मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्यांना काय नाश्ता द्यायचा?

Submitted by झंपी on 30 June, 2016 - 17:57

इथे कोणाला मूत्रपिंड विकाराणे त्रस्त असलेल्या रोग्याची काळजी अथवा नाश्ता साठीच्या पाक कृती माहिती असतील तर कृपया सुचवा,

पोटॅशियम, फॉस्पारस आणि सोडियम कमी असलेला आहार सुचवा किंवा नक्की काय देता ते सुचवा...

भारतीय नाश्ता देणं खूप कठिण आहे.... किंवा पर्याय कमीच वाटताहेत एका नातेवाईकाची काळजी घेताना , तेव्हा मदत करा....

डॉक्तरांनी वर वरचा तक्ता (काय खावू नये )दिलाय पण असे काही सांगितले नाही की हे असे द्या... वगैरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूत्रपिंडाचे विकार हजारो असतात. नेमके डायग्नोसिस काय आहे?
क्रिअ‍ॅटिनीनची रेंज साधारण काय आहे?
सोबत रक्तदाब/मधुमेह असा काही आजार आहे का?
डायलिसीस चालू असल्यास त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे?

हे कळल्यास मी सल्ला देऊ शकेन.

साती,

साबु ह्यांना मधूमेह छळतोय गेली २७ एक वर्षे. ते खूपच थकलेले असतात. पुर्ण नियंत्रण करतात पण अलीकडे काहिच नंबर सुधारत नाहीयेत. बघून एकदम समजत नाहीये की नक्की काय नाश्ता, जेवण द्यायचे.
मला खूपच वाईट वाटतेय. काहीच देवू शकत नाही जे आम्ही खातो. अगदी दु:खी असतात.

मेधूमेहाच्या सुरुवातीला बरा मॅनेज केला पण वाढतं वय आणि चिंता करायचा स्वभाव. आणि मधूमेहाने हळूहळू दाखवलेले एकेका अवयावर प्रताप केलेत. डायलिसीस नाही आहे गरज सध्या तरी(इति डॉक).

-बेन मध्ये उजव्या बाजूला ब्लॉकेज आहे.
-रक्तदाबाचा त्रास आहेच.
-पायाला अधून मधून सूज,
-सतत चक्कर , अंधारी येतेय.
-सतत सोडीयम आणि पोटॅशियम पातळी वर खाली. ( दुसरा एक डॉक्टर म्हनाला, हाय ब्ल्ड प्रेशर च्या गोळ्या पाहिल्या पाहिजेत) त्याची अजून तारीख मिळाली नाही.

सध्याचा डॉक्टर (मधूमेह स्पेशालिस्ट आहे) तो म्हणतो, थांबा थोडा वेळ. तीन एक महिने लागतील.होइल सेटल. पण हे वरचे प्रकार चालूच आहेत दोन महिन्यांपासून. आम्हालाच भिती वाटतेय म्हणून दुसरा डॉक्टर बघायचा सल्ला दिलाय इतरांनी.

नंबर काही खास नाहिच आहेत.
हा रीपोर्ट,

क्रीयेटीनाईन सीरम - १.० ( एम्जी/डिल)

सीरम युरीक अ‍ॅसीड - ५.९ ( एम्जी/डिल)

सोडियम सीरम - १२४ (आता कमी झालेय, सतत वर खाली चालूय)

पोटॅशियम सीरम - ५.३

क्लोराईड सीरम - ९४.७

कोलेस्टेरॉल - ३१४

एल्डील - २३८( खूपच खतर्नाक)

सतत युरीन ईन्फेक्शन आहेच ऑन्/ऑफ.

तर हे असे आहे. मला काहीच कळत नाही की, काय खायला द्यायचे.

काहीही नॉन्वेज देवू नका सांगितलेय
पिवळ्या/ नारम्गी रंगाची फळं बंद.
पाणी प्रमाणात.
वरचे क्षार ( पोटॅशियम, फॉस्पारस वगैरे) कमी असलेल्या भाज्या द्या. ह्यामुळे काय खायला द्या हे समजत नाहीये.

झंपी, हा बघ एक डेटा मिळालाय.

http://nutritiondata.self.com/foods-011000000000121123122-1w.html?

तू लिहीलेले तीनही घटक कमी म्हणजे साधारण किती तो आकडा विचारुन घेतलास तर घटक पदार्थाची निवड करणे सोपे जाईल.

