सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग -2

Submitted by Suyog Shilwant on 10 June, 2016 - 16:40

आजा नातू आता सोबत चालू लागतात. वाटेत जाताना त्यांना काही जनावरं, हिरवी गार शेतं, काही घरं ही लागतात. सकाळची वेळ असल्याने लोकांची रेलचेल सुरु असते. कुठे कोंबडयांचे आरवने, कुठे गुरांचे हंबरने तर कुठे चुलीचा धूर. असे करता करता ते चालत एका मोठ्या वाड्या जवळ येतात.
दुमजली असा भिंतीचा तो वाडा अगदि प्रशस्थ दिसत होता. वाडया समोर एक बाग आहे. बागे समोर एक लोखंडी गेट आहे. गेट जवळील दगडी भिंतीवर एक पाटी लावली होती. ज्यावर 'त्रिनेत्री' असे नाव लिहलेल दिसत. मुलगा गेट खोलतो व दोघे आत जातात. सूयुद्ध आजोबाला ओट्यावर असलेल्या झोक्यात नेऊन बसवतो. घरात जाताना तो आपल्या आजीला आवाज देतो.
"आज्जी… आम्ही आलोय ग."
तो पळतच घरात शिरतो आणि हाॅलमधे असलेल्या सोफॅवर जाऊन बसतो. त्याची आई त्याला आतुन आवाज देते. पण हा आपला टिव्ही लावण्यात मग्न झालेला असतो.
काया - " पहिले चहा पिणार का नाश्ता करतोस."
तो टिव्ही लावणार इतक्यात त्याची आज्जी पुजा करुन बाहेर येते. भगवी साडी नेसलेली आज्जी हातात पुजेचं ताट घेऊन धुप लावुन सुगंध करित असते. तोंडाने मंत्र पुटपुटत धुप देत ती सुयुद्ध जवळ येते. त्याच्याकडे बघत ती पुजेचे ताट त्याच्या समोर धरते. तो मात्र टिव्ही लावण्यात मग्न असतो जेव्हा ती त्याच्या समोर उभी राहते तेव्हा कुठे त्याचे लक्ष जाते. आपली आज्जी पुजेचे ताट घेऊन आपल्या पुढयात उभी आहे. तो पटकन हात फिरवुन पाया पडतो. आता परत त्याचे लक्ष पुन्हा टिव्ही लावण्याकडे वळ्ते. टिव्ही लावुन तो पाहत बसतो. एवढ्यात त्याचे आजोबा त्याला आवाज देऊन बोलावतात.

आजोबा -' अरे सुयुध्द जरा इकडे ये बाळा.'
सुयुध्द पटकन आजोबांचा आवाज ऐकुन पळतच त्याचाकडे जातो.

सुयुध्द - ' काय झाल बाबा? काहि हवय का?'

आजोबा - ' हो बाळा. जा माझा खोलीतून रेडिओ घेउन ये. '
सुयुध्द पट्कन आजोबांच्या खोलीकडे वळ्तो. पळतच जाऊन टेबलावरचा रेडिओ उचलतो आणि वरंड्यात बसलेल्या आजोबांना देतो.

सुयुध्द - ' हा घ्या बाबा तुमचा रेडिओ. '
आजोबा लगेच रेडिओ चालू करून जुणी गाणी ऐकत बसतात. सुयुध्द पुन्हा घरात जाउन टिव्ही समोर बसतो. त्याची आई आतुन नाश्ता आणुन टेबलावर ठेवते. त्याचा हातातल रिमोट खेचून त्याला बोलते.

काया - ' टिव्ही नंतर बघ आधी चहा नाश्ता करून घे पाहू.'
सुयुध्द मात्र टिव्हीत मग्न झालेला असतो. काया त्याचा आणि टिव्हीच्या मधे उभी राहते. कंबरेवर हात ठेउन ऊभ्या आईला पाहून आता आपली खैर नाही हे समजुन तो टेबलावरचा चहाचा कप उचलतो आणि तोंडी लावतो. गरम चहाने त्याची जिभ भाजते. तो भाजलेली जिभ बाहेर काढून फुसक्या मारू लागतो. ते पाहून त्याची आई लगेच त्याच्या जवळ बसते. आपल्या पोराची जिभ भाजली हि घटना तिला विचलित करून जाते. त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते.

