अपघात आणि व्यवस्था

Submitted by Nmate on 9 June, 2016 - 11:51

अपघात आणि व्यवस्था ..

नुकत्याच पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर झालेल्या आक्सिडेंट ची बातमी वाचण्यात आली , सतरा लोकांचा नाहक बळी कोणाच्या तरी चुकी मुळे , रोज कुठल्या ना कुठल्या आक्सिडेंट ची बातमी असतेच आणि त्या मध्ये बळी गेल्यांची संख्या..पण हे आक्सिडेंट्स का होतात ह्याची करणे बातमीत असली तरी त्याकडे कोणी गांभीर्याने घेत नाही. मी भारतामध्ये जवळपास ५ वर्ष गाडी चालवलीय आणि नंतर अमेरिका मध्ये मागील सहा महिने चालवत आहे. मला आता दोन्ही ठिकाणचे फरक स्पष्टपणे समजत आहेत. एक जाणवते की आपल्याकडे रस्ते चांगले आहेत पण सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून जी काळजी घ्याला पाहिजे ती घेतलेली दिसत नाही. काही नियम जे अमेरिकेमध्ये आहेत ज्या मुळे इथले रस्ते सुरक्षित आहेत गाडी चालवण्यासाठी ते भारतातही लागू होऊ शकतात असे वाटते.
आपण काही उदाहरणे बघू, पहिला आहे स्पीड लिमिट जे अमेरिकेमध्ये प्रत्येक रस्त्यांवर पाळावा लागते, त्यामुळे सगळ्या गाड्या एकाच स्पीड ने धावत असतात. दोन गाड्यामध्ये समान आंतर ठेवता येते. समोर ची गाडी आपल्या जवळ ही किती सेकेंड मध्ये येईल याचा अंदाज करता येतो. आणि आपल्याला पोहचायला किती वेळ लागेल ह्याची चिंता कमी होते. भारतामध्ये सुद्धा जर स्पीड लिमिट सिस्टम लागू केली तर वरील फायदे मिळू शकतात.
दुसर उदाहरण आहे ते स्टॉप साइन, अमेरिकेमध्ये प्रत्येक चौकात स्टॉप साइन जवळ कमीत कमी ३ सेकेंड थांबवा लागते, जरी बाकीच्या रस्त्यांवर कोणी नसेना. त्यामुळे चौकमध्ये होणारे आक्सिडेंट्स वाचतात आणि वाहतुक सुरळीत राहते, तसेच सिग्नल ची संख्या कमी होते. आपल्याकडे खूप आक्सिडेंट्स होतात ह्या एका कारणामुळे, मग ते शहरातले चौक आसूद्या नाहीतर हाइवे वरचे. आपल्याकडे हाइवे ला खूप क्रॉसिंग दिलेले असतात, काही मान्यताप्राप्त काही परवानगी शिवाय, ज्या मुळे गाड्या सरळ मेन रोड वर येतात आणि त्यामुळे मागून येणार्‍या गाडीला अपघात होण्याची शक्यता वाढते. अशी क्रॉसिंग्स काढून टाकली पाहिजेत.
तिसर उदाहरण आहे पिवळा सिग्नल ची वेळ, अमेरिकेमध्ये चौकाच्या मध्ये असताना सिग्नल लाल होणे म्हणजे गुन्हा नाही, आणि पिवळा सिग्नल ची वेळ जास्त असते त्यामुळे लोक आरामात पूर्ण सिग्नल क्रॉस करतात , या उलट आपल्याकडे पिवळा सिग्नल खूप कमी वेळ असतो आणि पोलीस जणू काही पलीकडे येण्याची वाट बघत असतात पावती फडायला, जणू काही मोठा गुन्हा केला आहे. अजुन एक मोठा फरक आहे तो हिरव्या सिग्नल चा, अमेरिके मध्ये दोन प्रकारचे हिरवे सिग्नल आहेत एक हिरवा बाण असलेला आणि दुसरा पूर्ण