Dermatoglyphics Multiple Intelligence Test करावी का?

Submitted by मी अमि on 30 May, 2016 - 00:40

आमच्या एका परिचीतांनी त्यांच्या मुलांची वरील टेस्ट करून घेतली. या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. तुमचे वेगवेगळे ईंटलिजन्स विश्लेषण करून रिपोर्ट तयार करतात म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences इथे दिलेल्या ईंटलिजन्स चे विश्लेषण करतात. त्यांच्या मते बोटांच्या ठशावरून या ईंटलिजन्स मॅपिंग करता येते.

  1. ही टेस्ट कोणी केली आहे का?
    साधारण कोणत्या वयात करावी?

मुळात बोटाच्या ठशांचा मेंदूशी संबंध असतो का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही टेस्ट माझ्या लेकीची केली आहे.
काही मते/अनुभव सांगते.
१) साधारण १० पुर्ण असताना २ वर्षां पुर्वी हि टेस्ट केली. एक परिचीत मागे लागले म्हणुन केली. तेंव्हा याबद्दल काहिच माहित नव्हते. ४००० रु. फ़ी दिली.
२) माझ्या मते हे ठोकताळे आहेत. त्यांच्या कडे ह्युज डेटाबेस असावा, ज्यावरुन बोटांचे ठसे घेवुन ते आहेत त्या डेटाबेस शी पडताळुन पाहुन साधारण कल दिला जातो.
३) अगदीच काहीही फ़ालतु असे नाहिये पण पुर्णपणे या टेस्ट वर विसंबुन निर्णय घेवु नयेत. (करिअर निवडणे इ.)
४) उजवा व डावा मेंदु चे जे काही कल आहेत त्याप्रमाणे प्रत्येकी ५ ५ स्किल्स आणि त्यातिल आपल्या मुलाचे मुल्यांकन असते.
डावा में.- इन्ट्रापर्सनल, लॉजिकल, लिन्गिविस्टिक इ.
उजवा में- इंटरपेर्सनल, विजुअल इमाजिनेशन, मुजिकल, विजुअल स्पेशिअल
इ.
५) अमच्या केस मधे- काही गोष्टी तंतोतंत बरोबर होत्या जसे की-
मुलीला कुठलेही काम एकटीने करणे आवडत नाही
आपापले वाचुन पेक्षा ऐकुन चांगले लक्षात राहते
नव्या भाषा पटकन शिकेल.
इ.इ.

एकुणच अभ्यास कसा घ्यावा- ऐकुन का वाचुन नीट लक्षात रहाते हे कळेल.
अमुक एक असे वागत असेल तर त्याचे कारण कळेल व आपली चिडचिड कमी होते व आपण उपाय शोधतो. (आमच्या केस मधे-सगळ्या गोष्टींनां एक सहायक का लागतो ते कळले.)
मुल मोठे असेल तर करिअर निवडीत मदत होईल. आपल्याला माहीत असलेला कल आणि या टेस्ट ने दिलेला कल पडताळुन पाहता येईल.

वर म्हणलय तसे ही टेस्ट करुन बघायला हरकत नाही. पण यावरुन निर्णय काही घेवु नये.

http://uniquebrain13.wix.com/uniquebrain#!personality/cxsu

https://en.wikipedia.org/wiki/William_Moulton_Marston

मलासुद्धा याबद्दल माहीती हवी आहे. कॄपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
एका टेस्ट साठीची फी काय असते? पुंण्यात २५०० पासून ते ५००० पर्यंत रेंज ऐकून आहे.

धन्स नीरा. माझा मुलगा पावणेतीन वर्षांचा आहे. या वयात मुलांचे बोटाचे ठसे विकसित झालेले असतात का हा सुद्धा एक मुद्दा आहे. एका विशिष्ट वयापर्यंत ते आई वडिलांची टेस्ट सुद्दा करणार आहेत आणि मग रिपोर्ट देणार.

हाताचे ठसे जेनेटीक असतात का? तसे नसेल तर आई वडीलांची टेस्ट कशासाठी ते कळले नाही.

