ट्रेकर्सची पंढरी...

Submitted by इंद्रधनुष्य on 31 May, 2016 - 03:30

बर्‍याच कालावधी नंतर मायबोलीकर भटक्यांचे पाय पुन्हा एकदा ट्रेकर्सच्या पंढरी कडे निघाले. यंदाची पाणी टंचाई आणि हवेतील उष्मा यामुळे ट्रेकला जाणे टाळले होते... परंतू मान्सुन पुर्व ट्रेकची ओढ आम्हाला स्वस्थ बसू देईना... मग एक से भले दो करत तब्बल १७ भटके एकत्र जमले ते हरिश्चंद्रगडाच्या मोहिमेला.. या मोहिमेने काय नाही दिले...

स्वागतला पाचनईतील सरडा... इडली विथ मार्टिन... चढाईच्या वेळची चुकामूक.. भास्कर कडील पिठलं भाकरी.. सूर्यास्ताच्या पार्श्वभुमी वरील उडीबाबांचा जल्लोष... कोकणकडयाच्या विशाल रंगमंचावर रंगलेला फाल्कन पक्षाचा वेगवान थरार.. रात्री टेन्टवर टपटपणारा पाउस.. धुक्यात हरवलेली पहाट.. सकाळी आठच्या सुमारास हुडहुडी भरवणारी कोकणकडयावरील थंडी... या रिफ्रेशमेन्टच वर्णन ना शब्दात मांडता येत ना फोटो मधे.. ते फक्त अनुभवायचंच... अट्टल भटक्यांच्या साथीनेच. Happy

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३ कलालगड

प्रचि ४ सौ. योरॉक्स यांच्या कृपेने...

प्रचि ५ Dusky Crag Martin

प्रचि ६ रांजण खळगे

प्रचि ७

प्रचि ८ केदारेश्वर

प्रचि ९ कोकणकडा

प्रचि १० कोकणकडा

प्रचि ११ कड्या वरुन दिसणारा माळशेज घाट

प्रचि १२ मावळतीचे रंग

प्रचि १३ रोहित मावळा

प्रचि १४ स्वछंदी

प्रचि १५

प्रचि १६ स्वरगंधारचा शिलेदार

प्रचि १७ योरॉक्स

प्रचि १८ आमचे प्रेरणास्थान Proud

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२ इंद्रवज्र टिपताना जिवेश..

प्रचि २३

प्रचि २४ गणेशगुहा

प्रचि २५ पुष्करणी

प्रचि २६ अलविदा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या रिफ्रेशमेन्टच वर्णन ना शब्दात मांडता येत ना फोटो मधे.. ते फक्त अनुभवायचंच... अट्टल भटक्यांच्या साथीनेच. >>>> अगदी अगदी ...

फोटो मस्त ...

१२, १५, १६ जगात भारी.
२३ म्हणजे ढगाचा धबधबाच दिसतोय.
इंद्रवज्र कुठाय?? ज्यासाठी केला होता अट्टाहास!

फोटो आणि वर्णन अ-फ ला -तू -न ____/\____

कोकणकडा काळजात घुसला >> +१ मस्तच

स्वरगंधारचा शिलेदार - अफलातुन Happy

इन्द्रदेवा, लई भारी! सगळीच छायाचित्रे अप्रतिम!

आमचा भाग आहेच मस्त निसर्गरम्य कोणत्याही ऋतुत जा तुम्हाला आनंदच देणार! Happy

ऑसम!!!!!!! कसली एनर्जी आहे प्रत्येक फोटोत.. तो बारा नंबरचा तर क्लासिक आहे..
मस्तं रे इन्द्रा... सुपर लाईक

तोफखाना इंद्रवज्र बद्दल माहिती साठी मस्त दुवा

योगायोगाने फेसबूकवर बरोबर ४ वर्षांपुर्वी मी आम्हाला दिसलेल्या इंद्रवज्राबाबत लिहिले होते त्याची आठवण फेसबुकनेच करून दिली. तोच लेख पुढे मी माबोवर देखिल टाकला. माझ्या माबो वरच्या लिहिण्याची सुरुवात ह्या लेखापासून झाली.

http://www.maayboli.com/node/39123

क्या बात है, इंद्रा!!!!

या रिफ्रेशमेन्टच वर्णन ना शब्दात मांडता येत ना फोटो मधे.. ते फक्त अनुभवायचंच... अट्टल भटक्यांच्या साथीनेच. >>>+१००० Happy

मस्त फोटो आणि वर्णन...
तुम्ही शिडी घाटातून गेलात की गणपती घाटातून....?
आणि वामन गाईड अजुन आहे का...?
पुर्वी आम्ही त्यांच्या बरोबर एकदा गडावर गेलो होतो....

निरु... शिडीघाट, गणेशघाट भिमाशंकरला जाताना लागतात. आम्ही पाचनई मार्गे हरिश्चंद्रगडा वर गेलो होतो.

येस... माय मिस्टेक.... अ बिग वन.... त्या वाटा भिमाशंकरच्या..
हरिश्चंद्र गड दोन वेळा केला...
पहिल्यांदा माळशेज घाट, खुबी फाट्यावरून..
आणि दुसर्‍या वेळी अलंग, कुलंग, मदन गडावरुन पाचनई मार्गे.... ह्याच वाटेला मला वाटत देवाची वाट म्हणतात...

Pages