जादूची गोळी - भाग २

Submitted by यतिन-जाधव on 29 June, 2016 - 22:48

जादूची गोळी - भाग २

सचिन : ठीक आहे तरी पण मला थोडीतरी कल्पना दे, या गोळीने मी काय पाहू शकतो, काय फील करू शकतो.

महेश : रात्री गोळी घेऊन झोपल्यावर तू जेव्हा सकाळी उठशील तेव्हा तुला सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतील, तुला फक्त इतकंच सांगतो कि अगदी भिंती पलीकडच्याही वस्तू, माणसं देखील तू पाहू शकशील.

पुढे सुरू . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . .. ... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

सचिन : ‘काय म्हणतोस काय ? दे दे मला आधी ती गोळी’ महेश आपल्या पाऊच मधून एक छोटीशी डबी काढ्तो व त्यातल्या दोन गोळ्या सचिनच्या हातावर ठेवतो आणि सांगतो,
महेश : रात्री जेवल्यावर एक गोळी घे व झोपताना दुसरी गोळी घे " इतक्यात मृणाल घरी येते आणि डायरेक्ट सचिनला विचारते,
मृणाल : जीजू ! कसल्या गोळ्या ? तुमची तब्येत ठीक नाहीय का ? काय होतंय तुम्हाला ?
सचिन : काही नाही ग मृणाल, हल्ली रात्री नीट झोप लागत नाही ना, त्यामुळे सकाळी उठल्यावर डोक दुखतं, त्याच्या गोळ्या आहेत या.
मृणाल : ‘अरे डॉक्टर महेश तुम्ही केव्हा आलात ?’ महेश तिच्याकडे पाहताच राहतो. ‘डॉक्टर काय झालं, कुठे हरवलात ?’
महेश : अ.. नाही, काही नाही ! आज तुम्ही लवकर घरी आलात ?
मृणाल : मी रोज याच वेळेला येते.
महेश : ‘मला माहितेय गं, म्हणून तर याच वेळेला आलो ना ?’ हे मात्र महेश मनातल्या मनात बोलतो. ‘चल मला आता निघायला हवं एका मिटींगला जायचंय.’
मृणाल : डॉक्टर दोन मिनिटं थांबा, आत्ता लगेच चहा करते.
महेश : ‘नको नको तुम्हीही आता दमून घरी आलात,चहा घ्यायला परत कधीतरी येईन ‘ सचिन आलटून पालटून दोघांचीही गम्मत पाहतो, दोघांनाही मनातून झालेला आनंद लपवता येत नाहीय, महेश उठून दरवाजाकडे जातो आणि मुद्दाम मोठ्यानेच म्हणतो, ‘ सचिन मी निघतो रे ’ आता आत दरवाजाच्या मागून पडद्यामागे उभी असलेली मृणाल पडदा थोडासा बाजूला करते आणि महेशकडे पाहते, महेशही तिची दखल घेतो, दोघे थोडेसे गालातल्या गालात हसतात, सचिन आता मुद्दाम मोठ्यानेच महेशला म्हणतो,
सचिन : हं निघा आता नाहीतर मिटींगला उशीर होईल.
महेश : पण तू गोळ्या मात्र आठवणीने घे.
सचिन : ‘हो हो नक्की’ त्या दिवशी रात्री सचिन मधुराकडे लवकर जेवायला वाढ असा हट्ट करतो, पण जेवण तयार नसतं, सचिन उद्या आपल्याला भिंती पलीकडच देखील दिसेल तेव्हा काय काय पाहता येईल याची स्वप्न रंगवू लागतो,