धन्यवाद नीरा.
मि_अमि, आम्हाला टेस्ट सजेस्ट करणार्‍यांनी मिनीमम वय ४ वर्षे असायाला पाहिजे असे सांगितले आहे.

मी अमि-
तुमचा छोकरा लहान आहे या टेस्ट साठी असे वाटते.
१) या साठी वय ५ वर्षे आणि जास्त पाहिजे. हे त्या माणसाने सांगितले होते.
२) वैवाहिक समस्यां साठी पण ही टेस्ट करतात म्हणे.
३) आई-बाबांन च्या टेस्ट च नक्की काय कनेक्शन ते माहीत नाही...पण कदाचीत त्यांचा आई-बाबा- आणि मुल असाही डेटा-बेस असावा.
४) मेंदु आणि बोटाचे ठसे यांचा काय संबंध माहीत नाही पण आपण ही आपल्या वडिलधार्यां कडुन बोटांवरील चक्रे, डोंगर, शंख आणि त्या नुसार भाग्य असे काही ऐकलेले आहेच.
तसे काही असावे.

अजुन १-
हायपर/ ओव्हर अक्टिव्ह मुल असतात त्या मुलाच्या पालकांना या टेस्ट चा फ़ायदा झाला.
अभ्यास कसा घ्यावा, मुलाला एका जागी कसे बसवावे, काही खोड्या हा का करत असेल अश्या गोष्टींन साठी मार्गदर्शन मिळाले.
अर्थात आपल्या मुलाचा अभ्यास केला की हि उत्तरे मिळतातच पण त्याला आधार मिळाल्याने मनसिक बळ वाढले असे म्हणु शकतो.

अतिशय उत्तम टेस्ट आहे. पण त्याहून बेस्ट आणि पावरबाज व्हर्जन म्हणजे बंगाली बाबा. मुंबईच्या लोकलमध्ये जाहिरात असते. तिथे नंबर मिळू शकेल.

जीएस Happy

नीरा म्हणतेय तसं माझ्या ज्या परिचितांनी टेस्ट केलीय त्यांनाही त्यांची मुलं अशी का वागतात याची उत्तरं मिळाली.

मला कंपनीच्या माणसाने २ वर्षापासून ही टेस्ट करतात असे सांगितले, ते ऐकून मी थक्क झाले.

ही टेस्ट करुन बघायला हरकत नाही. पण यावरुन निर्णय काही घेवु नये.

मग कशाला करायची टेस्ट? माझ्यामते हे लोक पोपटामार्फत भविष्य सांगणार्‍यांची सुधारित आवृत्ती आहे.

आई वडीलांची सुद्धा टेस्ट करणार आहेत का?
>>>
नाही. मुलांचीच करणार. थोरल्याचे आहे ४ च्या पुढे पण धाकटा लहान आहे (३.५) तर त्याची नाही करणार मग.

वरचे प्रतिसाद आत्ता पाहिले. बरीच चर्चा होऊन गेलीये की त्या धाग्यावर. आता करावी की नाही करावी. फेरविचार करावा म्हणते.

मी माझ्या मुलाची टे स्ट केली. पुण्यातुन. इच्छुकांना नंबर पण देवु शकेन.

मी ही टेस्ट करुन घ्यायची कारणे-
१. मुलगा हुशार, चलाख असला तरी हायपर आहे.
२. मी बर्‍याच गोष्टी त्याला याव्या अस आग्रह धरत असते.
३. मुळात त्याच्या कडे काय स्किल सेट असु शकतो हे जाणुन घ्यायच होते.
४. एखादी गोष्ट जी आमच्या ५० पिढ्यात नाही ती त्याच्या कडे असेल, तर ती वेळेत कळावी , आणी पाठ्पुरावा करता यावा.

आता आलेले रिझल्ट्स-:
बरेचसे बरोबर. ७५ %
संगीतात प्रचंड गती असे दर्श् विते आहे. ते अपेक्ष्ति होतेच पण त्या बरोबर चेस हे ही सांगितले. जे मला आणि नवर्‍याला येत नाही. पण त्याने अवघ्या १५ दिवसात चांगली प्रगती दाखविलेली.

