Vitiligo विषयी माहिती

Submitted by राजी on 17 June, 2016 - 13:32

माझ्या ९ वर्षाच्या मुलिला vitiligo झाला आहे. Vitiligo म्हणजे you loose skin color and get white patches.
सध्या खुप initial stage मधे आहे. आम्ही protopic वापरत आहोत. पण अजुन एक नवीन spot दिसायला लागला आहे. Dermatologist सध्या दुसरी कुठाली treatment सांगत नाही आहे.
इथे कुणाला काही अनुभव आहे का? आयुर्वेदीक treatment किंवा अजुन कुठली alternate treatment.
भारतातल्या किंवा अमेरीकतला डॉकटर recommendation?
इथे बरेच डॉकटर आहेत. कुणाला कुठल्या नवीन research बद्दल माहिती आहे का? जसे की Jak inhibitor.

मदती साठी धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असे का होते हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे.

<<माझ्या ९ वर्षाच्या मुलिला vitiligo झाला आहे. Vitiligo म्हणजे you loose skin color and get white patches.
सध्या खुप initial stage मधे आहे. >>
---- autoimmune disorder प्रकारत मोडतो. माझ्यामते यावर १०० % उपाय नाही आहे. उपाय असतीलही पण त्याचे काही दुष्परिणामही आहेत.

<<आम्ही protopic वापरत आहोत. पण अजुन एक नवीन spot दिसायला लागला आहे. Dermatologist सध्या दुसरी कुठाली treatment सांगत नाही आहे.>>
----- ते अत्यन्त योग्य उपचार करत आहेत. मुलीचे वय लक्षात घेता ते या वयात दुसरी treatment सान्गत नाही हे पण योग्य आहे.
काही ट्रिटमेन्टचे (UV, laser, PUVA) दुरगामी परिणाम होण्याची शक्यता असते. मुलगी लहान आहे म्हणुन, सज्ञान झाल्यावर आणि व्हिटिलिगोची व्याप्ती बघुन ते तिचा विचार जरुर घेतिल.

<<इथे कुणाला काही अनुभव आहे का? >>
----- वैद्यकिय क्षेत्रातला नाही आहे, पण थोडेफार वाचन, अभ्यास झालेला आहे आणि प्रकार जवळुन पाहिला आहे.

<<आयुर्वेदीक treatment किंवा अजुन कुठली alternate treatment.>>
----- पैसे असतील तर होमियोपॅथी (आयुष्यभर तुम्हाला फसवत रहातिल, ट्रिटमेन्टची गॅरेन्टी नाही, खोटी आशा, आणि निव्वळ फसवणुक) मधे उपचार आहेत असा त्यान्चा दावा आहे. ट्रिटमेन्टच्या आधिचे आणि नन्तरचे फोटो दाखवत अनेक अनेक फसव्या जाहिराती बाजारात आहेत. पण ज्याचे दुष्परिणाम नाही असा एकही उपाय नाही. उपचार घेत रहा... परिणाम दोन महिन्यान्नी दिसतील... किव्वा २० वर्षान्नी दिसतील... कशाचीच शास्वती नाही... निव्वळ पैसे कमावणे हा धन्दा आहे. कृपया यान्च्या नादी लागू नका.

भारतात किव्वा परदेशात, इन्टरनेट जाळात अनेक अनेक जाहिराती आहेत. या सर्व जाहिराती फसव्या आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. पुन्हा मी काही वैद्यकीय डॉक्टर नाही पण अनेक अनुभवी डॉक्टर यान्च्याशी चर्चा केलेली आहे.

<<इथे बरेच डॉकटर आहेत. कुणाला कुठल्या नवीन research बद्दल माहिती आहे का? >>
----- सन्शोधन सुरु आहे, या विषयाचे पुर्णत: आकलन अजुनही झालेले नाही.
(अ) अनुवन्शिक, (ब) अपघात, मानसिक धक्का ?, (क) स्ट्रेस
साधारणतः १ % लोकान्ना हा त्रास आहे. त्यापैकी १ % लोक नैसर्गिक रितीने पुर्वव्रत होतात.

