Submitted by जयदीप. on 19 May, 2016 - 08:22
पुढे आहेत सतराशे अटी
किती आहेत मागे कटकटी
शिजवता येत नाही डाळ मग
कशी येते बनवता आमटी
कडक आवाज आहे राहिला
जुनी आहे तशी ही फटफटी
कशी अाहेत झाडे येथली
क्षणापूर्वीच होती रोपटी
उगाचच वाट पाहत राहिला
निघाला एक रस्ता शेवटी
बरोबर शब्दही घेऊन ये
नको येऊस आता एकटी
तशी होती मला खात्री तुझी
सरळ होणार नाही शेपटी
जयदीप
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उगाचच वाट पाहत राहिला निघाला
उगाचच वाट पाहत राहिला
निघाला एक रस्ता शेवटी
बरोबर शब्दही घेऊन ये
नको येऊस आता एकटी<<< मस्त शेर
मतला रस्ता आणि शब्दही घेऊन ये
मतला रस्ता आणि शब्दही घेऊन ये हे शेर विशेष आवडले
बरोबर शब्दही घेऊन ये नको येऊस
बरोबर शब्दही घेऊन ये
नको येऊस आता एकटी
प्रथम वाचनात शेर खूप आवडला.
नंतर लक्षात आले कि उला मिसरा इतका स्पष्ट झालाय की सानी चे महत्व कमी होते आहे.
शेवट मस्त !
शेवट मस्त !
वा
वा
भारीच
भारीच
सगळ्यांचे मनापासून आभार वैभव
सगळ्यांचे मनापासून आभार
वैभव फाटक +१
वरच्या ओळीत अर्थाच्या शक्यतांचा विचार करता मी शेर रद्द केला नाही.