अति चंचलतेचा पॅटर्न आहे, त्यावर कसे काम करायचे ते सांगितले. त्या चे प्राविण्य असलेल्या बाबी सहित पुढे काय काय करिअर असु शकते यावरही चर्चा झाली.

शेवटी, नेट वर ५० पानाची कुंडली घेन्यापेक्षा मला हे विश्वासार्ह वाटले

शिकलेली माणसे असल्या स्युडोसायन्सवर विश्वास ठेवतात हे पाहुन आश्चर्य वाटले.

हे तर कायच नाय, ते मिड-ब्रेन ऍक्टिव्हेशन वाले मुलांना डोळे बंद करून वाचायला शिकवतात आणि वास घेऊन रंग ओळखायला शिकवतात. तुमच्या शाळेत नाही आले का ते अजून? छ्या अगदीच मागासलेली शाळा दिसतेय अशा शास्त्रशुद्ध पद्धती वापरत नाहीये ते. या स्पर्धेच्या युगात तुमच्या मुलांचा कसा काय टिकाव लागणार बाई?

पण तुम्च्या वर कोणी सक्ती तर नाही ना केली? ही टेस्ट करुन घ्यायची.

ज्यांना करुन घ्यावी का असे वाटते त्यांची चर्चा सुरु आहे. आपण मधे न पडणेच इष्ट.

मुळात ज्यांना मुले नाहीत तेही येतील आता धाग्याची वाट लावायला.

शिकली सावरली लोकं हत्तीचं डोकं बसवलेल्या अंगावरच्या मळापासून बनवलेल्या देवावर विश्वास ठेवतात. मग बाकीची कुठलीही गोष्ट विश्वासार्ह वाटली तर काय नवल!

मुग्धानंद-- तुमच्या दोन्ही पोस्ट ना अनुमोदन!

ही जाहीरात नाहिये आणि इथे कोणीही ही टेस्ट कराच असही सांगत नाहिये. उलट सर्व बाजुने विचार करुन निर्णय घ्यावा असा प्रामाणिक प्रयत्न आहे.

ज्यांना कोणाला हि टेस्ट पटत नाहिये..त्यानीं त्याची कारणे द्यावित म्हणजे सगळेच सावध होतील.

या टेस्ट चे अनुभव आले तसे सांगीतले आहेत.

पण तुम्च्या वर कोणी सक्ती तर नाही ना केली? ही टेस्ट करुन घ्यायची.
ज्यांना करुन घ्यावी का असे वाटते त्यांची चर्चा सुरु आहे. >>>>> अगदी बरोबर ! शेवटी निर्णय ज्याचा त्याचा .
लोक दोन्ही बाजूने बोल्णार , तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करावं.

मी माझ्या मुलाची हल्लीच टेस्ट करून घेतली .
टेस्ट करुन घ्यायची कारणे --
१. मुलगा चलाख आहे पण फार हायपर आणि मूडी आहे . कधीकधी अचानक डोक तापतं , टॅन्ट्रम्स दाखवतो , कधीतरी फार शहण्यासारखा वागतो.
२. त्याने काही गोष्टीत प्राविण्या मिळवावं ही माझी मनिषा . पण त्याला खरच त्या विषयात गति आहे का ? ते स्किलसेट त्याच्याकडे आहेत का ? हे जाणून घ्यायचे होते.
३. त्याचा अभ्यास कसा करवून घ्यावा , त्याच्या अभ्यासाच्या पद्धतीत काही बदल करावा का?
४. आमच्या ईतके वर्शांच्या निरिक्षणातून काही गोष्टी कळल्या होत्या , त्याला काहीतरी पुष्टी मिळावी म्हनून .
५. त्याचे काही सुप्त गुण आहेत का ? जे लवकर कळले तर त्याबाबत काही करता येईल , योग्य दिशेने काही प्रयत्न करता येतील.

एकंदरीतच त्याचे स्वभावविशेश कळावेत आणि त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करता यावेत.

