स्वर्ग त्यांचा अन मला पाताल आहे

Submitted by vilasrao on 11 May, 2016 - 02:24

पळपुट्यांच्या सोबतीला ढाल आहे
स्वर्ग त्यांचा अन मला पाताल आहे

मैफिलीला दाद देवू मी कसा रे
गायला तो राग बघ बेताल आहे

फेकलेले आज जोडे झेलतो मी
वाटते मग ही उद्याची शाल आहे

जिंकणारा डाव तेव्हा सोडला मी
ही तशी नावाजलेली चाल आहे

कुंपनावरचाच सरडा माजतो का
आज तो का हे म्हणे ' तू पाल आहे'

जीवलग माझा कुठे रे कोण आहे
काय जगता फार झाले हाल आहे

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेकलेले आज जोडे झेलतो मी
वाटते मग ही उद्याची शाल आहे.

अप्रतिम !

.......

इतरांच्याकडुन शाली खाण्यास चटावलेला