माझे ज्ञान वाचुन आणि चर्चा करुन मिळालेले आणि अपुरे/ तोकडे जरुर आहे.

कृपया रामदेवबाबा किव्वा होमिओपॅथी च्या मार्गाने नका जाऊ. रामदेवबाबा किव्वा अजुन दुसरी कडे कातडी (खालचे दोन लेयर्स) सोलुन काढेल असे जालिम औषध असतीलही. येथे रासायनिक प्रक्रिया होते (औषध स्किन बरोबर रिअ‍ॅक्ट होते) आणि कातडी अक्षरश: सोलली जाते.
अवैज्ञानिक रितीने रामदेव बाबा (किव्वा अजुन काही अघोरी उपाय) कतडी सोलुन रन्ग पुर्व-व्रत करुन देतील पण हे करताना तुम्ही "immune- system" शी तडजोड तर करत नाही? याची खात्री करा. कुठलाही निर्णय घेताना पुर्ण विचार करा. तुम्हाला आणि तुमच्या कन्येला या परिस्थिती बरोबर सामना करण्यासाठी मनापासुन शुभेच्छा.

साती, इब्लिस, जामोप्या (असतील त्या आय डीने :स्मित:) यान्ना त्यान्चे वैद्यकीय ज्ञान मोफत वाटण्यासाठी मी आमन्त्रण देत आहे... Happy धन्यवाद.

उत्तरासाठी धन्यवाद उदय.

प्रकार जवळुन पाहिला आहे>> या आजराच्या प्रोग्रेशन विषयी तुमचा अनुभव काय आहे? मला माहित आहे की तुम्ही guess करु शकत नाहि तरीपण थोडी कल्पना असावी म्हणुन.

होमियोपॅथी च्या खुप जाहिराती पाहिल्या आहेत, प्रश्न पैषा पेक्शा तुम्ही म्हणता तसा आरोग्याचा आहे म्हणुन अजुन हिम्मत नाहि झाली.

मुलिचा आजार आनुवांशीक असावा कारण माझ्या बहिणींचे केस खुप लवकर पांढरे झाले पण माझे नाही झाले. त्यामुळे ते genes तिच्यात आले असावे का असे वाटते.

तुम्हाला आणि तुमच्या कन्येला या परिस्थिती बरोबर सामना करण्यासाठी मनापासुन शुभेच्छा<< ह्याची खुप गरज आहे. भविष्याचा विचार करुन खुप त्रास होते. आप्ल्या मुलिशी लोक कसे वागतील, तिला मित्र मैत्रीणी मिळतील का? मात्र मुलिसोबत नॉरमल च रहतो.

<< या आजराच्या प्रोग्रेशन विषयी तुमचा अनुभव काय आहे? मला माहित आहे की तुम्ही guess करु शकत नाहि तरीपण थोडी कल्पना असावी म्हणुन.>>
---- याबद्दल स्वत: डॉक्टर पण सान्गणार नाही, सान्गू शकणार नाही (मर्यादा आहेत)... आपण फक्त घडामोडी बघायची, नोन्द घ्यायची. प्रत्येक व्यक्तीची विकास होण्याची प्रक्रिया युनिक असेल... अन्दाजही करणे शक्य नाही. protopic- स्किन पातळ असेल तर इतर भागाच्या तुलनेने परिणाम कारक ठरते.

वेग कधी खुप वाटेल, कधी कमी, क्वचित प्रसन्गी कमी होताना पण मग पुन्हा वाढताना... कुठलाही जबाबदार डॉक्टर प्रोग्रेशन बद्दल बोलणार नाही (असे माझे मत.. कारण तो जबाबदार आहे).

