डोंबिवली ते डोंबिवली (व्हाया लेह लडाख)

Submitted by Amey Gadgil on 19 July, 2016 - 12:41

http://www.maayboli.com/node/59410 भाग १

दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा तीच बाराखडी गिरवयाची होती. पुन्हा एकदा बाइक वर सामान बांधायचं होत.प्रवासातला सगळ्यात नावडता प्रकार पटकन उरकून आम्ही पुढचा दिशेने निघालो,लवकरच गुजराथ बॉर्डर ओलांडली आणि वाळवंटाच्या देशात प्रवेश केला.राजस्थान च्या वेशीवरच त्यांच्या संस्कृतीचा वारसा जपणारे खास राजस्थानी धाटणीचे प्रवेशद्वार आहे.राजस्थान म्हणताच आपल्या डोळ्यासमोर वाळवंटी प्रदेश येतो मात्र आम्ही ज्या प्रदेशातून आगेकूच करत होतो तो बऱ्यापैकी हिरवळीचा होता.गुजराथप्रमाणे राजस्थान मधील रस्ते देखील प्रशस्त मोकळे आणि निर्मनुष्य होते.

DSC00446_0.JPG

राजस्थान मधून प्रवास करताना दोन्ही बाजूनी संगमरवरी दगडांचे डोंगर लागत होते,रस्ते चांगले असल्याने प्रवासाचा वेग चांगला होता.मजल दरमजल करीत आम्ही उदयपूर गाठले.साधारणपणे दुपारच्या जेवायची वेळ झाली होती.आणि उन्हं पण तापली होती जरा थकवा पण जाणवायला लागला होता.त्यामुळे लगेचच एक ढाबा लागला तिथेच जेवायला थांबलो.माझ्या मते आपली मुंबई सोडली तर संपूर्ण भारतात लोक निवांत असतात.या धाब्यावर देखील कालच्या सारखीच परिस्थिती होती "लिखा तो सब है लेकिन इसम से सब नाही मिलेगा "त्यामुळे आमच्या बल्लवाने जे पक्वान्न तयार केलं ते गपगुमान गिळून पुढचा प्रवासाला लागलो दुपारची वेळ असल्याने उकाडा चांगलाच जाणवत होता राजस्थान मधला तो उकाडा खरोखरीच परीक्षा घेणारा होता सतत पाणी प्यावंसं वाटत होत.रस्ते चांगले असल्याने प्रवासाचा वेग चांगलाच नियमित ठेवता आलं. कोटा,अजमेर गाव मागे टाकत आम्ही किसनगढ या गावी पोहोचलो.जयपूर पासून साधारण 90 किमी अंतरावर हे गाव आहे. आजचा मुक्काम येथेच करायचा ठरवले. तिसऱ्या दिवशी देखील साधारण 450 किमी टप्पा गाठला.गुजराथ ते राजस्थान चा प्रवासात उन्हाचा तडाखा सोडला तर बाकी प्रवास एकदम उत्तम झाला.

DSC_6056.JPG

(किसनगढ च्या हॉटेल मधून दिसणारे दृश्य)

तिसऱ्या दिवशी पुन्हा एकाद्या नावडत्या कामाने सुरवात झाली

DSC00438_0.JPG

(सामानाची बांधा बांध करताना )

सामान बांधून झाल्यावर जयपूर च्या दिशेने निघालो थोड्याच अंतरावर एक हॉटेल दिसले तेथे न्याहारी करायचे ठरविले.आम्ही थांबलेलो हॉटेल हे तेथील भागात परोठ्यांसाठी खूप प्रसिद्ध होते ,आम्ही आत जाऊन बसलो नेहमीप्रमाणे मजा मस्करी सुरू होती तेवढ्यात एक वेटर आला आणि विचारल काय खाणार पाहुण्यांनो (मराठी मध्ये )
आम्ही चोघेही ताडकन उडालो....
मराठी वेटर इकडे काय करतोय???
आमच्या उत्सुक,प्रश्नार्थक नजरा त्याने ओळखल्या आणि म्हणाला काय करणार मित्रानो मुंबई मध्ये खूप comepetition आहे,त्याच्या या उत्तरावर आम्ही सर्वच निरुत्तर झालो कारण कमी अधिक फरकाने आम्ही त्याच जीवघेण्या स्पर्धेचा भाग आहोत.
आम्ही त्याला विचारलं तू कुठला आहेस,
त्यावर त्याने सांगितलं , अहमदनगर
तो पुढे म्हणाला मी इथे आनंदी आयुष्य जगत आहे रोज कोण त्या मुंबई च्या गर्दीत मारणार जीवन जगणार.(आमच्या चपराक बसली)
आम्ही न्याहारी आटोपली आणि पुढच्या प्रवासाला निघालो.

