जादूची गोळी - भाग ३

Submitted by यतिन-जाधव on 2 July, 2016 - 00:32

सचिन : अरे बापरे जोशीवहिनी सुद्धा ! सचिन आता हातानी आपले डोळे बंद करून घेतो आणि परत थोड्या वेळाने आपली हाताची बोटं बाजुला करून पुन्हा धीटपणे पाहू लागतो, शीss विकास आणि राहुल तुम्ही दोघसुद्धा असेच जाणार ऑफिसला ! हाssयss क्या बात हें शांभवी ! अरे अरे सावंत आजी-आजोबासुद्धा आज वॉकला असेच गेले होते ? बापरे वरच्या निकिता, नताशा आज अशा अवस्थेत जाणार की काय कॉलेजला, काय होणार त्या कोलेजच ! शीss या पोरांना झालय काय अशीच जातायत शाळेत नागडी-उघडी ! कि सरकारनेच आज जागतीक नग्न दिवस पाळण्याची घोषणा केलीय काही काळात नाहीय बुवा ! इतक्यात मृणाल खोलीत येते..................क्रमश

.......................... पुढे चालू

मृणाल : ‘ जीजू’ … सचिन तिला मागे वळून पाहण्याआधीच मधुरा तिला पुन्हा पाठीमागे ओढते.
मधुरा : तुला सांगितलं ना एकदा, समोर जाऊ नकोस म्हणून !
सचिन : ‘मृणाल काय म्हणत होती गं ?’ मृणाल आता आतूनच मोठ्याने ओरडून सचिनला सांगते,
मृणाल : ‘जीजू, आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत कॉलेजचं प्रोजेक्ट कम्प्लीट करायला, तुम्ही आम्हाला मदत कराल ना ?’
सचिन : हो हो नक्की, अरे हे काय विचारणं झालं.
मधुरा : सचिन जास्त चावटपणा करू नकोस हं, तू आज या रूममधून बाहेर नाही पडायचं.
सचिन : अगं पण मी आत्ता मृणालला …
मधुरा : असुदे काही बिघडत नाही प्रोजेक्ट लेट झालं तर, आपण आधी डॉक्टरकडे जाऊन येऊया.
सचिन : डॉक्टरकडे ?...कशाला ? … नको मी ठीक आहे.
मधुरा : हो तुला ठीक असायला काय झालं रे, दिसतंय ना सगळं मनासारखं ! सचिन आता थोडा नाराज होतो,
सचिन : बरं ठीकय ! तू म्हणतेस तर चल तेवढाच विरंगुळा रस्त्याने.
मधुरा : काही नको, तुला तेच तर हवंय , नजारे बघायचेत ना रस्त्याने सगळे ? चावट कुठला !
सचिन : मग आता ?
मधुरा : आपण तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधून डॉक्टरकडे जाऊया.
सचिन : चल ! काहीतरीचं काय?
मधुरा : नको ! तू चलच आता.
सचिन : ए मधु, खरंच राहूदे ना, नको डॉक्टर वगैरे, आजचा दिवस गेला की उद्या सगळं ठीक होईल पूर्वीसारखं.
मधुरा : नको ! त्यापेक्षा आपण डॉक्टरलाच घरी बोलावलं तर ? सचिन थोडा उदास होतो आणी विचार करून सुचवतो,
सचिन : डॉ. वैशाली … नको, डॉ.निलिमा...नको, डॉ. सुप्रियाला बोलवायचं का ? ती स्पेशियालीस्ट आहे या अशा केसेसमध्ये, मागच्यावेळी सुद्धा तिने खुप छान ट्रीट केलं होतं.
मधुरा : ‘ नको … लेडी डॉक्टर नको, डॉ. पेंडसे … नको,’ थोडासा विचार करून, ‘हा डॉक्टर महेशला बोलवूया, तसाही तो तुझा मित्रच आहे’. सचिन थोडासा विचार करतो कि हे सगळं तर त्याच्याच मुळे झालंय आता दुसरा काही पर्याय आहे का ? आणि नाईलाजाने हो म्हणतो,
सचिन : ‘ठीक आहे … तू म्हणतेस तर बोलवूया.’ मधुरा डॉ. महेशला फोन करते, महेश घरी येतो सचिनला तपासतो इकडे-तिकडे पाहतो त्याची नजर काहीतरी शोधतेय, तो आता मधुराला बाजूला घेऊन सचिनच्या तब्येतीबाबत चर्चा करतो.
महेश : ‘हं अवस्था फारच गंभीर आहे पण घाबरायचं काही कारण नाही, हा असा आजार लाखातूनच काय करोडो माणसातून एखाद्यालाच होतो, मी याला नक्कीच बरा करेन फक्त त्यासाठी तुम्ही मला सहकार्य करायला हवं.’ महेश आता परत इकडे-तिकडे पाहत विचारतो ‘पण घरात दुसरं कोणी नाहीय ना ?’
मधुरा : नाही … पण आम्ही नेमकं करायचं काय ?
महेश : सांगतो, सचिनवर कामाचा फार ताण आलाय, त्याच्या जेवणा-खाण्याच्या वेळा नीट पाळल्या जात नाहीत, त्याला तुम्ही प्रेमाने खाऊ-पिऊ घाला, त्याच्या कलाने घ्या, त्याचे सगळे हट्ट पुरवा, परत इकडे-तिकडे पाहत विचारतो पण घरात दुसरं कोणी नाहीय ना ?