मधुरा : ‘चला जेवण तयार आहे’ मधुराच्या आवाजाने त्याची तंद्री भंगते आणि समोर आलेलं जेवण बकाबका जेऊन पटकन तो दोन्ही गोळ्या एकदमच घेऊन टाकतो आणि झोपुन जातो.
रात्रीच्या गाढ झोपेनंतर सचिन सकाळी जरा उशीराच उठतो, नेहमीप्रमाणे त्याला किचनमधला कपबश्यांचा आवाज येतो, तो त्या दिशेने पाहतो, पण त्याला काहीच दिसत नाही, तो दुर्लक्ष करतो आणि उठून वर्तमानपत्र घेऊन पुन्हा बेडमध्ये येउन झोपून वाचू लागतो, इतक्यात मधुरा आंघोळ करून डोक्याला टॉवेल गुंडाळून बाहेर येते, बेडरूममधील ड्रेसिंग टेबलासमोर येउन आरश्यात पाहत बसते आणि डोक्याचा टॉवेल सोडून केस पुसू लागते, तिला आरशातून समोरच अजूनही बेडवर लोळत पडलेला सचिन दिसतो, त्याला पाहुन ती आता चिडते.
मधुरा : ‘सचिन उठ आता, आधी ब्रश करून घे लवकर, चहा करते.’ सचिन तिच्याकडे जराही न पाहता तिच्या बोलण्याकडेही दुर्लक्ष करून पेपर वाचतच राहतो.
सचिन : थांब गं शांतपणे पेपर वाचू देशील कि नाही ?
मधुरा : ‘हं उठ आता, बस झाला पेपर वाचून, मला निघायचंय, उशीर होतोय ऑफिसला.’ सचिन आता वैतागून पेपर खाली ठेवतो आणि मधुराकडे पाहतो, जागच्याजागी ताडकन उडतो व जवळजवळ ओरडतोच.
सचिन : ए…ए..ए… ए… ए…मधु काय हे ? काय चालवलयस तू हे ? तुला काही लाज लज्जा ?
मधुरा : काय झालं ? कसली लाजलज्जा ?उठ तयार हो आधी.
सचिन : मधु अगं काय हे ? तू आज अशीच काय फिरतेयस ? आणि कपडे कुठे आहेत तुझे ?
मधुरा : काय ? तुझं काय डोक फिरलंय ? कि झोपेत आहेस अजून ?सचिन कावराबावरा होत इकडे तिकडे पाहतो, बाजूला खिडकीकडे पाहतो.
सचिन : त्या खिडक्या लाव आधी ! थांब नको मीच लावतो, तू आधी आत जा आणि कपडे घालून बाहेर ये.
मधुरा : काय रे बरायस ना ? कि मस्करी करतोयस मागच्यासारखी, मागच्या वेळी काय तर तुला समोरच्याच्या मनातल सगळं ऐकू येत होतं म्हणे !
सचिन : अगं खरंच माझ्यावर विश्वास ठेव, मागच्यावेळी मला खरंच समोरच्याच्या मनातल सगळं ऐकू येत होतं, तुझी शप्पथ !
मधुरा : ‘हो खरंच तू माझ्या मनातलं सगळं बरोबर ओळ्खल होतस.’ मधुरा आता थोडीशी घाबरते आणि लाजते, ‘म्हणजे तुला आता खरोखरंच मी तश्शी दिसतेय, बापरे !… ‘ मधुरा आता लाजून आपली अब्रू झाकण्याचा प्रयत्न करत राहते.
सचिन : अगं खरंच आज सकाळी उठल्यापासून मला हे असं होतंय आणि माझं डोकं ही दुखतंय.
मधुरा : चल तयारी कर, आपण लगेच डॉक्टरकडे जाऊया.
सचिन : ‘नको थांब आधी, मी आणखी जराशी खात्री करून घेतो,’ इकडे तिकडे पाहतो. ‘ए मृणाल उठली का गं ?’
मधुरा : नाही अजून ! मी तिला हाक मारलीय, उठेल पाच-दहा मिनटात.
सचिन : मी बघून येऊ का तिला ?
मधुरा : कशाला ?