DSC00445_0.JPG

(किसनगढ येथील हॉटेल -याच हॉटेल मध्ये मराठी वेटर भेटला होता )

आदल्या दिवशी उन्हाने चांगलाच भाजून काढलेलं त्यामुळे आज आमची प्रवासाच्या सुरवातीलाच मानसिक तयारी झालेली होती,पुन्हा एकदा प्रशस्त आणि मोकळे रस्ते आमच्या गाडयांना वेग वाढवण्यासाठी खुणावत होते.

DSC00453.JPG
(प्रशस्थ आणि मोकळे रस्ते )

आमच्या गाड्यानी चांगला वेग आणि लय पकडली होती. थोड्याच वेळात जयपूर गाठले.जयपूर शहराच्या सुरुवातीलाच मुख्य शहरांमधील अंतर दर्शवणारे फलक लावले आहेत त्या पैकी एक फलकावर नई दिल्ली 200 किमी असे लिहिले होते.खरं सांगायचं तर ही पाटी वाचल्यावर प्रवासाचा थ्रिल आजून जाणवायला लागला.आणि "दिल्ली अब दूर नही" हे जाणवू लागलं आणि आम्ही त्या दिशेने कूच केली.पुढचा सगळं प्रवास हा अतिशय रखरखीत आणि निर्मनुष्य भागातून जात होता.कालच्यापेक्षा आज उन्हाचा त्रास आज जास्त जाणवत होता.त्यामुळे वारंवार पाणीपिण्यासाठी थांबावे लागत होते. आम्ही राजस्थान ची सीमा पार केली आणि हरियाणा मध्ये शिरलो.हरियाणा मध्ये प्रवेश केल्यावर आम्ही रेवरी चा दिशेने मार्गक्रमण केले.गेले 3 दिवस अतिशय प्रशस्त आणि सुंदर सस्त्यावरन चालणारी बाइक अचानक खडबडीत रस्त्यावर आली.
रेवरी झज्जर सोनिपत अशी गावे मागे टाकत परत एकदा राष्ट्रीय महामार्ग 1 किंवा सुवर्ण चतुष्कोन रस्ता जो माननीय अटलजी बाजपेयी यांच्या काळात बांधला गेलेला त्या रस्त्याला लागलो.आणि पानिपत च्या दिशेने मार्गस्थ झालो.अल्पावधीतच आम्ही पानिपत गाठलं.दरम्यान NH 1 ला लागल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजुनाई धाब्याची रंगाचं रांग आहे.त्यामध्ये टिपिकल ट्रक वाल्यांच्या ढाब्यापासून ते वैष्णव भोजनालय आणि 5 स्टार हॉटेल असे वैविध्य आहे. मुळात पंजाब ,हरियाणा दिल्ली ही राज्ये खाण्यासाठी आणि पाहुणचारासाठी प्रसिद्ध आहेतच.
मराठ्यांनी पानिपतावर स्वारी केल्यावर मुक्कामासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. लवकरच खिशाला परवडेल आणि असे हॉटेल निनाद आणि कुणाल ने शोधून काढले आणि इथेच टाका तंबू असा आदेश दिला.
पानिपत ला पोचल्या पोचल्या एक आनंदाची बातमी आम्हाला समजली ,ती म्हणजे आमचा मित्र नंदन नातू याचे लग्न ठरल्याची. मराठ्यांनी पानिपतावर केलेली स्वारी यावेळी आनंदवार्ता घेऊन आली होती.या बातमी ने आमचा प्रवासाचा थकवा थोडाफार कमी झाला. रात्री पराठे दही जीरा राइस आणि नंतर ice cream असा फक्कड बेत झाला.
आतापर्यंतच्या प्रवासात झोपेने कधीच डाग दिला नाही ती नेहमी शांत आणि वेळेवर यायची.नेहमीप्रमाणे झोपण्या आधी दुसऱ्या दिवशीचा आराखडा आखुन मगच झोपी गेलो.

क्रमशः भाग 3

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users