मधुरा : हो माझी लहान बहिण मृणाल आहे घरात, तिला शिक्षणासाठी इकडेच ठेऊन घेतलंय मी माझ्याकडेच.
महेश : हा,.. मग ठीक आहे.
मधुरा : आss ? काय म्हणालात ?
महेश : हा तरीचss, मी काय म्हणतो वहिनी, तुमचही अलीकडेच लग्न झालय ना, तुम्ही असं करा फिरून या दोघं थंड हवेच्या ठिकाणी, तब्येतीला चांगलं असतं.
मधुरा : काय ?
महेश : अहो वहिनी अशा आजारांवर हाच एक रामबाण उपाय असतो आणि आपलं वैद्यकशास्त्र देखील हेचं सांगत.
मधुरा : पण डॉक्टर, असं बहिणीला एकटीला सोडून आम्ही फिरायला जाण बरं नाही दिसत.
महेश : तुम्ही त्याची काळजीच करू नका वहिनी, आम्ही आहोत ना.
मधुरा : काय ?
महेश : ‘अहो आम्ही म्हणजे शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी, मी स्वतः आम्ही घेउ ना मृणालची काळजी अगदी उत्तमरीत्या.’
इतक्यात आतून मृणाल बाहेर येते आणि डॉ. महेशला पाहून गालातल्या गालात लाजते, महेशही आता मृणालला पाहून मधुराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि मृणालकडेच पाहत राहतो, मधुरालाही ते जाणवतं, ती त्या दोघांकडे पहातच राहते, आता महेश थोडासा स्वतःला सावरतो आणि उगाचच प्यायला पाणी मागतो, मृणाल धावतच आत जाऊन महेशसाठी पाणी घेऊन येते, महेशही आता थोडासा धीट होऊन मधुराकडून पाण्याचा ग्लास हातात घेताना मुद्दामच तिच्या हाताला स्पर्श करतो आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यातल्या प्रेमभऱ्या भावना ओळखतात, महेश आता मृणालला माधुरीच्या आणि स्वतःला अनिलकपुरच्या भूमिकेत पाहून ' धकs धकs करने लगाs' हे संपूर्ण गाण एन्जॉय करतो, गाण संपून जेव्हा वास्तवात येतो तेव्हा मृणाल आणि तो दोघेही एकमेकांच्या हातात हात घेतलेले एकमेकांच्या नजरेत नजर मिळालेल्या अवस्थेत मधुराला दिसतात आणि ती काय ते ओळखते.
मधुरा : मृणाल, डॉ. महेश हा अस्सा प्लान होता तर तुमचा आणि यात सचिन तर सामील असणारच… सचिनss !
सचिन : ‘काय ग मधुरा ? मृणाल आणि महेश तू सुद्धा !’ सचिन आता आत येतो आणि पटकन डोळ्यावर हात ठेऊन फिरून पाठी भिंतीकडे तोंड करून उभा रहतो.
मधुरा : सचिन बसं झालं नाटक, सगळ कळलंय मला, तुला ते तस्सं दिसतं ते सगळ खोट होत ना ?
महेश : नाही वाहिनी ते सगळं खरं आहे, त्याला अजूनही तसंच दिसतंय आणि यावर एकच उपाय फक्त हवापालटं !
मधुरा : ‘ म्हणजे ?’ मधुरा आता पुन्हा लाजून अब्रू झाकते आणि हाताने मृणालला ओढत आत न्यायचा प्रयत्न करते पण मृणाल तिचा हात झटकते, इकडे सचिन, डॉ. महेश आणि मृणाल एकमेकांना टाळी देतात, महेश प्यायला पाणी आणण्याच्या निमित्ताने मृणालला आत पाठवतो आणि आणि सचिनला विचारतो,
महेश : साल्या काय नाटक करतोयस ?
सचिन : नाटक कसलं, तू दिलेल्या गोळ्यांचा परिणाम !.
महेश : शक्यच नाही, तुला दिलेल्या गोळ्या मी सांगितल्याप्रमाणे घेतल्यास ना ? मग !
सचिन : सॉरी यार जेवल्यानंतर मी दोन्ही गोळ्या एकदमच घेतल्या आणि झोपलो.
महेश : अरे दोन्ही गोळ्या एकदम कशाला घेतल्यास ? चल ठीकय, पण मला आता पावर वाढवून त्याचा होणारा नवीन परिणाम तर कळला आणि मी आता तुला आणखी एक वेगळी गोळी देतो ती घे.
सचिन : नको, आता परत गोळी नको.
महेश : का परिणाम एन्जॉय करतोयस ?
सचिन : नाही रे पण मधुरावर सॉलिड इफेक्ट झालाय, आता ती बाहेर फिरायला जायच्या प्लानला नक्कीच तयार होईल, त्याबद्दल धन्यवाद !
महेश : छोड यार माझाही यात एक फायदाच झाला ना, मृणालने मला मगाशीच तिचा मोबाईल नंबर दिलाय आणि ठरवून बाहेर भेटण्याच प्रॉमिसही केलंय, तेव्हा आता तू बिनधास्त जा हनिमूनला, मी बघतो पुढच सगळं !........

