कोरड्या खोकल्याची उबळ कशी थांबवावी?

Submitted by मनस्वीनी on 15 May, 2016 - 20:48

मला गेले ६-७ दिवस कोरडा खोकला झालाय, कफ वगैरे काही नाहीये . दर ५-१० मिनिटांनी अचानकच न थांबवता येणारा खोकला येतो. अशा वेळेला ऑफिसमध्ये विशेषत: मीटिंग मध्ये तर खूपच विचित्र वाटते …. बाकी लोकांना पण इरिटेट होत असणार Sad

आतापर्यंत हळद- दुध, लवंग-मध, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, strepsils हे सगळ करून झालाय पण फारसा फरक नाही.
इतर काही उपाय आहे का? allopathy औषध घ्यायचे टाळते मी शक्यतो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्विनी, मलाही कधी कधी असा कोरड्या खोकल्याचा त्रास होतो. ऑफिसमधल्या एकीने तर चक्क सिगरेट कमी करण्याचा थेट सल्ला दिला.. अर्थात गमतीने!
असा त्रास झाला की मी ऑफिसात देखिल चहा ऐवजी सरळ हळदीचे दुध घेतो.सोबत दिवसातून दोनदा-तिनदा मिठाच्या पाण्याच्या गुळण्याने लगेच फरक पडतो.
मी ज्या भागात राहातो (कँबेल्टाऊन व्हॅली) तो 'पोलन' ची एलर्जी असणार्‍यांसाठी थोडा त्रासदायक आहे. त्यामूळे यावर कायमस्वरूपी उपाय नाही आणि त्यावर माऊथ स्प्रे चा उपाय चांगला आहे, ज्याचे दुष्परिणाम नाहीत असे डॉ. सांगतात.
एकंदरीत कशाची एलर्जी आहे का त्यावरही लक्ष ठेवा.

thanks चंबू. allergy नाहीये मला कोणती… आणि मी रहाते chatswood मध्ये , इथे काही पोलन चा वगैरे त्रास नाहीये .
बहुतेक अजून वातावरण सकाळी गरम आणि रात्री बर्यापैकी थंड असते म्हणुन झाले असेल.

मलाही खोकल्याचा वरचेवर त्रास होतो. मी युज्वली ऑफिसमध्ये खोकला आला की कंठसुधारकवटीच्या १-२ गोळया किंवा १ लवंग तोंडात ठेवते. घसा शक्यतो कोरडा पडू द्यायचा नाही. कितीही उकाडा असेल तरी गरम/कोमट पाणी पिते. पुष्कळ फरक जाणवतो.
खोकल्याचे प्रमाण जास्त असेल तर रात्री झोपतांना अ‍ॅलोपथीचं औषध घेते.

५ /६लवंगा तव्यावर भाजुन, थोड्या गार झाल्यावर, चम्च्याने दाबुन बारिक करा किंवा कुटा (पुड नको) आणि छोट्या बाटलीत मध घेवुन साधारण १५ ते २० मि. ली. त्यात मिक्स करुन ठेवा . हे चाटण थोड थोड तासाभराने चाटत रहा. लगेच फरक पडतो. रात्रि झोपताना घेतल तर जो झोपेत ठसका लागतो तो लागत नाहि.

स्टेपसिल्स आधी बन्द करा जास्त स्टेप्सिल्समुळे घसा अजुन कोरडा पडतो आणि घशावर जखम होते (स्वानुभव आणि डॉक्टरी निदान) कोरडा खोकला लवकर कमी होत नसेल तर रक्ततपासणी आवश्य करावी पांढ-या पेशी वाढलेल्या असण्याची शक्यता असू शकते.

स्टेपसिल्स आधी बन्द करा जास्त स्टेप्सिल्समुळे घसा अजुन कोरडा पडतो आणि घशावर जखम होते >> बाप रे..हे मला माहितच नव्हते...लगेच बन्द करते.

