वर्षाविहार २०१६

Submitted by ववि_संयोजक on 17 June, 2016 - 12:29

Header.jpg

खेळ मातीतले, मस्ती पावसाची
धमाल गाण्यांची आणि मित्रांनो दिवसही,
अर्थात 'तो'च जुलैच्या शेवटच्या आठवड्याचा
पवन मावळातला धुंवादार पावसाचा!!
बेधुंद करणारा हिरवा सह्याद्री आणि मायबोलीचा 'वर्षाविहार' !!!

पावसाळ्याची चाहूल लागली लोकहो! समस्त मायबोलीकर म्हणत असतीलच की अजून काही 'त्या'ची चाहूल नाहीये... पण काळजीचं काहीही कारण नाही; खंदे संयोजक असल्यावर 'तो' होणारच!
तर, समस्त मायबोलीकरांकरता पेश करतो आहोत 'वर्षाविहार २०१६'!

मायबोली ही आजपर्यंत हजारो मायबोलीकरांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाली आहे. मायबोलीवरचे लेखन, इतर अनेक उपक्रम, चर्चा, गप्पा, चेष्टा-मस्करी, विनोद (आणि येथेच झडणारी तात्विक चर्चावादळे वा मतभेद) यांबद्दल मायबोलीच्या सभासदांचे कुटुंबिय रोज काहीतरी ऐकत असतातच. मायबोलीच्या वर्षाविहार उपक्रमाद्वारे त्यांनाही ती खमंग चर्चा, धमाल-मस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आणि तीही इतर मायबोलीकरांसमवेत!

वर्षाविहाराचे (ववि) निमित्त साधून आंतरजालाच्या या आभासी जगातील अनेक आभासी आयडीज् प्रत्यक्ष रूपात एकत्र येतात, नव्या ओळखी होतात, जुन्या ओळखींचे पुनरुज्जीवन होते, काही ओळखी मैत्रीत बदलतात तर आपल्या नित्य परिचयाच्या असलेल्या मायबोलीकरांचीही एक वेगळी ओळख होते. नेहमीचे वाद, स्पर्धा, समज-गैरसमज, मतभेद इत्यादी बाजूला सारून नवीन ओळखी होतात व नवे मैत्र जुळते.

यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे रविवार, ३१ जुलै २०१६ या दिवशी, कामशेत येथील पवना हट्स च्या साथीने. पाऊस तर दरवर्षीचा सांगाती आहेच!

पवना हट्स ची थोडक्यात माहीती:
पवना हट्स - https://pavnahuts.wordpress.com/
अंतर - पुण्यापासून ५५-६० किमी. मुंबई पासून ११० किमी
* स्वच्छ आणि देखभाल केलेला परिसर
* फक्त शनिवार आणि रविवार या दोनच दिवशी लोकांसाठी खुला, कपॅसिटी खूप असली तरी मोजक्या २०० ते २५० लोकांना प्रवेश, तेही आगावू आरक्षणानंतरच
* जेवण - महाराष्ट्रिय (भाकरी, पोळी, पातळ भाजी, सुकी भाजी, चटणी, ठेचा, गोड)
* दारू, सिगरेट, गुटखा याला रिसॉर्टपरिसरात बंदी
* विशेष आकर्षण - मड बाथ

पण मंडळी, हा दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणे गरजेचे आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/ पत्नी/ मुले/ आई - वडील) येऊ शकतात. आपले इतर नातेवाईक/ मित्र-मैत्रिणी यांनाही वविला यायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी varshaavihaar2016@gmail.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.

नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती ई-मेलमध्ये देणे आवश्यक आहे.

१. नोंदणी करणार्‍याचे पूर्ण नाव
२. मायबोलीचा युजर आयडी
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (शक्यतो भ्रमणध्वनी क्रमांक)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला इमेल पत्ता
६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या, स्त्री, पुरुष, त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांचे वय
७. लहान मुले (वय २ ते ७ वर्षे) असल्यास त्यांचे पूर्ण नाव आणि वय
८. मायबोली ग्रुपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. बरोबर असलेल्या लहान मुलाला/ मुलांना बसमध्ये स्वतंत्र सीट हवी आहे का?
१०. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनला‌ईन?
११. वविला काढण्यात येणार्‍या छायाचित्रासंदर्भात खाली इंग्रजीत दिलेले डिस्क्लेमर वाचा आणि तुम्हाला कोणता पर्याय हवा आहे तो इथे द्या.