तर मित्रानो गमती-गमतीत महेशला एक नवीन फॉमुला सापडला, सचिनवर प्रयोग केल्यावर सचिनला सगळंच नग्न दिसु लागलं, पण खरच हा एक प्रकारचा आजार आहे आणि हा आजार आपल्यालाही व्हावा असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना अगदी मनापासून वाटलं असणार, पण आपण निराश व्हायचं काहीएक कारण नाही, डॉ. महेशने यावर आणखी रिसर्च करून हिच गोळी बाजारात आणलीय जी घेतल्यानंतर आपणही सचिन सारखं फील करू शकाल, जनरली आजार बरा करण्यासाठी एखादा फॉर्मुला बनवला जातो, पण डॉ. महेश हा जगातला एकमेव डॉक्टर असा आहे की ज्याने हा आजार होण्यासाठी एक नवीन फॉर्मुला शोधून काढला व त्याची गिनीज बुकात नोंद करून रीतसर पेटंटही घेतलंय, म्हणून हि गोळी फक्त डॉ. महेश शिवाय जगात इतर कुठेही उपलब्ध होऊ शकणार नाही, तेव्हा न लाजता आपण या गोळीची ऑन लाइन ओर्डेर देऊ शकता, अधिक माहिती : डब्लूडब्लूडब्लू.जादूचीगोळी_महेश.कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तेव्हा त्वरा करा आणि या संधीचा लाभ घ्या, अशी संधी पुन्हा-पुन्हा येणार नाही……धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.