मिस्टरांना लवकर बरं वाटू दे ही शुभेच्छा.

बाकी सगळ्यांसाठी इन जनरल-

-किडनीचे आजार विविध प्रकारचे असतात, एका प्रकाराला चालणारा डाएट इतर प्रकाराला चालेलच असे नाही.
- किडनी डॅमेज करणार्‍या विविध मूळ आजारानुसार डाएट बदलतो.
- एंड स्टेज रिनल डिसीजच्या विविध स्टेजेसनुसार आहार बदलावा लागतो.
- डायलिसीस चालू असेल तर आहार बदलावा लागतो.
-वारंवार सोडियम्/पोटॅशियम्/कॅल्शियम्/प्रोटीन्स/ फॉस्फरस चेक करून त्यानुसार आहार बदलावा लागतो.

एकाला एका वेळी चालणारा आहार त्यालाही काही महिन्यानंतर चालणार नाही.
त्यामुळे 'किडनीच्या पेशंटचा आहार' असा काही प्रकार पब्लिक फोरमवर कुणी देऊ नये आणि दिला असेल तर विश्वास ठेवू नये.

कारण एंड स्टेज रिनल डिसीजच्या पेशंटसमध्ये सोडिअम पोटॅशियमच्या मात्रेत होणारा जरासा फरक हा जीवन मरणाचा फरक ठरू शकतो.

डॉ. साती... अत्यंत मोलाचा सल्ला! आवडले.
तुम्हाला व सर्व माबो डॉ. नां, डॉक्टर्स दिनाच्या हर्दिक शुभेच्छा!__/\__

डॉ. साती... अत्यंत मोलाचा सल्ला! आवडले.
तुम्हाला व सर्व माबो डॉ. नां, डॉक्टर्स दिनाच्या हर्दिक शुभेच्छा!__/\__

>>> +१११

झंपी यानी विकार व संदर्भीय सविस्तर माहितीसह केलेली चौकशी आणि त्यावरील डॉ. साती यांचे उत्तर (आणि इन जनरल सल्ला....) याबद्दल वाचून खूप समाधान झाले. उत्तर देणारी व्यक्ती अशा प्रश्नाबाबत जेव्हा अधिकारवाणीने समोर काही मांडते त्यावेळी अशा त्रासांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना फायदा निश्चितच होत असेल (साती यानी व्यक्तिगत संपर्कातूनही झंपी याना सल्ला देणार आहेत असे वाचले, तेही खूप आवडले).

"...एकाला एका वेळी चालणारा आहार त्यालाही काही महिन्यानंतर चालणार नाही...." ~ म्हणजे दर तिमाहीनंतर नव्याने सायकलींग करावे लागणार.

दोन्ही सदस्यांचे खूप आभार.

डॉ साती,

खूप धन्यवाद. मी वाट बघते.

------
शुगोल, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. माझे मिस्टर नाही आजारी, साबु आहेत.

तुम्ही दिलेला चार्ट पाहिला. चार्ट मध्ये ज्या भाज्या आहेत त्याच एन मीन दोन चारच भाज्या मी करते. पण साबु इतके वैतागतात. रडतात, खात नाहीत.

मुळात प्रश्ण हा आहे ना, की नाश्त्याला काय द्यायचे? दर दोनेक दिवसाने त्यात ते लेवेल( क्षारांची) चेक करा. मग तसा जेवणाचा मेनू ठरवा. माझे डोके पिकते रोज. नाश्त्याला ठेवायला काहीच नसते संध्याकाळी.

इतकं वर्षे त्यांचा मधूमेह सांभाळून, हे नक्की कळलय की, प्रत्येक माणूस वेगळा, त्याचे शरीर वेगळे, त्याचे पचनशक्ती वेगळी त्यामुळे एक ठराविकच जेवण किंवा नाश्ता चालत नाही. पण सर्व साधारण पणे कुठल्या रेसीपी (भारतीयच) असतील मी त्यातल्या त्यात काय द्यायचे ह्याच्या आयडीया मिळतील. आणि ते हि त्यांच्या लेवलस सांभाळून ठरवता येतील.
डाळी नको, कडधान्य नाहीत. फळं नाहीत. खूपच कठिण परीस्थिती आहे. त्यात त्यांना बाहेरच्या पद्धतीने चालत नाही. वयामुळे चिडचिडे सुद्धा झालेत. नाहितर खूपच हसत्मुख आणि छान व्यक्तीमत्व होतं आजारी होण्याच्या आधी.:(

शुगोल, लेवल हि बदलती आहे. त्यामुळे आहार बदलता ठेवावा लागतो.