काया - ' अरे बापरे मी उगाच तुला चहा प्यायला सांगितला. फार भाजली का रे जिभ? दाखव पाहू.'
त्याचा चेहरा बघते तर तो जिभ बाहेर काढून तो हसत असतो. तिला काहिच कळेना तो लगेच ओरडतो.

सुयुध्द - ' आ..आ…आ… मम्मी जिभ भाजली किती गरम होता चहा.. मला नको आता चहा. मी नाश्ता करतो.'
हे पाहून कायाला कळते कि हा नाटक करत आहे. ती लगेच चहा नाश्ता उचलते व उठते. ती जाणार इतक्यात तो हात पकडतो आणि हसून बोलतो.

सुयुध्द - ' मम्मी मला नाश्ता हवाय तो का नेतेस? '
ती मागे वळून बघते तर तो हसत असतो. 'मम्मी मी फसवल तुला...sorry..मला देना नाश्ता.'

काया - ' काय रे लबाडा..घाबरवलस ना मला. मला वाटल कि जिभ भाजली तुझी. चहा नकोय का तुला? '

सुयुध्द - ' नको. मला फक्त नाश्ता हवाय.'

काया नाश्ता टेबलावर ठेवते आणि परत किचन मध्ये जाते. सुयुध्द पुन्हा टिव्हीत मग्न होतो. नाश्ता करत तो टिव्हीवर कार्टुन बघत बसतो.
बाहेर आजोबा गाणी ऐकत एका वेगळ्याच विचारात करत असतात. त्यांना कळत होते सुयुध्द किती पटकन मोठा होत चालला आहे. पुढे त्याला आज पडला असे अनेक प्रश्न पडणार आहेत. आज तर निभावल पण…पुढे कसे उत्तर द्यायचे त्याचा प्रश्नांना. त्याला कधी न कधी ह्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार आहेत. आज तर त्याने एवढेच विचारले कि तुमचे डोळे परत येतील का? जर का त्याने तुमचे डोळे कसे गेले विचारले तर. हा विचार त्याला व्याकूळ करु लागला. आज तो लहान आहे. पुढ त्याला नक्किच हे प्रश्न पडणार. हे विचार त्याला सहन होईना. आणखी प्रश्न पड्ण्या आधी त्याला हे कळलच पाहिजे कि तो कोण आहे. आतापर्यंत तरी आपण त्याला जपले उद्या जर त्याचा जिवाला धोका उद्भवला तर काय?... नाही असे नाही होऊ शकत. कोणत्याहि परिस्थितित त्याला सर्व कळायलाच हवे. येऊ देत आज चिरंतरला आज त्याला हे सर्व मार्गीच लावायला सांगतो. इतक्यात त्याच्या खांद्यावर कोणी हात ठेवते तो दचकतो.

काया - ' बाबा…. काय झाल ? कोणता एवढा विचार करताय.'

म्हातारा - 'अ….अ… काया तु होय. काही नाही ग. (तिला सांगावे का ? नको नको उगाच टेन्शन घेईल ती) मनातच बोलतो.

काया - ' काय झाले बाबा ? ' आपल्या सासऱ्याला अस विचारात बघुन तिलाही थोडी गंभीरता वाटते. ती ही विचार करू लागते. मधेच म्हातारा बोलतो.
म्हातारा - ' काया. अग चिरंतर कधी येणार आहे.' त्यांना चहाचा कप देत ती म्हणते.
काया - ' का ? बाबा काही झाले का आज नदीवर ? '
म्हातारा - ' नाही नाही … अग सहजच विचारल. हातात चहाचा कप घेऊन तो शांत राहतो. त्याला कळेना तिला कसे सांगवे. आज नातवाने काय प्रश्न विचारून त्याचा विचारांचा गोंधळ उडवलाय. काया आपल्या सासऱ्याची मन: स्थिती समझू शकत नव्हती. तिला कळ्तच नव्हते असे काय झाले आज जे बाबांच मन विचलित झालय. नक्कि काही तरी घडलय जे बाबा मला सांगत नाहीयेत. ती मनाशी ठरवते व विषय बदलते.

काया - ' बाबा हा सुयुध्द ना दिवसें दिवस आगाऊ होत चालला आहे. ह्यांना येऊ देत आज त्याची खबरच घ्यायला लावते.'
एवढे बोलून ती थांबते. म्हातारा थोडा विचार करतो व बोलतो.

म्हातारा - ' कधी येईल चिरंतर ?'