<< ह्याची खुप गरज आहे. भविष्याचा विचार करुन खुप त्रास होते. आप्ल्या मुलिशी लोक कसे वागतील, तिला मित्र मैत्रीणी मिळतील का? मात्र मुलिसोबत नॉरमल च रहतो.>>
------
सर्वप्रथम स्वत: सावरायचे, परिस्थितीला स्विकारायचे, खुप त्रास होतो पण तुम्ही ठाम असाल तर सोपे होते. या प्रकाराला 'आजार' समजणे चुकीचे आहे. एक प्रकारची स्किन कन्डिशन आहे. निव्वळ कॉस्मॅटिक आहे... दुर्लक्ष करायचे आणि इतर चान्गल्या बाबीन्वर लक्ष केन्द्रित करायचे.
उपायाच्या मागे धावत रहीलात तर तुमचा अमुल्य वेळ, पैसा, प्रचन्ड मान्सिक ताप, खोटी आशा... आणि शेवटी कमालीची १०० % अनिस्चितता... काय मिळवतो आपण य सर्वातुन? एक लक्षात घ्या हा प्रकार वर-वरचा आहे पण उपाय भयन्कर आणि दुरागामी असण्याची शक्यता आहे.

मुलगी ९ वर्षान्ची आहे... तिला झेपेल अशी चर्चा करायची. तिच्याशी थोडी-थोडी चर्चा करायची. मिलोनोसाईट्स काय आहेत, तिचे कार्य... स्किनला रन्ग देण्याचे काम कसे होते, कोण करतो, यात व्यत्यय आल्यास काय होते. मिलॅनिन... गोर्‍या लोकान्ची स्किन गोरी का आहे ? काळ्या लोकान्ची स्किन काळी का? गव्हाळ... हा फरक कसा होतो?

माझ्यामते या क्षणाला तुम्ही योग्य तेच करत आहात. तुमच्या डरमॅटोलॉजिस्ट योग्य प्रकारे उपचार करतो आहे. मुलगी सज्ञान/ प्रौढ झाल्यावर (तिला योग्य वाटल्यास) पुढचे निर्णय ति स्वत: घेईल. तुम्ही पालक म्हणुन योग्य वातावरण आणि सल्ला द्यायचा, तिच्या निर्णयाला त्या वेळी सपोर्ट करायचा.

होमियो, आयुर्वेद असे उपाय योजताना - कृपया दहा वेळा विचार करा, निर्णय घेण्यापुर्वी खुप अभ्यास करा. पुन्हा एकदा शुभेच्छा.

मुलिचा आजार आनुवांशीक असावा कारण माझ्या बहिणींचे केस खुप लवकर पांढरे झाले << केस अवेळी पांढरे होण पण ह्यात मोडत का?

धन्यवाद उदय.
प्रोग्रेशन चा प्रश्न या विकाराच्या अनिश्चतते मुळे विचारला. तुम्ही लिहिलेले सगळे स्वताला सम्जावुन झाले आहे पण कधी कधी अचानक भीती वाटते. तुम्ही लिहिल्याप्रमाणे मुलीशी चर्चा नक्की सुरु करु. सध्या तीला फक्त sun मुळे pigment loss झाला आहे असेच सांगितले आहे.
तुम्हाला स्वीमींग मुळे ही कंडीशन अ‍ॅग्रीविएट होते असे वाटते का? आम्ही सध्या स्वीमींग बंद केले आहे.
सॉरी, मी खुप प्रश्न विचारते आहे पण डॉक्टर सोडुन अजुन कोणाशी बोलत नाही स्टिग्मा च्या भीतिने.

अदिती, मी डॉक्टर नाही पण केस पांढरे पण मेलानिन प्रॉडकशन थांबल्यानेच होतात म्हणुन मला असे वाटते. चुकिचे असेल पण का झाले ह्याचे उत्तर म्हणुन, मनाची सम्जुत म्हणुन.

सशल, धन्यवाद. तो लेख वाचला आणी म्हणुनच हा धागा काढावा वाटला.

