली वर अगदी बेडरूममध्ये सुद्धा पाळत ठेऊन असतो. तुमची कोणतीही गोष्ट तुम्हाला स्नाईपर रेजीमेंट साठी अपात्र ठरवू शकते. त्यानंतर बटालीयन कमांडर हे निश्चीत करतो की तुम्ही स्नाईपर स्कूलसाठी पात्र आहात की नाही. इथे तुमची क्षमता, परिश्रम, आणि काम करण्याची सातत्यता यांचेच रिझरवेशन चालते. या पोस्ट्साठी जातीवरून कोणतीही सुट दिली जात नाही. या कारणामूळेच ही रेजीमेंट सैन्यात सर्वात यशस्वी असावी.

वॉलंटीअर म्हणून काम केल्यानंतर, सगळ्या बेसीक क्वालीफीकेशन्स मध्ये फिट असाल तर तुम्हाला आर्मी स्नाईपर म्हणून नियुक्त केले जाते. त्यानंतर चालू होते सात आठवड्यांची स्नाईपर ट्रेनिंग. या ७ आठवड्यांमध्ये मार्कसमॅनशीप- नेमबाजी, रेंज एस्टीमेशन, टारगेट डीटेक्शन, स्टाल्क, आणि लिखित स्वरूपातील आदेश. याबद्दल माहीती दिली जाते. रेडीओ कम्युनिकेशन, सिग्नलींग याबद्दल आधीच माहिती असणे गरजेचे आहे कारण तो महत्वाचा घटक आहे.

हे सात आठवडे एकमेकांशी सलग्न असतात, याच्यात तुम्ही क्लासरूम आणि बॅटलफील्ड ट्रेनिंग चा सुद्धा समावेश असतो.

पहिला आठवडा.. या आठवड्यात stalks म्हणजेच युद्धात होणार्‍या सोप्या टास्क असतात, रेंज एस्टीमेशन- अंतर मोजण्याची किंवा अंतराचा अंदाज कसा लावायचा याबद्दल ट्रेनिंग दिली जाते. आणि टारगेट डीटेक्शन- टारगेट किती अंतरावर आहे, त्याची पोझीशन काय आहे, त्यामध्ये असणारे अडथळे यांचे प्रशिक्षण दिले जाते. कारण मॉडर्न स्नाईपर गनची फायरींग रेंज ही काही मीटर्स पासून एक ते दोन किलोमीटर्सपर्यंत
दुसरा आठवडा - दुसर्‍या आठवड्यात हातात असते ती M110 सेमी-ऑटोमॅटीक स्नाईपर सिस्टीम राईफल. ही राईफल दुसर्‍या ट्रॅडीशनल स्नाईपर राईफलपेक्षा हलकी असली तरीही हिची प्रीसीझन म्हणजे लक्ष्य भेदण्याची क्षमता कमालीची आहे, जवळपास ८०० मीटर्स अंतरावरील टारगेटही या राईफलच्या मदतीने अचूकपणे टिपता येते.

आठवडा तिसरा- स्नाईपींग च्या संदर्भात काही युद्धनिती आणि डाटा गॅदरींग, डाटा प्रोसेसींग याबद्दल महिती आणि ट्रेनिंग दिली जाते.

चौथा आठवडा- या आठवड्यात रात्रीच्या मीट्ठ काळोखातील नेमबाजी शिकवली जाते आणि M2010 ही गन चालवण्यास दिली जाते. नाईट विजन हाताळणे आणि त्यात प्रावीण्य मिळवणे हे कोणत्याही स्नाईपरसाठी अत्यावशक असते.

पाचवा आठवडा- moving targets, आणि अज्ञात अंतरावरील टारगेट टिपणे तसच M9 गन चालवने शिकवले जाते.