त्यामुळे एकच प्रमाण असे नसते.

खूपच थकान येण्यासारखे आहे. असो.

डॉ. साती. उपयुक्त सल्ला.

झंपी, तुम्ही ह्यांना लिहिलंय त्यामुळे शुगोल चा जसा समज झाला तसा माझाही झाला होता.

डॉ. साती... अत्यंत मोलाचा सल्ला! आवडले.
तुम्हाला व सर्व माबो डॉ. नां, डॉक्टर्स दिनाच्या हर्दिक शुभेच्छा!__/\__

>>> +१११

आमच्या घरी एक पेशंट आहेत.
त्यांना डॉ नी पालेभाज्या शक्यतो बंद, डाळी/कडधान्ये कमी आणि फळे फक्त तीनच चालतील असे सुचवले आहे.
चालणारी: पपई, पेरु, सफरचंद.
जास्त करुन साळीच्या लाह्या, पोहे, फळभाज्या इ. खातात.तसे खाण्याचे इश्यू होतातच.जे आवडते ते बंद आणि नावडते ते सर्व चालते.

<<झंपी, तुम्ही ह्यांना लिहिलंय त्यामुळे शुगोल चा जसा समज झाला तसा माझाही झाला होता.>> माझा पण.
साती यांनी उपयुक्त सल्ला दिला आहे Happy

अत्यंत अवघड परिस्थिती. देव तुम्हा सर्वांना मानसिक शक्ती देवो.
2007 मध्ये माझ्या नणदेला हेच निदान होते. तिला साळीच्या लाह्या, साळीचे पोहे, फळभाज्यांमध्ये लाल भोपळा असे द्यायचो. ज्वारीची भाकरी द्यायचो. बरेच पदार्थ रिपिट करावे लागायचे त्यामुळे ती वैतागायचीच. पण इलाजच नव्हता. इतर काही देताच येत नव्हते. पण एक चार्ट मिळाला होता कुठल्या वेळेस काय द्यायचे याचा. तसा तुम्हाला मिळाला नसेल तर डॉक्टरकडे मागता येईल.

झंपी, डाएटिशियनना गाठा. ते सध्याच्या पेशंटच्या पथ्यानुसार व पेशंटच्या तब्येतीनुसार वेगवेगळी काँबिनेशन्स सुचवू शकतील. तब्येतीतील बदलांनुसार आहारातील बदल सुचवतील.

झंपी,

कृपया हे पाहा

http://www.freedomfromdiabetes.org/Program

डॉ. प्रमोद त्रिपाठी यांच्या या उपचार पद्धतीचा अनेकांनी लाभ घेतला आहे...
माझ्या परिचयातील एकांना २२ वर्षा पासुन मधुमेह होता....गोळ्या तर होत्याच शिवाय ३६ युनिट्स एन्शुलीन होतं...
सोबतच त्यांना बीपी, थायऱोईड, आणि असे बरेच त्रास होते.....
या उपचार पद्धतीने आज त्या डायबेटीस मुक्त आहेत...बाकीच्या सर्व गोळ्या पण बंद झाल्या...हे फक्त एक उदाहरण....
आजवर साधारण १००० लोकांना त्यांनी मधुमेहापासुन मुक्त केले आहे...
माझी अत्यंत जवळची मैत्रीण व तिचे २० वर्ष एन्शुलीन घेणारे वडील देखील या उपचार पद्धतीने आज अतिशय मस्त गोळ्या न घेता आनंदात आहेत....

( ही जाहीरात नाही....माझा यात वैयक्तीक काहीही हेतु नाही..केवळ एक माहिती म्हणुन येथे देत आहे....)

अरुधंती,

धन्यवाद.
डायटीशनने साम्गितलेले सुद्धा करतोच आहे. पण तिने एकदम काही विचित्र प्रकार सांगितलेत. म्हणजे कधीच (मी) न एकलेले.

खायचा डिंक पाण्यात भिजवून खायचा. ह्याचा नक्की काय फायदा नाही सांगितला. अच्छा है. ले लो रोज. बस इतकच.