<<तुम्हाला स्वीमींग मुळे ही कंडीशन अ‍ॅग्रीविएट होते असे वाटते का? आम्ही सध्या स्वीमींग बंद केले आहे.>>
------- मुलीला पोहोण्याची आवड असेल, तिला पोहोण्यामुळे निखळ असा आनन्द मिळत असेल तर खुशाल स्वीमींग करु द्यावे. कशासाठी थाम्बवायचे ? त्याने कुठलेही अ‍ॅग्रीवेशन होणार नाही. पाण्यात जाण्याची भिती, आई-वडिलान्चा आग्रह/ हट्ट आणि लादणे असा ताण(stress)युक्त प्रकार असेल तरच थाम्बवा, अन्यथा नको.

मुलान्ना vitiligo चा त्रास होत असेलच. पण त्याहीपेक्षा आपल्या या कन्डिशनमुळे आपल्या आई-वडिल-भावन्डे यान्ना होणारा मनस्ताप त्यान्ना जास्त त्रासवतो. लहान मुले आई-वडिलान्पेक्षा जास्त लवचिक असतात. त्यान्चे दुखणे हे दुहेरी आहे (अ) मला त्रास होतो (ब) माझ्यामुळे आई-वडिलान्ना त्रास होतो. त्यान्चा त्रास कमी करण्यासाठी तुम्हा दोघान्ना हिम्मत धरावी लागेल. #अ कन्डीशन तुमच्या हातात नाही आहे पण #ब तर पुर्णत: तुमच्या नियन्त्राणात आहे, त्यान्चे लढाईचे ५० % काम सोपे होते.

येथे छान माहिती दिलेली आहे,
https://www.vitiligosupport.org/faq.cfm#item10

राजी तुम्ही डॉ. माया तुळपुळेंशी प्रत्यक्ष भेटुन बोलावं असं मी सुचवेन. तुमच्या शंकांचं निरसन होईलच पण तुमच्या आणि तुमच्या मुलिच्या मनावरचा ताण नाहिसा होईल. उपायांइतकंच तेही महत्वाचं आहे.

मलाही स्किन प्रॉब्लेम आहे पण व्हिटिलिगो नाही. माझी ana/adna test 1:1000 अशा ऍन्टीबॉडीएस दाखवते. माझा अनुभव मी लिहिते सविस्तर. एक मोठा प्रतिसाद लिहिला तो एक चुकीची क्लिक आणि उडाला मोबाईलवरून. म्हणून नंतर लॅपटॉपवरून लिहिते.

उदय, तुम्ही फार छान माहिती दिलीत आणि तुमच्या आश्वासक शब्दांनी राजी यांना नक्कीच मानसिक उभारी आली असेल. Happy

राजी, मलाही स्किन प्रोब्लेम/ vitiligo आहे, जवळपास गेली २५-२६ वर्षे ! (from my school age) लहान लहान patches आहेत, पण इतर काहीच त्रास नाही मला त्याचा. मी इतर उपाया सोबत, UV treatment पण घेतली ( at the age of 19-20 yrs); घेताना त्रास व्हायचा स्किअची आग आग होई पण उपयोग फारसा झाला नाही. पण पुर्ण बरे झाले नाहि.

कृपया रामदेवबाबा किव्वा होमिओपॅथी च्या मार्गाने नका जाऊ. रामदेवबाबा किव्वा अजुन दुसरी कडे कातडी (खालचे दोन लेयर्स) सोलुन काढेल असे जालिम औषध असतीलही. येथे रासायनिक प्रक्रिया होते (औषध स्किन बरोबर रिअ‍ॅक्ट होते) आणि कातडी अक्षरश: सोलली जाते.
अवैज्ञानिक रितीने रामदेव बाबा (किव्वा अजुन काही अघोरी उपाय) कतडी सोलुन रन्ग पुर्व-व्रत करुन देतील पण हे करताना तुम्ही "immune- system" शी तडजोड तर करत नाही? याची खात्री करा. कुठलाही निर्णय घेताना पुर्ण विचार करा. तुम्हाला आणि तुमच्या कन्येला या परिस्थिती बरोबर सामना करण्यासाठी मनापासुन शुभेच्छा. >>> याला पूर्ण अनुमोदन.