सचिन : ‘म्हणजे माझी खात्री पटेल न कि मला खरच तसं दिसतंय म्हणून.’ सचिन उठून मृणालला पाहायला आतल्या खोलीत जायला निघतो, इतक्यात मधुरा त्याला अडवते.
मधुरा : ए… ए… ए… नको थांब तिथेच ! इतक्यात मृणालच उठून बाहेर खोलीत येते.
मृणाल : ‘गुड मॉर्निंग दीदी, गुड मॉर्निंग जीजू !’ मधुरा आता चपळाईने सचिनला ढकलून देते आणी मृणालला आपल्या पाठीमागे लपवते.
मधुरा : ‘मृणाल पाठी हो आणि आत जा, एकदम आत जा निघून.’ मृणाल आता मधुराच्या पाठीमागून पुढे येते आणि मधुरालाच विचारते,
मृणाल : ‘काय झालं दीदी ? तुझी तब्येत ठीक नाहीय का ? कि मागच्यासारखं ?’ इकडे सचिन मृणालला तसाच डोळे भरून पाहत उभा राहतो.
सचिन : ‘मधुरा खरंच गं, खात्री पटतेय हं.’ आता मधुरा पुढे येउन जबरदस्तीने मृणालला मागे खेचते आणि परत आपल्या पाठीमागे लपवते.
मधुरा : ‘मृणाल तू आत जा आधी ! मी तुला सगळं सांगते नंतर’ मधुरा मृणालला आता मागच्या मागे ढकलतच खोलीबाहेर घालवते.
मधुरा : ‘सचिन तू आधी त्या खुर्चीमध्ये बस बघु, अगदी भिंतीकडे तोंड करून.’ सचिन आता अगदी लहान आज्ञाधारक मुलासारखा निमुटपणे खुर्चीकडे जायला निघतो व चार पावलं चालल्यानंतर हळूच परत मागे वळून मधुरा गेली का याचा अंदाज घेउन मागे पाहतो, मधुरा आता सचिन म्हणून मोठ्याने ओरडते आणि आपली अब्रू झाकते, नाईलाजाने सचिन निमूट भितीकडे तोंड करून खुर्चीत जाऊन बसतो, मधुरा आता आत निघून जाते, सचिन अंदाज घेऊन मान फिवून मागे पाहतो आणि रुममध्ये कोणीच नाही असं पाहून रील्याक्स होतो व खुर्चीतुन उठून उभा राहतो, थोडे आळोखे-पिळोखे देतो आणि चला बाहेर जाऊन रस्त्यावरची गम्मत बघून येऊ असा विचार करून दरवाजाकडे जातो व पायात स्लीपर्स घालण्यासाठी म्हणून खाली पाहतो आणि तिथेच थबकतो-हडबडतो, त्याला आता आपण स्वतःही अगदी संपूर्ण दिगंबरावस्थेत असल्याची जाणीव होते आणी तो बाहेर जायचा बेत रद्द करून खिडकी उघडून बाहेरचे नजरे पाहत तिथेच उभा राहतो.
सचिन : अरे बापरे जोशीवहिनी सुद्धा ! सचिन आता हातानी आपले डोळे बंद करून घेतो आणि परत थोड्या वेळाने आपली हाताची बोटं बाजुला करून पुन्हा धीटपणे पाहू लागतो, शीss विकास आणि राहुल तुम्ही दोघसुद्धा असेच जाणार ऑफिसला ! हाssयss क्या बात हें शांभवी ! अरे अरे सावंत आजी-आजोबासुद्धा आज वॉकला असेच गेले होते ? बापरे वरच्या निकिता, नताशा आज अशा अवस्थेत जाणार की काय कॉलेजला, काय होणार त्या कोलेजच ! शीss या पोरांना झालय काय अशीच जातायत शाळेत नागडी-उघडी ! कि सरकारनेच आज जागतीक नग्न दिवस पाळण्याची घोषणा केलीय काही काळात नाहीय बुवा ! इतक्यात मृणाल खोलीत येते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users