ज्येष्ठमध किंवा कंठसुधारक वटि इथे मिळणे अवघड आहे.
सध्या लवंग-मध, हळद-दुध आणि कोमट पाणीच चालू ठेवते…उद्या नाही पडला तर मग डॉक गाठावाच लागेल

गुगल वर शोधताना एक मजेदार उपाय सापडला … खोकला आला कि दोन्ही हात खांद्याच्या लेव्हल पेक्षा वर डोक्यावर धरून उभं रहायच , खोकला आपोआप जातो… Happy
घरी ट्राय करिन… ऑफिस मध्ये केलं तर लोकांन्ना वाटेल कवायत चाललीये Lol

जुनाट खोकल्यासाठी एक उपाय सांगितला होता , शेजारच्या काकूंनी :
बेदाणे ( पिवळ्या मनुका ) उभ्या उलगडून त्यात अर्धी चिमुट मिरीपूड घालावी . आनि परत बंद करून , तोंडात ठेवून चघळ्यावा .

तुम्हाला चालत असेल तर व्हिस्की घेऊन बघा . लग्गेच फरक पडतो .
पण तुम्हाला व्हिस्की सहन नाही झाली तर बाकींच्यावर बराच फरक पडेल Proud

लिकोरिष नावाचा एक पदार्थ मिळतो. coles किंवा woolies मध्ये चॉकलेट/ candy सेक्शन मध्ये सापडेल. त्याचा तुकडा चघळत रहा.

मला पण असा त्रास झालेला आहे. फार जीव घाबरा होतो. व आपण खोकताना पाहून मुले दचकतात.
मी शोध घेतला तेव्हा मला असे सापडले की. मी जिथे झोपत होते तिथे फार च डस्ट होती. तसेच दिवाण नवा घेतले ला तेव्हापासून त्याचे पॅ किन्ग तसेच होते व त्यात बारीक धूळ अडकलेली होती. ती घशात जाउन त्रास होत होता. तर घरी / बेडरूम मध्ये पूर्ण जबरदस्त व्हॅक्यऊम करून घ्या. गरज असेल तर एअर फिल्टर सिस्टिम बसवा. तेच हपिसातही करून घ्या. तुमचा निद्ना ५०% त्रास नक्की कमी होईल.
फंगस डस्ट पोलन. ही मेन कारणे आहेत . त्या परते अजून खो गो नावाच्या गोळ्या, औषधे आहेतच.
एक लंग फंक्षन टेस्ट करून घ्या. तसेच सारखे कोमट गरम पाणी घुट्क्या घुटक्याने पीत राहणे पण आराम दायक असते.

खोकल्यावर काढा खूप चांगला उपाय आहे.

तुळशीचे पाने मुठभर (कृष्णवर्णीय असेल तर उत्तम)
लवंग ५/६
मीरी ५/६
सुंठ बोटभर
गवती चहा एक जुडी (ह्याने कफ वितळतो कारण गवती चहा गरम असतो. )
गुळाचा खडा - जास्त घातला तरी अपाय नाही साखरेसारखा.
हे सर्व नीट उकळायचे आणि ह्यात दुध न घालता हा चहा प्यायचा.

अनाशीपोटी प्यायली की जास्त फरक पडतो. कारण अनाशीपोटी पोटात अन्न नसते. अन्न जर पोटात असले तर अन्नच काढा शोषूण घेतो.
हा काढा चार पाच वेळा घ्यावा.

ज्येष्ठमधाची पुड कधी वापरु नये. त्यापेक्षा त्याची एक काडी वापरावी.

जर तुमच्याकडे लालकाळे डाळिंब मिळत असेल तर खोकल्यावर डाळिंब उत्तम उपाय आहे. एकदम फरक पडतो.

वरच्या उपायांनी खोकला थांबला नाही तर प्लीज डॉक्टरांकडून तपासून घ्या. कधी कधी हार्ट ट्रबलची ती सुरवात असू शकते. माझ्या आईला असे झाले होते. घाबरवत नाही पण फार काळ घरगुति उपायांवर विसंबून राहू नका.