केवळ vitiligo आहे म्हणुन मुलीची कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी बंद करु नका प्लिज.

राजी, माझ्या जवळच्या नातलगाला असं झाले होते.प्रथम चेहर्‍यावर ओठांच्या कडेने नंतर बोटांची पेरे पण गुलबट पांढरी दिसू लागली. प्रथम त्या नातलगाने आयुर्वेदिक उपाय चालू केले होते.त्यामधे एका मुळीची त्यांना अ‍ॅलर्जी आल्यानंतर अ‍ॅलोपॅथिक औषध चालू केली.एक ते दीड वर्ष औषध घेतले.एकही एक डाग आता त्यांच्या अंगावर नाही.

अतुल ठाकूर यांचा प्रतिसाद चांगला आहे.

धन्यवाद उदय. मुलिला स्वीमींग आवडते पण नेट वर बरेच ठीकाणी क्लोरीन वॉटर ने वाढु शकते असे लिहिलेले दिसले. तसेच लहाणपणी तीला स्वीमींग ची भिती होती त्यामुळे आम्ही चालुच ती म्हटल्यावर ७ वर्षाची असताना केले आणी पुढच्या वर्षी स्पॉट आले. पण आता तीला खुप आवडते पण जाता येत नाही. तिच्या डॉक ने पण पाठ्वा असेच सांगितले.

ंमला टाइप करायला वेळ लागतो म्हणुन आता सविस्तेर लिहिते.
तिला मागच्या जुन मधे पहिले स्पॉट आले डोळ्यच्या खाली. july मधे protopic चालु केले. तसेच व्हीटामीन डी ची टेस्ट केली. ते लो आले. मग suppliments चालु केल्या आणी आहारात बदल केले. डींसेंबर मधे पीगमेंट परत आले. डॉक ने protopic बंद करायला सांगितले. पण या जुन मधे त्या जागी परत थोडे पीगमेंट गेले. आणी गालावर एक छोटा स्पॉट आला. परत protopic चालु केले आहे.
मनस्ताप त्यान्ना जास्त त्रासवतो>>आजच्या घडीला सुदैवाने मुलीला खुप त्रास होत नाही कारण सध्या ते एव्हडे नोटिसेबल नाही आहे. auto immune disorders are aggravated by stress. त्यामुळे आम्ही तसेही सगळे रुटीन (स्वीमींग सोडुन) चालु ठेवले आहे.

अतुल ठाकुर, हो . तुमच्या लेखातुनच त्यांच्याविषयी कळले. त्यांच्याशी सध्या फोन वर संर्पक करु आणी भारतात आल्यावर प्रत्यक्श भेटु.
धन्यवाद साधना. नक्की लिहा.
समाधानी, तुम्ही ह्या सोबत कसे कोप अप केले हे लिहु शकाल का?
धन्यवाद शब्दाली.
देवकी, तुमचे नातेवाइक बरे झाले हे वाचुन बरे वाटले आणी आशेचा किरण दिसला. तुम्ही प्लीज डॉकटर चे नाव आणी पत्ता देउ शकल का?

उदय, तुमचे प्रतिसाद खुप छान आहेत. माहितीपुर्ण आणि आश्वासक.

राजी, हा काह्यी आजार नाही, पण तु किती अपसेट असशील याची कल्पना करणं अवघड नाही. My prayers are with you and your daughter.