काया - ' अहो बाबा ते नेहमी प्रमाणे 4 वाजता येतील कामाहून.' आता मात्र तिची खात्री पटते. नक्किच सुयुध्द ने बाबांना असे काही विचारले असेल ज्याने बाबा इतके गंभीर झालेत. ती गप्प राहते आणि आत निघुन जाते.
पण म्हातारा चहाचा एक एक घुट घेत विचारातच असतो. परत सुनेला आवाज देणार इतक्यात त्याला कोण्याच्या येण्याची चाहूल लागते. तो पटकन बाजुला ठेवलेली काठी उचलतो आणि आवाज देतो.

म्हातारा - ' कोण आहे रे तिकडे?' समोरुन त्याला काठी आपटत घुंगरांचा आवाज येतो आणि तो समजुन जातो कोण आल आहे ते.

हातात लांब काठी ज्याला वरच्या बाजूस घुंगरु बांधलेत. भगवे वस्त्र धारण केलेला. डोक्यावर केस नाहीत. कपाळवर चंदनाचा त्रिलेप धारण केलेला तरूण म्हाताऱ्यासमोर उभा असतो. चेहऱ्यावर स्मित हास्य डोळ्यात तेज. एकटक म्हाताऱ्याकडे पाहत असतो. म्हातारा त्याला संबोधुन बोलतो.
म्हातारा - ' आज अचानक तुम्ही इथे. काय झाले?'
गप्प उभा असलेला तरुण आता बोलतो.
तरुण - ' अचानक नाही. गरुंजींचा संदेश आहे तुमच्यासाठी. तोच घेऊन आलोय. गुरुजी आज संध्याकाळी येणार आहेत.'
इतके बोलून तो अद्रुश्य झाला.
मगास पासुन चिंतीत म्हातारा थोडा निश्चिंत झाला होता. त्याचा विचारांचा गोंधळ आता संपला होता. त्याने पटकन आपल्या पत्नीस हाक मारली आणि चाचपडत घरात गेला.

म्हातारा - ' सुनैना… ऐकलस का..कुठे आहेस? ' त्याची हाक ऐकताच त्यांची पत्नि आणि काया आपल काम सोडून बाहेर आल्या. सुयुध्दच लक्ष नव्हत तो टिव्ही पाहण्यात मग्न होता. आपल्या पतिस खुश पाहुन सुनैना ने त्याला विचारले.
सुनैना - ' काय झाले हो? अचानक अशी हाक मारलीत.'

म्हातारा - ' अग बाजुला चल सांगतो तुला.' त्या दोघी एकमेकांकडे बघत. आजोबा चा खोली जवळ गेल्या. ' अग गुरुजींचा संदेश आला आहे. ते आज संध्याकाळी आपल्याकडे येणार आहेत. काया तु लगेच चिरंतरला फोन करुन कळव.' हे ऐकताच ती आपल्या खोलीत निघुन जाते.
' अग सुनैना आज सूयुध्दला सगळ सांगायची वेळ आली आहे.'

सुनैना - ' अहो पण… तो किती लहान आहे अजुन. त्याला कस कळेल.'

म्हातारा - ' आज त्याने मला असा प्रश्न विचारला कि मी गोंधळुन गेलो. त्याला काय उत्तर द्यावे हे मला कळतच नव्हते. पण मी कसबस त्याला फुसलवल. बर झाल… आज गुरुजी आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. ह्या दिवसाची मी किती आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर तो दिवस आलाच.'
आज्जी खोलीच्या दारात उभी राहुन सुयुध्दकडे पाहुन विचार करू लागली. तिला कळेना एवढ्याशा पोराला ह्या सर्व गोष्टी कळतील का नाही. थोड्या वेळाने ती विचार करुन मग म्हाताऱ्याला म्हणते.
सुनैना - ' हे पाहा त्याला सांगण्याची घाई करणे मला पटत नाही. अजून थोडा वेळ दिला तर..' काया आपल्या खोलीतुन बाहेर आली. सुयुध्दच्या डोक्यावर हात फिरवते आणि परत सासु सासऱ्यां जवळ जाउन उभी राहते. पण सुयुध्द मात्र टिव्ही पाहण्यात चांगलाच रमला होता. आपल्या घरात काय चालु आहे याचाशी त्याला काडीमात्र ही रस नव्हता.