- नावनोंदणीची अंतिम तारीख आहे शनिवार, २३ जुलै २०१६
- नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार २०१६ ची वर्गणी खाली दिल्याप्रमाणे आहे :

मुंबईसाठी :-
प्रौढ : रु. १०००/- प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ७००/-, बस : रु. ३००/-)

पुण्यासाठी
प्रौढ : रु. १०००/- प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु ७००/-, बस : रु.३००/-)

मुले (वय २ ते ७ वर्षे) : रु. ३५०/- प्रत्येकी (रिसॉर्ट फी) आणि बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी रु. ३००/- आणि पुण्यासाठी रु. ३००/-

- २ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
- ७ वर्षापासून पुढे रिसॉर्टचा पूर्ण आकार लागेल.
- रिसॉर्ट च्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांचा समावेश आहे.
- वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ५० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या कमी झाली तर प्रवास खर्च कदाचित जास्त येऊ शकेल.
- पुणे आणि मुंबई इथे रविवार, २४ जुलै २०१६ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.
- पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: सं. ५.३० ते ७.००
- मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: सं. ५.३० ते ७.००
- समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
- स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
- ऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ई-मेलने कळविली जाईल. जे बँक डिटेल्स ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दिले जातील, त्या अकाऊंटमध्ये कॅश डिपॉझिट करु नका.
- ऑनलाईन पैसे भरण्याकरता २४ जुलै २०१६ या तारखेपर्यंत वाट पाहायची गरज नाही.
- प्रत्यक्ष पैसे भरणार्‍यांपैकी कोणाला पैसे भरायला येणे शक्य नसेल तर त्यांनी आधीच संयोजकांशी संपर्क साधून तसे बोलून घ्यावे.
- मुंब‌ई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार २०१६ संयोजन समिती :

पुणे -

योगेश कुळकर्णी (योकु) (भ्रमणध्वनी ९९३००५६९६३)
दिप्ती जोशी (दक्षिणा) (भ्रमणध्वनी ९०७५०९७३१६)
मल्लीनाथ करकंटी
दिपक कुळकर्णी

मुंबई -
मुग्धा कुळकर्णी (मुग्धानंद) (भ्रमणध्वनी ९३७१६३६३०९)
मिनल गोडबोले (मिनू) (भ्रमणध्वनी ८०८०८८८४४६)
राखी शेलार - राऊत (राखी)
संदीप खांबेटे (घारूअण्णा)
शरद

- https://pavnahuts.wordpress.com/ या दुव्यावर पवना हट्स बद्दल अधिक माहिती मिळू शकेल.
- आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा varshaavihaar2016@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल...

सकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० कपडे बदलणे
१०.३० ते ११.३० मडबाथमध्ये खेळणे आणि रस्सीखेच!
११.३० ते १२.३० फ्रेश वॉटर पाँड्मध्ये मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३० - ४.३० मनोरंजन
५.०० वाजता चहा
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बसमधून प्रयाण.

तेव्हा, भेटू या २०१६च्या वविला!

- वविचे अंतीम बस मार्ग सोमवार, २५ जुलै २०१६ या तारखेनंतर स्वतंत्र धाग्यावर देण्यात येतील.

सूचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/ नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील). पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही.

तर मायबोलीकरांनो हा सोहळा चुकवू नका, मुंबई पुण्याचे मायबोलीकर एकत्र भेटण्याचे हमखास ठिकाण म्हणजेच वर्षा विहार .....!

================================================
Disclaimer:-

Let us respect everyone (both female and male members) who may or may not like their picture posted here or anywhere. The same rule applied to picture sent through email , as once it is sent there is no control anyway who sees it.

For those of us who do not want their picture posted, please write here your wish.

A) I do not want my pictures to be posted at all
B) I don't mind my pictures posted only after my approval. So send pictures only to me, and I will post it myself if I choose.
C) I don't mind my pictures to be posted at all,(No prior permission required) but if I don't like one, please respect my wish take it down
D) Post only the big group picture of me (with everyone)

Everyone, Please respect these wishes. And maayboli administration is committed to respect this for everyone to communicate to us.

In the Hindsight , this should have been announced before the start of VAVI, but we learned and we want to acknowledge. Better late than never. Thank you for your support.

Writing this from Organizers point of view too.

1. It is very difficult for organizers to police this. All of them are very busy organizing the event and if they keep focusing on this, the event won't happen. So it is responsibility of all people to present and respect their wish. The question everyone should ask, if this was a picture of my mother, father, brother, sister, daughter, son, wife, husband do I feel comfortable posting this.