मी नाव ट्रीटमेंट आणि डॉक्टर रेकमेंड करत नाहीए, कारण हा दुसर्‍याचा अनुभव आहे आणि तो सुद्धा खुप जुना, टीनएज मधे पाहिलेला. पण मला miraculous वाटला, म्हणुन सांगावासा वाटतो आहे.
माझ्या एका मैत्रिणीला अचानक मानेवर आणि हातावर स्पॉट्स दिसायला लागले होते. आणि दिसायला लागले तेव्हा फिकट आणि कमी नाहीत, तर अगदी अचानकच obvious आणि भरपुर. तिच्या सख्ख्या काकांना Vitiligo होताच त्यामुळे पुर्ण फॅमिली भयंकर अपसेट झाली. काकांना Allopathyचा उपयोग झाला नव्हता म्हणुन तिला खडीवाले वैद्यांची ट्रीटमेंट चालु केली. काय होती माहित नाही, पण ती म्हणायची फार त्रास होतो. तेव्हाचं वयपण फार चौकशा करायचं नव्हतं, त्यामुळे फार डिटेल्स माहित नाहीत. जे काही औषध असेल ते, पण तिचे स्पॉट्स नुसते गायब नाही झाले तर स्कीन हळु हळु अगदी पुर्वीसारखी झाली. ( वेळ - ८-१० महिने). त्यानंतर ती मला १८ वर्षांनी एकदा एअरपोर्टवर भेटली. तिची स्कीन अजुनही स्पॉटलेस आहे. बहुतेक नंतर परत काही आले नाहीत. आणि जे होते ते पण कायमचे गेले असावेत.

प्रश्न अन उपाय दोन्हीही अवघड आहेत. तुमच्या मुलिला शुभेच्छा. Happy

>>>> रामदेवबाबा किव्वा अजुन दुसरी कडे कातडी (खालचे दोन लेयर्स) सोलुन काढेल असे जालिम औषध असतीलही. <<<<
असतीलही? म्हणजे ठामपणे आहेत असे माहित नसताना निव्वळ अंदाजावर "बाजारात तुरी अन भट भटणीला मारी" अशा पद्धतीने बाकि भारुड का लावलय? तुम्ही तर "कुडमुड्या फलज्योतिषांच्याही" वरताण निघालात की... Proud
नै, म्हणजे मी म्हणतो की दरवेळेस "एका दगडात किती किती ते पक्षी मारु पहायचे ?" याला काही लिमिट? असो.
मूळ धागाकर्तीसः माफ करा, पण अगदीच रहावले नाही म्हणून वरील मजकुर.

होमिओपॅथिमध्ये खरंच इलाज असेल तर पार्ला पश्चिम ( इरला) येथे कॅालेजच्या ओपिडीत दाखवा /मिळेल.
आयुर्वेदिकसाठी सायन स्टेशनजवळच्या शेठ वरजिवनदास कॅालेजच्या ओपिडित दाखवा.
दोन्ही ठिकाणी स्पष्ट आणि मोफत( वीस पंचवीस रुपयात) सल्ला मिळेल.
फारतर आयुर्वेदात सांगितलेली आरोग्यवर्धिनी वटी घेऊन पाहा.

<<उदय, कातडीवर त्रास करुन घेण्याचा उपाय भयंकर आहे पण तो उपाय रामदेवबाबा खरच करतात का?>>
---- पतन्जली मधे औषधे मिळतात.

असतीलही? म्हणजे ठामपणे आहेत असे माहित नसताना निव्वळ अंदाजावर "बाजारात तुरी अन भट भटणीला मारी" अशा पद्धतीने बाकि भारुड का लावलय?
---- LT ठामपणे माहित आहे... औषधाचा लेप लावताना रासायनिक क्रिया जास्त झाल्यास खोल जखमा होतात. (मला येथे भयानक फोटो टाकायचे नाही आहे). पतन्जलीच्या लोकान्नी 'गुलाब पाण्याने' जखमेला शान्त करायचा सल्ला दिला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर अ‍ॅलोपॅथी स्पेशलिस्ट कडे गेलो... त्याने डोक्याला हात लावला. सर्व प्रकार थाम्बवायला सान्गितले !

तुम्हाला भारुड वाटत असल्यास माझा नाईलाज आहे. मला आलेले अनुभव मी कथन केले आहे.