काया - ' बाबा मी कळवलय ह्यांना. ते म्हणाले लवकरात लवकर घरी येतील.'
म्हातारा - ' ठिक आहे. जेवनाची तयारी करा मी लगेचच मंदिरात जाऊन येतो.' म्हातारा तयारी करायला आपल्या खोलीत जातो. आपल्या खोलीत जाऊन एका पेटी जवळ उभा राहतो. कसलासा विचार करु लागतो. अखेर आज सुयुध्दला सर्व काही सांगण्याची वेळ आलीच. आपल्या चेहऱ्यावर हात फिरवत स्वतःचे डोळे चाचपडू लागला मग जवळच्या पेटीवर हात फिरवतो पेटी खोलतो. त्यात एक छोटा संदुक असतो. तो उघडतो त्या आत असलेल्या वस्तु वर हात फिरवतो.

' अखेर जी गोष्ट त्रिनेत्रींच्या नशिबात आहे ती ह्याचा हि वाट्याला आलीच. काय देवाने ठरवलय तोच जाणे.'
एवढे बोलुन तो संदुक आत ठेवतो. पेटी लावतो आणि वळून तयारी करून लगेचच मंदिराची वाट धरतो.

काही वेळ निघुन जातो. म्हातारा इकडे मंदिराच्या पायऱ्या
चढत विचार करत असतो. किती दिवस झाले माझी दृष्टी जाऊन काय प्रसंग होता तो. अस का घडल. अजुनही त्याच गुढ मला उलघडल नाही.
अचानक त्याचा डोळ्यांसमोर एक काळी छाया उभी राहते. तो एका वेगळ्याच ठिकाणी उभा आहे. काळी भोर रात्र त्यात विजा कडाडतायेत. अचानक एक भयानक हास्य त्याला ऐकू येते. तो इकडे तिकडे बघतो. त्या विजेंच्या पडणाऱ्या प्रकाशात पाहण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला कोणीच दिसत नाही. आता त्याला भयानक हास्याचा आवाज सहन होत नाही. तो कानावर हात ठेवतो पण काही कमी होईना. समोर पाहतो तर त्याला एक प्रकाश दिसतो. अचानक तो प्रकाश दिपवणारा होतो. तो डोळे मिटतो हसण्याचा आवाज आता हळुहळू कमी होऊ लागतो. शेवटी तो डोळे उघडतो. पण अंधार... फक्त काळोख. हसण्याचा आवाज आता पुर्ण बंद झालेला असतो. तो किंचाळतो…त्याचा डोळ्यांना असह्य वेदना होत असतात. त्याचा गालावार काही पड्ल्यासारखे त्याला जाणवत. तो हातात लावतो. त्याला कळते हे रक्त आहे. तो जमिनीवर पडतो. आता त्याला कधीच दिसणार नव्हते. फक्त काळोख होता जिवनात. इतक्यात त्याचा खांद्यावर कोणी हात ठेवते. तो दचकतो पुन्हा पाहतो तर तो मंदिरांच्या पायऱ्यावर उभा असतो. मंदिराचा पुजारी त्याला म्हणतो.
पुजारी -' काय झाल त्रिनेत्री असे उभे का आहात?'

त्याचे अतीत त्याला असे अचानक का आठवले काहि समजत नव्हते. पण तो सर्व विसरुन मंदिरात जातो. शंकराचा पिंडी जवळ जाऊन आपल्या पिशवीतला तांब्या काढून पुजारीला अभिषेक करायला सांगतो. बाकी पुजेचे सामान तो पुजाऱ्याला देतो.
पुजारी - ' कोणाच्या नावाने पुजा सांगणारं आहात ?'

म्हातारा - ' माझा नातू सुयुध्द आणि त्रिनेत्री परिवाराच्या नावाने. आज फार चांगला दिवस आहे. तुम्ही पुजा सुरु करा.'
पुजा सुरु होते पण त्याचा मनात अनेक विचार घोळत होते. तो सुयुध्द चा विचार करु लागतो आणि पुढ भविष्यात अघटित येणाऱ्या संकटांचा विचार करु लागतो. इतक्यात त्याला गुरु विश्वेश्वरांनी सांगितलेली गोष्ट आठवते.
त्रिनेत्रींचा ह्या संकटांशी सामना आजचा नाही. हे नेहमी आपल्या समोर आलेल्या संकटांशी झूंज देत आले आहेत. तुमच्या घराण्याची पाचवी पिढी त्याचा अंत करु शकते. योग्य वेळ आल्यावर आपल्याला नक्किच विश्वास बसेल...
इथे पुजा संपते तसा तो घरी परतायला निघतो. पुजेचा प्रसाद घेऊन तो परततच असतो कि त्याला कोणी हाक देते.

