आठवणींच्या राज्यात

Submitted by पूजा जोशी on 4 June, 2016 - 06:00

माझ्या पहिल्या लिखाणाला मायबोलीकरांनी मनापासून दाद दिली म्हणून ठरवले नीलचे आणखीन काही किस्से इथे लिहावे. किस्से लिहीण्याचा मुख्य हेतू नीलला मोठेपणी ही लक्षात रहावे आणि आपण कसे होतो हे काही अंशी आपल्या मित्र परिवाराला, बायको मुलांना सांगता यावे.आपण नाही का मुलांचे लहानपणीचे फोटो काढून ठेवतो आणि मोठेपणी ते बघून भूतकाळात फेरफटका मारून येतो तसा काहीसा प्रकार आहे हा.

तर किस्सा क्रमांक 2

स्वाइन फ्लू 

काल Trevor Noah चा एक video बघत होते.Trevor एक साउथ आफ्रिकन स्टॅन्डप काॅमेडीयन आहे. त्याच्या बहूतेक शो मधे तो अमेरिका आणि इंग्लंड या देशांकडून बाकी देशातील नागरिकांना कशी वागणूक मिळते ह्यावर भाष्य करताना दिसतो. 

तर काल मी बघत होते त्या व्हिडिओ मधे इबोलाच्या साथी दरम्यान US एअरपोर्टवर होणारी चौकशी, मजेशीर प्रश्न. विमानातून उतरण्या आधीच कसल्यातरी यंत्राने घेतली जाणारी इबोलाची चाचणी. विमानात लॅन्ड होण्याआधी केलेली जंतूनाशक फवारणी चे वर्णन होते. हे ऐकायला गमतीशीर असल तरी त्याला एक विशिष्ठ प्रकारची करूणेची किनार होती. असो. 

माझा सांगण्याचा उद्देश काय तर ते ऐकताना मला काही वर्षांपूर्वी मुंबईत पसरलेल्या स्वाइन फ्लूची साथ आठवली. त्या वेळी सकाळ संध्याकाळ ऑफिसच्या ईमेल बाॅक्समधे 'स्वाइन फ्लू ची लागण न होण्यासाठी कोणते उपाय कराल 'ह्याची माहिती दिली जायची. Hand sanitizer and mask वापरण्याचे पेव फुटले आणि त्या अनुषंगाने त्या बनविणार्या कंपन्यांचा वार्षिक उत्पन्नात वाढ झाली. 

लहान मुलांना शाळेत स्वाइन फ्लूची लक्षणे, आपण घ्यायची काळजी ह्याचे धडे दिले जावू लागले. अर्थात नील याला अपवाद नव्हता पण शाळेत शिकवलेले बहुतेक सगळे पचनी पडले नव्हते म्हणा किंवा लक्षात आले नव्हते. काही काही गोष्टीच ठळक पणे लक्षात होत्या.त्यात प्रामुख्याने लक्षात होता तो mask.  बहुतेक तो बाईंनी शाळेत दाखवला होता. 

तर एका दुपारी मी आणि नील आजी कडे जायला निघालो. रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. वर्मा टेलरच्या गल्लीत समोरून एक माणूस mask घालून येत होता. 'सरळ मार्गाने' चालणाऱ्या चिरंजीवांचे लक्ष mask कडे वेधले गेले. Baby's day out मधे नाही का त्या मुलाला पुस्तकातील चित्र आठवतात, तसाच काहीसा साक्षात्कार नीलला झाला.आईच्या लक्षात ही गोष्ट आणून द्यावी म्हणून साहेब जोरात बोंबलले, "आई तो बघ स्वाइन फ्लू ". वर त्या माणसावर बोट ही रोखले.रस्त्यावर असलेली दोन चार डोकी नीलने दाखवलेल्या दिशेने पाहू लागली.  

मला संकटाची चाहूल लागली. स्वाइन फ्लू आमच्या कडे रोखून बघत होता. तो आमच्यावर हल्ला करायच्या तयारीत होता.मी प्रसंगावधान दाखवून नीलला कडेवर घेतले.पळणं अशक्यच होते मग दिशा बदलली व भरभर चालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर होते, जवळ एक रिक्षा होती त्यात नीलला ढकलले आणि जलदगतीने रिक्षा चालव अस रिक्षाचालकाला सांगितले. स्वाइन फ्लू थोडा वयस्कर असल्याने त्याचा  फायदा घेऊन आम्ही निसटलो. 

विनाकारण पार्ल्यात फिरून आलो. नाही म्हणायला अवघ्या 13 रुपयात स्वाइन फ्लू पासून जीव वाचला होता.

किस्सा क्रमांक 1
http://www.maayboli.com/node/58891

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मज्जा Happy

आईच्या लक्षात ही गोष्ट आणून द्यावी म्हणून साहेब जोरात बोंबलले, "आई तो बघ स्वाइन फ्लू ". >>>> धम्माल गम्मत Rofl

Lol भारी आहे नील, मला माझ्या लेकाचा एक किस्सा आठवला.
तो तीन चार वर्षांचा असताना ती पेप्सी ची अॅड होती , सरदारजी सचिनला जोरात हाक मारून "ओय सच्चिन हॅव पेप्सी " असं म्हणायचा ती ad यशला (माझा लेक) भयंकर आवडायची आणि तो सरदारजी दिसला कि जोरात ओरडायचाच " ओय सचीन हॅव पेप्सी "
एकदा रेल्वे स्टेशन मध्ये मला त्याने लाज आणलीये असं ओरडून Lol