अलोपथीची औषधे घेत नाही म्हणताय, पण ब्लड प्रेशरच्या काही गोळ्यांनी पण असा त्रास होतो. ( हा माझा अनुभव ) डॉक्टर, गोळ्या बदलून देतात.

चंबू शी सहमत. Pollen Allergy चा सध्या सुकाळ आहे. दिसत नाहीत pollen पण असतात ते Happy कोरडा खोकला हे अगदी पहिले लक्षण. त्यावर कितीही आयुर्वेदिक औषधे घेतली तरी फारसा उपयोग नाही.

<< Pollen Allergy चा सध्या सुकाळ आहे. >> +१. साध्या Groceries घ्यायला गेलो तरी सर्वत्र खोकल्याचा सुकाळ चालू आहे.

गेले ३-४ दिवस आधी ताप आणि आता residual खोकल्याने बेजार झालो आहे. दिवसा विशेष त्रास नाही पण रात्री झोपणे अशक्यच. कोरड्या खोकल्याची जोरदार उबळ येते. तीसुद्धा इतकी जोरदार की २ दिवस अँटीबायोटिक्स आणि कफ सिरप चालू असूनही कसलाही फरक नाही. मी दोन दिवस खालील उपायाने टिकलो आहे.

१. मधात सितोफलादी चूर्ण एकत्र करून अर्धा चमचा चाटण करणे. याने पहिली रात्र छान फरक पडला. ५-६ तास सलग झोप झाली.
२. वरच्या उपायाला दुसर्‍या दिवशी खोकल्याने आजिबात दाद लागू दिली नाही. म्हणून कढत पाण्याच्या गुळण्या झाल्यावर हळद-दूध पिऊन एकाऐवजी २ उशा डोक्याखाली घेऊन झोपलो. शांत आणि पूर्ण झोप झाली.

आज काय करावे लागतेय ते नंतर इथे टाकेन. हे उपाय सोडून तुम्हाला काही उपाय कळाले तर इथे नक्की पोस्टा......
हे सर्व चालू असताना अ‍ॅलोपॅथिक औषधे बंद करू नका हे वे सां न ल.

लिकोरिष म्हणजे जेष्ठमध...>>> बघितलाय बहुतेक woolies मध्ये पण चोकलेट समजून दुर्लक्ष केलं होतं …. आज घरी जाताना बघते .

@अमा … मी रहाते तिथे धुळ नावाला पण सापडत नाही , त्यामुळे ते कारण नसावे .

@हर्ट … तुम्ही सांगितलेला काढ्याचा उपाय चांगला आहे . आज रात्री करते, फक्त गवती चहा नाहीये .

रात्रभर झोप नाही लागली खोकल्याने Sad
आज ऑफिसमध्ये लवंग आणलीये , सकाळपासुन चघळत आहे … शिवाय हळद-दुध, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या हे चालूच आहे …

धन्यवाद सर्वांनाच लगेच उपाय सुचवल्याबद्दल … आणि प्लीज मला अहो-जाहो नका ना म्हणू… फक्त खोकला झालाय मला… मी नाही म्हातारी झाले Lol

@दिनेश … मी allopathy ची औषधे सहसा टाळते …म्हणजे ताप वगैरे आला तरी २ दिवसात जातो काही न करता
बाकी इतर कोणत्या गोळ्या, सप्लीमेण्ट्स वगैरे पण नाहीयेत .

आता खोकल्यासमोर नाइलाज झाला तर मात्र घ्यावेच लागेल अलोपथीचे औषध.

>>woolies मध्ये पण चोकलेट समजून दुर्लक्ष केलं होतं …. आज घरी जाताना बघते . << का कुणास ठाऊक पण इथले (वूलवर्थ) जेष्ठमध एकदा मला पांचट वाटले होते चवीला..इंडियन शॉप मधे बघा..