हिरवा असलेला , फरक हा आहे की जेंव्हा हिरवा बाण चालू असेल तिकडे बिनधास्त जायचे आणि पूर्ण हिरवा दिवा लागला की समोरच्या रस्त्याचा वरुन येणार्‍या गाड्या ना पण हिरवा सिग्नल असतो आणि जे लोक सरळ जाणार आहेत त्याना प्राथमिकता असते, आणि जे वळणार आहेत त्याना जो पर्यंत समोरून येणार्‍या गाड्या संपत नाहीत तो पर्यंत थांबवा लागते, लोक बिनधास्त चौकमध्ये गाड्या नेऊन थांबतात, या उलट आपल्याकडे फक्त एक्काच बाजूचा सिग्नल चालू असतो आणि कधी कधी तर सगळेच थांबलेले असतात..आणि त्यामुळे लोक कधी सिग्नल हिरवा होतोय ह्याची वाट पाहतात, आणि काही सिग्नल पाळत नाहीत. जर आपल्याकडे वर दिलेल्या सिग्नल प्रणाली सारखा बदल झाला तर रस्त्यावर वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल असे वाटते, त्यासाठी उड्डाण पूल असायला पाहिजे असे काही नाही.
अशी भरपूर उदाहरणे देता येतील की ज्यामुळे रस्ते सुरक्षित होऊ शकतील, एका माहिती नुसार भारतात दर चार मिनिटं मध्ये एक बळी जातो. बर्‍याच वेळा अपघात हे मानवी चुकी मुळे होतात असे दिसते कारण आपल्याकडे लाइसेन्स मिळणे खूप सोपे आहे, त्यामुळे तुम्हाला वाहन चालवायला परवाना मिळालाय ह्याची किंमत काय आहे हे जाणवत नाही, समजा नियम मोडला तर थोडेसे पैसे दिले के काम झाले हा समज पुढे अपघात होण्यास कारणीभूत ठरतो..आमच्या पुण्यातील सोसाइटी मध्ये छोटी मुलेसुधा ५०-७० च्या वेगाने गाडी चालवतात, आणि त्यांच्या पालकांना त्याचा अभिमान वाटतो. अमेरिकेमध्ये छोट्या गल्या आणि सोसाइटी मध्ये २५ पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवायची परवानगी नाही. आणि १६ वर्षा खालील मुला ना गाडी चालवायला परवानगी नाही , १८ वर्ष पर्यंत पालक बरोबर असणे गरजचे आहे. ड्राइविंग ची लेखी परीक्षा एवढी अवघड आहे की कमीत कमी आठ दिवस अभ्यास करावा लागतो. जी गोष्ट सहज मिळते त्याची किंमत राहत नाही म्हणूनच असे अपघात घडतात आणि नाहक बळी जातात. लहान मूल ही मोठ्यांना बघून त्यांचा अनुकरण करतात, त्यामुळे प्रत्येक पालकची ही जबादारी आहे की आपण स्वताहा नियमांचे पालन करावे म्हणजे आपली मूल सुधा करतील. जेवढी जबबदारी सरकारची आहे तेवढीच आपली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात राहूनही परदेशात काय आहे हे अनेकांना माहीत आहे. हे भारतात लागू कसं करायचं आणि कुणी याबद्दल प्रश्न आहे.

एक्स्प्रेस हायवेवर परवा झालेला भीषण अपघात बेशिस्तीमुळे झालेला होता. बेशिस्तीमुळेच बहुसंख्य अपघात होतात. बेदरकार प्रवृत्ती कारणीभूत आहे. इतर निरपराधांचेही नाहक बळी जातात त्याचे तर काही नसतेच कोणाला!

असो!

सुसंस्कृत नागरीक नावाची एक दुर्मीळ प्रजाती वाढायला हवी आहे.