2. Organizers can understand the objection if the picture was taken without permission of the person. But if the person has specifically posed for picture (e.g group photo) to be taken, it is difficult to understand the reason why you don't want to be in the picture now. It also applies to photos of 3-4 people specifically posing to get their picture taken. Once you are in a group picture, it is very impossible for organizers to prevent its spread. Even if it is not posted here, it still spreads (without anyone's knowledge) from people to people through emails. So preventing posting of a group picture on the public forum gives only a false sense of security.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Are wah!
Mala miss kara (punha sangatey)
Representative pathavanyat yeil

Himya Lol

ववि ला मड बाथ आणि रस्सी खेच असे मायबोलीकरांचे आवडते खेळ ठेवलेत ... वाह ...

बघुया कोण कोण येतय समक्ष हे करायला Proud

दिवा घ्या माबोकर्स .. Wink

Mala miss kara (punha sangatey) >>>... आमचा अंदाज होता - (कदाचीत) या वर्षी तू मिसेस ***** (रिकाम्या जागा भरा), या नव्या नावाने सहभागी होशील...
Lol

>>> ववि ला मड बाथ आणि रस्सी खेच असे मायबोलीकरांचे आवडते खेळ ठेवलेत ... वाह ...
बघुया कोण कोण येतय समक्ष हे करायला <<<<
मडबाथ म्हणजे काय? म्हणजे यथेच्छ चिखलफेक करायचिये का? Proud

नै, अजुनपर्यंत मी "तसा" चिखलात पडलेलो नाही (भातलावणीवेळेसही नाही...) अनुभव नाही, म्हणून विचारतोय..... अनुभवि सदस्यांनी जरुर मार्गदर्शन करावे... Wink

जोक्स अपार्ट, मड बाथ करता प्रिकॉशन्स (सावधगिरि) काय घ्याव्यात?

मड बाथ करता प्रिकॉशन्स (सावधगिरि) काय घ्याव्यात?>>>>>>> नाक, तोंड, कान, डोळ्यात चिखल जाणार नाहि याची काळजी घ्यावी

नाक, तोंड, कान, डोळ्यात चिखल जाणार नाहि याची>>>>

हेल्मेट विथ फेस मास्क, शिल्ड... पावसाळी ड्रेस, हातमोजे, गमबूट हे सगळे परिधान करायचे लिम्बु भाऊ आणि काय!

माझा हुकणार ववि! अरेरे
>> जसा काही आतापर्यंत प्रत्येक वविला येऊन येऊन दमलास जणू :नामुभा:

जसा काही आतापर्यंत प्रत्येक वविला येऊन येऊन दमलास जणू>>.

दक्षिणा, तब्बल ३ वविंना होतो मी!

आता पुण्यातच नसल्यावर काय करणार??? Sad

जेवणात जरा अ‍ॅडिशनल मेनू नसणार का? लहान मुलांसाठी? खास करून?

भात वगैरे? आमटी वगैरे? कि नुसते पीठलं?

सर्व लहान मुलं खात नाहीत हे म्हणून हि सुचना.

हा माझा सलग ५ वा ववि.
नोंदणी करत आहे. ववि ला जाणे म्हणजे माझे वर्षभराचे स्ट्रेस्स बस्ट्र् र आहे.

मी पण काल ववीसाठी नावनोंदणी केली आहे. टिशर्ट कडून कन्फर्मेशन ईमेल मिळाला अजून ववीकडून ची प्रतिक्षा आहे.

ववि समितीला एक मनापासून विनंती.
तुमचा उत्साह आणि उरक दांडगा आहे. त्याबद्दल मला खूप कौतुकही वाटतं. पण वविला न येणार्‍या किंवा त्यात फारसा रस नसणार्‍या माबोकरांना वविची दवंडी प्रत्येक गप्पाच्या बाफवर पडायला लागली की काही काळाने इरिटेट व्हायला होतं. काही ८-१० ठीके. पण मगाशी पहिली दोन तीन पानं बहुतांशी स ग ळ्या गप्पा पानांवर वविची एकेक दवंडी पडलेलीच फक्त दिसत होती. बाकी सगळं त्याच्यामागे जाऊन खणावं लागत होतं. हे जरा जास्त होतंय.
तुमच्या वविचे तप्शील ठरले आहेत. आता ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी बाफ उघडले गेलेत. ते सोडूनही इतर काही नेहेमीच्या गप्पापानांवरही जाहिरात लावा. पण इतकी तीन पानं भरून बाफवर जाहिरात म्हणजे ट्रोलिंग होतंय...
प्लीज थांबवा

तुमच्या वविला शुभेच्छा. मस्त धमाल करा Happy

Pages