मूग आणि मेथी दाणे भिजवून वाटून डोसे. रोज किती खाणार.

बरीच मोठी न खाण्याची लिस्ट.
दूधी, कयोट, फरसबी, पेपर्स वगैरे फक्त भाज्या.

मधूमेहाच्या स्पेशालिस्ट पण काय खाउ नका दिलेय. जवळपास तेच आहे. पण रोज नक्की काय शिजवायचे?

कुठल्या भाजीत किती पोटॅशियम, फॉस्परस वगैरे समजणे कठिण जातेय. व शरीर नक्की किती घेतेय, हे नाही सांगू शकत.

आता बघुया, नवीन डॉक काय म्हणतोय.

स्मिता_श्रीपाद,

इतकी क्रिटीकल परीस्थिती आटोक्यात येइल का? ( शंका नाही काढत आहे. पण बरेच इतर आजार आहेत मधूमेहामुळे ).

न्युरोपॅथी सुद्धा आहे.
डोळे वीक झालेत.

आणि वर सर्व लिहिलेले आहेच.
तरी बघते विचारून.

कारण एंड स्टेज रिनल डिसीजच्या पेशंटसमध्ये सोडिअम पोटॅशियमच्या मात्रेत होणारा जरासा फरक हा जीवन मरणाचा फरक ठरू शकतो.>> अगदी अगदी .. वडिलांच्या वेळचा अनुभव आहे.. Sad

झंपी, अगदी सेम परीस्थिती माझ्या दीराची आहे. मधुमेह त्यानंतर आता किडनी प्रॉब्लेम, एक दिवसाआड डायलेसिस सुरु आहे, डोळे वीक इइ बरंच काही.

आजकाल मधूमेह इतका कॉमन आहे आजूबाजूला.

बर्‍याच लोकांकडून हेच एकतेय. एका तरी घरात दोन नाहितर एक तरी सापडतोच. भितीदायक आहे. Sad

साबु तर नेहमी व्यायाम करणारे, पळणारे, पट्टीच पोहणारे होते. पण हा अनुवांशिक मुळे झाला काय माहिती नाही..
फक्त खायची आवड होती पण नीट व्यायाम करायचे. तसाही त्यांच्या ५० व्या वर्षी झाला.
अक्खं घर त्यांच्या सेवेत आहे पण उपचारच कमी पडताहेत. Sad

>>>कारण एंड स्टेज रिनल डिसीजच्या पेशंटसमध्ये सोडिअम पोटॅशियमच्या मात्रेत होणारा जरासा फरक हा जीवन मरणाचा फरक ठरू शकतो.<<

हे हि पाहिलय. काका(नवर्‍याचे) गेले ह्याचमुळे.

इतकी क्रिटीकल परीस्थिती आटोक्यात येइल का? ( शंका नाही काढत आहे. पण बरेच इतर आजार आहेत मधूमेहामुळे ).

>>

तुम्ही ईतके सगळे उपाय करताय ना..मग एकदा हा करुन बघु शकता....
मी वर उल्लेख केलेल्या बाईंना मधुमेह, थायरॉईड, हाय बी पी, सोबतच फेशिअय पॅरॅलीसीस, ई ई आणि अजुन बरेच कॉम्प्लीकेशन्स होते....आता मला नीट नावही नाही आठवत....आणि आज त्या एकही गोळी घेत नाहीयेत....आज वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचा उत्साह बघुन मला माझीच लाज वाटली...

त्यामुळे तुम्ही एकदा प्रयत्न करा नक्की.....

नमस्कार! माझ्या परिचयाचे एक गृहस्थ आहेत त्यांच्या बहिणीला मूत्रपिंडाचा विकार होता. आठवड्यातून दोन वेळा डायलिसीस करावे लागत होते. पुण्यातील एका वैद्यांकडून उपचार घेतले, आज दीडवर्षे विनाडायलिसीस जगते आहे.

मूत्रपिंडावर हमखास गुणकारी आयुर्वेदिक औषधे-
१) गोक्षुरादि गुग्गुळ ( गोळ्या ) हे औषध रक्तातले किरॅटिन कमी करते.किडनी काम करत नाही तेव्हा किरॅटिनचे प्रमाण वाढत असते.
२) पुनर्नवादि क्वाथ/काढा हे आणखी एक उत्तम गुणकारी औषध आहे.शरिराची सूज उतरवते.

Pages