सहावा आणि सातवा आठवडा- या आठवड्यात फायरींग करताना आपली पोझीशन निवडणे जिथून शत्रुला आपण दिसणार नाही, फायरींग चालू असताना पोझीशन बदलने. आणि m107 रायफलचा वापर शिकवला जातो. सातव्या आणि शेवटच्या आठवड्यात FTX फील्ड ट्रेनिंग एक्जरसाईज घेण्यात येते ज्याच्यामुळे स्नाईपर स्कील्स डेवलोप होण्यास मदत होते.

सात आठवडे आणि परफेक्ट ट्रेनिंग झाल्यानंतर तयार होतो तो स्नाईपर. जो सज्ज्य असतो आपल्या शत्रुला टिपण्यासाठी. मी पण या सगळ्या प्रोसेस मधून जात असताना चांगला स्नाईपर झालो. आता वेळ होती ती खर्‍या खुर्‍या युद्धाची. भारताच्या सीमेवरच्या आतंकवाद्यांसाठी आमची स्नाईपर रेजीमेंट कर्दनकाळ ठरनार होती. आता पुढचा मुक्काम होता नारायणपूर बॉर्डर आऊटपोस्ट, सांबा डीस्ट्रीक्ट.

टास्क चालू होण्याआधी आद्ल्या दिवशी संध्याकाळी कोअर मीटिंग झाली, माझ्यासोबत सहा जणांची टीम तयार करण्यात आली. त्यात चार इंफॅट्री ऑफिसर आणि दोन स्नाईपर होते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सहा ते सात जणांचा एक आतंकवादी ग्रुप नारयणपूर बॉर्डर पासून BSF ची नजर चुकवून रात्रीच्या अंधारचा फायदा घेत सांबा डिस्ट्रीक्ट मध्ये १ ते ३ किमी पर्यंत घुसले होते आणि तेथे असणार्‍या स्थानिक लोकांना ओलीस ठेवले होते. साधारण पने ५-६ लोक त्यांच्या कस्टडीमध्ये असल्याची महिती होती. अत्तापर्यंतच्या चकमकीवरून असे लक्षात आले होते की त्यांच्याकडे Ares १६ ऑटोमॅटीक रायफल, LMG लाइट मशीन गन, M4 कार्बाईन, CGM4 रॉकेट लॉंचर, gradAR सारख्या लेटेस्ट वेपन आणि लॉन्ग डिस्टंस फायरिंग रेंज चे वेपन्स होते.

आम्ही नारायणपूर एरीया ची भौगोलिक रचना आणि स्नाईपींग स्पॉट याची चर्चा केली. हे एक अत्यंत सोपे C ग्रेडचे रेस्क्यू मिशन होते. संध्याकाळी मिटिंग आटोपून ७ वाजताच आम्ही बाहेर पडलो. साम्बा चेकपोस्टला आम्हाला सकाळी रिपोर्ट करायचे होते. इंडीयन आर्मीच्या वॅन मधून आम्ही सहाजण आमच्या पहिल्या वहिल्या मिशनसाठी जात होतो. कोणाच्याही मनात कसलीही शंका नव्हती. एकच धेय होतं आतंकवाद्यांना संपवणे. आणि मी मात्र माझ्या Bareett XM109 OSW 23 mm स्नाईपर गनच्या प्रतीक्षेत होतो.

क्रमशः...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा उत्तम जमते आहे, फक्त पुलावात खडे लागावेत तसे शुद्धलेखन वाचण्यात रसभंग करत आहे, कृपया तिकडे लक्ष देणे, ही कळकळीची विंनती आहे माझी _/\_

त्याशिवाय ,

स्नायपर्स बद्दल लिहिताना फक्त स्नायपर्स बद्दल लिहा ही विनंती. त्यामध्ये आपले वैयक्तिक विचार अन आकस घालण्याचे प्रयोजन समजत नाही, उदाहरणार्थ, तुमची खालील वाक्यं

इथे तुमची क्षमता, परिश्रम, आणि काम करण्याची सातत्यता यांचेच रिझरवेशन चालते. या पोस्ट्साठी जातीवरून कोणतीही सुट दिली जात नाही. या कारणामूळेच ही रेजीमेंट सैन्यात सर्वात यशस्वी असावी.