मला अ‍ॅलोपथीच्या डॉक.नेच एक औषध लावायला दिले होते त्याने मोठे मोठे फोड आले होते ज्यात पाणी झाले होते.
डॉक.ना काय झाले ते सांगितल्यावर निविया क्रीम लावायला सांगितले.

४ दिवस खुरडत चालत होते, आता त्या आठवणी पण नको वाटताहेत. Sad

यावर एखादी माहितीपर व्हॉटसअ‍ॅप पोस्ट लिहीता येईल का, जी शेअर करता येईल.
हा आजार संसर्गजन्य नाही, आणि कशा प्रकारचे स्ट्रॉन्ग उपाय टाळा असे काहीतरी रोचक सुरुवातीसह?
याचा खूप फायदा होईल(खाली खर्‍याखुर्‍या डॉ चे नाव आणि त्यांची मते असतील तर जास्तच.)
निव्वळ त्वचेच्या रंगावरुन लोकांनी वेगळी वागणूक देणं प्रचंड वाईट वाटतंय.

>>> तुम्हाला भारुड वाटत असल्यास माझा नाईलाज आहे. मला आलेले अनुभव मी कथन केले आहे. <<<
तस कै नै उदयराव, फक्त तुमच्याच पोस्ट नंतरच्या पोस्टमध्ये शब्दालीने, "अ‍ॅलोपॅथीच्या" औषधानेही फोड वगैरे त्रास झाल्याचे लिहिलय, पण तिने अ‍ॅलोपॅथीकडे जाऊच नका अशा आशयाचे लिहिले नाहीये, तुम्ही मात्र संधी न सोडता पतंजली व होमिओपॅथीला वाळीत टाकण्याचा (फुकट) सल्ल्ला देऊन मोकळे होताय... हा फरक "अनाकलनीय" नाहीये... ! Proud असो.

लिंबुकाका, औषध अ‍ॅलोपथीच्या डॉक्ने दिले होते पण ते अ‍ॅलोपथी होते का आयुर्वेदिक ते मला आठवत नाहिये. आयुर्वेदिक पण असु शकेल.

पूर्वी गयेवरुन औषधे मागवत यासाठी, त्याने तर हमखास असा त्रास होत होता, अनुभव आहे.

इथे वाचा बावची तेल
//हा उतारा बैद्यनाथच्या आरोग्यप्रकाश भाग दुसरा या माहिती पुस्तकातून साभार ( कॅापीराइट खूण नाहीये )-
""
Shwitra or Kilaas or Vitiligo
Shwitra or Kilaas or Vitiligo
Page 479,

In India depigmentaion of the skin is also termed as safed korh (White-leptosy which is wrong for this has nothing to do with leprosy or korh. The word kushtham In ayurveda includes all types of skin dise-
ases including leprosy. A patient having depigmentised skin should be told that it is not an infectious disease and there is no other danger except the cosmetic effect and so there is no cause for worry. It cannot be imparted to any other person thru contact like scabies.
In this disease pigment is lost on exposed areas, around body orifices, over pressure points and also from hair, nevi, genitalia and axilla. It may also be inherited as a dominant trait. One should be able to
differentiate between true vitiligo and hypopigmentation. It is confirmed by Wood's light examination which show a depigmented lession as ivory white
patch of skin. For hypo—pigmentation and for vitiligo bakuchee (Psoralia corylifolia Linn.) seeds are the best remedy. For this 3 to 6 grams of the powder of the seeds is given internally with water and also a paste of the seeds in water is applied to the depigmented parts of the skin, The application causes blisters formation which later on turn black and help bring normal Working of the melnocytes which allow deposition of
of colour White spots cauged due to burns are not removed by this drug.""//

>>> आयुर्वेदिक पण असु शकेल. <<< Lol
अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरनी आयुर्वेदिक औषधे सुचविली असु शकतील अशी अशक्यप्राय शक्यता जरी व्यक्त झाली, तरी माझे मन अगदी अगदी "गहिवरुन " आले गो.... Wink

Pages