म्हातारा - ' कोण…कोण आहे ?'
पण कोणाचीच चाहूल नाही आजुबाजुला.
गुरु विश्वेश्वर - ' मी आहे अभिनव आणि मला तुझ्याशी घरी येण्या आधी बोलायचे होते. पण मी इथे नाही. आपण मनः संभाषनातुन बोलत आहोत.' आता म्हातारा सावध होतो मंदिराच्या आवारात कोणीच नाही ना याची खात्री चाहूल करून घेतो. मग बोलतो.

म्हातारा - ' नमस्कार्ं अस्मी गुरु विश्वेश्वर…' हात जोडून उभ्या जागीच तो त्याना प्रणाम करतो. ' गुरु तुम्ही कधी येणार आहात. मी विचार करतच होतो कि कधी तुमच्याशी बोलु शकेन. '
गुरु विश्वेश्वर - ' हे बघ अभिनव. योग्य वेळ आता जवळ आली आहे. मला तुझाशी बोलायचे होते याचे कारण वेगळं आहे. गेल्या काही दिवसात सुयुध्द मध्ये असलेल्या शक्तिचा संचार आणि त्याचा वापर याबद्दल मला चिंता वाटत होती. तुम्हाला दिलेल्या शक्ति कवचाची बंधनं आता संपुष्टात येत आली आहेत्. सुयुध्दला आज भेटून मला त्याच्या शक्तिची त्याला ओळख करुन द्यायची आहे. पण त्या आधी तुम्ही त्रिनेत्री जी परंपरा आणि ह्या युगाच्या सुरक्षेसाठी जे काहि योगदान देत आला आहात. त्याचीहि पुर्वकल्पना सुयुध्द ला देणे तितकेच गरजेचे आहे. आज मी जेव्हा त्याला भेटेन त्या आधी तुम्ही घरातील सर्व सदस्य मिळून त्याला त्रिनेत्री परिवाराचा पुर्ण भुतकाळ सांगा. पुर्वी जेव्हा मी त्याला भेटलो होतो तेव्हा तो लहान आणि अजान होता. पुढे येणाऱ्या संकटांशी लढा देण्यासाठी त्याला शक्ति सह विद्देची सुद्धा गरज आहे. तो आपल्या सर्वांसाठी खुप महत्वाचा आहे.

अभिनव- 'होय गुरु. मीही याच गोष्टींचा विचार करत होतो. आजच्या दिवसाची मी खुप दिवसांपासून वाट पाहीली आहे. आजच तो दिवस आहे मला विश्वासच होत नाही.'

गुरु विश्वेश्वर - ' विश्वास ठेवावा लागेल अभिनव. माझा गुरुंनी मला सांगितल्या प्रमाणे तुमच्या घराण्याची पाचवी पिढी ही सुयुध्द आहे. तोच आहे जो तुमच्या घराण्याला आणि या जगाला वाचवू शकतो. तुम्ही मी आणि असे अनेक जणांनी 'कालाशिष्ट' वर मात करण्याचा प्रयत्नं केला. पण त्याचे काय फळ मिळाले ह्याची कल्पना तुम्हाला आहेच. तुमच्यापेक्षा जास्त वाट आम्ही विश्वेश्वर घराण्यानी पाहीली आहे. आज त्याचा अंताची सुरुवात आपण करायची आहे.

अभिनव - ' होय गुरु. तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे. मी तेवढ्यासाठी म्हणून इथे मंदिरात आलो. पूढे येणाऱ्या संकटांची मला कल्पना आहेच. मी घरी गेल्यावर सुयुध्दला सर्व हकिकत सांगतो. '

गुरु विश्वेश्वर - ' ठिक आहे अभिनव जा. शुभम्ं भवतु.'
इतके बोलुन गुरु विश्वेश्वर थांबतात. म्हातारा समजतो गुरु गेले आहेत. झालेल्या संभाषणाने तो आता निश्चिंत वाटू लागतो. आता तो घरी जाण्यास निघतो.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचे अतीत त्याला असे अचानक का आठवले
>> क्रुपया हिंदी शब्द जमल्यास टाळा, सुग्रास जेवण जेवत असतांना मध्येच खडा लागल्यासारखे होते.

prafullashimpi धन्यवाद आपल्या अमुल्य प्रतिसादा बद्दल. आपल्या सल्ल्यांबाबत प्रचंड आभार. वाचत रहा.