हर्बल टी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 18 May, 2016 - 23:30

मी एकदा गांधीभवन कोथरुड ला निसर्गोपचार आश्रमात एक व्याख्यान ऐकायला गेलो होतो. तिथे पाहुणचार म्हणून मला हर्बल टी दिला. मी प्रथमच तो घेतला. प्यायल्यानंतर तो चांगला वाटला. हा हर्बल टी नेमका काय प्रकार आहे? तो कसा करायचा? तो कुठे मिळतो?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उरळी कांचन च्या निसर्ग उपचार केंद्रात मिळते ही पावडर त्यावर लिहलेले असते त्यात काय-काय आहे ते
तिथे पुस्तक पण मिळते ही पावडर कशी बनवतात त्यावर.

प्रकाश, माझ्याकडे असलेली 'तळवलकर्स' ची हर्बल टी ची माहिती अशी आहे.

पुदिना आणि तुलसी पत्ता - प्रत्येकी ४-५
गवती चहा - १ ब्लेड
मिरं ( black pepper) - २-३
आलं - छोटासा तुकडा अंदाजे
जेष्ठ मध पावडर - १ चमचा

हे सगळं एकत्र बॉइल करुन, गाळुन चहाला substitute म्हणुन सकाळी आणि दुपारी प्यायचं. चवीला चांगलं लागतं. सवय झाल्यावर तर भारीच वगैरे लागतं. Happy

समर मधे मी ग्रीन टी/ रोस्टेड व्हिट टी पिते कारण मला बॉइल्स यायला लागले, म्हणजे वरचे सगळे पदार्थ उष्ण असावेत. पावसाळा आणि थंडीमधे मात्र जबरी लागतं हे मिश्रण.

हर्बल टी, हे फारच कॉमन नाव झालेय. त्याखाली काहिही येऊ शकते. साधारणपणे कुठल्याही औषधी वनस्पतींचा सौम्य काढा असे त्यावे स्वरुप. आपापल्या प्रकृतीनुसार आणि असेल तर आजारानुसार त्यातले घटक ठरवावेत.

भारतात तितकेसे लोकप्रिय नाहीत पण परदेशात डाळींब, संत्र्याची साल वगैरे अनेक घटक असलेले हर्बल टी मिळतात. तसेच काही आजारावर उपयोगी ठरतील असेही मिळतात.