( एक जागरूक पालक म्हणून तुम्हाला तुमच्या मुलाचे गुण-अवगुण , त्याला कसं सांभाळावं , त्याला कसं प्रोत्साहन द्याव हे कळायला पाहिजे , तुम्हाला नाही कळतं तर तिसर्या माणसाला काय कप्पाळ करणार , चाईड सयकोलोजिस्ट किन्वा काउन्सलर वगैरे या पेक्शा उत्तम मार्गदर्शन करू शकतात ,नुसते बोटांचे ठसे तपासायला ईतके पैसे खर्च करणार , करियर वगैरे ईतक्या लहान वयात काय करायचेय वगैरे वगैरे टोमण्यांना/टीकेला अप्रत्यक्षपणे अगोदरच तोंड देउन किन्वा दुर्लक्शुन झालं आहे, )

आम्हाला तरी रिजल्ट ८०% पटले.
पुढच्या वाटचालीसाठी काही टिप्स मिळाल्या .
सुधारणेसाठी काही उपाय सुचवण्यात आले,त्यावर काम चालु आहे.

फक्त एक आहे , उपायांनंतरची प्रगती ही फक्त निरिक्शणातुनच कळते. परत टेस्ट करून काही उपयोग होत नाही. रिजल्ट्स अर्थातच बदलत नाहीत.

आम्ही ज्यान्च्याकडून टेस्ट करवली त्यान्ची सगळ्यात लहान क्ल्यायंट दीड वर्शाची आहे.
( ईतक्या लहान वयात टेस्ट कदाचीत मी करवून घेतली नसती) .

अमि , माहीती मिळवं , ज्यानी टेस्ट केली आहे त्यान्चे प्रत्यक्श अनुभव ऐक , काय फायदा होतो ते विचार .
रिलाएबल कंपनी बघ.

शेवटी , या टेस्ट वर किती विश्वास ठेवायचा , ईतके पैसे घालायचे की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.

हाताच्या बोटांच्या ठश्यांवरुन बुध्दीमत्तेची चाचणी होऊ शकते हे खरचं अनाकलनीय आहे.
पूर्वी बिनाकष्टाने फार जास्त पैसे मिळाले की लोक बाबा बुवांच्या नादी लागत असत... >>> पण कित्येक बुवांच्या नादी लागल्याने फायदा होतच असेल की , काही ना काही अनुभव आल्यावरच त्यांचा भक्तगण वाढेल ना? जर अनुभवच आला नाही तर कोण कशाला अशा बुवांच्या नादी लागेल. Wink

<<या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. >>

----- अगदीच भम्पक टेस्ट आहे. अशा टेस्टवर विष्वास ठेवायची घोडचूक करु नका.

स्वत: च्या कर्तुत्वावर विष्वास ठेवा. सभोवतालची नोकरी-व्यावसाय यान्ची तत्कालीन परिस्थिती, तुमची स्वत:ची आवड, अभ्यासातली तुमची मजबूत तसेच कमकुवत बाजू तुम्ही स्वत: जाणायची आणि स्वत:ला आवड असणारे क्षेत्र निवडायचे. साधा, सोपा मार्ग.

हातावरच्या रेषा बघुन कुणी विश्लेषण करत असेल तर त्या चक्क थापा आहेत, कृपया थापान्ना बळी पडू नका.

पैसा जास्तच झाला असेल तर समाजकार्याला दान करा, गरिब लोकामधे वाटा...

मुग्धा, स्वस्ति तुमच्या मुलांची टेस्ट केली तेव्हा त्यांचे वय काय होते? पालकांची टेस्ट करावी लागली का?

माझा मुलगा आता साडेसहा वर्शाचा आहे , २-३ महिन्यापूर्वीच केली टेस्ट .
पालकांची टेस्ट नाही होत , म्हणजे त्यानी तस काही सांगितलं नाही .
पण पालकांसोबत एक काउन्सलिन्ग सेशन होतं .

अमि, माझा मुलगा ८ वर्षांचा आहे.
आमची टेस्ट केली नाही. समुपदेशन झाले.

स्वस्ति- आपल्या पोस्ट्स अगदी सेम सेम .

Pages