ह्यातून काय अर्थ निघतोय ह्याची तुम्हाला कल्पना आहे का? आर्मीच्या इतर रेजिमेंट्समध्ये जातीनिहाय आरक्षण असते हे एक निरीक्षण ह्यातून निघते, दुसरे म्हणजे तुमचा आरक्षणप्राप्त जातींविषयी आकस अन रोषसुद्धा दिसून येतो, तो तुमचा वैयक्तिक आयुष्यात असू देत पण स्नायपर्सच्या गाथेत मधेच ते यायचा संबंध कळत नाही अजिबात, मी पॅरा मिलिटरी मध्ये अधिकारी आहे, आमच्याकडे सुद्धा अतिशय निष्णात स्नायपर्स असतात अन प्रॉपर जाती आधारित आरक्षण घेऊन आलेले असतात, माझा एकही जवान फक्त आरक्षण घेऊन आलाय म्हणून टाकाऊ नसतो साहेब, तेव्हा आर्मीच्या पदराआडून तीर मारू नका ही अजून एक विनंती करतो तुम्हाला

_____/\______

सोन्याबापू>>> सर पहिल्यांदा तुम्हाला salute ...तुम्ही आम्हा सगळ्यांचे रक्षण करता. माझी ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे..याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही..आणि कथेमध्ये लेखकाची विचारसरणी झळकत असते. माझा रिझरवेशन बद्दलचा रोष मी इथे दाखवला त्यामुळे भारतीय सैन्याच्या प्रतीमाला धक्का पोहोचत असेल तर मी मनापासून माफी मागतो.
धन्यवाद सर

सोन्याबापू +१

स्नायपर्स यांच्यात अचूक निशाणा ही एकच क्वालिटी बघितली जाते. एक गोळी एक टारगेट कारण दुसरा शॉट मारण्यची संधी क्वचीतच मिळते. मग तो कुठल्याही धर्माचा जातीचा असो श्रीमंत असो या गरीब घराचा असो. एक शॉटच मिळतो.

स्नायपर्स यांच्यात अचूक निशाणा ही एकच क्वालिटी बघितली जाते. एक गोळी एक टारगेट कारण दुसरा शॉट मारण्यची संधी क्वचीतच मिळते. मग तो कुठल्याही धर्माचा जातीचा असो श्रीमंत असो या गरीब घराचा असो. एक शॉटच मिळतो.>>>+१

@अभिषेक जी,

प्रथमतः मला सॅल्यूट वगैरे करू नका, मी कोणी महान माणूस नाही, मी फक्त एक नोकरी करतोय अन त्यातून माफक देशसेवा होते आहे असे म्हणता येईल, दुसरे म्हणजे कथेत लेखकाची मते येण्याबद्दल, तर कथा जर वैयक्तिक अनुभव, ललित अश्या सदरात मोडणारी असल्यास त्यात वैयक्तिक अनुभव आल्यास गैर नसते किंबहुना तेच त्या कथेचे बलस्थान नसते, त्यात ते विषयानुरूप असते, तुमच्या कथेचे मूळ किंवा बेस हा आर्मी सारख्या एका सर्वोत्तम इंस्टिट्यूशनचा आहे, हा बेस घेऊन लिहिताना वैयक्तिक अनुभव त्यात अध्याहृत करणे विचित्र वाटते, उद्या समजा मी आर्मीवर कथा लिहिली अन त्यात "मला श्रीखंड आवडते" घातले तर जो रसभंग होईल तो ह्या आरक्षणविषयक कॉमेंट ने झाला, म्हणून मी आपणांस टोकले, नथिंग पर्सनल

माफी वगैरे माझी मागायचे कारण नाही, मी एक वाचक म्हणून आपले मत नोंदवले आहे इतके सुचवतो Happy