सिंडी तुझ्याविना कशी राहू मी राणी ?

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 08:01

सिंडी
तुझ्याविना कशी राहू मी राणी ?

आईविना लेकरू म्हणून जवळ केली तुला
आणि मी कधी तुझी आई झाले ते कळलेच नाही मला .

तुझ्या बरोबर पकडा पकडी व लपाछापी खेळायला मजा येई भारी
पण तुझ्या सारख्या मस्तीखोर राणीला सांभाळताना होई दमछाक माझीच .

तुला अंघोळ घालायला मजा खूप येई
तुझ्या एका डरकाळीने पळून जाई सारी

तुझ्या सारख्या वाघोबा बरोबर फिरायला जाताना उकळ्या फुटे मला
जणू उत्सुक नजरा करी पाठलाग माझाच .

तुझ्या काळ्या ,पांढर्या व चोकलेटी मऊसर केसांची मला पडली ग भुरळ
तुझी प्रेमाने ओथम्बलेलि नजर खेचे अजूनच तुझ्या जवळ

दहा वर्षे साथ देवून तू सोडून गेलीस मला
आता तुझ्याविना राहताना जड जाई मला

पदोपदी तुझी आठवण येईल आता , कसे आवरू मनाला
नुसत्या तुझ्या आठवणीं वर जगणे मान्य नाही मला

माझ्या हालचालींवर नजर ठेवून असायचीस तू सदा
जणू मम्मी बाहेर जाताना तूच हवी सोबतीला

तुला घरी ठेवून जावे लागले तर माझेही मन होई बेचैन
कधी घरी जाईन अशी मलाच होई घाई

तुझ्या अगणिक आठवणींनी घायाळ झालेय ग मी
सतत तुझाच भास होतोय करू काय मी

तुझ्या मऊ शार स्पर्शासाठी आसुसले मन माझे
म्हणून डोळ्यांचे पाणी थांबवायला तूच इलाज सांगावेस

तू माझी लाडकी , तूच सोनू माझी
आता तुझ्याविना कसे राहू मी राणी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही आपल्या पाळीव प्राण्याबद्दलची कविता आहे का?

पुलंची 'सिंडरेला' आठवली.

चिनूक्स::फिदी:

Ho agdi barobar. Mazya GSD dog sathi lihileli bhavna shabdat mandanyacha ek prayatn.